वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आयुर्वेदिक म्हटल्या बरोबर आपल्या मनात प्रथम येतं "परिणाम हळू होत असला तरी साईड-इफेक्ट नसतात". आयुर्वेदामधे अतिशय जलद परिणामकारी औषधे आहेत ह्यावर आपला आता नक्की विश्वास बसेल. वर्षानुवर्ष सतत अभ्यास केल्यावर असा अनुभव येतो की आयुर्वेदात नमूद केलेली औषधे व आरोग्य विषयक मूलभूत सिध्दांत हे त्रिकालाबाधित सत्य आहेत. पित्तशमन औषधे व मेदनाशक औषधांची जोडी मेद कमी करण्यासाठी कशी कार्य करते ह्या विषयी थोडक्यात माहीती बघूया. वजन कमी करण्यासाठी दोन महत्वाच्या क्रिया होणे आवश्यक आहे. प्रथम आहारावर नियंत्रण व दुसरे मेद विलयन करून तो शरीरा बाहेर काढणे. ह्याला मेदनाशक औषधांचा (थर्मोजेनिक म्हणजे ऊष्मा वाढविणारी औषधे) उपयोग करावा लागतो. चरबी किंवा मेद हा मेणासारखा असतो. ऊष्णतेमुळे सहज वितळतो अर्थातच थंडपणामुळे गोठून एका ठिकाणी पक्का बसतो. म्हणून मेद नाशक औषधे स्वाभाविकपणे पित्ताची वाढ करतात. त्यामुळे आपोआप भूकही वाढते. म्हणून अशा औषधांमुळे घशाशी आंबट/कडू येणे, छातीत जळजळ होणे अशी लक्षणे होऊ लागतात. शिवाय औषध घेणे बंद केल्यानंतर भूक वाढते व अन्न जास्त प्रमाणात खाल्ले जाते. पित्तशमन औषध जेवणाच्या आधी घेण्यामुळे पित्त स्राव कमी होतो, भूक सौम्य होते शिवाय ऊष्मा वाढविणारी म्हणजेच मेदनाशक औषधांच्या ऊष्ण गुणांपासून आतड्यांच्य नाजुक आवरणाचे संरक्षण होते. ही प्रक्रिया योग्य रीतीने होण्यासाठी पित्तशमन २ गोळ्या जेवणाच्या दोन ते तीन तास आधी घ्याव्यात व मेदनाशक च्या २ गोळ्या जेवणानंतर लगेच घ्याव्यात. आपला आहार-विहार हा शरीरातील सर्व घडामोडींसाठी कारणीभूत असतो. त्यामुळे आहार-विहार आहे तसाच चालू ठेवून वजन कमी करण्याचा प्रयत्न करणे चुकीचे ठरेल. गोड पदार्थ किंवा तळलेले/तुपकट पदार्थ टाळले पाहिजेत ही बाब अगदी लहान मुलांना पण माहिती असते. आयुर्वेदानुसार आरोग्य विषयक मूलभूत सिध्दांतांच्या आधारे काही लहान-सहान गोष्टी अमलात आणल्या तर परिणाम लवकर होतो व प्रकृती उत्तम राहते. ही माहिती वाचतांना आपल्याला काही गोष्टी कदाचित चुकीच्या किंवा प्रवाहाच्या विरुध्द वाटतील, पण ह्या गोष्टी अनेक पिढ्यांच्या अनुभवातून सिध्द झालेल्या आहेत.
गोड पदार्थ जेवणाच्या शेवटी खाण्याची एक प्रथा आहे. आयुर्वेदानुसार गोड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खावेत, शेवटी खाणे योग्य नाही. अतिरिक्त चरबी वाढण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. हा मुद्दा नीट समजण्यासाठी एक प्रयोग स्वतः करून पहा. एक दिवस नेहमीचे जेवण झाल्यानंतर ठराविक प्रमाणात काही गोड पदार्थ खा. १-२ दिवसांनी तोच गोड पदार्थ तेवढ्याच प्रमाणात जेवणाच्या सुरुवातीला खा. आपल्याला नहमीपेक्षा निम्मे जेवण जाईल. म्हणजेच आपल्याला जवढी खरी भूक आहे तेवढेच अन्न घेतले जाते, अनावश्यक किंवा अवाजवी अन्न घेणे अशा प्रकारे सहज टाळता येऊ शकते. जेवणानंतर पान खाण्याची पध्दत योग्यच नव्हे तर शास्त्रीय आहे. ह्याचा अर्थ प्रत्येकाने पान खावे असा न घेता, जेवणाचा शेवट गोड पदार्थाने करू नये, एवढा अर्थ नक्कीच घेतला पाहिजे. शरीराला हलकेपणा आणण्याचा हा अगदी सहज सोपा उपाय आहे.
सर्व फळांमधे कमी-जास्त प्रमाणात साखर असते. त्या साखरेला उतारा म्हणून निसर्गाने सोबत कडू-तुरट चवीच्या बिया व साली दिल्या आहेत. बिया व सालींमधे अधिक प्रमाणात जीवनसत्व असतात. आपण फक्त चवीच्या सुखानुभवा पायी ही जीवनसत्व वाया घालवतो. वजन कमी करण्याचा निश्चय केलेल्यांनी सहज शक्य होतील तेवढ्या बिया व साली फेकून देऊ नयेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
November 18, 2016
लक्ष्यॆषु सत्स्वपि कटाक्षनिरीक्षणानां
आलॊकय त्रिपुरसुन्दरि मां कदाचित् ।
नूनं मया तु सदृशः करुणैकपात्रं
जातॊ जनिष्यति जनॊ न च जायतॆ वा ॥ १० ॥
भक्ताच्या आणि भगवंताचे नाते माता पुत्रासमान असते. इथे तर भगवती आई जगदंबेचाच विषय आहे. त्या पुत्र वात्सल्याचे विविध पैलू आचार्यांच्या विवेचनात प्रकट होत आहेत. आईला अनेक लेकरे असतात. सगळेच तिला प्रिय असतात. पण त्यातही जे लेकरू थोडे दुर्बल असते, असहाय्य असते, हतबल असते, त्यावर आईचे थोडे अधिक लक्ष असते. व्यवहारातील मातेचा हा स्वभावविशेष येथे आधार करीत आचार्य श्री आई जगदंबे ला स्वतःकडे लक्ष द्यायला सांगत आहेत.
आईच्या विश्वजननी स्वरूपाला मान्य करत ते आरंभी म्हणतात,
लक्ष्यॆषु सत्स्वपि कटाक्षनिरीक्षणानां
आलॊकय त्रिपुरसुन्दरि मां कदाचित् - आई जगदंबेच्या कृपाकटाक्षाने निरीक्षण करावे असे असंख्य जीव असले तरी ही त्रिपुरसुंदरी माझ्याकडे कदाचित पाहील.
अर्थात तिच्या कृपेला पात्र जगात असंख्य लोक आहेत. त्या सगळ्यांच्या तुलनेत मी अत्यंत सामान्य आहे. त्यामुळे पहिल्या आवेगात माझ्याकडे लक्ष जाणार नाही हे ठीक आहे. पण तरी ती त्रिपुरसुंदरी माझ्याकडे पाहील.
हा एक तर माझा विश्वास आहे आणि दुसरा माझा नाईलाज.
विश्वास यासाठी की ती जगज्जननी आहे तर मग माझा अव्हेर कसा करेल? आणि नाईलाज यासाठी की तिच्या शिवाय मला आहे तरी कोण?
आई जशी हतबल लेकराकडे अधिक पाहते तशी ती माझ्याकडे पाहणारच. कारण,
नूनं - खरोखरच
मया तु सदृशः- माझ्या समान.
करुणैकपात्रं- करूणेला पूर्णपणे पात्र.
जातॊ जनिष्यति जनॊ न च जायतॆ वा - आजवर कोणी जन्माला आला नसेल किंवा कदाचित भविष्यात जन्माला येणार ही नाही.
मग माझी आई ! तुला माझ्याकडे दुर्लक्ष करून कसे चालेल?
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
April 21, 2020
भगवान श्रीविष्णुंच्या चरणकमलांचे अलौकिकत्व वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात, भगवान श्रीविष्णु जगत पालक असल्याने त्यांना देव आणि दैत्य दोन्ही आपले आहेत. कोणत्याही एका समूहावर ते कधीच अन्याय होऊ देत नाहीत.
December 16, 2020
मला चित्रकलेची आवड लहानपणापासून होती. मी दादरच्या बालमोहन विद्यामंदिर शाळेत जात होते. घर शाळेच्या अगदी जवळ असल्यामुळे आमचे चित्रकलेचे सर मला सुस्वागतमची रांगोळी काढायला बोलवत असत. त्यांचा मला जास्त सहवास मिळायचा व ते मला चित्रकलेबद्दल बरेच सांगायचे. आमच्या शाळेत प्रत्येक वर्गाचं दरवर्षी एक मासिक काढलं जायचं, त्याचं मुखपृष्ठ नेहमी मीच काढत असे.
November 29, 2024
…. आज हे आठवायचे कारण म्हणजे त्यांच्या पत्नी,श्रीमती रोहिणी हट्टंगडी यांनी साकारलेली “कावेरी “पाहिली टीव्ही वर “नटसम्राट “मध्ये ! आजही भरून पावलो.
July 28, 2022
भाषेबद्दल शिक्षकास पत्र (सुधारित) – (अब्राहम लिंकनची माफी मागून)
November 13, 2021
भारतीय खवले मांजराची लांबी (डोके व धड) ६०-७५ सेंटीमीटर असते. शेपूट ४५ सेंटीमीटर लांब असते. डोके लहान, तोंड लांबट व पुढे निमुळते असते. डोळे बारीक व कान फार लहान असतात. भारतीय खवले मांजर साधारणत: ८ ते ३५ किलोपर्यंत वाढते. त्याच्या अंगावर असलेले खवले हे किराटीन नामक द्रव्यापासून तयार होतात.
February 19, 2022
अतिदक्षता विभागात संगणकीकृत निरीक्षणे ठेवणे व तेथील रुग्णांच्या अतिमहत्त्वाच्या चाचण्यांवर सतत लक्ष ठेवणे हे आज आपल्या ओळखीचे आहे. परंतु अशा प्रकारचा अतिदक्षता विभाग असावा अशी कल्पना मांडून , त्याचे प्रारूप कर्कलीन यांनी सुचविले व आज जगभरात ते अंमलात येते आहे. या प्रारूपाच्या वापरामुळे रुग्णांची काळजी घेणे सुलभ झाले आहे. त्याचप्रमाणे शस्त्रक्रियेनंतरची गुंतागुंत कमी झाली आहे व पर्यायाने कित्येकांना जीवदान मिळाले आहे.
March 31, 2019
भगवान श्री विष्णूच्या नाभीकमलाचे वर्णन केल्यानंतर, त्यातून उत्पन्न झालेल्या भगवान ब्रह्मदे वांचे जन्मस्थान असलेल्या कमळाचे वर्णन केल्यानंतर, भगवंताच्या संपूर्ण उदराचे एकत्रित स्वरूपातील वर्णन आचार्य श्री प्रस्तुत श्लोकात करीत आहेत. ते म्हणतात,
December 28, 2020
तांब्याच्या भांड्यात रात्रभर ठेवलेलं पाणी सर्वोत्तम असा संदर्भ आयुर्वेदात नेमका कुठे आलाय बरं? साहजिकच मला हा प्रश्न सतावू लागला आणि मग याविषयी संदर्भ काढायला सुरुवात केली. याबाबत काही ज्येष्ठ वैद्यांशीही चर्चा केली. या सगळ्या प्रक्रियेचा सारांश इथे देत आहे.
April 25, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti