कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

जया अंगी मोठेपण…!

Category:

 

‘माशाचे अश्रू कुणाला दिसत नाहीत,’ बाळासाहेब ठाकरे एकदा उद्वेगाने असे म्हणाले होते. खरेच आहे ते! ज्यांनी देशाला, जगाला आपल्या विचारांनी, आपल्या कर्तृत्वाने भारावून टाकले अशा थोरामोठ्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील यशापयश कधीच समोर येत नाही.

लेखसंग्रह

शेवटी पैसा जातो कुठे?

Category:

 

शिलकीचा अर्थसंकल्प मांडून राज्याच्या अर्थमंत्र्यांनी आपल्या पाठीवर आपण शाबासकीची थाप मारून घेतली असली तरी त्यांनी उभा केलेला आर्थिक स्थैर्याचा देखावा किती पोकळ आहे, हे सांगायला कुण्या अर्थतज्ज्ञाची गरज नाही.एखाद्या देशाची, प्रदेशाची आर्थिक स्थिती कशी आहे, हे जाणून घ्यायचे असेल तर त्या देशातील शेवटच्या माणसाची आर्थिक स्थिती कशी आहे, ते आधी पाहायला हवे. या कसोटीचा वापर केल्यास राज्याची आर्थिक स्थिती अतिशय दयनीय असल्याचे दिसून येते.

लेखसंग्रह

विध्वंसाचे जीन्स!

Category:

 

पुराणात प्रतिसृष्टी निर्माण करणाऱ्या त्रिशंकू राजाची कथा आहे. साक्षात सृष्टी नियंत्या ब्रह्याला आव्हान देणाऱ्या या त्रिशंकूची अवस्था अखेर काय झाली हे सगळ््यांनाच माहीत आहे. त्या त्रिशंकूचेच आधुनिक अवतार आता विज्ञानाच्या शिडीचा वापर करून प्रतिसृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

लेखसंग्रह

सरकारची दुकानदारी!

Category:

 

‘एक सुंदर बोधकथा आहे. चिमणीच्या मुलीचे बारसे असते आणि या बारशासाठी चिमणी आपल्या सगळ्याच परिचितांना आमंत्रण देते. गोगलगायीलाही हे आमंत्रण मिळते.

साहित्य - ललित

सत्यम् शिवम् सुंदरम्

Category:

 

माणसाचं मन असतं कुठे? त्यात काय, काय असतं? ते सगळं आपल्याला कळतं का? माणूस मनाचा वापर करतो, की मन आपल्यावर स्वार होतं? असे एका ना दोन अनेक प्रश्न प्रदीर्घ काळ माझं मन कुरताडत असतं. अस्वस्थ करीत असतं. माझ्या वयाच्या अकराव्या वर्षी मी पहिली चोरी केली. एका पानटपरीवाल्याचे आठ रुपये पंचेचाळीस पैसे मी लांबविले. ती घटना मी विसरलो, असं समजत होतो. नित्यजीवनावर त्या घटनेचे काही परिणामही जाणवत नव्हते; पण दहा वर्षांच्या कालावधीनंतर जेव्हा मी त्या पानवाल्याकडे या चोरीची कबुली दिली, त्याचे पैसे दामदुपटीने परत केले तेव्हा कळलं, की माझी चोरी त्याला त्याचवेळी ज्ञात होती. तो काही बोलला नव्हता. त्या दहा वर्षांत त्यानं कधीही या घटनेची आठवणही मला करून दिलेली नव्हती. मी चोर नाही, माझा सद्सद्विवेक जागा आहे, असा त्याचा विश्वास होता. एका अर्थानं चूक कबूल केल्यानंतरही तोच जिंकला होता. एक साधा पानवाला; पण मनाच्या नीतळपणाची साक्ष तो अजूनही मला देत असतो.