लहानपणापासून सारं आयुष्य ग्रंथाच्या सहवासातच गेलं, तरी एखाद्याला वाचनाचा नाद लागेलच, असं सांगता येणं कठीण आहे. तसं असतं तर प्रत्येक ग्रंथविक्रेता हा चांगला वाचक झाला असता. पण तस होतं नाही. मात्र याचा मात्र नेहमीचं खरा ठरतो. आणि वाचनाचा नाद असलेला ग्रंथविक्रेता हा उत्तम पुस्तकविक्रेता होतो! मला स्वत:ला वाचनाचा नाद नव्हे वेड आहे, अगदी लहानपणीच लागलं. त्याचं कारण ग्रंथांच्या सहवासात गेलेलं बालपण हेच होय.
December 23, 2009
हिंदी चित्रपटसृष्टीत नायिका म्हणजे चित्रपटांचा आत्मा असतो. अनेक नायिकांनी आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने चित्रपटांवर अधिराज्य गाजवले. अशाच काही तारकांची ओळख सदानंद गोखले यांनी या पुस्तकातून करून दिली आहे.
March 1, 2024
जीवनाच्या विविध पैलूच्या भावना समर्थपणे व्यक्त करणारा काव्यसंग्रह बालपणीच्या पहिल्या हुंकारापासून माणसाचं व्यक्त होणं सुरू होतं आणि आयुष्यात घडणार्या चांगल्या वाईट प्रसंगात प्रत्येक माणूस व्यक्तीपरत्वे व्यक्त होत असतो. नव्हे आयुष्यभर व्यक्त होण्याचा त्याला ध्यास लागलेला असतो. त्यामुळेच व्यक्त होणं हे माणसाच्या जिवंतपणाचं लक्षण समजले जातं. मिलींद वि. देशपांडे व्यक्त मी अव्यक्त मी : प्रा. सुनील जोशी भ्र.: 9273807046 पाने : ११२, किंमत : १०० रू. प्रकाशक : नचिकेत प्रकाशन मो. : 9225210130
September 29, 2012
येत्या शनिवारी म्हणजेच दिनांक ७ जानेवारी २०१७ रोजी सायंकाळी ५ वाजता, नूतन बांदेकर लिखित मनतरंग (भाग १) या ललित लेखसंग्रहाचे व अॅडिओ सीडीचे प्रकाशन नरेंद्र बल्लाळ सभागृह, ठाणे महानगरपालिका मुख्यालय, पहिला मजला, ठाणे (प) येथे होणार असून माननीय महापौर संजयजी मोरे (ठाणे महानगरपालिका) यांच्या हस्ते प्रकाशन होईल. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संपदा जोगळेकर-कुलकर्णी (अभिनेत्री), मिलिंद बल्लाळ (संपादक दै. ठाणे वैभव) , दीपक वेलणकर (व्हॉईस गुरु) ही नामवंत व्यक्तिमत्व लाभलेली आहेत. आपण या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती !
श्रोते हो, आपण माझ्या लिखाणाला देत असलेल्या उदंड प्रतिसादामुळे मला सतत लिहीत रहाण्याची उर्जा मिळते. तीच विचारांची मालिका आणि तंत्रज्ञानाची कास धरुन निर्माण झालेलं त्याचं हे श्राव्यरुप मी खास आपल्यासाठी सादर करीत आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी माझा हा खारीचा वाटा ! आजच्या विद्यार्थी वर्गाला मराठी भाषा वाचन आणि उच्चार सुधारण्यासाठी मदतीचा हात देण्याचा आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी माझा हा वेगळा प्रयत्न आहे. आपण माझी ही नवनिर्मिती स्विकारुन, नक्कीच प्रतिसाद द्याल, ही अपेक्षा !
घेऊन तेव्हा येईन मी, विचारांचे नवीन रंग !
द्याल जेव्हा साद मित्र हो, पुन्हा उमटतील मनतरंग !
मनापासून धन्यवाद !
- नूतन बांदेकर

January 3, 2017
‘व्यवस्थापन’ या विषयावर १९७०च्या दशकानंतर, भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभर गांभीर्याने लक्ष केंद्रित केले जाऊ लागले. मोठमोठ्या औद्योगिक समूहाबरोबरच, मध्यम व लघु उद्योगांनीही सातत्याने नावीन्यपूर्ण, उपाययोजना, कल्पना यांचा समावेश असलेली व्यवस्थापनाची विशिष्ट प्रणाली आपलीशी केली आहे.
April 22, 2024
आपला प्रत्येकाचा दुकानांशी जवळ जवळ रोज संबंध येतो. पण दुकानदारीच्या जगाबद्दल आपल्याला काहीच माहित नसते. लहान मोठे दुकानदार त्यांच्या दुकानदारीच्या विविध तऱ्हा, त्यांचे अनंत प्रश्न, अर्थव्यवस्थेत रिटेल दुकानदारीचे स्थान, महत्व, व्यवसायाचे विविध पैलू यावर सांगोपांग विवेचन करणारे मराठीतील पहिले व एकमेव पुस्तक. विलास कुळकर्णी पाने : १५८, किंमत : १६० रु.
September 29, 2012
दुसरे महायुद्ध साऱ्या जगाची उलथापालथ करणारे ठरले. केवळ आंतरराष्ट्रीय राजकारणाची नव्हे तर अनेक देशांची अंतर्गत परिस्थिती या महायुद्धामुळे बदलली.
January 20, 2024
मार्ग जितका काटेरी, यश तेवढेच उत्तुंग’ असा यशाचा मूलमंत्र सांगणार्या धीरुभाई अंबानी यांच्या वाटचालीत अनेक अडथळे आले. पण, या प्रतिकूलतेवर त्यांनी कशी मात केली, हे सांगणारं ‘प्रतिकूलतेवर मात’ हे पुस्तक मेहता पब्लिशिग हाऊसने प्रकाशित केलं आहे.
August 8, 2009
लेखक मनोहर महादेव भोसले यांनी स्वतः च्या मनोगतामध्ये आजच्या काळातील स्त्रियांच्या बदलत्या विचार सरणीला स्पर्श केला आहे. लग्नामध्ये किंवा लग्न झाल्यावर अनेक वस्तूंच्या किंवा आर्थिक गोष्टी बद्दल एकमेकांचे वाद विवाद असतात. परंतु लेखकाने अनुभवलेल्या एका प्रसंगांमध्ये स्त्रीचे मत स्पष्टपणे आणि योग्य ठिकाणी मांडणे कितपत आवश्यक आहे याची सर्वांना नक्कीच कल्पना येईल. आजच्या या २१व्या युगातील महिलांमधील शारीरिक, मानसिक, भावनिक वैचारिक बदला बद्दलची ही लघुनाटिका आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांनाही समान मानले जाते परंतु काही धार्मिक पंडित म्हणवून घेणा-या व्यक्तीच्या मूळे लिंगभेद निर्माण केला जात आहे. त्याचा परिणाम संपूर्ण मानव जातीवर होतो आहे लिंगभेदामुळे अनेक नवनवीन वाद विवाद होत आहेत. पुरुषांना सर्व बाबतीत मुक्तता असते परंतु स्त्रीयांवर अनेक प्रकारची बंधने घातली जातात. भारतीय संस्कृती हि पुरुष प्रधान मनाली जाते परंतु कोणताही पुरुष हा स्त्री शिवाय अपूर्णच आहे.
वंश आणि अंश या लघुनाटिकेमध्ये लेखकाने एका काल्पनिक विवाहात स्त्री पुरुषामध्ये लिंगभेदामुळे घटस्फोट घेण्यासाठी ते कोर्टामध्ये जातात. त्या दोघांनाही घटस्फोट हवा असतो परंतु त्यांना तीन मुली असतात त्या मुलींच्या जोपासनेसाठी लागणारी पोटगी त्या महिलेला मिळावी यासाठी ते कोर्टात जातात. तेथे त्यास्रीला सर्वजण वंशाचा दिवा मानला जाणारा मुलगाच हवा आणि ते ती स्त्री देऊ शकत नाही म्हणून तिचा पती घटस्फोट घेत असतो. परंतु मुलं जन्माला घालणे हे फक्त एका स्त्रीचे काम नसून त्यामध्ये पुरुष देखील खुल महत्वाची भूमिका बजावत असतात. कोर्टा मध्ये काही जेष्ठ आणि तज्ज्ञ व्यक्ती तसेच डॉक्टर यांना बोलावून मुलं जन्माला घालणे, त्यासाठी आवश्यक असणा-या गोष्ट या सर्व बाबींची चर्चा होते.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार स्त्री मध्ये फक्त X पेशी असतात तर पुरुषामध्ये X आणि Y अशा दोन प्रकारच्या पेशी असतात पुरुषापासून मिळालेल्या पेशींनुसारच जे बाळ जन्माला येणार आहे ते स्त्री किंवा पुरुष ठरत असते त्यामुळे स्त्रियांना दोष देण्यापेक्षा पुरुष ही तितकाच जबाबदार आहे हे आपण लक्षात घ्यायला हवे. स्त्री ही नेहमी जमिनीची भूमिका बजावते तर पुरुष हा शेतक-याची भूमिका बजावत असतो पुरुष जे पेरतो तेच उगवत असते मग पुरुषाने काय पेरायचे ते स्वतः ठरवावे लागेल.
लेखक मनोहर भोसले यांनी मुलगा किंवा मुलगी या दोघात ही वंश न समजता तो आपला अंश आहे म्हणून त्याचा सर्वांगीण विकास केला पाहिजे. असा मुक्त विचार सरणीचा संदेश खूप छान पद्धतीने दिला आहे. शाळा, कॉलेज, महाविद्यालयामध्ये ही लघुनाटिका सादर व्हावी आणि समाज जागृतीचे आणि प्रबोधनाचे कार्य होणे आवश्यक आहे आणि ते वंश आणि अंश या लघु नाटिकेतून नक्कीच होईल असा मला ठाम विश्वास वाटतो. लेखकाला पुढील लिखाणासाठी खूप खूप शुभेच्छा.
- मंगेश विठ्ठल कोळी (लेखक-संपादक-समीक्षक)
o Title - Vansh Aani Ansh (वंश आणि अंश)
o Author - Manohar Mahadev Bhosale (मनोहर महादेव भोसले)
o Price - Rs. 40/- (मूल्य 40/- रुपये)
o Publisher - Dr. Sunil Patil (डॉ. सुनील पाटील)
o Publication - KavitaSagar Publication (कवितासागर प्रकाशन)
o Contact - 02322 - 225500, 09975873569
o Email - sunildadapatil@gmail.com
January 24, 2016

मराठी वाङमयातील कविता, कादंबरी व आत्मचरित्र या तीन वाङमय प्रकाराचा तौलनिक आढावा डॉ.विलास खोले यांनी घेतला आहे.
कवितांविषयी लिहिताना करूणाष्टके, स्वातंत्र्य शाहीर कुंजविहारी, प्रेम गौरव, भिजकीवही, द्रोण, संधिप्रकाशाचे लावण्य, तृतीय पुरुषाचे आगमन सारख्या प्रतिकात्मक काव्याचे सटीप विश्र्लेषण, तर कादंबरी या वाङमयाचा आढावा घेताना श्यामची आई, आस्तिक, बखर एका राजाची, गांधारी, किनारा, होमकुंड, भिन्न, विमु्क्ता यानंतर १९६० नंतरची मराठी कादंबरी व स्त्रीवाद यांचे विवेचन अभ्यासपूर्ण आहे.
आत्मचरित्र या प्रकाराबद्दल लिहिताना डॉ. खोले यांनी आत्मचरित्र व चरित्र, आत्मचरित्राचे आकलन - एक दिशा, आमच्या आयुष्यातील काही आठवणी, करुळचा मुलगा दलित आत्मकथने याविषयी सविस्तर तपशीलासह विवेचन केलेले आहे.
विभ्रम
लेखक : विलास खोले
प्रकाशक : अनघा प्रकाशन, ठाणे पूर्व
मूल्य : ३५०/- रुपये
पाने : ३०१
October 18, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti