(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • एलुरु

    एलुरु

    एलुरु हे आंध्र प्रदेशातल्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. विजयवाडा आणि विशाखापट्टणम यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५ वर ते वसले आहे.

      October 20, 2023


  • महाराष्ट्रातील विमानसेवा

    महाराष्ट्रातील विमानसेवा

    महाराष्ट्रात मुंबई (सहार) हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. राज्यात मुंबई, पुणे, औरगांबाद, नाशिक व नागपूर येथे प्रमुख विमानतळ आहेत.

      July 10, 2016


  • शहरांतर्गत प्रवासी वाहतूक

    राज्यातील २५ शहरांत शहरांतर्गत वाहतूक सेवा आहे. यासाठी म.रा.प.म. दररोज सरासरी ५२० बसगाड्यांचा वापर करते.

      November 28, 2024


  • रिला मठ

    रिला मठ

    बुल्गेरियातील रिला मॉनस्ट्री (मठ) चा शोध १०व्या शतकात सेंट जॉन यांना लागला. आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या या मठाची १८३४ ला पुनर्बांधणी करण्यात आली.

      March 13, 2017


  • अलिबाग – महाराष्ट्राचं मिनी गोवा

    अलिबाग – महाराष्ट्राचं मिनी गोवा

    निसर्गरम्य समुद्रकिनारा लाभलेले अलिबाग शहर महाराष्ट्राचं मिनी गोवा म्हणून ओळखले जाते. १७ व्या शतकात मराठा साम्राज्याचे सेनापती सरखेल कान्होजी आंग्रे यांनी हे शहर वसवले आहे.

      January 17, 2016


  • सारस बागेतील सिद्धीविनायक, पुणे

    सारस बागेतील सिद्धीविनायक, पुणे

    पुण्याच्या पेशवे पार्क जवळील सारस बागेमध्ये सिद्धीविनायकाचे नयन मनोहर असे मंदिर आहे. यालाच तळ्यातील गणपती म्हणतात.

      July 11, 2016


  • ऐतिहासिक शहर विजापूर

    ऐतिहासिक शहर विजापूर

    कर्नाटकातील विजापूर हे दक्षिणेतील एक ऐतिहासिक शहर असून या शहराला पूर्वी भक्कम तटबंदी अंदाजे दहा कि.मी. भरेल. पूर्वी या शहराचे विजयपूर असे नाव होते. नंतर अपभ्रंश होता होता त्याचे विजापूर असे झाले

      February 7, 2017


  • बर्किना फासो

    बर्किना फासो

    बर्किना फासो (फ्रेंच: Burkina Faso) हा पश्चिम आफ्रिकेतील एक भूपरिवेष्टित देश आहे. बर्किना फासोच्या भोवताली माली, बेनिन, टोगो, नायजर, घाना व आयव्हरी कोस्ट हे सहा देश आहेत. वागाडुगू ही बर्किना फासोची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. २०१० साली ह्या देशाची लोकसंख्या १.५ कोटी इतकी होती.

      October 7, 2018


  • चिंचवड गावातील मोरया गोसावी गणेश मंदिर

    चिंचवड गावातील मोरया गोसावी गणेश मंदिर

    पुणे शहराचे उपनगर असणार्‍या चिंचवड गावात पवना नदीकाठी असलेल्या मोरया गोसावी गणपतीची मोठी महती आहे. या गणपती मंदिराच्या बांधकामाला १६५० मध्ये प्रारंभ झाला व १७२० मध्ये हे काम पूर्ण झाले. यातील मंगलमूर्तीचे देवघर मात्र १६०५ मध्येच बांधण्यात आले असून अद्यापही ते व्यवस्थित आहे. पवना नदीला पूर आल्यावर संपूर्ण मंदिर पाण्याखाली जाते.

    मोरया गोसावी या गणेशाच्या भाविकाने मोरगावला मोरेश्वराची उपासना केली. त्यामुळे त्यांना देवत्व प्राप्त झाले. समाजाला त्यांची प्रचिती येत होती. मोरयांना त्यामुळे उपसर्ग होत होता. त्यांच्या सेवेत खंड पडत होता. त्या वेळी त्यांना श्रीगणेशाने दृष्टांत दिला की मी तुझ्यासाठी चिंचवड येथे प्रकट होत असून तेथे तू माझी सेवा कर. त्यानुसार मोरया गोसावी यांनी मोरगाव सोडले आणि चिंचवडजवळील ताथवडे गावानजीकच्या जंगलात पवना नदीच्या काठी बसून गणेश उपासनेस प्रारंभ केला. तेथे त्यांनी गणपतीचे मंदिर बांधले आणि तेथेच गणेश उपासना केली.

    मोरया गोसावींनी याच ठिकाणी १५६१ मध्ये पवना नदीकाठी संजीवन समाधी घेतली. या मंदिरातील मूर्ती उजव्या सोंडेची असून मनोकामना पूर्ण करणारी अशी या गणेशाची ख्याती आहे. या मंदिराचा उल्लेख शिवाजी महाराज आणि पेशव्यांच्या ऐतिहासिक दस्तावेजांमध्ये आढळतो.

      November 12, 2015


  • इक्वेडोर

    इक्वेडोर

    लॅटिन अमेरिकेमधील अनेक देशांप्रमाणे स्पेनची वसाहत असलेल्या इक्वेडोरला १८२२ साली स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर अल्प काळाकरिता ग्रान कोलंबियाचा भाग असलेला इक्वेडोर १८३० साली पूर्णपणे स्वतंत्र देश बनला.

      October 9, 2018