अतुल खंडेराव कुलकर्णी
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteअतुल कुलकर्णी यांनी १९८६ साली लातूर शहरातून पत्रकारितेची सुरुवात केली.सध्या मुंबईत दैनिक लोकमतचे ब्युरो चीफ, विशेष प्रतिनिधी म्हणून लोकमतमध्ये कार्यरत. सामाजिक विषयांना स्पर्श करीत, व्यवस्थेतील चुकांवर प्रहार करीत केलेले लिखाण ही जमेची बाजू. विविध वृत्तमालिका लिहीताना सामान्य माणूस केंद्रस्थानी कसा राहील याचा सातत्याने केलेला प्रयत्न कायम दिसून येतो.