(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे

    भारतीय एकात्मतेची पुष्टी करणारी विधायक अध्ययनदृष्टी, आंतरशाखीय अभ्यासपद्धती ही ढेरे यांच्या विचाराची, लेखनाची वैशिष्ट्ये होती. एखाद्या व्रतस्थ ऋषीप्रमाणे त्यांनी सारे आयुष्य संशोधन, लेखन यांसाठी दिले. दैवतशास्त्र, सांस्कृतिक इतिहास हे त्यांच्या लिखाणाचे मुख्य विषय. ‘श्री विठ्ठल : एक महासमन्वय’ या ग्रंथासाठी १९८७ साली त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.

      July 21, 2021


  • रोहन कोकणे

    कोकणे, रोहन
    रोहन अजित कोकणे हा बेळगावचा मुलगा म्हणजे लिंबो स्केटिंगमधला चमत्कार आहे असे म्हणायला हरकत नाही, पण हा चमत्कार त्याने अथक परिश्रमानंतर केला आहे. हाँगकाँग येथे एका मॉलमध्ये सर्वाच्या समक्ष तो आपले शरीर जमिनीला समांतर करीत ६.७५ इंच इतक्या रुंदीच्या जागेतून रोलर स्केट्सने एका बाजूने दुसरीकडे गेला. यावरून त्याच्या शरीराच्या लवचिकतेची दाद द्यावी तितकी थोडी आहे. त्याचा हा जागतिक विक्रम आहे. तरुणांमध्ये व्यायामाची गोडी निर्माण व्हावी यासाठी आयोजित कार्यक्रमात त्याने ही करामत केली.
    विक्रम मोडणे ही त्याच्यासाठी नवी गोष्ट नाही. कारच्या खालून तो सहज पलीकडे जातो. त्याच्या विक्रमाची नोंद गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झाली आहे. त्याने २० मोटारींच्या खालून १२६ फूट ११ इंच इतके अंतर पार केले आहे. एवढे अंतर लिंबो स्केटिंग करीत कापणारा तो पहिलाच मुलगा आहे. गेल्या वर्षी मुंबईत त्याने जुहू एरोड्रोम येथे हा विक्रम सर्वासमक्ष केला होता. रोहन हा अकरा वर्षांचा आहे. लहानपणापासून त्याने या खेळात तपश्चर्याच केली आहे. अमेरिकेच्या झोए बेडा या मुलीच्या बरोबरीने स्केटिंगमध्ये त्याची कामगिरी आहे. बेडा ही ‘रोलर लिंबो प्रिन्सेस’ म्हणून ओळखली जाते. रोहन हा ‘रोलर लिंबो प्रिन्स’ आहे असे म्हणायला हरकत नाही. अनेक सामाजिक उपक्रमांतर्गत त्याने स्केटिंगची प्रात्यक्षिके दाखवली आहेत. त्याचे वडील अजित कोकणे यांचा विद्युत उपकरणांचा छोटा व्यवसाय आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती फार भक्कम नसतानाही काही प्रायोजकांच्या मदतीने रोहनने घोडदौड कायम ठेवली आहे. बेळगावच्या रोलर स्केटिंग अकादमीचे सूर्यकांत हिंदूळगेकर, शशिधर पोळ व उमेश कलघटगी यांनी त्याला प्रशिक्षण दिले. बेळगाव येथील सेंट झेवियर स्कूलचा तो विद्यार्थी आहे. तो विक्रमवीर असला तरी आई अनुपमा, वडील अजित तसेच प्रशिक्षकांना तो त्याच्या यशाचे श्रेय देतो, यातून त्याची विनम्रता दिसून येते. त्याने जिल्हा व राज्य पातळीवरील लिंबो स्केटिंग स्पर्धा प्रत्येकी दोनदा जिंकल्या आहेत. प्रत्येक वेळी आता तुला कसे वाटते यावर तो ‘अच्छा लगता हैं’ असे त्याच्या बालसुलभ शैलीत सांगतो.

      August 5, 2017


  • मराठीतील ‘गझल सम्राट’ सुरेश भट

    सुरेश भट हे मराठी गझल विश्वातील एक अजरामर नाव. मराठीतील 'गझल सम्राट' सुरेश भट यांचा जन्म १५ एप्रिल १९३२ रोजी झाला. त्यांच्याशिवाय मराठी गझल हा विषयच पूर्ण होत नाही. मराठी गझल आणि सुरेश भट हे समीकरण झालेलं होते. गझल मराठी माणसांपर्यंत पोहचवली ती सुरेश भट यांनी. गझलचे सादरीकरणाचे वेगवेगळे कार्यक्रम करून त्यांनी गझलचा प्रसार आणि प्रचार केला. ‘लाभले आम्हास भाग्य’ ही त्यांची गझल अनेक लोक म्हणतात, ऎकतात.

    सुरेश भटांनी यांनी उर्दू भाषेतील शेर शायरी, गझल यांचा आयुष्यभर मनापासून आभ्यास केला. गझल हा काव्य-प्रकार मराठीत रुजवला.हा त्यांचा प्रयास त्यांना ‘गझल सम्राट’ हा मनाचा किताब देवून गेला. विदर्भातील अमरावती या शहरात सुरेश भटांचा जन्म झाला. तिथेच ते लहानाचे मोठे झाले. वडील डॉक्टर असल्याने घरची परिस्थीती बरी होती. आणि त्यांच्या आईला कवितेची खूप आवड होती. यातूनच सुरेश भटांना कवितांची आवड निर्माण झाली. सुरेश भट यांना लहानपणीच मराठी कवितांची आवड निर्माण झाली. ते अडीच वर्षाचे असताना त्यांना पोलियोची बाधा झाली होती. त्यामुळे त्याचा उजवा पाय जन्मभरासाठी अधू झाला होता. त्यांचे सर्व शिक्षण अमरावती येथे झाले. बी.ए.ला अंतिम वर्षाला दोन वेळा नापास झाल्यानंतर शेवटी १९५५ साली ते बी.ए. पास झाले. त्यानंतर ते शिक्षकी व्यवसायात आले. अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागात नोकरी करताना त्यांनी त्यांचे कविता लेखन सुरू ठेवले होते. पण ते काही लिहित होते ती गझल आहे हे त्यांनाही माहिती नव्हते. त्यांना उर्दू भाषेचाही चांगलाच अभ्यास होता. सुरेश भट हे जरी विदर्भातील असले तरी महाराष्ट्राच्या कानाकोप-यात त्यांची ओळख होती.

    हॄदयनाथ मंगेशकर यांनी सुरेश भट यांना शोधून काढले आणि भटांच्या कविता, गझल त्यांनी संगीतबद्ध केल्या. मराठीतील अनेक प्रसिद्ध सिनेमांमध्ये त्यांच्या गझल घेण्यात आल्या. मा.सुरेश भटांनी एकूण पाच गझलसंग्रह लिहिले त्यात ‘रूपगंधा’, ‘रंग माझा वेगळा’, ‘एल्गार’, ‘झंझावात’, ‘सप्तरंग’ यांचा समावेश आहे. वेगवेगळे रस, रंग असणारी मराठी गझल त्यांनी रेखाटली. फक्त श्रृंगार, प्रेम, विरह इतकच नाहीतर त्यांनी आपल्या गझलमधून समाजाचे दु:ख मांडले, राजकीय लोकांचा भ्रष्टाचार मांडला. बदलता समाज, बदलती माणूसकी मांडली. त्यांच्या अनेक गझल बी.ए.च्या अभ्यासक्रमात घेण्यात आल्या. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य गझलसम्राट म्हणजे सुरेश भट असे वर्णन सुरेश भट यांचे करता येईल. आज त्यांच्यमुळे मराठी गझलला मानाचे स्थान मिळाले आहे. त्यांच्या गझल संग्रहांना आजही मोठी मागणी आहे. त्यांची गझल ही कोणत्याही एका वर्गाची नव्हती. अनेक साहित्यिकांनी गझलला मान्य केले नव्हते पण सुरेश भट लढले आणि त्यांनी गझलला अधिकॄत सन्मान मिळवून दिला.

    सुरेश भटांनी गझल फक्त त्यांच्यापुरतील मर्यादीत न ठेवता अनेकांना ती शिकवली. आज महाराष्ट्रात त्यांच्याकडून गझल शिकलेले कित्येक गझलकार आहेत. मा.सुरेश भट हे फक्त गझलकारच नाही तर एक तडफदार पत्रकार देखील होते त्यांनी त्यांचे एक साप्ताहिक देखील सुरू केले होते. ज्यातून त्यांना परखड लिखाण केले. समाजातील प्रत्येक घटनेवर त्यांचं चौकस लक्ष असायचं. त्यावर ते बेधडकपणे लिहायचे. त्यांची व्यक्तीमत्व कलंदर व्यक्तीमत्व होतं असं अनेकदा बोललं जायचं. आणि त्यात तथ्यही आहे. इतकी प्रसिद्धी मिळाल्यावर देखील त्यांनी कधीही पैशांना महत्व दिले नाही. त्यांनी फक्त गझलचा प्रसार केला. ते लिहित गेले. त्यांनी भरभरून लोकांना दिले. त्यांच्या शिष्यांमध्ये कधीही भेदभाव केला नाही. जो येईल त्याला ते शिकवायचे. त्यांच्या झोळीत ते काहीच शिल्लक ठेवत नव्हते. सर्व लुटवून टाकायचे. मा.सुरेश भटांनी गझलकारांना गझलेच्या तंत्रावर, व्याकरणावर माहिती म्हणून ‘गझलेची बाराखडी’ नावाची एक पुस्तिका लिहिली होती. वाचक-रसिक, सगळ्यांनीच ही पुस्तिका वाचावी, संदर्भासाठी जवळ बाळगावी अशी आहे. नवोदित कवींना गझल कळावी म्हणून ते ही पुस्तिका त्यांना स्वखर्चाने पत्रासोबत पाठवीत असत. सुरेश भटांनी गझलसाठी आपलं जीवन वाहून टाकलं होतं. आज मराठी गझल लिहिणारे, गाणारे कित्येक गझलकार तयार झाले आहेत. पण सुरेश भटांनी जे पेरलं होतं ते पुन्हा उगवेल याची जरा शंकाच आहे. त्यांनी अनेकांना एकत्र आणून गझलचा प्रसार केला होता. पण आता परिस्थीती जरा वेगळी आहे. सुरूवातीच्या काळात मराठी गझल एकीकडे आणि मराठी कविता एकीकडे असे होते. आज मराठी गझल लिहिणा-यांमध्येच कित्येक ग्रुप तयार झाले आहेत. मी मोठा की तो मोठा ह्या गोष्टी आता पुढे यायला लागल्या आहेत. त्यामुळे सुरेश भटांनी ज्या उद्देशाने गझलला जीवन अर्पण केले होते, तो उद्देश आजच्या पिढीतील गझलाकारांमधून हरवल्याचे चिन्ह दिसत आहेत. पण तरीही एक गोष्ट मात्र, नक्की की सुरेश भटांप्रमाणे गझलेचे तंत्र जपणारा सुद्धा एक वर्ग आहे हे महत्वाचं. सुरेश भट यांनी मराठी गझलच्या विश्वात अमूल्य असं काम केले होते. त्यांच्या गझल व कविता हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर, आशा भोसले, सुरेश वाडकर, भिमराव पांचाळे यांसारख्या अनेक मोठ्या गायकांनी गायल्या आहेत. गडचिरोली येथे भरलेल्या ३९ व्या विदर्भ साहित्य संमेलनचे ते अध्यक्ष होते. आयुष्याच्या अखेरच्या पर्वात त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता. सुरेश भट यांना दोन मुले. त्यापैकी चितरंजन हे सुद्धा वडीलांच्याच पावलावर पाऊल देत एक उत्तम गझलकार म्हणून प्रसिद्ध आहेत. सुरेश भट यांचे १४ मार्च २००३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    सुरेश भट नक्षत्रांचे देणे
    https://www.youtube.com/watch?v=DygZQRv4JD8
    रंग माझा वेगळा
    https://www.youtube.com/watch?v=r8LGpFQKkpQ
    https://www.youtube.com/watch…

      April 15, 2019


  • मिलिंद गुणाजी

    महाराष्ट्रातील गडकिल्ले आणि अन्य प्रेक्षणीय स्थळे यांची दूरचित्रवाणीच्या पडद्यावर ओळख करून देणारे मिलिंद गुणाजी यांचे ते कार्यक्रम अतिशय लोकप्रिय आहेत. मिलिंद गुणाजी हे उमदे आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व आहे यात शंकाच नाही.

      July 16, 2022


  • राम शेवाळकर

    अमोघ वाणी लाभलेला वक्ता, कवी, ललित लेखक, समीक्षक, विचारवंत ही ओळख राम शेवाळकर यांची.

      February 4, 2010


  • मराठी अभिनेत्री रंजना देशमुख

    व्ही. शांताराम निर्मित व किरण शांताराम दिग्दर्शित चंदनाची चोळी, अंग अंग जाळी या चित्रपटातून १९७५ साली मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पुढे व्ही. शांताराम यांच्या झुंज या चित्रपटातून प्रमुख नायिकेची भूमिका साकारली.

      March 5, 2018


  • अँटनी विल्यम टोनी ग्रेग उर्फ टोनी ग्रेग

    अँटनी विल्यम टोनी ग्रेग उर्फ टोनी ग्रेग यांचा जन्म ६ ऑक्टोबर १९४६ रोजी झाला. सहा फूट सहा इंच उंची असलेले टोनी ग्रेग यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील क्वीन्सटाऊन येथे झाला होता. टोनी ग्रेग यांचे शालेय शिक्षण तेथेच झाले. परंतु, वडील स्कॉटलंडचे असल्यामुळे टोनी ग्रेग इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. ग्रेग यांनी अष्टपैलू कामगिरी करताना ५८ कसोटींत ४०.४३ सरासरीने ३ हजार ५९९ धावा केल्या. तसेच मध्यमगती आणि ऑफब्रेक मारा करत १४१ विकेट्स टिपल्या. मात्र २२ वनडेच त्यांच्या वाटय़ाला आल्या. टोनी ग्रेग यांच्या नेतृत्वाखालील इंग्लंडने १९७६-७७ मध्ये भारताचा दौरा केला. त्यावेळी पाच सामन्यांच्या मालिकेत पहिल्या तीन कसोटी मोठ्या फरकाने इंग्लंडला जिंकून देण्यात ग्रेग यांचे मोलाचे योगदान राहिले. कर्णधार म्हणून भारताचा यशस्वी दौरा रहिला.

    सर्वोत्तम कामगिरी करूनही वर्ल्ड सिरिज क्रिकेटमुळे टोनी यांची इंग्लंडसाठीची कारकीर्द केवळ पाच वर्षाची राहिली.
    वर्ल्ड सिरिज क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी ग्रेग यांनी अनेक आघाडीच्या आणि उत्तमोत्तम क्रिकेटपटूंनाही वळवून घेतले. यामुळे संबंधित क्रिकेट बोर्डाच्या टीकेचे ते लक्ष्य बनले. वर्ल्ड सिरिज क्रिकेटमध्ये खेळल्याने टोनी यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्दही संपुष्टात आली. वर्ल्ड सिरिज बंद झाल्यानंतर ग्रेग ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले. क्रिकेट खेळाडू म्हणून त्यांनी कारकीर्द संपविल्यानंतर समालोचक म्हणून त्यांची कारकीर्द बहरली.

    समालोचक म्हणून त्यांना मोठी लोकप्रियता लाभली. क्रिकेटचा चांगला अनुभव तसेच रोखठोक स्वभावामुळे ऑस्ट्रेलियाच्या ‘चॅनेल नाइन’मधून तब्बल ३३ वर्षे क्रिकेट समालोचन केले. खेळादरम्यान काही मजेशीर प्रसंग घडला की, ग्रेग यांच्या खोचक समालोचनाने क्रिकेटप्रेमी मंत्रमुग्ध व्हायचे. मैदानावरील अंपायर्सच्या निर्णयाविरोधात दाद मागण्याच्या (डीआरएस) प्रणालीला विरोध केल्यानंतर ग्रेग यांनी बीसीसीआयवर टीका केली होती. टोनी ग्रेग यांचे निधन २९ डिसेंबर २०१२ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      December 29, 2018


  • मराठी सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी

    लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. इयत्ता सातवीत असताना त्यांनी ‘मोरूची मावशी’ नाटकात मावशीची भूमिका साकारली.

      October 17, 2021


  • ज्येष्ठ चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक बी. आर. इशारा

    हिंदी चित्रपटात काम करण्यासाठी बी. आर.इशारा १९६० च्या दशकात मुंबईत आले. त्यांचा जन्म ७ सप्टेंबर १९३४ रोजी झाला. हिंदी चित्रपटांत नवीन ज्वलंत विषयांची लाट आणण्याचे काम बी. आर. इशारा यांनी १९७० च्या दशकात केले. इन्साफ का मंदिर चित्रपटातून लेखक म्हणून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ३४ चित्रपटांपैकी बहुतेकांचे लेखन त्यांनीच केले होते. त्यांनी १९६९ ते १९९६ या काळात ३४ चित्रपट बनवले. इशारा यांनी चित्रपटसृष्टीत "बोल्ड‘ विषय आणले. कोणीही हाताळले नाहीत, अशा विषयांवर त्यांनी चित्रपट तयार केले.

    "चेतना‘मध्ये त्यांनी वेश्यां्च्या पुनर्वसनासारखा विषय घेतला. हा चित्रपट २५ दिवसांत पूर्ण झाला होता. बंगल्यात चित्रीकरण करण्याचा पायंडा त्यांनी पाडला. त्यांनी "प्रेम शस्त्र‘, "औरत और इंतकाम‘, "वो फिर आयेगी‘, "हम दो हमारे दो‘, "जरूरत‘, "मिलाप‘ आदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. चेतना, हम दो हमारे दो, एक नजर, मिलाप, लोग क्या कहेंगे, सौतेला पती, औरत का इन्तेकाम, घर की लाज असे विविध वादग्रस्त विषयांवरील सिनेमे त्यांनी केले. अभिनेत्री परवीन बॉबीला रूपेरी पडद्यावर झळकवण्याचे श्रेय इशारा यांनाच जाते.

    त्याशिवाय रेहाना सुल्तान, राकेश पांडे, विजय अरोरा या कलावंतांनाही त्यांनीच पहिला ब्रेक दिला.चित्रपटांचे लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन अशा तिन्ही जबाबदाऱ्या त्यांनी कौशल्याने पार पाडल्या. ज्येष्ठ कलाकार रेहाना सुलतान ह्या बी. आर. इशारा यांच्या पत्नी होत.मा.बी.आर.इशारा यांचे २५ जुलै २०१२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      September 7, 2017


  • संतकवि कृष्णदयार्णव

    हा संतकवि सातारा जिल्ह्यांतील कर्हाहड जवळील कोपरडें येथील रहाणारा. माध्यंदिनशाखी देशस्थ ब्राह्मण होय. याचें खरें नांव नरहरि असून बापाचें नांव नारायण व आईचें बहिणा होते. याचा जन्म सन १६७४ च्या अक्षय्य तृतीयेस झाला. याचें लग्न लवकर झालें होतें. या वेळीं महाराष्ट्रांत औरंगझेबाच्या स्वारीमुळें सर्वत्र धुमाकूळ माजला होता. त्यामुळें नरहरीला गांव सोडावा लागला. तो जोगाईच्या आंब्यास राहिला असतां तेथें आनंदसंप्रदायीं गोविंदाने त्याला शके १६१८ गोकुळ अष्टमीस उपदेश दिला.

    मधुकरी मागत असतां “कृष्णदयार्णव” असें नरहरि सतत म्हणे. त्यावरून तेंच त्यांचें टोपण नांव रूढ झालें. तीर्थयात्रा करून आल्यावर व प्रथम कुटुंब वारल्यावर अग्निहोत्र घेतल्यामुळें यांनीं द्वितीय संबंध केला. परंतु तितक्यांत त्यांना महारोग झाला. त्यावर उपाय म्हणून भागवताच्या दशमस्कंधावर त्यांनीं प्राकृत टीका लिहिली. यावेळीं यांचें वय ५४ होतें. या ग्रंथास आधार श्रीधरी टीकेचा आहे. पूर्वार्धाचे ४९ अध्याय संपले व रोग नाहींसा झाला. उत्तरार्धाचे ३७ अध्याय संपविले व ३८ व्या अध्यायाचे २३ श्लोक झाले आणि स्वामी पैठण येथें समाधिस्त झाले (शके १६६२ मार्गशीर्ष). पुढील साडेतीन अध्याय यांचा शिष्य उत्तमश्लोक यानें लिहिले आहेत. एकंदर ग्रंथास १६ वर्षे लागलीं. हा ग्रंथ चांगला आहे. ओवी एकनाथाप्रमाणें आहे.

    ज्ञानेश्वरीचीहि छाया ग्रंथावर पडलेली आहे. विद्वान लोक या “हरिवरदा” ग्रंथास फार मान देतात. यावरून कर्त्याची विद्वत्ता व बहुश्रुतपणा दिसून येतो. काव्याच्या दृष्टीनेंहि ग्रंथ चांगला वठला आहे. विस्ताराच्या मानानें हा ग्रंथ प्रचंड आहे. याची एकंदर ओवीसंख्या ४२ हजार आहे. स्वामींचा “तन्मयानंद” नांवाचा आणखी एक ग्रंथ व बरेचसे अभंग आणि पदें इतकी कृति सध्यां उपलब्ध आहे. संतकवि कृष्णदयार्णव यांचे १३ नोव्हेंबर १७४० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      November 13, 2018