(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जगावे कसे पक्ष्यासारखे

    जगावे कसे पक्ष्यासारखे,
    आभाळी स्वैर उडणारे,
    ध्येय आपुले दिसताच,
    पुन्हा जमिनीवर उतरणारे,--!!!

    जगावे कसे केवड्यासारखे,
    धुंद, मोहक वशीकरणाने,
    समोरच्याला ताब्यात घेणा‌रे,--!!!

    जगावे कसे कापरासारखे,
    स्वत:स अर्पण करुन,
    ज्वलनही सोसणारे,--
    ओवाळून ओवाळून ,
    त्यात आनंदें संपणारे,--!!!

    जगावे कसे चित्त्यासारखे,
    संकटाच्या थेट भेटीस जाणारे,
    निडरतेने दबा धरुन,
    ताकदीने हल्ला करणारे,--!!!

    जगावे कसे "अत्तरासारखे*,
    स्वत: सुगंधित बंदिस्त राहून,
    दुसऱ्याला दरवळून टाकणारे,--!!!

    जगावे कसे उसासारखे,
    स्वत: उन फार सोसून,
    दुसऱ्यास 'जीवनरस' पाजणारे,--!!

    जगावे कसे झऱ्यासारखे,
    स्वत: शीतल राहून,
    थेंबाथेंबाचे मोती,
    एखाद्यावर सहज लुटणारे,--!!!

    जगावे कसे फुलासारखे,
    आयुष्य कमी असूनही,
    ते दुसऱ्यास अर्पिणारे,--!!!

    जगावे कसे चंदनासारखे,
    उगाळले कुणी किती,
    तरी त्याला सुगंधाने भारणारे,--!!!

    जगावे कसे झाडासारखे,
    दगड सोसून फळे देणारे,
    जगावे कसे सिंहासारखे,
    पारध्यालाही घाबरवणारे,--!!!

    जगावे कसे माणसासारखे,
    माणूस म्हणुनी माणसास जपणारे,
    जगावे कसे प्रेमासारखे,
    सर्वोच्च असूनही,
    त्यागात धन्यता मानणारे,--!!!

    हिमगौरी कर्वे

      March 5, 2019


  • जागतिक चिमणी दिन

    निसर्गाची ओळख मानवाला प्रथम चिमणीपासूनच होते. एक घास चिऊचा… सांगतच आपली आई आपणास एक-एक घास भरवते.

      March 21, 2017


  • शोध

    देव देव राहतो कुठे ?
    सांग आई, सांग आई !
    चंद्रावरती, सूर्यावरती
    आभाळी की धरेवरती?

    सागरात , पर्वतशिखरी
    जंगलात की पाण्यामध्ये
    दगडगोट्यात,धातूमध्ये
    देवळात की मठामध्ये?

    शाळामध्ये, घरामध्ये
    रानीवनी की मुर्तीमध्ये
    मंत्रतंत्र की ग्रंथामध्ये
    महाली की कोपीमध्ये ?

    तुझी वात माझ्यामध्ये
    माझा दीप तुझ्यामध्ये
    दिसला गं देव माझा
    आई, मला तुझ्यामध्ये
    देव देव राहतो कुठे?

    -- विठ्ठल जाधव
    शिरूरकासार, जि.बीड
    सं.९४२१४४२९९५

      October 22, 2019


  • वियोग

    कृष्ण कमळ-

    ..

      January 25, 2014


  • नियतीचा फटका

    भोपाळ येथे विषारी वायुमुळे एका रात्रीत सहस्त्रावधी लोक मृत्यूमुखी पडले. ४.१२.८४ ची रात्र...

    एक भयानक रात्र अशी,
    सहस्त्रावधींचा घेई बळी ।
    नियतीच्या खेळामधली,
    कुणा न समजे ही खेळी ।।१।।

    मध्यरात्र होऊन गेली,
    वातावरण शांत होते ।
    गादीवरती पडून सारे,
    स्वप्ने रंगवीत होते ।।२।।

    तोच अचानक विषारी वायू,
    पसरला त्या वातावरणी ।
    हालचालींना वाव न देता,
    श्वास रोखीले स्वप्न थांबवूनी ।।३।।

    कित्येक जनांचे बळी घेतले,
    काळ्या काळाने ।
    शांत निद्रेची महा निद्रा,
    करूनी टाकीली क्षणात त्याने ।।४।।

    भरडून गेले सारे परि,
    पापी वा पुण्यवान ते ।
    कळला नाही हिशोब त्याचा,
    मोजमाप काय असते ।।५।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      December 9, 2015


  • काजळरेघ

    काजळाची रेघ तुझ्या पापण्यात लपलेली
    अलवार काळजाचा ठाव घेत जाते..
    मन मुग्ध अन बरसतात श्रावण धारा
    ओठावर हळूवार तुझे नाव येते..

    रेशीम किनार तुझ्या पदराची वीण
    खुणावते वाऱ्याला आज नव्यानं
    पापण्यांच्या कडा मिटून घट्ट एकदा
    मिठीत तुझ्या येता उरावे न भान...

    उन्हातून सावली परतून यावी
    निळ्या नभात उमटावे इंद्रधनू..
    अनामिक नातं जुळत असताना
    मनातील द्वंद्व उन पाऊस जणू..

    उमलतील जेव्हा पापण्यांच्या कळ्या
    वाचत राहिन हृदयातील ओळी..
    नकोस खेळ खेळू लपंडाव आता
    जीव कातर झाला असा सांजवेळी.

      July 11, 2026


  • दिव्यत्वाची झेप

    पंख फुटता उडूनी गेला, सात समुद्रा पलीकडे

    आकाशातील तारका होत्या, लक्ष्य तयाच्या नजरेपुढे

    निसर्गाने साथ देवूनी, दणकट दिले पंख तयाला

    झेप घेत जा दाही दिशांनी, मनी ठसविले त्या पक्षाला

    आत्मविश्वास तो जागृत होता, चिंता नव्हती स्थळ काळाची

    कुठेही जाईन झेपावत तो, ओढ तयाला दिव्यत्वाची

    निसर्ग रंगवी चित्र मनोहर, रंग एक तो कुंचल्यामधल्या

    देईन अंगच्या छटा निराळ्या, चमक दाखवित ह्या जगताला

    स्वच्छंदाची नशा मनस्वी, विसरूनी गेला सर्व जगाला

    कुठे तो होता कोठूनी आला, आठवण येई मध्येच त्याला

    सोडूनी दिले सारे ते त्याचे, आजभोवती विश्व निराळे

    नाविन्याचा शोध शोधता, जुने विसरणे आता आले

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      February 17, 2020


  • चालणे सुरु तर कर

    चालणे सुरु तर कर ....पोहोचणार नाही कशावरुन ?

    बोलणे सुरु तर कर ...टाळ्या पडणार नाही कशावरुन ?

    टिम्ब काढ रेषा होतील...रेषारेषांचे चित्र जाईलच बनून

    आवड तयार होईल ...कलाकृती छान घडणार नाही कशावरुन ?

    लिहिणे सुरु तर कर.. कविता होईल ओळी मिळून

    जमणार नक्की ...लाईक मिळणार नाही कशावरुन ?

    हे जमत नाही ते जमत नाही...सोड सांगणं( गाऱ्हाणं) फिरून फिरून

    गाणं सुरु तर कर ...सूर सापडणार नाही कशावरुन ?

    घाबरतो उगाच आपण...रुपडं बघून वरुन वरुन

    अंतरंगात बघ गुण शोधून ...जगणं जमणार नाही कशावरून ?

    # कौशल

    -- श्रीकांत पेटकर

      February 25, 2019


  • ये जवळ बस

    ‘ये, जवळ बस’ म्हणालीस तूं,
    मी बसलोही
    क्षीण तुझा कर करीं घेउनी
    सुखावलोही .
    नव्हतें माहित, ‘उद्या’ परंतू
    काय व्हायचें होतें
    ‘उद्या’च येथुन कायमचें तुज
    दूर ज़ायचें होतें.

    - सुभाष स. नाईक

      October 26, 2017


  • आयुष्य

    आयुष्य संपत जाते, पण प्रेम संपत नाही
    किती करा परमार्थ, पण क्रोध आटपत नाही

    आधी कष्टे स्वतःसाठी, मग कुटुंबासाठी
    भरुन भांड ओसंडे, तरी लोभ सुटत नाही

    पैसा-अडका, जमीन-जुमला, घराण्याचा गर्व
    जववर असे दैव अनुकुल, मद हा हटत नाही

    सकाळ, दुपार, संध्याकाळ - देई शिव्या अपार
    एक दिवशीही मत्सर, केल्याविना दिसत नाही

    कुणावरही विश्र्वास न करी, सर्व स्वतःच करी
    वेळेस नातं तोडी, पण संशय सोडत नाही

    श्री सुनील देसाई
    १८/०७/२०२२

      July 19, 2022