To be chkd-जरा आजूबाजूला बघायला शिका!
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनबायबलमध्ये एक बोधकथा आहे. येशू ख्रिस्त फिरत-फिरत एका गावात आले. त्यावेळी त्यांना दिसले की गावातील सगळेच लोकं एका मैदानात जमले आहेत. प्रत्येकाच्या हातात दगड आहे आणि मैदानाच्या मध्यभागी एका खांबाला बांधलेल्या स्त्रीला ते दगडांनी ठेचून मारणार आहेत. त्या स्त्रीचा अपराध कोणता, याची चौकशी केल्यावर येशू ख्रिस्तांना सांगण्यात आले की, ही स्त्री व्यभिचारी आहे आणि या गुन्ह्याची शिक्षा म्हणून तिला दगडांनी ठेचून मारण्यात येणार आहे. येशू ख्रिस्तांना त्या स्त्रीची दया आली किंवा त्यापेक्षा अधिक गावकर्यांच्या बुध्दीची कीव वाटली. पहिला दगड त्या स्त्रीकडे भिरकावल्या जाण्यापूर्वी येशू ख्रिस्ताने उपस्थित जमावाला उद्देशून म्हटले की, या स्त्रीला शिक्षा केली पाहिजे हे मान्य, परंतु ही शिक्षा देण्याचा अधिकार केवळ त्याच व्यक्तीला आहे, ज्याने एखादेही पाफत्य केलेले नाही. येशु ख्रिस्तांच्या या आवाहनाने उपस्थित जमाव अंतर्मुख झाला आणि प्रत्येकाच्या हातातील दगड गळून पडला. ही घटना किंवा कथा बोधप्रद असली तरी त्यातील बोध त्या घटनेपुरताच प्रासंगिक ठरला. पापी, अन्यायी किंवा कर्तुत्वहीन लोकांनी स्वत:लाच न्यायाच्या उच्चासनावर बसवून इतरांकडे दगड भिरकावण्याचा अधिकार बाळगणारी मानसिकता आजही विद्यमान आहे. ती स्त्री त्यावेळी भाग्यवान ठरली, परंतु असे भाग्य त्यानंतर कुणाच्या वाट्याला आले नाही.