(User Level: User is not logged in.)

सामान्यज्ञान

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मदर इंडिया’ हिंदी चित्रपटसृष्टीतील गाजलेला चित्रपट

    १९२७ साली एक अमेरिकन लेखकाने याच नावाचे एक वादग्रस्त पुस्तक लिहून भारतीय स्त्री यांच्या पुराणातील विधानांचा आधार घेऊन, स्त्री प्रतिमेला बदनाम करण्याची उठाठेव केली होती. त्यावर उत्तर देण्यासाठी, भारतीय स्त्री जशी सोशिक तशीच कशी धाडसी व कणखर असू शकते याचा प्रत्यय आणून देण्यासाठी त्याने आपल्या औरतच्या पुनरावृत्तीला ‘मदर इंडिया’ असे शीर्षक दिले.

      October 25, 2021


  • स्वरानंद संस्थेचा वर्धापन दिन

    स्वरानंदचा उद्देश हा भारतीय अभिजात आणि ललित संगीताची अभिरुची जनात वाढविणे, त्याचा प्रसार करणे राहिला आहे.

      November 7, 2021


  • भारतातील मोबाईल सेवेची २६ वर्षं

    ज्या कोलकात्यातून १६४ वर्षांपूर्वी पहिली तार पाठविण्यात आली होती त्याच कोलकात्यातून ३१ जुलै १९९५ रोजी पहिला मोबाईल कॉल लावण्यात आला.

      July 31, 2021


  • वसुबारस

    चांगले कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.

      November 1, 2021


  • दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे

    दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा चित्रपट मुंबईतील मराठा मंदिर या थिएटरमध्ये ही जवळपास २४ वर्ष म्हणजेच, १२७४ आठवड्यांपर्यंत चालला.

      October 20, 2021


  • जागतिक बालरंगभूमी दिवस

    बालरंगभूमी हा उत्तम अभिनेता किंवा अभिनेत्री घडविण्याचा पाया आहे. हा पाया लहान वयातच पक्का करून घेतला तर पुढे व्यावसायिक रंगभूमी, चित्रपट किंवा दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांसाठी कसदार अभिनय करणारे चांगले कलाकार मिळू शकतात. नाटक, चित्रपट किंवा दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमध्ये आघाडीवर असलेल्या अनेक कलाकारांची सुरुवात बालरंगभूमीपासूनच झाली आहे.

      March 20, 2022


  • झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यातील १४ फूट उंचीच्या पुतळ्याचे पासष्ठव्या वर्षांत पदार्पण

    हा पुतळा कोणत्या शिल्पकाराला करायला द्यायचा याचा निर्णय घेण्याचे अधिकार समितीने ज्येष्ठ शिल्पकार विनायक करमरकर यांच्याकडे सुपूर्द केले होते. त्यानुसार भगवंतराव गोरेगावकर आणि नानाभाई गोरेगावकर यांनी हा पुतळा घडवावा, असे करमरकर यांनी सुचविले. या पुतळ्यामध्ये काही त्रुटी राहू नयेत यासाठी महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांचा सल्ला घेण्यात आला होता, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी त्या काळात ९६ हजार ६४३ रुपये खर्च आला होता.

      June 18, 2022


  • अभिमान चित्रपटाची ४८ वर्षे

    आजच्या दिवशी १९७३ साली अभिमान चित्रपट प्रदर्शीत झाला याला आज ४८ वर्षे झाली.

    हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक उल्लेखनीय चित्रपटांपैकी एक मानल्या जाणाऱ्या काही चित्रपटांपैकी एक म्हणजे, १९७३ साली प्रदर्शित झालेला चित्रपट 'अभिमान' होय.
    सांगितिक बहर असलेल्या या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी मूख्य भूमिका साकारल्या होत्या. हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात बिंदू, असरानी यांसारख्या कलाकारांनीही उल्लेखनीय व्यक्तीरेखा साकारल्या होत्या.

    दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांच्या कारकिर्दीतील लक्षणीय चित्रपटांमध्ये अनेक सिनेरसिकांनी 'अभिमान' या चित्रपटालाही पसंती दिली होती. 'अभिमान' चित्रपटाच्या लोकप्रियतेचे आणखी जमेची बाजू म्हणजे चित्रपटाचे संगीत. एस. डी. बर्मन यांच्या संगीताने परिपूर्ण अशा या चित्रपटातील गाण्यांनाही सिने व संगीत रसिकांनी फार पसंत केले होते.

    चित्रपटाचे कथानकच मुळात संगीतावर आधारलेले असल्यामुळे आजही 'अभिमान'ची गाणी तितकीच लोकप्रिय आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठीत गीतकार मजरुह सुलतानपुरी यांच्या लेखणीने शब्दबद्ध केलेली ही सुमधुर गीते लता मंगेशकर, मोहम्मद रफी, किशोर कुमार या नामवंत आणि पट्टीच्या गायकांनी गायली होती. 'तेरे मेरे मिलन की ये रैना', 'पिया बिना' या गाण्यांसह चित्रपटातील इतर सर्वच गीते आणि अमिताभ व जया यांच्या जोडीने साकारलेल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते.

    'अभिमान' मध्ये साकारलेल्या भूमिकेसाठी अभिनेत्री जया बच्चन यांना 'फिल्मफेअर'तर्फे 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.

    संजीव वेलणकर, पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    अभिमान चित्रपटाची गाणी
    https://www.dailymotion.com/video/x3gknt8

      July 27, 2021


  • २१ डिसेंबर

    २१ डिसेंबर १९६५ रोजी दादा कोंडके निर्मित व दिग्दर्शित आणि वसंत सबनीस लिखित 'विच्छा माझी पुरी करा' या नाटकाचा पहिला प्रयोग धोबीतलाव येथील रंगभवन येथे झाला. वसंत सबनीस यांचे 'विच्छा माझी पुरी करा' हे नाटक म्हणजे सबनीसांच्याच छपरी पलंगाचा वगाचीच रंगावृत्ती आहे. याचे संगीतकार होते तुकाराम शिंदे. ‘विच्छा माझी पुरी करा’ नाटकाने दादा कोंडके यांना सुपरस्टार रंगकर्मी बनवले. दादा कोंडके यांनी या लोकनाट्याचा कुठंही प्रयोग लावला तरी तो हाऊसफुल व्हायचा. त्या काळात दादा कोंडके यांचे प्रतिस्पर्धी असणाऱ्या नाट्यनिर्मात्यांच्या नाटकांचा तिकीटांचा दर थोडा चढा असायचा. मात्र दादांनी आपल्या या लोकनाट्यासाठी ‌अगदी ‘जनता दर’ लावला होता. त्यामुळे त्यांचा प्रत्येक प्रयोग लगेचच हाऊसफुल व्हायचा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दादांच्या लोकनाट्याची ‘प्रॉडक्शन कॉस्ट’ खूप कमी होती. रंगमंचाच्या पाठच्या बाजूला एक पडदा असलं की दादांचं काम होऊन जायचं.

    गायिका आशा भोसले यांनी एकदा ‘विच्छा…’चा प्रयोग पाहिला. फक्त एक माणूस प्रेक्षकांना तब्बल साडे चार तास हसवतो, नुसतंच हसवत नाही तर प्रेक्षक खुर्चीवरून खाली पडायचाच तो काय बाकी असतो. अशाप्रकारचं दृश्य आशाताईंनी पहिल्यांदाच पाहिलेलं होतं. हा अनुभव आशाताईंनी प्रख्यात दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांच्या कानावर घातला आणि त्यांनाही हे लोकनाट्य पाहण्याचा आग्रह केला. त्यानुसार काही दिवसांनी आशाताई भालजींसह पुन्हा हे नाटक पाहायला आल्या. ते एवढं रंगलं की आशाताईंनी खूश होऊन दादांच्या युनिटमधील सगळ्यांच्या हातामध्ये सोन्याचं ब्रेसलेट घातलं. त्या नंतर गायिका आशा भोसले यांनी त्या काळी ‘विच्छा माझी पुरी करा' ’चा मुंबईतला एकही प्रयोग पाहायचा सोडला नव्हता. याच सुमारास भालजी ‘तांबडी माती’ या चित्रपटाची निर्मिती करीत होते. दादा किती कमालीचे कलाकार आहेत, हे एव्हाना भालजींना समजलं होतं. त्यामुळे त्यांनी या चित्रपटामधील एका महत्त्वाच्या व्यक्तिरेखेसाठी दादांची निवड केली. दादांनी याच चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.

    दादा कोंडके, राम नगरकर यांनी हे नाटक गाजवले होते. राजकीय परिस्थितीवर मार्मिक पद्धतीने भाष्य करत, हळूच चिमटे काढत प्रेक्षकांना मनमुराद आनंद देणारे 'विच्छा माझी पुरी करा' हे सदाबहार वगनाट्य सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. त्यांच्यानंतर अभिनेते विजय कदम गेली काही वर्षे सातत्याने 'विच्छा माझी पुरी करा'चे प्रयोग करत होते. 'विच्छा माझी पुरी करा' हे लोकनाट्यातील महत्त्वाचे नाटक आहे.

    आजपर्यंत अनेकांनी या नाटकाचे प्रयोग केले गेले. या वगनाट्याची कथा, त्यातील राजकीय भाष्य आज ही ताजे वाटते. एकेकाळी तमाशा,वगनाट्य हे ग्रामीण आणि असभ्य कलाप्रकार आहेत अशी शहरी समाजाची विचारसरणी होती. परंतु "विच्छा माझी पुरी करा" या नाटकाने ही विचारसरणी बदलण्याचं फार मोठं कार्य करत लोकनाट्य शहरी पांढरपेशी समाजापर्यंत पोहोचवले.कुठलीही कला जितकी आत्यंतिक लोकल असते, तितकेच तिला ग्लोबल अपील असते कारण ती जनसामान्यांच्या संवेदनांशी नाते सांगते. हीच गोष्ट पुन:पुन्हा कराव्याश्या वाटण्या-या "विच्छा माझी पुरी करा"या नाटकाने सिद्ध केली आहे! आणि हेच या नाटकाच सर्वात मोठं बलस्थान आहे. एक दोन नव्हे, तब्बल ५२ वर्षे या वगनाट्याने मराठी प्रेक्षकांना झपाटून टाकलं.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      December 21, 2017


  • टॉकीज चा जन्म

    ३ मे १९१३ रोजी गिरगावातील 'कॉरोनेशन सिनेमा' च्या परिसरात जमलेल्या गर्दीनं एक अद्भुत क्षण अनुभवला. दादासाहेब फाळके निर्मित "राजा हरिश्चंद्र" हा भारतीय चित्रपट जगतातील पहिला चित्रपट या दिवशी दाखवण्यात आला आणि ह्या मूकपटाच्या प्रदर्शनानं भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासाचा श्रीगणेशा झाला. दादासाहेब फाळके यांनी "राजा हरिश्चंद्र‘ या चित्रपटाद्वारे प्रथमच "हलत्या चित्रां‘चे दर्शन घडवीत भारतीयांच्या "चित्रपट वेडाची‘ मुहूर्तमेढ रोवली. गेल्या शंभर वर्षांत हिंदी चित्रपटसृष्टीने मोठी भरारी घेतली असतानाच मराठी, तमीळ व बंगालीसारख्या प्रादेशिक भाषांतील चित्रपटांनीही आपलं महत्त्वपूर्ण योगदान दिलं. "हलत्या चित्रांचा विजय असो,‘ म्हणत फाळक्यांनी लावलेल्या वृक्षाचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. परदेशामध्ये फिल्मच्या मदतीने पडद्यावर हलते चित्रपट दाखविण्याचा प्रयोग होऊ लागला व हे तंत्रज्ञान भारतात आणण्यासाठी दादासाहेब फाळके या अवलियानं कंबर कसली व "राजा हरिश्चंद्र" च्या रूपानं भारतात मोठ्या पडद्यावर हलती चित्रे दिसली. "भस्मासुर मोहिनी‘ फाळकेंच्या दुसऱ्या चित्रपटात अभिनेत्रीचा प्रवेश झाला आणखी एक इतिहास घडला. फाळकेंकडून प्रेरणा घेऊन अनेक निर्माते व दिग्दर्शक चित्रपट निर्मितीकडे वळले.

    १९१८ मध्ये इंडियन सिनेमॅटोग्राफ कायदा पास झाला व मुंबई, कलकत्ता, मद्रास व लाहोर बोर्ड १९२० मध्ये सुरू झाले. कलकत्त्यामध्ये धीरेन गांगुली व मुंबईमध्ये चंदुलाल शहा यांनी ब्रिटिश आणि जर्मनांची मदत घेत चित्रपट आधुनिक करण्यास सुरवात केली. हिमांशू रॉय यांनी "द लाइट ऑफ एशिया‘ची निर्मिती करीत भारतीय सिनेमाला आंतरराष्ट्रीय दर्जा दिला. १९२९ मध्ये प्रभात फिल्म कंपनीची स्थापना झाली. याच दरम्यान इम्पिरिअल फिल्म कंपनीने १४ मार्च १९३१ ला "आलम आरा‘ या भारतातील पहिल्या बोलपटाची निर्मिती केली. या चित्रपटात प्रथम गाण्यांचा समावेश केला गेला व चित्रपटाच्या यशामुळे भारतीयांच्या गाणी व संवादांच्या आवडीचं बीज रोवलं गेलं! चलचित्रांबरोबरच आवाजही आल्यानं "टॉकीज‘चा जन्म झाला.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      May 4, 2017