वाङ्मय जगतात ‘साहित्य’ आणि ‘ललित लेखन’ या दोन संज्ञा वारंवार वापरल्या जातात. वरवर पाहता त्या सारख्याच वाटत असल्या, तरी त्यांच्या व्याप्तीत आणि लेखनाच्या उद्देशात मोठा फरक आहे. साहित्य ही एक अत्यंत व्यापक संकल्पना आहे, तर ललित लेखन हा त्याचाच एक अत्यंत सुंदर आणि कलात्मक भाग आहे. थोडक्यात सांगायचे तर, ‘साहित्य’ हे जर एक विशाल उद्यान असेल, तर ‘ललित लेखन’ हे त्या उद्यानातील सुवासिक आणि सुंदर फुलांसारखे आहे. साहित्याने माणसाची बुद्धी प्रगल्भ होते, तर ललित लेखनाने माणसाचे मन समृद्ध होते. दोन्हीचेही मानवी जीवनात आणि समाजात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.
August 12, 2026
ताप उतरला म्हणजे रुग्ण बरा झाला” असा अनेकांचा समज असतो. प्रत्यक्षात ताप उतरल्यावरची पुढील २४–४८ तासांची वेळ सर्वाधिक धोकादायक असू शकते. याच काळात रक्तवाहिन्यांमधून द्रव बाहेर जाऊन रक्तदाब कमी होणे (शॉक), रक्तस्राव किंवा इतर गंभीर गुंतागुंत होऊ शकते.
July 8, 2026

हॅरिसन ॲलन-सटर आणि त्यांच्या सहकारी संशोधकांनी प्रयोगशाळेत केलेल्या आपल्या प्रयोगात, सिलिकॉन कार्बाइड हे संयुग पाण्यात बुडवून त्यावर प्रचंड दाब दिला. त्यानंतर लेझर किरणांच्या साहाय्यानं, दाबाखाली असलेल्या या सिलिकॉन कार्बाइडचं तापमान मोठ्या प्रमाणात वाढवलं. पृथ्वीवरच्या वातावरणातील दाबाच्या सुमारे पाच लाखपट दाब आणि सुमारे तेवीसशे अंश सेल्सियस तापमान निर्माण झाल्यावर, सिलिकॉन कार्बाइ़डमधील कार्बनचं रूपांतर चक्क हिऱ्यांत झालं.
December 26, 2021

प्रत्येक सजीवाला त्याचे गुणधर्म हे त्याच्या पेशींतील जनुकांच्या रचनेनुसार प्राप्त होतात. जनुक म्हणजे सजीवाच्या पेशीतल्या डीएनए रेणूंतल्या विशिष्ट रासायनिक रचना. पेशींतील जनुकांच्या संपूर्ण माहितीला, सजीवाचा ‘जनुकीय आराखडा’ म्हटलं जातं. सजीवाच्या जनुकीय आराखड्यात विविध कारणांनी कालानुरूप बदल होत जातात. हे जनुकीय बदल त्या सजीवाच्या स्वरूपात बदल घडवून, त्या सजीवाच्या उत्क्रांतीला कारणीभूत ठरतात. आज अस्तित्वात असलेल्या सजीवांच्या जनुकीय आराखड्यांची प्राचीन काळातील सजीवांच्या जनुकीय आराखड्यांशी तुलना करून त्या सजीवाच्या उत्क्रांतीचा अभ्यास करता येतो.
April 28, 2022

ग्रीनलँड हा पृथ्वीवरचा अतिउत्तरेकडचा प्रदेश आहे – उत्तर ध्रुवाजवळचा! या प्रदेशाचा उत्तरेकडचा भाग म्हणजे एक शीत मरुभूमी आहे. अत्यंत कोरडी आणि थंड हवा असणारा हा प्रदेश अगदी वैराण आहे. इथल्या जमिनीतलं पाणी हे सतत गोठलेल्या अवस्थेत असतं. इथल्या अतिप्राचीन काळातील वनस्पतींची आणि प्राण्यांची फारशी माहिती उपलब्ध नाही.
February 11, 2023

