(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • बाळक्रीडा अभंग क्र.१७

    संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.

      August 28, 2018


  • घसा खवखवणे आणि दुखणे

    घसा दुखणे ही एक नेहमी आढळणारी तक्रार आहे. खाज सुटल्यासारखे खवखवणे आणि घशात खूप वेदना जाणवणे या दोन टोकांत कमी-जास्त प्रमाणात त्रास होतो. घशातून मेंदूकडे संवेदना नेणाऱ्या मज्जातंतूच्या शिरा (नववी आणि दहावी क्रेनियल नर्व्ह) याच कानातूनही संवेदना मेंदूत नेतात. त्यामुळे घशाच्या आजारात अनेकदा कानही दुखवतो आहे, अशी रुग्णाला भावना येते. जिवाणू अगर विषाणूजन्य दाह, इजा होणे, ऍलर्जी, घशाचा कॅन्सर, शरीराचे काही अन्य आजार, शस्त्रक्रिया किंवा तपासण्यानंतर घसा दुखतो. तोंड उघडे ठेवून श्वाचस घेतला गेला तर घशाचे अस्तर कोरडे पडते. खूप मोठ्याने बोलण्याने स्वरयंत्रणेवर ताण पडतो. अतिरेकी मद्यपान, नाकाघशातून धूर जाणे किंवा अमोनियासारखा वायू घशात जाणे यामुळेसुद्धा घसा दुखू लागतो. घसा दुखण्याची कारणे अनेक. घसा दुखण्याचे एक नेहमी आढळणारे कारण म्हणजे ऍलर्जिक ऱ्हायनायटिस. हा त्रास विशिष्ट ऋतुमानात अथवा वर्षभर होत राहू शकतो. घसा दुखतो व नाक चोंदते. नाकातून पातळ द्राव वाहतो. नाकाच्या मागून घशात स्राव उतरतो. झटके आल्याप्रमाणे शिंकांच्या एकामागोमाग फैरी येतात. वास येत नाही. कपाळ व कानशिलांच्या वरचा भाग दुखू लागतो. डोळे, नाक व घसा येथे खाज सुटते. डोळे लाल होतात. पापण्या सुजतात. हा आजार फुलांच्या परागांना, बुरशीच्या गोलकांना, धुळीला, प्राण्यांच्या त्वचेवरील खवल्यांना झालेल्या ऍलर्जीमुळे होतो. ऍलर्जीचे कारण शोधण्याचा प्रयत्न करून त्यावर उपचार करता येतो; परंतु, यामुळे सर्वांनाच फायदा होईल असे नाही.

    काही औषधांत अँटि-ऍलर्जिक रेणू असतात, त्यांनी गॅस्ट्रो इसोफेजियल टीफ्क्ललस डिसीझ या विकारात अन्ननलिका आणि जठर यांतील झडप कमजोर होते. परिणामी जठरातील पाचकरस अन्ननलिकेतून घशापर्यंत येतात. या पाचक रसात हायड्रोक्लोजरिक ऍसिडचे प्रमाण बरेच असते. स्वरयंत्रणेचा दाह होतो. आवाज बसतो. अशा व्यक्तींमध्ये स्वरयंत्रणेवरील कूर्चाही सुजणे आणि रुग्णाला आपल्या घशात "गाठ‘ असण्याची भावना येऊ लागते. ग्लॉसोफॅटिंजियल न्यूरालनिया या आजारात घशाच्या एकाच बाजूला चमक आल्यासारखी किंवा कापल्यासारखी वेदना येते. सहसा गिळताना किंवा जांभई देताना हा त्रास अधिक तीव्रतेने जाणवतो. ही वेदना कानापर्यंत जाणवू शकते. हर्पीन सिंप्लेक्सा नावाच्या विषाणूने सहसा नाक व वरचा ओठ येथे फोड येतात (ज्वर उतणे). हा विषाणू कधी कधी घशातही फोड निर्माण करतो. जीभ, घसा, हिरड्या यावर श्वासाला दुर्गंधी सुटते. लाळ खूप येऊ लागते. भूक लागत नाही. अंगात बराच ताप भरतो. इन्फ्लुएंझाच्या आजाराची सुरवात घसा दुखण्याने होते. इन्फेक्शहस मोनोन्यूक्लीीओसिस या आजारात घसा दुखतो. मानेत गाठी येतात. ताप जात-येत राहतो. एपस्टाईत बार नावाच्या विषाणूने तो येतो. आजारी व्यक्तीच्या लाळेतून हा विषाणू परिसरात पसरतो. प्लीहा वाढते. वाढलेली प्लीहा ठिसूळ असते. तुलनेने क्षुल्लक मार लागल्याने ही वाढलेली प्लीहा फुटते व प्राणघातक रक्तस्राव होतो. जिभेच्या, घशाच्या, स्वरयंत्रणेच्या कॅन्सरमुळेदेखील घसा दुखतो. घसा दुखतो अशी तक्रार असणाऱ्या प्रत्येक रुग्णाची काळजीपूर्वक कसोशीने तपासणी होणे आवश्येक आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- सकाळ / डॉ. ह. वि. सरदेसाई

      January 13, 2017


  • राष्ट्रवादी काॅंग्रेस भविष्यात बारामती पुरतीच

    राज्यभरात गेल्या तीन महिन्यांत मराठा मोर्चाचे वादळ उठले होते. या मराठा मोर्चाचा फायदा राष्ट्रवादी कॉंग्रेसला होईल, असे सरधोपटपणे म्हटले जात होते. प्रत्यक्षात तसे घडलेले नाही.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाणी पाजू, असं विधान बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारसभेत केलं. पण झालं उलटचं.

    राष्ट्रवादी काँग्रेसनं बारामतीत दणदणीत विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा येथे पराभव झाला असता तरं ती "नॅशनल न्यूज' ठरली असती. अजित पवार यांनी बारामतीचा गड राखला, अशी नेहमीचीच बातमी त्यामुळं "फ्लॅश' झाली.

    नगरपालिकांचा निवडणुकीचा दुसरा टप्पा पार पडल्यानंतर आणि गेल्या अडीच वर्षांची स्थिती पाहिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससाठी भविष्यात एकचं चांगली बातमी येऊ शकते. ती बातमी हीच की *"बारामतीचा गड अजित पवारांनी राखला."* बारामतीच्या पुढे आणि मागे राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती आता हतबल होऊ लागली आहे. बारामती शेजारच्या सासवड, जेजुरी, इंदापूर, दौंड या ठिकाणी पक्षाला यश मिळालेले नाही. ज्या पुणे जिल्ह्यातून विधानसभेच्या 21 जागा निवडून दिल्या जातात. त्या बालेकिल्ल्यातच पक्षाची अशी स्थिती असेल तर इतरत्र बोलायलाच नको.

    अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे अशा हाताच्या बोटांवरील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपापले बालेकिल्ले राखले. इतरत्र भाजपने किंवा शिवसेनेने बाजी मारली. काँग्रेसला जोमाने प्रयत्न न करता चांगल्या जागा मिळाल्या.

    राज्यभरात गेल्या तीन महिन्यांत मराठा मोर्चाचे वादळ उठले होते. या मराठा मोर्चाचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होईल, असे सरधोपटपणे म्हटले जात होते. प्रत्यक्षात तसे घडलेले नाही.

    राष्ट्रवादी काँग्रेसची एक महत्त्वाची अडचण झालेली आहे ती म्हणजे त्यांच्याकडे दुसऱ्या फळीत "स्ट्रटेजिस्ट' नाहीत. आर. आर. पाटील असताना त्यांनी जेम्स लेनच्या मुद्यावरून 2004 मध्ये रान पेटवले होते. (आता हा मुद्दा चांगला की वाईट, यावर वाद होऊ शकतात. पण पक्षाची स्ट्रटेजी म्हणून जेम्स लेनचा मुद्दा राज्यात गाजला.) त्याचे चांगले यश मिळून हा पक्ष विधानसभेत राज्यात नंबर एकवर गेला. आता मराठा मोर्चाच्या निमित्ताने भाजपविरोधात रान उठविण्यासाठी या पक्षाकडे फिल्डवरचा नेताच राहिला नाही. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगरपालिका किंवा महापालिका निवडणुकीत उतरुन आक्रमक पद्धतीने प्रचार करणे अपेक्षित नाही. आर. आर. पाटील असते तर त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यभर फिरून त्यावर भाजपला अडचणीत आणले असते. तसा गर्दी खेचणारा नेता सध्या राष्ट्रवादीकडे नाही.

    राष्ट्रवादीकडे सध्या असलेले नेते हे इलेक्‍शन मॅनेजमेंट मधील तज्ज्ञ आहेत. कोणत्या गल्लीत कोणत्या समाजाची किती मते आहेत आणि कोणाच्या भावकीचा जोर कुठे आहे, याची माहिती त्यांना तोंडपाठ असेलही. मात्र या सूक्ष्म नियोजनासोबतच व्यापक अर्थाने पक्षाच्या मुद्यांची मांडणी करणारा, कार्यकर्त्यांना चेतविणारा नेता दुसऱ्या फळीतील नेता नाही. या नेत्यांकडे ही क्षमता नाही की जाणीवपूर्वक ते स्वतःला "एक्‍स्पोझ' करत नाहीत, हा देखील मुद्दा आहे. कारण भाजप सरकारच्या विरोधात ओरडले की आपला " काटा" केला जाईल, अशी धास्ती या नेत्यांच्या मनात असावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जवळीक साधण्याची ही देखील गरज असावी. नोटांच्या मुद्यावरून ममता बॅनर्जी आक्रमक होतात. पण राष्ट्रवादीचे नेते सावधपणे बोलतात.

    सध्याचे सत्ताधारीही राज्यात काहीही घडले तरी त्याचे सारे खापर अजून कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या डोक्‍यावर फोडून मोकळे होतात. काँग्रेस थोडेफार तरी प्रत्युत्तर देते. भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांचे झेंगाट मागे लागल्याने राष्ट्रवादीला असे प्रत्युत्तर देणेही अवघड होऊन बसते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जे दुसऱ्या फळीतील नेते आहेत, त्यातील अनेक नेते भाजपशी आतून संधान साधून आहेत. म्हणजे पक्षाचे जहाज बुडणार असल्याचे लक्षात आल्यानंतर ही मंडळी भाजपमध्ये केव्हाही उडी मारू शकतात. लोकसभेत पक्षाच्या सहा खासदारांपैकी चार खासदार हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या वावड्या अधूनमधून उठत असतात. उदयनराजे हे पक्षाला जुमानतच नव्हते. विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते यांच्या आणि भाजपच्या नेत्यांच्या बैठका झाल्याचे सत्तेच्या वर्तुळात चर्चा आहे.

    कोल्हापुरचे खासदार महाडिक हे केव्हाही पक्षातून उडी मारू शकतात. कारण त्यांचे बंधू भाजपचे आमदार आहेत. अंदमान-निकोबारच्या खासदाराने केव्हाच भाजपशी जवळीक वाढवली आहे. जयंत पाटलांना भाजपची खुली ऑफर असल्याचे सांगण्यात येते. ही सारी मंडळी योग्य संधीची वाट पाहत असल्याचे बोलले जाते. आधीच पक्षाचा पाया पश्‍चिम महाराष्ट्रावर आधारीत. त्यात ही अशी स्थिती. विदर्भात पक्षाला फार काही स्थान नाही. मराठवाड्यात परिस्थिती अनुकूल आहे; पण तिचा लाभ घेता येत नाही. उत्तर महाराष्ट्रात नेतृत्त्व नाही. कोकणातील नेत्यांत वाद संपत नाहीत. साठहून आमदार देणाऱ्या मुंबई-ठाणे पट्ट्यातील मतदार राष्ट्रवादीला साथ देत नाही. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस आगामी काळात बारामतीपुरतीच मर्यादित राहणार का, अशी शंका जी येते त्याला ही सारी कारणे आहेत. राष्ट्रवादीला पाणी पाजण्यात भाजपा ब-यापैकी यशस्वी झाली आहे, ही मात्र खरे.✍?

      December 16, 2016


  • समांतर ब्रम्हांड – Parallel Universe

    या विश्वामधे अनेक ठिकाणी अनेक Universes असू शकतात आणि त्यातील काही असे असू शकतात की तिथे तुमच्या हुबेहूब जीवनाचे प्रति रूप असू शकते अर्थात समांतर ब्रम्हांड.

      April 25, 2024


  • गणेशपञ्चरत्नम् – मराठी अर्थासह

    गणेशपञ्चरत्नम् – मराठी अर्थासह

    आदि शंकराचार्यांनी रचलेल्या या श्री गणेशाच्या स्तुतीपर स्तोत्रात पाच श्लोक आहेत. सहावा फलश्रुतीचा आहे. यातील श्लोकांचे / चरणांचे विविध अभ्यासकांनी वेगवेगळे अर्थ लावलेले दिसतात.

      August 22, 2020


  • नववर्षाच्या संकल्पांशी प्रामाणिक आहात ?

    सकाळी लवकर उठायचे......

    रोज किमान अर्धा तास तरी व्यायाम व योगासने करायची...

    रोज आंघोळ करायची........

    रोज किमान दोन किलोमीटर तरी चालायचे.....

    आहारावर व खाण्यावर नियंत्रण ठेवायचे, तेलकट, तुपकट & गोड पदार्थ(?) कमीच करायचे.....

    खर्च कमी व सेव्हीँग जास्त करायचे.......

    स्वदेशी वस्तुच जास्त वापरणार..........

    रोज एखादे चांगले काम करायचे............

    रोज रात्री फेसबुक व Whattsup वर कमी व निद्रेमध्ये जास्त रहायचे........

    जिमला नियमितपणे जायचे.......

    रोज सकाळी पेलाभर गरमलिंबुपाणी प्यायचे.....

    चांगले पुस्तक आणि कविता वाचतच झोपायचे....

    लिफ्टचा वापर कमी करत जिन्यानेच वर जायचे....

    रोज पाच ईँग्रजी शब्द पाठ करायचे.....

    रोज किमान 15 मिनिटे तरी वर्तमानपत्र वाचायचे.....

    गाडी चालवताना मोबाईल वापरायचाच नाही.....

    रोज सकाळी ऑफीसला जाताना एकाला तरी लिफ्ट द्यायची..

    रोज घरातले एक तरी काम करायचे.....

    आठवड्यातुन एकदा तरी घर आवरायला आईला मदत करायची......

    नातेवाईकांना महीन्यातुन एकदा तरी कॉल करायचा.....

    रोज आंघोळ झाल्यावर (?) एक जपमाळ करायची आणि एक आवडते स्तोत्र वाचायचे.".....

    हे असे अनेक संकल्प आपल्या सभोवतालची हिंदु माणस ख्रिस्तींच्या "न्यु ईयर"ला करतात. (सर्वधर्मसमभाव )

    पण या संकल्पाशी वर्षभर कितीजण प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहतात देवच जाणे.

    -- विवेक जोशी

      January 2, 2017


  • उजेडाची पहाट येवो !

    अगदी वेदमंत्रासारखी ऋचा वाटतेय ना? अर्थात शब्दांना अद्याप मंत्रांचे सामर्थ्य प्राप्त झालेले नाही,याची जाणीव आहे. पण गेल्या १०-१२ दिवसांच्या कुंद सकाळच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी उजेड दिसला (रविवार सकाळ म्हणून की काय?)

      July 20, 2022


  • डॉ. सॅम्युअल हनेमन – होमिओपॅथीचे जनक (पूर्वार्ध)

    डॉ. सॅम्युअल हनेमन हे होमिओपाथी या वैद्यकशास्त्राचे जनक होते. त्यांचा जन्म १७५५ साली झाला. त्या काळात वैद्यकीय उपचारांसाठी विविध पद्धती प्रचलित होत्या. अशावेळी डॉ. हनेमन यांनी वैद्यक हे शास्त्रोक्त पद्धतीच्या चौकटीत कसे बसवता येईल याचा शोध घेण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले.

      April 29, 2023


  • सप्टेंबर २४ – जिमी अमरनाथ आणि विसविशीत विश्वविजय

    भारतीय संघातून क्रिकेट खेळणे ही ज्यांच्या घराण्याची एके काळी मिराशी बनली होती (असे म्हणण्यासारखी परिस्थिती होती) त्या घराण्यात २४ सप्टेंबर १९५० रोजी मोहिंदरचा जन्म झाला. ‘जिमी’ हे त्याचं लाडाचं नाव. जिमीचे वडील लालाजी आणि जिमीचा भाऊ सुरिंदर हेही कसोटीपटू होते. राजिंदर हा जिमीचा आणखी एक भाऊ. तो प्रथमश्रेणी खेळला.

      September 24, 2010


  • साडेसाती म्हणजे काय? -भाग १ ला (पूर्वार्ध)

    काल मी शनीची ‘साडेसाती’ या विषयावर लिहिलेल्या एका छोट्याश्या लेखामुळे मला अनेकांचे फोन आले. बहुतांश फोन मुख्यतः स्वत:च्या राशीबद्दल विचारणा करणारे होते. आता प्रत्येकाच्या राशीबद्दल अशी माहिती देणं शक्य असलं तरी केवळ एका राशीवरून कोणताही अंदाज वर्तवणं शक्य होत नाही हे मी त्या सर्वाना सांगितले.

      January 17, 2017