लेखसंग्रह

मृत्यू शिका

Category:

 

जन्म झाल्यापासून आपल्याला कसे जगावे हे शिकवले जाते. वय वाढेल तसं जगण्याचं शिक्षण वाढत जातं. सगळी धडपड जगण्यासाठी चालू रहाते. जीवन इतके चिवट बनते की मृत्यूचा विचारही शिवत नाही. हा विचारही आपल्या मनात का यावा हे सांगत आहेत निरेन आपटे.
कधीतरी, कोणीतरी मृत्यू पावतो. आज एक जातो, उद्या दुसरा जातो. पण आपण गेलेले नसतो. त्यामुळे मीही एक दिवशी जाईन हा विचार मनाला शिवत नाही. तरुण वयात तर मुळीच नाही. पण आपण कुठपर्यंत जगणार आहोत हे कोणालाही माहित नसतं. म्हणून जगता जगता मृत्यूही शिकायला हवा. मृत्यू शाश्वत आहे, आज ना उद्या येणारच! मग तो शिकून घेतलेला बरा. हा विचार सहसा आपण करत नाही, पण ह्याचा विचार खूप प्राचीन काळापासून झालेला आहे.

  March 29, 2026


लेखसंग्रह

कल्याण-डोंबिवलीचं “कल्याण ” झालं !, तुमच्या शहराचंही होणार!!

Category:

 

काही वर्षांपूर्वी कोकणचं California करण्याची घोषणा झाली होती. पण त्या नादात California चं कोकण होण्याची भीती असल्यामुळे तो बेत रद्द करण्यात आला. मग मुंबईचं सिंगापूर, bankbook वैगरे करायला निघाले. मुंबईत लघुशंकेला जागा मिळत नाही Bangkok करायला कुठे जागा मिळणार? तोही बेत फसला.
अनेक शहराचं बरंच काय काय करायचा प्रयत्न झाला. फक्त कल्याण-डोंबिवली शहराने कधीही कोणाचं अनुकरण केलं नाही. इथे सत्ता कोणाचीही असो, प्रत्येकाने कल्याण डोंबिवलीकरांचं “कल्याण” करून टाकलं.
ह्या शहराची मजेदार सफर घडवत आहेत निरेन आपटे.

  March 28, 2026


दाजी पणशीकर- गुरु शिष्य परंपरा- भाग ०१
व्हिडिओज - Marathi

दाजी पणशीकर- गुरु शिष्य परंपरा- भाग ०१

Category:

 

ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांनी नृत्यगुरु सोनिया परचुरे यांच्या विद्यार्थ्यांसमोर गुरुपरंपरेबाबत विचार मांडले. त्या व्याख्यानाचा पहिला भाग आज गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला आपल्यासमोर प्रसारित करीत आहोत. या भागात दाजी पणशीकर यांनी गुरु महत्त्व तसेच वक्तृत्वाचे महत्त्व देखील विषद केले आहे…
जरूर ऐका.

  March 27, 2026


गुरु-शिष्य परंपरेवर व्याख्यान- भाग ०२
व्हिडिओज - Marathi

गुरु-शिष्य परंपरेवर व्याख्यान- भाग ०२

Category:

 

आज गुरुपौर्णिमा !
ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांनी आपल्या एका व्याख्यानात ‘गुरु कसा असावा? शिष्य कसा असावा? गुरुकृपा कुणाला प्राप्त होते’ याचे केलेले विवेचन आजच्या दुस-या भागात ऐकुया

  March 27, 2026


लेखसंग्रह

नवीन वर्ष गड-किल्ल्यांवर

Category:

 

आपण मराठी माणसं भाग्यवान आहोत. आपल्याला जन्मताच शिवाजी महाराजांचा इतिहास मिळतो आणि अनेक गड किल्ल्यांचा वारसाही. हे किल्ले केव्हाही पाहावेत असे आहेत. काही विशेष कारणाने पहिले तर आणखी सुंदर दिसतात. एखादा सण किंवा नवीन वर्ष किल्ल्यांवर साजरे केले तर त्याच्या निराळ्या आनंदाचं वर्णन करत आहेत निरेन आपटे.

  March 27, 2026


लेखसंग्रह

अनैतिकच्या खांबावर उभे असलेले साम्राज्य कधीही कोसळू शकते…!!

Category:

 

अरेरेरे… काय दिवस आलेत राव…! ज्या हातांनी पोरांना केमिस्ट्रीचे फॉर्म्युले शिकवून डॉक्टर-इंजिनिअर बनवायचं स्वप्न दाखवलं, त्याच हातांत आज सीबीआयने कायद्याच्या बेड्या ठोकल्या. ज्या डोक्याने ‘गोल्ड मेडल’ जिंकलं, त्याच डोक्याने अख्ख्या शिक्षण व्यवस्थेचा बाजार मांडला. शिवराज मोटेगावकर! लातूर पॅटर्नचा स्वतःला ब्रँड म्हणवून घेणारा, १ हजार कोटींच्या साम्राज्यावर सुबत्ता भोगणारा हा माणूस आज मान खाली घालून पोलिसांच्या गाडीत बसलाय. ​पण राग या गोष्टीचा नाही की एक मोठा माणूस जेलमध्ये गेला;

  March 26, 2026


साहित्य - ललित

तीन बाळ

Category:

 

रायगड जिल्ह्यातील कर्जतजवळील जांभिवली हे माझ्या वाडवडिलांचे गाव. मला कळायला लागल्यापासूनच्या जास्त आठवणी या गावाशी निगडित आहेत.

  March 25, 2026


लेखसंग्रह

स्मरणगाथा : ५

Category:

 

धन्य होण्याचे आणि कृतकृत्य होण्याचे, गुरू ऋण अंशतः फेडण्याचे योग आयुष्यात अपवादानेच येतात. असे योग माझ्याही आयुष्यात आले. ज्यांनी माझ्या वाङ्मयीन कारकिर्दीला आशीर्वाद दिला , त्या स्वामी स्वरूपानंद महाराजांचं चरित्र लिहिण्यासाठी सेवा मंडळाकडून विचारणा झाली होती .

  March 25, 2026


साहित्य - ललित

पुणे ते मुंबई – आगामी चित्रपटासाठी फॉर्म्युला

Category:

 

एका कल्पक दिग्दर्शकाने आपल्या आगामी चित्रपटासाठी पुढील फॉर्म्युला तयार केला आहे. आजकालच्या लोकप्रिय चित्रपटांना आवश्यक असा सर्व मसाला त्यात आहे. पुणे ते मुंबई या आगगाडीच्या एका प्रवासात हा बोलपट काढता येतो. या चित्रपटाचे कथानक व शूटिंग पुणे स्टेशनवर सुरू झाले असून बोरीबंदर स्टेशनवर ते संपले आहे.

  March 25, 2026