प्रत्येक व्यक्तीचे अध्यात्मिक ध्येय असते की तिने त्या चैतन्यमय ईश्वरी शक्तीचे अस्तित्त्व जाणावे, अनुभवावे. कुणाला ईश्वर भेटला वा दिसला, ह्याची खऱ्या अर्थाने विचारवंताना देखील सत्यता पटलेली नाही. परंतु अनेक प्रसंगातून मात्र त्याच्या योजनेची शक्तीची कुशलतेची जाणीव निश्चित झालेली आहे.
September 27, 2011
नामस्मरणासाठी कोणतेही मूल्य लागत नाही. याउलट नामस्मरणामुळे सहजपणे आपल्याकडून एक हवन (होम) घडते. शरीराला ऊर्जा मिळवून देणारे आणि स्फूर्ती मिळवून देणारे, हे अन्न साक्षात परब्रम्ह आहे. अन्नग्रहण करणे म्हणजे नुसते पोट भरणे नव्हे तर तो एक यज्ञ कर्म आहे हे जाणून घ्यावे”.
September 22, 2020
जर आपला स्वभाव चांगला असेल आणि लोकांना आकर्षित करणारा असेल, तर लोक आपल्याजवळ येण्यासाठी उत्सुक होतील, म्हणून दुसऱ्यांना जिंकण्यासाठी मोठमोठ्या गोष्टींची आवश्यकता नसते, आवश्यक असतो तो आपला स्वभाव. जो दुसऱ्यांच्या दुःखात त्यांच्या सोबत राहतो, सुखात सहभागी होतो, अश्याच व्यक्तींना लोक आपलेसे करतात.
May 6, 2021
ही कथा एका अशा भक्ताची आहे ज्याच्या हृदयामध्ये सदैव शिवभक्ती आणि श्वासांमध्ये ॐ नमः शिवाय गुंजत होते. त्यांचे नाव आहे, “संत नरहरी सोनार…..”
April 1, 2021
नवदुर्गेचा तिसरा अवतार हा माता चंद्रघण्टा…. चंद्रघण्टा मातेच्या मस्तकावर चंद्र सुशोभित आहे आणि मातेच्या हाती नाद करण्यासाठी घण्टावादय आहे. माता चंद्रघण्टा या साक्षात ध्वनिमुर्ती आहेत.
October 21, 2020
अहंकार म्हणजे गर्व, गर्विष्ठपणा, स्वतःच्या श्रेष्ठत्वावर वाटणारा एक उन्मत भाव, एक वाईट स्वभाव, इतरांना कमी लेखणारे विचित्र वागणे. अहंकारामुळे आपण फक्त नातेसंबंध नाही तर आपल्यातली माणुसकी सुद्धा संपवतो. ही कथा आपल्याला शिकविते की कधीही गर्व करू नये. अहंकार बाळगू नये.
June 19, 2020
दुर्गामातेचा पहिला अवतार आहे, माता शैलपुत्री….. शैलपुत्री नावामधील शैल चा अर्थ आहे पाषाण आणि पुत्री म्हणजे कन्या. शैलपुत्री म्हणजे हिमालय पुत्री…. आता आपण पाहूया माता शैलपुत्रीच्या जन्मावताराची कथा….
October 20, 2020
कालीरात्री हा दुर्गामातेचा सातवा अवतार आहे. कालचा अर्थ आहे मृत्यू आणि रात्रीचा अर्थ आहे काळोख, अंधकार, अज्ञान…. अज्ञानरूपी काळोखाला मॄत करण्यासाठी स्वतः दुर्गामातेने कालीरात्रीचे रूप धारण केले. जगाच्या संरक्षणाकरीता मातेचा हा रक्षणरुपी अवतार…..
October 30, 2020
आस्तिकता म्हणजे परमेश्वराच्या भव्यदिव्य अखंड अस्तित्वावर असलेला विश्वास आणि निस्वार्थ अशी भक्ती…. अक्कलकोट मधलीच एका गोविंद नावाच्या देव-दैव न मानणार्या नास्तिक इसमाची ही गोष्ट..
July 9, 2020
… गुरुदेव म्हणाले की, “मी रजईला गुंडाळले नाहीये, ही रजईच मला घट्ट धरून बसली आहे, मी किती प्रयत्न करतोय यातून स्वतःला सोडवण्याचा… पण मला सहज शक्य होत नाहीये. माझी ही इच्छा आहे की मी ही रजई स्वतःपासून मुक्त करू.
June 24, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti