(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • कोल्हापूरची अंबाबाई

    श्री महालक्ष्मी देवीच्या नित्य निवासाने पुनित झालेले महाराष्ट्रातील महाक्षेत्र करवीर वा कोल्हापूर या नावाने ओळखले जाते. हे क्षेत्र प्राचीन शक्तिपीठ असून पुराणमताप्रमाणे याला १०८ कल्पे झाली आहेत. अठरा पुराणांपैकी काशीखंड, पद्मपुराण, देवीभागवत, हरिवंशपुराण, स्कंदपुराण आणि मार्कंडेय पुराणात करवीर क्षेत्राचा उल्लेख सापडतो.

      June 10, 2025


  • माती ‘मातीमोल’ कशी?

    खडकांची झीज होऊन माती तयार होते. ठिसळ गहू-ज्वारीचे पीठ दळायला दहा अश्वशक्तीची चक्की लागते. मग पाषाणहृदयी, वज्रतुल्य, कठीण खडकांची माती करायला निसर्गाला किती बळ आणि वेळ खर्च करावा लागत असेल? अशा महत्प्रयासाने तयार झालेल्या संपत्तीला मातीमोल ठरविणारे हे कोण असे पंचांगपंडित?

      July 17, 2023


  • “लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी!” – भारतात निर्माण झालेलं सर्वात भव्य गीत.

    सुरेश भटांच्या या शब्दांना कौशल श्री इनामदारने संगीत दिलं आहे. हे गीत प्रचंड मोठ्या प्रमाणात, म्हणजे १२० प्रस्थापीत गायक, ३५० समूहगायक आणि १०० वादक यांच्या ताफ्यात ध्वनिमुद्रित करण्यात आले आहे.

      March 25, 2010


  • अनुशेष नेतृत्वगुणाचा आणि दूरदृष्टीचा !

    आपल्या भागासाठी पैसा खेचून आणताना प. महाराष्ट्रातील नेते पक्षभेद विसरून एक होतात. सरकारला निर्णय बदलण्यास भाग पाडतात आणि इथे मात्र मिळालेला तुटपुंजा पैसादेखील खर्च न होता परत जातो. फलोद्यान विकासासाठी सरकार हजार कोटींची तरतूद करीत असेल तर त्यातील केवळ पन्नास कोटी विदर्भाच्या वाट्याला येतात आणि त्यातलेही पंचवीस कोटी परत जातात, विकास होईल तरी कसा?

      September 4, 2011


  • सदगुरु आणि देव

    एकदा सदगुरु आणि देव असे दोघे एका शिष्याच्या घरी येतात तेव्हा शिष्य पहिल्यांदा देवांच्या पायाजवळ नमस्कार करायला जातो, देव त्याला म्हणतात , "तु पहिले सदगुरूंना नमस्कार केला पाहिजेस".

    जेव्हा शिष्य हा सदगुरूंच्या पायापाशी जातो तेव्हा सदगुरु म्हणतात "मी देवाला तुझ्या घरी आणले आहे त्यामुळे पहिला देवाला नमस्कार कर."

    शिष्य परत देवाच्या चरणाजवळ येतो, तेव्हा देव म्हणतो "तुझ्या सदगुरुंनी देवाला तुझ्या आयुष्यात आणले आहे, त्यांनी माझा लाडका भक्त होण्याचा मार्ग तुला सांगितला त्यामुळं पहिला सदगुरूंच्या चरणांपाशी जा."

    जेव्हा भक्त सदगुरूंच्या चरणांजवळ जातो तेव्हा सदगुरु म्हणतात, मी तुला फक्त भक्तीचा मार्ग सांगितला *पण् देवाने तुला निर्माण केलय,नाही कां ?त्या मुळे जा आणि पहिला देवाच्या चरणाशी नतमस्तक हो. त्यानंतर तो भक्त देवाच्या चरणाजवळ गेला तेव्हा देव म्हणाले थांब हे सगळं बरोबर आहे . पण आता मी तुला देवाची आणि गुरूंची प्रमुख तत्व सांगणार आहे.

    देवाच्या तत्वात - : माझ्या कडे न्याय व्यवस्था आहे. जर कां तु चांगलं कार्य केलंस तर तुला त्याचं चांगलंच फळ मिळेल, चांगलं आयुष्य मिळेल आणि मुक्ति मिळेल.

    पण जर कां तु वाईट कर्म केलीस तर तुला तर त्याचे वाईटच फळ मिळेल. तुला शिक्षा होईल . तु या मायाजालात अडकशील आणि त्यात बुडुन जाशील आणि तुझा आत्मा संघर्ष करीत राहील.

    आता तुला गुरूंची तत्वे सांगतो. : जेव्हा तुम्ही सदगुरुकडे जाता तेव्हा ती प्रेमळ शांत मूर्ति असते. तुम्ही कसेही असाल, कसेही वागत असाल तुमची कर्मे कशीही असली तरीही ते आपल्या शिष्याला प्रेमाने आपल्या कुशीत घेतात. ते आपल्या शिष्याला शुद्ध करतात आणि मग माझ्या चरणाशी आणतात.

    त्यामुळे सदगुरु कधीही कोणालाही स्वतःहून आपल्या पासून दूर लोटत नाहीत. तर उलट ते आपल्या शिष्यात हिऱ्या प्रमाणे पैलू पाडतात त्याला शुद्ध करून मग माझ्या चरणाशी आणतात.

    त्या मुळे मी नेहमी पृथ्वीवर सदगुरूच्या रूपातच येतो.

      June 14, 2017


  • खेळ आकड्यांच्या

    • महाराष्ट्राचा अर्थसंकल्प १८ मार्च रोजी मांडला जाणार आहे.
    • दरडोई उत्पन्न आणि मानव विकास निर्देशांक यांच्या बाबतीतही महाराष्ट्राचा देशात अनुक्रमे तिसरा आणि सातवा क्रमांक लागतो.
    • गेल्या पाच वर्षांपासून महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सरासरी १० टक्क्यांनी वाढते आहे. सन २०१६-१७ मध्ये महाराष्ट्राचे सकल राज्य उत्पन्न मागील वर्षांपेक्षा १२ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे, तर सन २०१५-१६ मध्ये हीच वाढ १५ टक्क्यांनी अपेक्षित होती.
    • सन २०१४-१५ मध्ये महाराष्ट्राच्या सकल राज्य उत्पन्नाच्या ५.१५ टक्के एवढा निधी सामाजिक क्षेत्रावर खर्च करण्यात आला होता. हे प्रमाण २०१५-१६ मध्ये ४.८५ टक्के तर २०१६-१७ मध्ये ४.२९ टक्के होते. भारतातील सर्व राज्य सरकारे व केंद्र सरकार मिळून सामाजिक क्षेत्रावर जीडीपीच्या ९ टक्के खर्च करतात.
    • २०१४-१५ च्या अर्थसंकल्पाबाबत सुधारित अंदाजानुसार अर्थसंकल्पातील एकूण २३१ हजार कोटींपैकी राज्य सरकार केवळ १९७ हजार कोटी खर्च करू शकले, त्यातही सामाजिक सेवांसाठी केलेल्या ९० हजार कोटींपैकी केवळ ७९ हजार कोटी खर्च झाल्याचे २०१६-१७ च्या अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेल्या आकडेवारीमधून स्पष्ट झाले होते. २०१५-१६ वर्षांमध्येही शासकीय आकडेवारी पाहिली असता (१७ मार्च २०१६ अखेर) अनेक कळीच्या क्षेत्रांसाठीचा निधी वापरलाच गेला नसल्याचे दिसते. आरोग्यासाठीच्या निधीतील ७३ टक्के , शिक्षणासाठी ८३ टक्के निधी खर्च झाला.
    • महिला-बाल विकास विभागाच्या बजेटमध्ये २०१६-१७ मध्ये ६२ टक्के इतकी भयंकर कपात करण्यात आली. पुरवणी बजेटमध्ये त्यात वाढ झाली, पण तरीही २०१५-१६ च्या तुलनेत या वर्षी विभागाला मिळालेला निधी हा १०८२ कोटीने कमी होता. महाराष्ट्राच्या सर्व सामाजिक सेवांना मिळणाऱ्या बजेटच्या तुलनेत या विभागातील बजेट सर्वात कमी आहे.
    • तामिळनाडू सरकार २०१५-१६ या आर्थिक वर्षांत पोषणावर दरडोई रुपये ४२३ एवढा महसुली खर्च करीत होते, तर महाराष्ट्र सरकार याच आर्थिक वर्षांत केवळ २५४ रुपये दरडोई खर्च करीत होते.
