(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • श्री शारदा भुजंगप्रयात – भाग १

    भगवान गणेशांच्या स्तोत्रांनंतर जगदंबेच्या स्तोत्रांच्या रसग्रहणाला आरंभ करताना आज नेमकी वसंत पंचमी असावी हा नियतीचा सुंदर योगायोग. वसंत पंचमी हा ज्ञानदायीनी देवी शारदेच्या, सरस्वतीच्या पूजनाचा दिवस

      January 28, 2020


  • दिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे

    ‘दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्ती’ या तत्वांना घेऊन आज आपण दिवाळी मोठ्या आनंदाने साजरी करुया. अलीकडच्या काळामध्ये दिवाळी हा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात येतो. आजच्या बदललेल्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये नवनवीन वस्तुंची खरेदी करणे, वेगवेगळ्या ठिकाणी कुटुंबासमवेत फिरायला जाणे, मौज मजा करणे, मित्रांसोबत पार्टी करणे, भरमसाठ महागाचे फटाके फोडणे इतकाच मर्यादित अर्थ आजच्या तरुणाईला माहीत आहे. हे तरुणाईच्या वेगळ्या प्रकारच्या उत्साहावरुन आणि वर्तनावरुन जाणवते.

      November 10, 2018


  • ममींमागचे चेहरे

    इजिप्तमधल्या पुरातन राजवटींतील प्रतिष्ठित घराण्यांतील अनेक व्यक्तींचे अवशेष आज ममींच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. या ममींचं पूर्ण शरीर उपलब्ध असलं तरी, ते कुजू नयेत म्हणून ममीत रूपांतर करताना, त्यांच्या शरीरातील पाणी काढून टाकलं जायचं. परिणामी या सगळ्या ममी अत्यंत शुष्क स्वरूपात आढळतात. या शुष्क स्वरूपावरून त्यांच्या मूळ चेहऱ्याची कल्पना येणं, हे जवळपास अशक्य आहे.

      January 1, 2022


  • मंगलाष्टक वन्स मोअर

    “मंगलाष्टक वन्स मोअर” आजच्या काळातील तरुणाईचं मन, इच्छा-आकांक्षा, त्यांचे प्रोफेशनल व पर्सनल प्रश्न, प्रेमाच्या संकल्पना सांगणारा सिनेमा असल्यामुळे आपल्याला जवळचा वाटत राहतो कारण त्यातून सत्य देखील प्रगट होतं; अअणि म्हणूनच हा सिनेमा काहीसा वेगळा ठरतो.

      December 2, 2013


  • सचिनची निवृत्ती आणि १५० सह्यांचा संग्रह

    सचिनची निवृत्ती आणि १५० सह्यांचा संग्रह

    १४ नोव्हेंबर २०१३. सचिनने त्याचा शेवटचा कसोटी सामना याच दिवशी खेळला. सचिनच्या तब्बल १५० पेक्षा जास्त सह्यांचा संग्रह केलाय ठाण्यातील  `सह्याजीराव’ या नावाने ओळखले जाणारे `सतिश चाफेकर’ यांनी. 

      November 14, 2019


  • दत्तात्रेय म्हणजे साक्षात परब्रह्म

    ब्रह्म, विष्णु आणि महेश यांची एकत्रित अभिव्यक्ती असलेले दत्तात्रेय म्हणजे साक्षात परब्रह्म. त्रिगुणात्मक अशा या त्रिमूर्तीला 'परिपूर्ण' म्हणण्यास काहीच हरकत नसावी. ज्यांना अवघे विश्व 'गुरु' म्हणूनच ओळखते ते दत्त म्हणजे साक्षात ज्ञानच!! असे असूनही भागवत पुराणातील एकादश स्कंदात दत्त महाराजांच्या २४ गुरूंचे वर्णन आलेले आहे.

    पृथिवी वायुराकाशमापोऽग्नीश्चन्द्रमा रविः |
    कपोतोऽजगरः सिंधुः पतङ्गो मधुकृद गजः ||
    मधुहा हरिणो मीनः पिङ्गला कुररोऽर्भकाः |
    कुमारी शरकृत्सर्प ऊर्णनाभिः सुपेशकृत ||

    यांत पंचमहाभूतांपासून ते अगदी मासा, हरीण यांसारखे प्राणी आणि पिंगलेसारखी गणिका यांचाही समावेश होतो. स्वतः मूर्तिमंत ज्ञान असूनही अवघ्या चराचर सृष्टीतील प्रत्येक गोष्टीतून काही ना काही शिकण्याचा दत्तगुरूंचा संदेश अत्यंत महत्वाचा वाटतो. 'मला सगळं काही कळतं.' ही भावना निर्माण झाली की त्या व्यक्तीची प्रगती खुंटलीच म्हणून समजा. आपल्या आयुष्यातील प्रत्येक लहान- मोठी गोष्ट, माणसं वा प्रसंग आपल्याला काहीतरी शिकवत असतात. माणसाने शिकण्याची जिज्ञासा बाळगून सतत शिकत मात्र रहायला हवं.

    ।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।

      January 3, 2017


  • मंत्रपुष्पांजली

    खरं तर मंत्रपुष्पांजली हे एक राष्ट्रगीत आहे, विश्वप्रार्थना आहे. त्यात एकात्म राष्ट्रजीवनाची आकांक्षा आहे. आबालवृद्धांच्या हृदयांतील ज्योत जागविणारे स्फुर्तीगान आहे. द्रष्ट्या ऋषीजनांनी जाणतेपणाने प्रस्थापित केलेला प्रघात आहे. त्या विश्वगीताचा अर्थबोध सामान्यजनांपर्यंत पोहोचावा, नव्हे जाणत्यांनी प्रयत्नपूर्वक सामान्यांपर्यंत पोहोचवावा म्हणून या लेखाचे प्रयोजन

    मंत्रपुष्पांजलीमध्ये एकूण चार कडवी आहेत ती पुढीलप्रमाणे :

    (या मंत्रांचा अर्थ समजणे आवश्यक आहे. अर्थ समजला की अनुभूतीचा आनंद नक्कीच होईल.)
    प्रत्येक श्लोक व श्लोकाचा अर्थ येणेप्रमाणेः

    श्लोक - १ यज्ञेन यज्ञं अयजन्त देवाः तानि धर्माणि प्रथामानि आसन्
    तेह नांक महिमानः सचन्तयत्र पूर्वे साध्याःसंति देव:

    अर्थ - देवांनी यज्ञाच्याद्वारे यज्ञरुप प्रजापतीचे पूजन केले. यज्ञ आणि तत्सम उपासनेचे ते प्रारंभीचे धर्मविधी होते. जिथे पूर्वी देवता निवास (स्वर्गलोकी) करीत असत ते स्थान यज्ञाचरणाने प्राप्त करून साधक महानता (गौरव) प्राप्त करते झाले.

    श्लोक २ ओम राजाधिराजाय प्रसह्यसाहिने। मनोवयं वैश्रवणाय कुर्महे। स मे कामान् कामाकामाय मह्यं। कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय/ महाराजाय नमः

    अर्थ - आम्हाला सर्वकाही (प्रसह्य) अनुकुल घडवून आणणाऱ्या राजाधिराज वैश्रवण कुबेराला आम्ही वंदन करतो. तो कामेश्वरकुबेर कामनार्थी अशा मला (माझ्या सर्व कामनांची) पूर्ति प्रदान करो.

    श्लोक ३ (प्रथमार्ध) ओम स्वस्ति। साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ट्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं।

    अर्थ - आमचे सर्व कल्याणकारी राज्य असावे. आमचे साम्राज्य सर्व उपभोग्य वस्तुंनी परिपूर्ण असावे. येथे लोकराज्य असावे. आमचे राज्य आसक्तिरहित, लोभरहित असावे अशा परमश्रेष्ठ महाराज्यावर आमची अधिसत्ता असावी.

    श्लोक ३ (द्वितियार्थ)
    समन्तपर्यायीस्यात् सार्वभौमः सार्वायुषः आन्तादापरार्धात्। पृथीव्यै समुद्रपर्यंताया एकरा‌ळ इति।

    अर्थ - आमचे राज्य क्षितिजाच्या सीमेपर्यंत सुरक्षित असो. समुद्रापर्यंत पसरलेल्या पृथ्वीवर आमचे एकसंघ दीर्घायु राज्य असो. आमचे राज्य सृष्टीच्या अंतापर्यंत म्हणजे परार्ध वर्ष पर्यंत सुरक्षित राहो.

    श्लोक ४ तदप्येषः श्लोकोभिगीतो। मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसन् गृहे। आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति।।

    अर्थ - या कारणास्तव अशा राज्याच्या आणि राज्याच्या किर्तीस्तवनासाठी हा श्लोक म्हटला आहे. अविक्षिताचा पुत्र मरुताच्या राज्यसभेचे सर्व सभासद असलेल्या मरुतगणांनी परिवेष्टित केलेले हे राज्य आम्हाला लाभो हीच कामना.

    संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची, आकांक्षेची व सामर्थ्याची जाणीव प्रत्येकाला करून देणारीही विश्वप्रार्थना. अंतीम सत्य शोधण्याचे मार्ग अनेक असतील, पंथोपपंथ विविध असतील परंतु सर्वांचा उद्देश एक, सर्व मतपंथांच्या विषयी समादर, सर्व मतपंथाच्या प्रगतीच्या सर्वांना समान संधी असलेले, सर्वहितकारी राज्य तेव्हांच शक्य आहे जेव्हा संपूर्ण मानवजातीमध्ये सहिष्णु समरस एकात्मतेची भावना असेल.

      September 6, 2016


  • आधुनिक अमेरिकन शेती व पशुसंवर्धन – भाग ७

    पूर्वी गायीचं दूध हातानं काढावं लागायचं. आता बहुतेक ठिकाणी यंत्रांच्या सहाय्यांनी मिल्किंग पार्लर्समधे गायीचं दूध काढलं जातं. त्यामुळे पूर्वी छोट्या कौटुंबिक फार्म्सवर आई, वडील, मुलं मिळून ३०-४० गायींचं दूध काढता काढता थकून जायची. आता मोठमोठ्या डेअरी फार्म्सवर मिल्किंग पार्लरमधे हजारो गायींचं दूध दिवस रात्र काढलं जातं. बहुतेक डेअरी फार्म्सवर लॅटीन अमेरिकन मजूर हे दूध काढण्याचं काम करतात. दिवसातून दोनदा दूध काढलं जात असल्यामुळे बहुतेक मोठ्या फार्म्सवर हे मजूर दिवसपाळी / रात्रपाळीच्या कामगारांसारखे काम करतात. काही मोठ्या फार्म्सवर तर दिवसातून दोनच्याऐवजी तीन वेळां दूध काढलं जातं. त्यामुळे जवळ जवळ ८ तासांची एक अशा तीन कामाच्या पाळ्या चालू असतात.

    हे मिल्किंग पार्लर बहुदा फार्मवरच्याच एखाद्या स्वतंत्र इमारतीत असते. दिवसाच्या / रात्रीच्या ठरावीक वेळेला दुभत्या गायींना त्यांच्या राहत्या ठिकाणापासून चालत चालत या मिल्किंग पार्लर पर्यंत आणले जाते. तिथे त्यांना पाण्याचे फवारे मारून साफ सफाई करून दूध काढण्यासाठी तयार केले जाते. मिल्किंग पार्लरच्या क्षमतेनुसार एका वेळी साधारणपणे ८, १२, २४ किंवा ४८ गायी मिल्किंग पार्लरमधे घेतल्या जातात. गायी देखील शिकवल्याप्रमाणे न्हाव्याच्या दुकानात एकेका खुर्चीवर गिर्‍हाईकाने बसावे, त्याप्रमाणे एकेका मशीन समोर जाऊन उभ्या राहतात. गायींची उभी राहण्याची व्यवस्था अशी असते की गायी दोन बाजूंना समांतर रांगांमधे किंवा वर्तुळाकार आकारात उभ्या राहतात. मधल्या भागात ४ फूट खोलीचा खड्डा असतो त्यात दूध काढणारे मजूर उभे असतात. प्रत्येक गायीची कास साफ करणे, तिच्या आचळांना मशीनचे कप लावणे, प्रत्येक मशीन व्यवस्थित चालले आहे की नाही ह्याचेवर वरचेवर लक्ष ठेवणे, दूध काढून झाल्यावर आचळापासून मशीन दूर करणे, पुन्हा आचळावर जंतूनाशक औषध लावणे, ही सारी कामे हे दोन तीन मजूर धावून धावून करत असतात. प्रत्येक गायीच्या पुढ्यात, तिचे दूध काढले जात असताना खाद्य उपलब्ध असते, त्यामुळे एकीकडे यंत्राने दूध काढले जात असताना दुसरीकडे गायी शांतपणे खात असतात. सहा-सात मिनिटात दूध काढून संपले की सार्‍या गायी हलत डुलत आपल्या रहात्या ठिकाणी जाण्यासाठी चालू लागतात. गायींच्या एका बॅचचे दूध काढून संपले की मजूर तत्परतेने पाण्याचे फवारे मारून मिल्किंग पार्लर पुनश्च साफ करून ठेवतात आणि पुढच्याच मिनिटाला गायींची पुढची बॅच दूध काढून घेण्यासाठी मिल्किंग पार्लरमधे शिरते. हा प्रकार अव्याहत काही तास चालू रहातो आणि फार्मवरच्या शेकडो किंवा हजारो गायींचे दूध चार-सहा तासांत काढून होते. मधे काही तासांची मोकळीक आणि ‘पुनश्च हरी ओम’ म्हटल्याप्रमाणे गायी हलत डुलत मिल्किंग पार्लरची वाट चालू लागतात. काही फार्म्सवर जिथे दिवसातून तीन वेळा दूध काढले जाते तिथे तर शेवटच्या गायीचे दूध काढून होईपर्यंत पुन्हा पहिल्या गायीचे दूध काढायची वेळ येते. त्यामुळे दुधाचा हा महापूर दिवसरात्र अव्याहत चालूच असतो.

    वराहपालन देखील असेच औद्योगिक स्वरुपाच्या फार्म्सवर होऊ लागलं आहे. वराह उत्पादनाचे तीन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात वराहाची पैदास केली जाते. या ठिकाणी माद्या पिल्लांना जन्म देऊन त्यांना दोन-तीन आठवड्यांपर्यंत पोसतात. या सुमारास त्यांचे वजन ८ ते१२ पाउंड असते. दुसर्‍या टप्प्यात या पिल्लांना पुढचे सहा आठवडे खायला घालून त्यांचे वजन ४०ते ५५ पाउंड होईपर्यंत त्यांना वाढवतात. शेवटी तिसर्‍या टप्प्यात सहा महिन्यांपर्यंत या पिल्लांचे पोषण केले जाते आणि ती साधारणपणे २५० ते २९० पाउंड वजनाची झाली की त्यांची विक्री होते. साधारणपणे १९९२ पर्यंत बहुतेक सारे फार्म्स वराहांच्या उत्पादनाचे हे तिन्ही टप्पे स्वत:च संभाळत असायचे. परंतु आता असे फार्मस्‌ सापडणं अवघड होत चाललं आहे. मोठमोठ्या कंपन्या आता अनेक फार्म्सना हाताशी धरून सारा कारभार आपल्या हातात एकवटू बघत आहेत. फार्म्स देखील या तीन पैकी एखादाच टप्पा हाताळण्याचे कौशल्य मिळवू लागले आहेत.

    वराहपालनाच्या उद्योगातील कंपन्या लहान आणि मध्यम आकाराच्या फार्म्सना गिळंकृत करून मोठ्या होत चालल्या आहेत. आज अमेरिकेत दर वर्षी मार्केटमधे येणार्‍या सुमारे १०० दशलक्ष वराहांपैकी जवळ जवळ ७५% वराह केवळ ४० मोठ्या कंपन्यांच्या अखत्यारीत येतात. यावरून या मोठ्या कंपन्यांचा मार्केटमधील प्रभाव आणि त्यांची दादागिरी समजून यावी.

    -- डॉ. संजीव चौबळ

      November 29, 2015


  • प्लास्टिक – स्वास्थ्याचा टाईम बॉंब

    प्लास्टिकच्या निर्मितीसाठी बिस्फिनोल ए आणि थॅलेट्स ह्या दोन रसायनांचा वापर केला जातो. ह्यांना प्लास्टिसायझर्स म्हणतात. जगात कृत्रिम रसायनांच्या निर्मितीमध्ये सर्वात अधिक निर्मिती ह्या रसायनांची होत आहे.

      August 20, 2016


  • जोडीदार निवडतांना – भाग १

    काय करू काही समजत नव्हतं , कोणत्या स्थळाची / वराची निवड करू ? भल्या मोठ्या पगाराची शहरात नोकरी करणारा ,कि गेल्या तीनचार वर्षात स्वतःचा व्यवसाय सुरु केलेला , कि प्रगतिशील असलेल्या एखाद्या गावात स्वतःचा जमीन जुमला , बंगला , शेतकरी असलेला ग्रामीण भागात राहणारा .

      August 5, 2023