पृथ्वीचा असा खोलपर्यंत घट्ट झालेला हा जाड पृष्ठभाग म्हणजेच आजचं शंभर-दीडशे किलोमीटर जाडीचं पृथ्वीभोवतीचं घन स्वरूपातलं भूपृष्ठ! या भूपृष्ठाच्या निर्मितीच्या वेळी पृथ्वीचं वय होतं जवळजवळ एक अब्ज वर्षं. पृथ्वीवर खनिजांची निर्मिती होऊ लागली पृथ्वीच्या जन्मानंतर सुमारे दहा-पंधरा कोटी वर्षांनी; त्यानंतर आणखी सुमारे ऐंशी कोटी वर्षांनी पृष्ठभागाला आजचं स्वरूप प्राप्त झाल्याचं यावरून दिसून येतं.
January 8, 2022

साप या प्राण्याची गणना सरीसृपांच्या गटात होते. तरीही साप हे इतर सरीसृपांपेक्षा वेगळी वैशिष्ट्यं बाळगून आहेत. उदाहरणार्थ, त्यांचा लांबलचक आकार, पायांसारख्या अवयवांचा अभाव, स्वररज्जूंचा अभाव, इत्यादी. सापांना स्वररज्जू नसल्यानं त्यांना स्पष्ट स्वरूपाचे आवाज काढता येत नाहीत. मात्र तोंडानं हवा सोडून केलेल्या ‘हिस्स’ अशा आवाजाद्वारे ते इतर प्राण्यांना घाबरवू शकतात. आवाजाशी संबंधित त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना कान नाहीत. त्यांना कान नसले तरी, ऐकू मात्र येतं. याचं कारण म्हणजे त्यांना, बाहेरून दिसू शकणारा कानाचा भाग नसला तरी, त्यांच्या त्वचेच्या आतल्या भागात श्रवणसंस्थेसारखी रचना आहे.
July 20, 2023
कोथरूड येथील दृष्टिहीनांसाठी, सर्वसमावेशक निवासी’ शाळा एकदा तरी भेट द्यायला हवी अशीच आहे. गांधी भवन, कोथरूड येथे ही शाळा आहे. डोळे असले म्हणजेच यश गाठता येते असे नाही, हे येथील विद्यार्थ्यांकडून व त्यांनी केलेल्या वस्तू पाहून नक्कीच म्हणता येईल. केवळ वस्तूची निर्मिती नव्हे तर विक्री करून अर्थार्जनसुद्धा इथे केले जाते.
July 2, 2026

पृथ्वीवरील प्राणिसृष्टीवर वर्चस्व गाजवणारे डायनोसॉर हे सरीसृप या आघातामुळे नष्ट झाले आणि सस्तन प्राणी हे, त्यानंतर अस्तित्वात आलेल्या प्राणिसृष्टीचे महत्त्वाचे घटक बनले. या आघातानंतर, प्राणिसृष्टीप्रमाणे वनस्पतिसृष्टीत कोणता बदल घडून आला, याचं कुतूहल उत्क्रांतीच्या अभ्यासकांना आहे. हे कुतूहल काही प्रमाणात शमवू शकणारं एक संशोधन ‘सायन्स’ या शोधपत्रिकेत अलीकडे प्रसिद्ध झालं आहे. पनामा शहरातल्या (मध्य अमेरिका) स्मिथ्सोनिअन ट्रॉपिकल रिसर्च इंस्टिट्यूट या संस्थेतील पुराजीवशास्त्रज्ञ मोनिका कार्व्हॅलो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या या संशोधनाचे निष्कर्ष लक्षवेधी आहेत.
June 21, 2022
ऋग्वेदात एकीकडे वस्तू निर्माण करणारा तक्षा, कर्मार वगैरे कारागीर आहेत, तर दुसरीकडे विश्व निर्माण करणारा विश्वकर्मा आहे. (ऋ. १०.८१-८२) तत्कालीन विद्वान ऋषींना विश्वाचे शिल्प घडविणाऱ्या शिल्पकाराला विश्वकर्मा म्हणण्याची कल्पना समाजातील शिल्पकाराला पाहूनच सुचली आणि परवर्ती (वेदोत्तर) साहित्यानी प्रासाद, लेणी, मंदिर, मूर्ती, चित्र, अलंकार अशा कला कौशल्याच्या अनेक वस्तू, वास्तू निर्माण करणाऱ्या शिल्पकराला विश्वकर्मा हे नामाभिधान दिले आणि ते रुढही झाले. म्हणून विश्वकर्माच्या नावाने कला-शिल्पकारागिरांचा समाज नाव लौकिकास आला. विश्वकर्मा समाज म्हणजे कला-कारागिरांचा समाज हे समीकरण वेदोत्तर प्राचीन ग्रंथानीच रुढ केले.
January 23, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti