अनेक शिक्षक, शाळा, आज ‘सृजनात्मकतेकडे वाटचाल करत आहेत. नावीन्यशील प्रयोगामुळे शिक्षणक्षेत्रात आशाादयक चित्र निर्माण होत आहे. असेच एक शिक्षक आहेत श्री. बालाजी जाधव. आठवणीतील शिक्षक आणि शाळा ही जगण्याची ऊर्मी असते. जसे शिक्षक तंशी शाळा. As is the H.M., so is the school. शिक्षकामुळे शाळा लक्षात राहतात. दुर्गम, दुष्काळी भागात राहून शाळेला बागायती करणारे, नंदनवन करणारे शिक्षक श्री. बालाजी जाधव, गुगल इन्नोव्हेटर शिक्षक. ॲप्स, वेब स्वनिर्मित करुन गुगल मायक्रोसॉफ्टकडून सन्मान. गुगलसोबत दोनशेहून जास्त कार्यशाळा घेऊन दोन लाखाहून जास्त शिक्षक प्रवाहात आणले. शाळा ५० पेक्षा जास्त देशासोबत व्हर्चुअली जोडली आहे. ‘शिक्षणभक्ती’ हे युट्युब चॅनेल आहे. गुगल मायक्रोसॉफ्ट, एक्सेल गुजरात सरकारकडून आयसिटी वर्कबद्दल सन्मान. महाराष्ट्र ई-गव्हर्नमेंट आयटी सेलचे सदस्य. एससीईआरटीचे टेक्नो रिसोर्स पर्सन. कार्यप्रेरणा साधन व्यक्ती. बालभारती ॲप क्रिएशन सदस्य १५ देशात व्हर्चुअल ऑफलाईन, २५ अँड्रॉइड अॅप्लिकेशन केले. शाळेसाठी एसएमएस चॅनल केले. स्पर्धा परीक्षेसाठी ५०० फ्री ऑनलाइन टेस्ट. ओपेन सोर्स टूल फॉर ऑनलाइन टेस्ट. व्हिडिओज, अॅप्स गृहपाठचा वापर लाखो विद्यार्थी करतात. शाळेत लॅपटॉप स्वतः आणला, गैरहजर मुलेही यायला लागली. सुरुवातीला फ्फक्त तेवीस विद्यार्थी येत होते. त्यापैकी १२ विद्यार्थी हजर असायचे. मुलं गावात भटकत असायची. मुलांची आवड जपण्यासाठी स्वतः लॅपटॉप घेतला.
June 12, 2026
केवळ पुस्तकं वाचून अव्यक्त राहाणाऱ्या पिढीला, पुस्तकांच्या पलीकडे गेलं तरच व्यक्त होण्याच्या अनेक संधी उपलब्ध होतात. मुलांना केवळ पोपटासारखं बोलायला शिकवण्यापेक्षा व्यक्त होणं शिकवायला हवं. बालकवींची कविता ‘हिरवे हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे’ कविता पाठ करून मुले अव्यक्त राहातात; पण प्रत्यक्षात जेव्हा हिरव्या गालिच्यावरून ते चालतात, उड्या मारतात तेव्हा ती जास्त व्यक्त होतात आणि आनंदाच्याजवळ पोहचतात.
July 7, 2026
काही गोष्टी मनावर बिंबवायलाच हव्यात. आजच्या पिढी समोर फक्त डर के आगे जीत हे हेच सातत्याने येत आहे. श्रम आणि चिकाटी असेल तर यश तुमच्या पायाशी लोळण घेतं.32 तासांच्या अतिशय जटिल शस्त्रक्रियेनंतर मेंदूतील ट्यूमर काढून टाकल्यानंतर, दोन शल्यचिकित्सक पूर्णतः थकून जमिनीवर पडले,तरीही विजयी भावनेने भारलेले होते. हा क्षण उच्च-जोखमीच्या प्रक्रियेचा शारीरिक आणि मानसिक ताण दर्शवतो, जिथे प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो आणि प्रत्येक निर्णय जीवन आणि मृत्यूमध्ये फरक करू शकतो.
July 3, 2026
वेदनेला पुरस्कार दिल्याने वेदना संपत नसते. आयुष्यातील वास्तव नेहमीच आपल्याला खुणावत असते.कोणत्याही क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार मिळवण्यासाठी जात, धर्म ,आर्थिक परिस्थिती, अपंगत्व कधीच आड येत नाही.व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मनात एक कोपरा छंदाचा असतो. आपले छंद ओळखता येणं व ते जोपासणं प्रत्येकाला जमेल असं नाही. अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या नादात जीवनामधील छंद सुप्त अवस्थेतच असतात. छंदाला वाव मिळाला नाही तर तो जोपासला जात नाही. आयुष्याच्या उत्तरार्धातच अनेकांचे छंद ओळखले गेले आहेत व बहरले आहेत. शाळेत न जाता किंवा शाळा अर्धवट सोडून अनेकांनी छंदाला वेळ दिला आणि त्यात त्यांनी यशोशिखर गाठले. अनेकांनी व्यवसाय करत करत छंदही जोपासले आणि त्याचं फळ त्यांना मिळालं. असेच एक व्यक्तिमत्व म्हणजे साहित्य अकादमी प्राप्त देविदास सौदागर. वाचन व्यक्तिमत्व व आयुष्य समृद्ध करतं. वाचन तुम्हाला भरभरून देतं, ओळख देतं म्हणून वाचायलाच हवं.
June 25, 2026
येणाऱ्या पिढीलाही जीए कळायला हवेत. काही साहित्य तुमचं भावनिक पोषण करतं. जीएंचं साहित्य त्यापैकीच एक. जीवनाच्या अनेक संचितापैकी जीएंचं असणं हे एक संचित आहे. जीएंचं साहित्य अनेकांच्या दृष्टीने मुदतठेव आहे, ज्याच्यामुळे आपलं आयुष्य सुखद आहे. भावणारे साहित्य लिहिणे आपल्या आवाक्यात जरी नसले तरी वाचण्यात व ऐकण्यात ते आपलंच असतं. माणसं येतात आणि जातात पण त्यांचं साहित्य मनात घर करतं. मनात घर करणाऱ्या गोष्टीच मनात तग धरतात. शब्दांच्यापलीकडे गेल्यानंतरच जीएंचं साहित्य व त्यातील सौंदर्य कळतं. काही गोष्टींची अनुभूती घ्यायची असते. काही गोष्टी फक्त जगायच्या असतात. जीएंचं साहित्य या प्रकारात मोडतं. माणसे जाताना केवळ आठवण मागे ठेवून जात नाहीत, तर विचार मागे ठेवून जातात, अस्तित्व मागे ठेवून जातात. माणसाला मरण असतं, विचारांना मरण नसतं. त्यांच्या साहित्यानं दुःखं सहन करण्याची प्रतिकारशक्ती वाढविली आहे, अनेक संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. अनेकांना जगण्याची उमेद दिली आहे, वास्तवाची जाण करून दिली आहे. जीए म्हणजे एक साहित्यातलं अस्वस्थ करणारं नाव. अस्वस्थ साहित्य मनाला चटका लावतं, चिरकाल स्मरणात राहातं. पु.ल., वि. वा., जी. ए. हे साहित्यातील दीपस्तंभ आहेत. दुर्बोधतेततही जसा ग्रेस असतो तसं अस्वस्थतेत जीए असतात.
June 9, 2026
पुस्तकांच्या धड्यामधूनच आपल्याला धडा मिळतो असं नाही, तर प्रत्यक्ष जीवनात असे अनेक प्रसंग आहेत जे आपल्याला धडा शिकवतात. पुस्तकाबाहेर अवतीभवती आपल्याला अशा काही घटना दृष्टिक्षेपात येतात ज्या आपल्याला प्रेरणा देऊन जातात, आपल्यात नवचैतन्य जागवून जातात, नैराश्याचे मळभ झटकून टाकतात. नुसते डोळे उघडे ठेवून चालत नाही, तर निरीक्षण शक्ती आपल्याला जी दिली आहे तिचा वापर करून वैचारिक क्षेत्रात प्रवेश करता यायला हवा. विचार करता यायला हवा. आपल्यामधील वैचारिक दारिद्र्यच आपल्याला स्वतःतून उमलू देत नाही, स्वतःची उन्नती करू देत नाही. एखादी यशोगाथा झाली की ती इतिहासाचा भाग बनते; पण असं होता कामा नये. एका यशोगाथेतून दुसरी यशोगाथा जन्म घ्यायला हवी, तरच यशोगाथेची परंपरा चालू राहाते. प्रत्येकाच्या आयुष्यात नैराश्याचे मळभ येतातच; पण या नैराश्येच्या गर्तेत आपण संपलो असं माणसं समजू लागले तर ती पुन्हा उभारी घेत नाहीत. मग अवतीभवती अशा काही घटना मनातले मळभ झटकून टाकतात आणि आपणही का नाही उभारी घेऊ शकत? या विचाराने भारावून जातात.
June 11, 2026
देवाला अनेक ठिकाणी जायला जमत नाही म्हणून काही चांगली माणसे पृथ्वीतलावर कदाचित पाठवले असावीत.काही माणसांचे निष्पाप कर्म पाहून हाच विचार मनात येतो. प्रेरणेची पायवाट अजून काय असते?
June 7, 2026
भवताल सुधारलं तर मुलं सुधारतील. हवी आहे मुलांना एक ऑफलाइन आई. श्यामची आईसारखी आई हवी, वेळ देणारी आई, जी मुलाला कुशीत घेईल, गोष्टी सांगेल. स्वतःच्या हातचं मोडकंतोडकं खाऊ घालेल. मुलांना समर कॅम्पला पाठवणारी आई नको. मुलांना आईच्या तालमीतच जिजाऊसारखं शिकायला मिळावं. मुलाला नको पिझ्झा, बर्गर, मुलांना हवेत चांगले संस्कार. आमच्या मुलांच्या गरजाच अमर्याद वाढल्या आहेत आणि वाढवू दिल्या जात आहेत. मुलांच्या सभोवतांचे जग हे मायानगरी आहे. प्रलोभनामध्ये मुले न्हावून निघत आहेत. सभोवताली लैंगिक भवताल आहे, याला आळा घालणारे पालक हवेत.
June 24, 2026
असं एक प्रेरणेचे पायवाट असलेलं प्रवीण दवणे यांचं हार्दिक हे पुस्तक होय. वाचकपत्रांचा सोबतीने केलेली ही शब्दयात्रा आहे.पुस्तकांतून,पत्रांतून अनेकांचं जीवन सावरलय.अनेक वाचक लेखकांवर जगतात, लेखकाच्या तत्वज्ञानावर जीव ओलांडून टाकतात. टोकाची भावना असल्याशिवाय प्रतिक्रिया बाहेर पडत नाही. अनेक वाचकांनी प्रवीणजींच्या विचारावर, पुस्तकावर भरभरून पत्र लिहिली आहेत. पत्रातून खरंतर प्रत्येक जण जीवनाचं तत्त्वज्ञान, आकलन पाझरत असतों. कोणाचे सूर कोणाशी जुळतील हे सांगता येत नाही. लेखकाशी सूर जुळले की संवेदनशील वाचक पत्रातून खुला होतो. पत्रातून आनंद आणि वेदना झिरपते. संवाद संपलेल्या काळातही असंख्य वाचक आजही लेखकाला पत्र लिहितात. प्रत्यक्ष पत्रातून आपलं जीवन लेखकासमोर उघडे करतात, त्याच्याकडून मार्गदर्शन मागवतात.
July 14, 2026
आपल्यात असलेलं व्यंग नैराश्याच्या गर्तेत आपल्याला लोटणार या भावनेनं जीवन अनेक जण जीवन जगत असतात.काही पुस्तकं माणसें घडवतात,नैराश्य घालवतात.मालिनी चिब यांचे वन लिटील फिंगर हे पुस्तक असेच प्रेरणेची पायवाट आहे. मालिनी चिब या बहुविकलांगता म्हणजे सेरेब्रल पाल्सी या विकाराने ग्रस्त आहेत. असे असूनही या शारीरिक स्थितीशी झगडत शालेय शिक्षण ते पदव्युत्तर शिक्षण या प्रवासामध्ये भारत आणि परदेशामध्ये घेतलेले अनुभव त्यांनी स्वत:च ‘वन लिटील फिंगर’ या पुस्तकातून मांडले आहेत. दिव्यांग व्यक्तींबाबत समाजामध्ये असणारे घोर अज्ञान, त्यातून निर्माण झालेली नकारात्मक वृत्ती, दिव्यांगांना समाजाकडून मिळणारी वागणूक, शासकीय यंत्रणांची उदासीनता, भारत व पाश्चिमात्य देशांमध्ये दिव्यांगांना दिल्या जाणाऱ्या सुविधांमधील जमीन अस्मानाचा फरक, यामुळे शाळा, महाविद्यालयात प्रवेश मिळवताना येणाऱ्या अपरिमित अडचणी यांसारख्या असंख्य गोष्टींचे दाहक चित्रण आणि त्याला मालिनीने केलेला यशस्वी सामना या पुस्तकात आहे.
June 20, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti