(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सामाजिक शिष्टाचार – सौजन्याचे दुसरे नाव लुफतान्सा

    सकारात्मक दृष्टीकोन आणि सहवेदना असेल तर कोणत्याही ठिकाणचे कर्मचारी ग्राहकांचे हित बघतील, त्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतील. लुफतान्सा या जर्मन हवाई प्रवास कंपनीचे कर्मचारी प्रवाशांना सर्वतोपरी मदत करण्यास सगळे कर्मचारी उत्साहाने झटत असतात.

      October 12, 2018


  • नातं स्वयंपाकघराशी

    वयाप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे नाती बदलतात. मग ती माणसांशी जुळलेली नाती असोत, अथवा वस्तू-वास्तूंशी. प्रत्येक नात्याचा स्वतंत्र विकासक्रम असतो. नातं जन्मतं, उमलतं आणि घडत राहतं. माणूस आणि घर यांचे संबंध घनिष्ट असतात. माणूस घराला घडवतो, घर माणसाला. घर म्हणजे केवळ खांबा भिंतींवर तोललेल्या छताछपरांची इमारत नसते. माणसांना निवारा देणारं ते विश्रांतिस्थान असतं.

      July 14, 2023


  • कर्मफल

    निष्कर्ष एकच.….ईश्वराच्या राज्यात देर जरी असला तरी अंधार नाहीच नाही.अन्याय तर नाहीच नाही! सर्वांनाच योग्य वेळी आपल्या “पापपुण्य कर्माचा” हिशेब चुकता करावाच लागतो!

      January 26, 2022


  • पोलिओमुक्त विश्व

    विश्वाच्या कल्याणासाठी पोलिओ जगताचा अनभिषिक्त सम्राट होण्याच्या आकांक्षेने महायुद्धात उतरलेला हा योद्धा कोण असेल बरे ! त्याची आयुधे आहेत सूक्ष्मदर्शकयंत्र , परीक्षा नळ्या , चंचुपात्र आणि युद्धभूमी आहे प्रयोगशाळा , तर शत्रू आहे पोलिओ .

      August 21, 2024


  • कायस्थ प्रभुंची कोकण परिसरातील देवी-स्थाने !

    चांद्रसेनीय कायस्थ प्रभु ज्ञातीचा इतिहास हा मुख्यतः स्थलांतराचा इतिहास आहे. इ.स. १३०५ मध्ये मांडवगडच्या पतनानंतर महाराष्ट्रात मुख्यतः कोकण आणि मावळ प्रांतात जी कायस्थ प्रभु कुटुंबे स्थलांतरित झाली त्यांनी ते रहात असलेल्या परिसरातच अध्यात्मिक आधार शोधायचा प्रयत्न केला.

      June 28, 2025


  • श्री भ्रमरांबाष्टकम् – ९

    गायत्रीं गरुडध्वजां गगनगां गान्धर्वगानप्रियांगम्भीरां गजगामिनीं गिरिसुतां गन्धाक्षतालंकृताम् ।
    गङ्गागौतमगर्गसंनुतपदां गां गौतमीं गोमतीं
    श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये ॥ ९॥

    एकच अक्षर किंवा शब्द वारंवार वापरण्याला साहित्यात अनुप्रास अलंकार असे म्हणतात. मागील श्लोकात आचार्यश्रींनी क चा उपयोग करून तर या श्लोकात ग चा उपयोग करून अनुप्रास साधला आहे.

    गायत्रीं - ज्याचे गायन केल्याने साधक तरुन जातो, त्या मंत्राला गायत्री म्हणतात. सर्वच मंत्रांचे गायन अर्थात आनंद पूर्ण उच्चारण करावे.

    गरुडध्वजा- गरुडध्वज म्हणजे भगवान विष्णू. त्यांची सहधर्मचारिणी.

    गगनगा- गगन म्हणजे आकाश. त्यातून ग म्हणजे गमन करणारा अर्थात भगवान सूर्य. तशी तेजस्वी. त्याच्या प्रकाशाच्या मागे असणारी चैतन्यशक्ती. ज्ञानशक्ती.

    गान्धर्वगानप्रिया- देवतांचे जे विविध प्रकार आहेत, त्यापैकी गायन प्रवीण असणाऱ्या देवतांना गंधर्व असे म्हणतात. हाहा, हूहू, तुंबरू अशा अनेक गंधर्वांचे वर्णन शास्त्रात आहे. त्या गंधर्वांच्या द्वारे केल्या जाणारे गायन अत्यंत प्रिय असणारी.

    गम्भीरा- अत्यंत गहन. सहजा सहजी पार न लागणारी. अपार. अथांग. अनाकलनीय.

    गजगामिनी- हत्तीप्रमाणे शांत, गंभीर तथा आकर्षक गतीने चालत जाणारी.

    गिरिसुतां- गिरी म्हणजे पर्वत. त्यांचा राजा तो हिमालय. त्याची कन्या. पार्वती. गन्धाक्षतालंकृताम् - मस्तकावर गंध आणि त्यावर अक्षता धारण केलेली.

    गङ्गा- गंगा म्हणजेच गमनशीला . गमन अर्थात गती हा चैतन्याचा विषय. त्यामुळे गंगा म्हणजे चैतन्यमयी.

    गौतमगर्गसंनुतपदां - गौतम, गर्ग इ. ऋषिमुनींनी चरण वंदना केलेली.

    गां- गोमाता स्वरूप असलेली.

    गौतमीं - महर्षी गौतमांवर आलेले गोहत्येचे बालंट दूर करण्यासाठी त्यांनी तपश्चर्या केल्यामुळे प्रगटलेली गोदावरी स्वरूप असलेली.

    गोमतीं- दक्षिण भारतात गोमती नदी स्वरूप असलेली.

    श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये - श्रीशैल पर्वतावर निवास करणाऱ्या आई जगदंबा भ्रमराम्बेचे मी भजन करतो.

    जय भ्रमराम्बा !

    -- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

      April 11, 2020


  • दोन आठवडय़ात ४ किलो वजन घटवण्यासाठी वेट लॉस डाएट प्लॅन

    * काबरेहायड्रेट्स आणि प्रोटिन्सचे मिश्रण असलेले जेवण दिवसातून ६ वेळा घेणे गरजेचे आहे.

    रात्रीचे जेवण नेहमी हलके घ्या, ज्यात फायब्रस काबरेहायड्रेट्सचा समावेश असेल. सॅलड किंवा सूप, यांच्यासोबत मासे, चिकन, मलईरहित पनीर यांसारख्या प्रोटिनसमृद्ध पदार्थाचा समावेश करा.

    * काबरेहायड्रेट्स, शर्करा आणि चरबी, सोडियमचे प्रमाण अधिक असलेल्या तळलेल्या पदार्थाचा समावेश जेवणात करणे टाळा.

    * शरीरातील चरबी वेगाने घटवण्यासाठी ओमेगा ३ फॅट्सचा आहारात समावेश करा. अक्रोड, बदाम आणि फ्लाक्स सीड्सचा अंतर्भाव तुमच्या जेवणात करा.

    * शरीरात पाण्याचे योग्य प्रमाण राहील याची काळजी घ्या. डिहायड्रेट झालेले शरीर वजन घटवू शकत नाही, त्यामुळेच किमान ३ लिटर पाणी दिवसाला प्यायलेच पाहिजे.

    * संध्याकाळचे अति खाणे टाळून त्यांच्या जागी दाणे, गाजर, काकडी यांचा समावेश करा.

    * ओट्स, बाजरी, ज्वारी, नाचणी, गहू, सॅलड, भाज्या आणि फळे यांसारखे फायबर असलेले कॉम्प्लेक्स काबरेहायड्रेट्स खाणे वजन घटवण्याची गुरुकिल्ली आहे.

    * तुम्ही किती व्यायाम करता यावरही प्रत्येक आठवडय़ाला तुमचे वजन किती कमी होईल हे अवलंबून असते. आठवडय़ातील तीन दिवस वेट ट्रेिनग आणि तीन दिवस धावणे, पोहणे यांसारखी काíडओव्हॅस्क्युलर ट्रेनिग आठवडय़ातून ३ वेळा करणे गरजेचे आहे.

    * मासे किंवा मटणपेक्षा चरबीचे प्रमाण कमी असलेले प्रोटिनयुक्त चिकन खाणे महत्त्वाचे आहे. शाकाहारींसाठी मलईरहित (स्किम्ड) दुग्धजन्य पदार्थ, दही आणि पनीर खाणे कधीही श्रेयस्कर.

    * दिवसभर उपाशी राहण्यापेक्षा दर २ ते ३ तासांनी खाणे कधीही योग्य. त्यामुळे अधिकाधिक कॅलरी जाळण्यास मदत होते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      January 2, 2017


  • भाकीत – वितळणाऱ्या बर्फाचं

    बर्फाच्या वितळण्याची भाकितं करणाऱ्या प्रारूपांच्या निर्मितीतली अडचण ही आहे की, समुद्रावरच्या बर्फाचं प्रमाण हे अनेक घटकांवर अवलंबून असतं – वातावरणातल्या घटकांवर तसंच समुद्राच्या पाण्यातल्या घटकांवर! त्यामुळे या प्रारूपांची अचूकता ही काहीशी मर्यादितच असते.

      December 18, 2021


  • सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्या …. गूढरम्य डोंगररांगा …

    पावसाळा … सह्याद्रीच्या ऋतुचक्राचा राजा …. आणि दुर्गराज किल्ले रायगडाच्या हिरकणी बुरुजावरून दिसणारा हा सह्याद्रीच्या दुर्गम … जंगली मुलुखाचा नजारा … घनघोर कोसळणारा पाऊस खऱ्या अर्थाने बघायचा … अनुभवायचा असेल तर सह्याद्रीच्या गाभ्यात वसलेल्या किल्ले रायगडावर जायला हवं …टकमक टोकावरून दिसणारं काळ नदीचं खोरं … कोकणदिवा … लिंगाण्याचे थोरले डोंगर …. कडे … एकीकडे भवानी कडयावरुन दूरवर दिसणारे राजगडाचे डोंगर … तर हिरकणी बुरुजावरून दूरवर असलेल्या जावळीच्या निबिड अरण्याने वेढलेल्या शंभू महादेव डोंगररांगा … त्यावरचा प्रतापगड… रायगडाचा सगळा घेर प्रचंड मोठा …फोटोत त्यातल्या एका बाजूची थोडी कल्पना येईल

      August 4, 2019


  • मिडिया इंडस्ट्रीची हाक

    मुंबईच्या केसी कॉलेजमधून B.A.FTNMP पदवीधर. संगीत, वाचन, फोटोग्राफी, पर्यटन ह्यांची आवड. वयाच्या अठराव्या वर्षापासून झी, सोनी, कलर्स, अशा विविध चॅनल्सबरोबर प्रॉडक्शन युनिटमध्ये असिस्टंट एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम केले.

      June 21, 2022