लेखसंग्रह

प्राचीन भारतीय गणित – इतिहास आणि सद्यस्थिती

Category:

 

शाळेच्या वयापासूनच आपण गणित आणि भूमिती हे विषय म्हटले की थोडा धसकाच घेतो, नाही का? काही जणांना गणिताची मुळात आवड असते पण काही मात्र त्याकडे रुक्ष विषय, आकडेमोड म्हणूनच पाहतात. पण भारतीय व्यवहारात आणि इतिहासात गणिताची सुरुवात आणि रुजवात कशी झाली हे समजून घेण मात्र तितकच रंजक आहे बर का! हा विषय तसा विस्ताराने मांडण्याचा आहे. पण वाचकांची उत्सुकता वाढवून त्यांना या विषयाची अधिक माहिती घेण्यासाठी प्रोत्साहन मिळावं आणि त्यासाठी किमान काही प्राथमिक माहिती हाती असावी इतकाच या लेखाचा मर्यादित उद्देश आहे.

  September 30, 2020


साहित्य - ललित

द अदर साईड ऑफ सोल – २

Category:

 

त्यादिवशी माझंही तसंच झालं. समोरचं एसटीचं धूड बघितल्यावर बावचळून मी बाईक साईडला घेतली . एसटीवाला निर्धास्तपणे गेला आणि मी साईडपट्ट्यांजवळ असलेल्या खडीच्या ढिगाऱ्यावर कोसळलो . गाडी माझ्या अंगावर पडली होती आणि मला ती बाजूला करता येत नव्हती . पण माझ्या सुदैवाने , शेजारच्या झाडाजवळ जेवायला बसलेला एक तरुण धावत आला आणि त्यानं गाडी बाजूला केली. मला उठवलं आणि शेजारच्या त्या झाडाच्या सावलीत नेलं.

  September 30, 2020


लेखसंग्रह

श्री उमामहेश्वर स्तोत्रम् – १२

Category:

 

भगवान श्रीशंकर आणि देवी पार्वती च्या या युगुल स्वरूपाचे दिव्य वैभव वर्णन करताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात..

  September 30, 2020


साहित्य - ललित

ओळख नर्मदेची – भाग तीन

Category:

 

नर्मदेला कोणी कथाबध्द तर कोणी कादंबरी बध्द पण केले आहे असे म्हणतात.माझ्या वाचनात तर आले नाही पण तिला मान्यतेप्रमाणे,एक कुमारिका समज़ुन तिचे वर्णन खालील प्रमाणे केले आहे .मी पण जे अनुभवले ते पण हुबेहुब तसेच, त्यामुळे वेगळे असे शब्दांकन काय करणार ?

  September 29, 2020


साहित्य - ललित

द अदर साईड ऑफ सोल – १

Category:

 

त्यानं डोक्यावरची टोपी काढली . जमिनीवर आपटली . त्या टोपीवर तो थयथया नाचला . टोपीवर जोरात थुंकला आणि पायानं ती टोपी उडवली . टोपी नेमकी कंपाउंड जवळच्या कचराकुंडीत जाऊन पडली . मग त्यानं घाम पुसला . हात स्वच्छ पुसले आणि वरच्या खिशात ठेवलेली पानं हळुवारपणे माझ्या हाती दिली … मी प्रश्नार्थक मुद्रेनं त्याच्याकडे पाहिलं . आणि धक्काच बसला .

  September 29, 2020


साहित्य - ललित

द अदर साईड ऑफ सोल !

Category:

 

अशी न लिहिली गेलेली आत्मचरित्रं , खूपच वेगळी असतात . अनवट वाटेनं जाणारी असतात . प्रचंड धक्कादायक असतात . खूप गुपितं लपवून ठेवणारी असतात . समाजात गदारोळ करणारी असतात . अनेकांचे बुरखे टराटरा फाडणारी असतात . नातेसंबंध ओरबाडून टाकणारी असतात . अशी आत्मचरित्रं सप्तरंगी नसतातच तर कृष्णधवल रंग त्यात मजबूत असतो . आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ,अशा आत्मचरित्रांचे नायक हे सर्वसामान्य असतात . त्यामुळे त्यांनी न लिहिलेल्या आत्मचरित्रातील त्यांचा आत्मा हा केव्हाच उडून गेलेला असतो . अशा न लिहिलेल्या आत्मचरित्रातील काही पाने माझ्या हाती लागली .

  September 28, 2020