    • महाराष्ट्राचा आरोग्यावरील दरडोई खर्च रु. ८५० हा राष्ट्रीय पातळीवर केल्या जाणाऱ्या खर्चापेक्षा रु. १२१७ पेक्षा बराच कमी आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत राजस्थान (रु. १६७२), छत्तीसगड (रु. १२८४), ओदिशा (रु. ९२५) ही राज्येसुद्धा आरोग्यावर जास्त निधी खर्च करतात. याचे उदाहरण म्हणजे २०१६-१७ मध्ये केंद्र शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे बजेट ३१४२ कोटी वरून २७१७ कोटींपर्यंत (४२५ कोटींची कपात) कमी केले आहे.
    • येत्या वर्षांत (२०१७-१८) आरोग्य सेवांचे बजेट ४०टक्क्यांनी वाढवण्याचे लक्ष ठेवले पाहिजे. म्हणजे महाराष्ट्र शासनाने १४,६०० कोटी इतका निधी सार्वजनिक आरोग्यावर खर्च करावा. याआधारे राष्ट्रीय दरडोई आरोग्य खर्चाच्या प्रमाणात १२०० रु. प्रतिव्यक्ती निधी उपलब्ध करावा आणि पुढील दोन वर्षांत राजस्थानइतका (दरडोई रु. १६७०), अर्थात आरोग्यावरील खर्च दुप्पट करण्याचे धोरण ठेवावे. त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य सेवा पुरवण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ, शहरी आरोग्य अभियान आणि सार्वत्रिक मोफत औषधे मिळण्याची सोय, यांची व्यवस्थित अंमलबजावणी होऊ शकेल.
    • महाराष्ट्र राज्याचा पहिला अर्थसंकल्प ११ जुलै १९६० रोजी तत्कालीन अर्थमंत्री बॅ. शेषराव वानखेडे यांनी सादर केला होता व तो होता १७१ कोटी ५६ लाख रुपयांचा. गेल्या वर्षी सादर झालेला राज्याचा अर्थसंकल्प होता दोन लाख कोटींचा. यंदा केंद्र सरकारने २१ लाख कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. म्हणजेच केंद्राच्या एकूण अर्थसंकल्पाच्या तुलनेत राज्याचा अर्थसंकल्प हा साधारपणे दहा टक्के आहे. राज्याचा ७०वा अर्थसंकल्प १८ मार्च रोजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार सादर करणार आहे.
    • आठ फेब्रुवारीला सरकारने जारी केलेल्या आदेशात विकास कामांवरील खर्चात २० टक्के कपात करण्यात आली आहे.
    • विक्रीकर, मुद्रांक आणि उत्पादन शुल्क हे राज्याचे तीन प्रमुख उत्पन्नस्रोत आटत चालले असताना ‘आस्थापना खर्च ६३ टक्के आणि व्याजफेडीपायी १५ टक्के’ ही खर्चाची स्थिती कायम राहणारच, अशी चिन्हे आहेत.
    • सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करायची झाल्यास १५ हजार कोटींचा ताण वर्षांला पडू शकतो.
    • अल्पभूधारकांचे कर्ज माफ करायचे तरीही राज्याचा १० हजार कोटींचा खर्च वाढू शकतो.
    • मद्यविक्रीतून यंदा १५ हजार कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. वित्त खात्याने जमा केलेल्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारीअखेर १० हजार ३५० कोटीच जमा झाले आहेत. मार्चअखेर १२ हजार कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे. गेल्या वर्षी (२०१५-१६) १२ हजार ५०० कोटींच्या आसपास महसूल उत्पादन शुल्क विभागाकडून मिळाला होता.
    • सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने १ एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गालगतची दारूची दुकाने किंवा परमिट रूम बंद करण्यात येणार आहेत. या आदेशामुळे राज्यातील एकूण ६३ टक्के दुकाने किंवा परमिट रूम बंद होणार आहेत. ३०० कोटींचे परवाना शुल्क, सात ते साडे सात हजार कोटींचा महसूल तसेच त्यावरील विक्रीकर असे एकूण राज्याचे पुढील आर्थिक वर्षांत १० हजार कोटींचे नुकसान अपेक्षित आहे.
    • व्यापाऱ्यांना खुश करण्याकरिता सरकारने गेल्या वर्षी घाईघाईत स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द केला. त्याची नुकसानभरपाई महापालिकांना देण्याकरिता सरकारच्या तिजोरीवर चालू आर्थिक वर्षांत सहा हजार कोटींपेक्षा जास्त बोजा पडला. वस्तू आणि सेवा कराची प्रत्यक्ष अंमलबजावणी केव्हा होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तोपर्यंत सरकारला दरमहा ५००ते ७०० कोटींचा बोजा सहन करावा लागेल.
    • जमा होणाऱ्या प्रत्येक एक रुपयातील फक्त ११ पैसे हे विकास कामांवर खर्च होतात’, अशी माहिती अर्थसंकल्पीय पुस्तिकेतच देण्यात आली आहे.
    • दरवर्षी २५ ते ३० हजार कोटी फक्त व्याज फेडण्याकरिता खर्च होतात. राज्याच्या एकूण अर्थसंकल्पाच्या आकारमानाच्या तुलनेत १० ते १५ टक्के रक्कम ही व्याज फेडण्यासाठी खर्च होत आहे.
    • केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातही यंदापासून योजना व योजनेतर खर्च अशी विभागणी बंद केली जाणार आहे. याऐवजी भांडवली व महसुली खर्च अशी रचना करण्यात येणार आहे.
    • बॅ. वानखेडे यांच्याकडून सर्वाधिक अर्थसंकल्प सादर बॅरिस्टर शेषराव वानखेडे – १३ अर्थसंकल्प जयंत पाटील – १० अर्थसंकल्प सुशीलकुमार शिंदे – ९ अर्थसंकल्प अधिक राज्यमंत्री म्हणून दोनदा विधान परिषदेत अर्थसंकल्पाचे वाचन
    • ‘जीव्हीए’ म्हणजे सकल मूल्यवर्धन (ग्रॉस व्हॅल्यू अ‍ॅडेड) आणि ‘जीडीपी’ म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पन्न (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट)
    • ऑक्टोबर २०१६ ते डिसेंबर २०१६ मध्ये सकल राष्ट्रीय उत्पन्न (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट- ‘जीडीपी’) सात टक्क्यांनी वाढल्यामुळे चालू आर्थिक वर्ष ३१ मार्च २०१७ रोजी संपेल तोवर या वर्षभरातील आपला आर्थिक वाढदर ७.१ टक्क्यांवर पोहोचलेला असेल असा निर्वाळा ‘केंद्रीय सांख्यिकी संस्था’ किंवा ‘सेंट्रल स्टॅटिस्टिक्स ऑर्गनायझेशन (‘सीएसओ’) चे विद्यमान प्रमुख सांख्यिकी अधिकारी डॉ. टी. सी. अनंत यांनी दिला आहे.
    • २०१६-१७ या आर्थिक वर्षांच्या सुरुवातीला, यंदाचा वाढदर ७.६ टक्के असेल असा दावा सरकारने केला होता. तो आता निश्चलनीकरणानंतर ७ टक्के होणार असे जर आपण गृहीत धरले, तरीही त्यास अनिष्ट परिणामच म्हणायला हवे, कारण ०.६ टक्क्यांवर पाणी सोडणे म्हणजे आपल्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात नव्वद हजार कोटी रुपयांची घट होणे. जर हाच वाढदर साडेसहा टक्क्यांवर पोहोचला तर बसणारा फटका असेल १,६५,००० कोटी रुपयांचा.
    • ‘जीव्हीए’ म्हणजे सकल मूल्यवर्धन (ग्रॉस व्हॅल्यू अ‍ॅडेड) आणि ‘जीडीपी’ म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पन्न (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट) या दोहोंचे आकडे केंद्रीय सांख्यिकी संस्थेतर्फे प्रकाशित केले जातात. यापैकी ‘जीव्हीए’ हे अनुमान असते आणि ‘जीडीपी’ मात्र कर-महसुलाची बेरीज आणि अनुदानांची वजाबाकी करून मग काढला जातो.

      March 17, 2017


  • शुभ दिपावली

    २८ ऑक्टोबर पासून दीपावली ला सुरुवात होत आहे.
    सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.... !!!!!
    २८ ऑक्टोबर २०२४- वसुबारस !
    गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता,
    प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास
    लाभो !

    २९ ऑक्टोबर २०२४- धनत्रयोदशी !
    धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत !
    निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !
    धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !

    ३१ ऑक्टोबर २०२४- नरकचतुर्दशी !
    सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा !
    अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ
    आपल्याला लाभो !!
    आपल्याकडून नेहमी सत्कर्म
    घडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !!

    ०१ नोव्हेंबर २०२४- लक्ष्मीपूजन !
    लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा !
    नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त
    होवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्य
    आपल्याला नेहमीच लाभो ! घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न !

    ०२ नोव्हेंबर २०२४- दिपावली पाडवा व बलिप्रतिपदा !
    पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव
    गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे
    आशीर्वाद आपल्याला मिळत राहो !

    ०३ नोव्हेंबर २०२४- भाऊबीज !
    जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे !

    ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास
    आंनदाची भरभराटिची जावो.

      October 29, 2024


  • पहिल्या स्थानिक सेन्सॉर बोर्डची मुंबईत स्थापना

    ६ ऑगस्ट १९२० साली पहिल्या स्थानिक सेन्सॉर बोर्डची मुंबईत स्थापना झाली. याच बरोबर कलकत्ता, मद्रास, व रंगून स्थानिक सेन्सॉर बोर्डची स्थापना केली गेली.

    पहिले सेन्सॉर प्रमाण पत्र गोउमुंट कंपनी ला देण्यात आले.

    अमेरिकेत हॉलीवूडमध्ये चलचित्राच्या सेन्सॉरशिपची पहिली घटना घडली १८९७ मध्ये जेव्हा जेम्स कॉर्बेट व रॉबर्ट फिट्झसिमन्स यांच्यातील हेवीवेट वजनी गटातील सामना दाखवायला बंदी घातली गेली होती. १९१५ मध्ये अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने म्युच्युअल फिल्म कॉर्पोरेशन वि. इंडस्ट्रिअल कमिशन ऑफ ओहायो यांच्यातील खटल्यात सिनेमा हा तद्दन व्यवसाय असल्याने त्यावर सेन्सॉरशिपला विरोध दर्शविला होता. मात्र, १९१५ ते १९५२ या काळात स्थानिक, राज्य व केंद्र सरकारी पातळीवर सेन्सॉरशिप लागू करण्याचे बरेच प्रयोग झाले. अमेरिकन शासनाने सेन्सॉर बोर्ड स्थापन करू नये यासाठी १९२२ मध्ये रिपब्लिकन पक्षाचा वकील व वजनदार अशा विल हेज याच्या नेतृत्वाखाली प्रोड्युसर्स आणि डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशन (PDA) ही संघटना स्थापन झाली जिने शासनाने हस्तक्षेप करण्याआधी स्वतःच काही बंधने घालून घेतली. १९३४ साली जोसेफ ब्रीनच्या नेतृत्वाखाली प्रॉडक्शन कोड अॅडमिनिस्ट्रेशन (PCA) या संघटनेने १ जुलै, १९३४ पासून पुढे येणाऱ्या सर्व सिनेमांना प्रमाणपत्र घेणे बंधनकारक केले. ब्रीनने हा कायदा अतिशय कडक व त्रासदायक केला.

    तथाकथित नैतिकता व धार्मिकता पाळणे हे अक्षरशः बंधनकारक केले. पुढे १९५२ साली अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात PCA चा अधिकार खूपच कमी केला. हा निर्णय 'मिरॅकल' या सिनेमाशी संदर्भित खटल्याशी संबंधित असल्याने त्याला 'मिरॅकल डिसीजन' (जादुई निर्णय!) म्हटले जाते. यानंतर 'द मून इज ब्ल्यू' या १९५३ च्या सिनेमात Virgin, Seduce इ. शब्दांचा प्रथमच वापर करण्यात आला. जगभरातील बहुतांश देशांत चित्रपटाच्या सेन्सॉरशिपशी संबंधित कायदे व बोर्ड अस्तित्वात आहेत. भारतात पहिला सिनेमा १९१३ साली आला आणि सेन्सॉर बोर्डाची स्थापना १९२० साली झाली.

    सिनेमेटोग्राफ एक्टच्या खाली सेंट्रल बोर्ड ऑफ़ सेन्सॉर ची १९५२ मधे स्थापना झाली. कालांतराने त्यात काही नवे बदल घडवून १९८३ मध्ये सेंट्रल बोर्ड ऑफ़ सर्टिफिकेशन असं नामकरण करण्यात आलं. आधी फक्त ‘यु’आणि ‘ए’अशी दोनच प्रमाण पत्रे दिली जायची..नंतर ती ‘यु’, ’यु/ए’, ’ए’ आणि ‘एस’ अशी विविध वयोगटानुसार,प्रेक्षकवर्गानुसार देण्यात येतात.मात्र हे देण्यासोबतच काही सीन्स, शब्द, वाक्यांना सेन्सॉर बोर्ड बिनबोभाटपणे कात्री लावते.प्रदर्शनाला बंदी घालते.

    संकलन. संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      August 6, 2021


  • गोष्ट “अशी” संपायला नकोय !

    ११ जानेवारीला अल्वार हून पंतनगर च्या वाटेवर असताना, मित्राने व्हाट्सअपवर कळविले – ” लता मंगेशकर आय सी यू त -कोरोनाची बाधा !” व्हाट्सअप विद्यापीठावर मी शक्यतो विश्वास ठेवत नाही म्हणून घरी पत्नीला तातडीने फोनलो – ” टीव्ही वर काही वृत्त आहे का बघ आणि कळव. “

      January 24, 2022


  • अनाद्यंत खंडेराया

    अनाद्यंत खंडेराया । वेद वंद्या आत्मराजा ।
    आरती ओवाळीतो । सोडूनि भाव दुजा ।। धृ।।

    अस्थिर ग्राम एक । गड देहाची जेजूर । षड् चक्रे कडे त्यासी । वरी दिव्य पठार ।।
    तेथे तू नांदतोसी । संगे घेऊन परिवार । उन्मनी म्हाळसा हे । शांती बाणाई थोर ।।
    स्वानंद अश्वराज । वरी होऊनी स्वार । त्रिगुण त्रिशुळ हाती । हाती बोधाची तलवार ।।
    हिडता नगरी माजी । देखीयला चमत्कार । षड रिपू दैत्य थोर । तये ग्रासिले जेजूर ।।
    मर्दिले राक्षसाशी । हेची किर्ती केली थोर ।।1।। अनाद्यंत खंडेराया ।।धृ।।

    घेतली दिक्षा तुझी । जीव दशा वाघ्या थोर । ँ़ कार येळ कोट । वारं वार उच्चारी ।।
    मागे मी सदा वारी । लक्ष चौऱ्यांशी घरी । एकविस सहस्त्र । शते सहा उच्चार करी ।।
    श्रमलो तेणे फार । हिडता दारो दारी । कौटमा औट हात । गळे तो नव द्वारी ।।
    वैराग्य झोळी गळा । सदा रिकामी सारी। फोडीतो दीर्घ टाहो ।
    घाली निज कृपा वारी ।।2।। अनाद्यंत खंडेराया ।।

    विकार वासनादी । विचारे फोडीयले । अनुभव गाळणीने । महाकष्टे गाळीयले ।।
    भंडार शुद्ध तोची । देहा भूषण शोभले । फोडूनी द्वैत भावा । ते खोबरे उधळीयले ।।
    होताची ऐक्य ऐसे । आत्मराज प्रगटले । कैचा देव कैचा भत्त* । देही देहिच देखीले ।।
    आनंदा पूर आला । मौन वाचेसी झाले । राधा गोविद सुताचे । पूढे बोलणे खुंटले ।।3।।
    अनाद्यंत खंडेराया ।।धृ।।

    गायक - श्री.सुधीर गोरे.
    गायीका - सौ. हेमा.

      October 15, 2015