(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • संक्रांत आणि पतंगबाज

    निरभ्र आकाश, थंडगार झुळझुळ वाहणारे वारे, आणखीन काय पाहिजे पतंग उडविण्यासाठी. देशातल्या इतर भागांप्रमाणे महाराष्ट्रातही संक्रांतीच्या दिवशी पतंग उडविल्या जातात.

    आम्हा दिल्लीकरांचे मात्र सर्वच इतरांपेक्षा वेगळे असते. इथे उन्हाळ्याच्या सुट्या आणि पावसाळा म्हणजे पतंग उडविण्याचा मौसम. या मौसमात अधिकांश वेळ आकाशात ढग असतात. कधीही अचानक पाऊस सुरु होतो, पतंग आणि मांजा दोन्ही खराब होतात. तर कधी अचानक सुसाट वारे वाहू लागतात. अश्या वेळी उस्ताद पतंगबाज्यांच्या मोठ्या-मोठ्या पतांगाही आकाशात तग धरू शकत नाही, जमिनीवर निष्प्राण होऊन पाडतात. कधी-कधी एकदम घुम्म मौसम. नाममात्र वारही नाही. अश्या घुम्म वेळी छोट्या-मोठ्या पतंगांना आकाशात उड्डाण भरणे अशक्यच. अश्या पावसाळी मौसमात उस्ताद पतंगबाजाच तग धरू शकतात. इथे पतंग पेच लढविण्यासाठीच उडवितात. पतंगबाजाचा D-Day अर्थात १५ ऑगस्टला तर सतत ‘आई बो काटा’ हि विजयी आरोळी सकाळपासूनच वातावरणात दुमदुमू लागते.

    माझे बालपण जुन्या दिल्लीतच गेले. १९८०च्या पूर्वी आम्ही ज्या वाड्यात भाड्यावर राहायचो तो पूर्वाभिमुख होता. मध्ये बेडा (आंगण) आणि तिन्ही बाजूला बांधकाम. भलीमोठी गच्ची होती. पावसाळ्यात वारे हि पूर्वेचे असतात. त्यामुळे भरपूर पतंगा लुटायला मिळायच्या. पतंगा विकत घेण्याची गरज पडत नसे. या शिवाय गच्चीच्या मागे काबुली गेटची सरकारी शाळा होती. शाळेच्या गच्चीवरच्या पतंगा हि आमच्या नशिबी.

    काबुली गेट वरून आठवले. पूर्वी शाळेच्या जागी मैदान होते व पुढे काबुली दरवाजा. पण १८५७च्या क्रांतीत, अंग्रेजांच्या तोफांच्या मार्याने हा दरवाजा नष्ट झाला. इथे भयंकर युद्ध झाले होते. हजारोंच्या संख्येने दोन्ही पक्षांचे सैनिक आणि अधिकारी शहीद झाले होते. काहींच्या मते आज हि अमावस्येच्या घुप्प रात्रीत घोड्यांच्या टापांचे आवाज आणि सैनिकांचे विव्हळणे ऐकू येतात. आमच्या राहत्या खोलीची खिडकी शाळेच्या बाजूला होती. कधी हि काही ऐकू आले नाही. फक्त हिवाळी रात्रीत शाळेची इमारत माकडांची झोपण्याची जागा होत असेल. त्यांच्या माकड चेष्टांमुळे (अर्थात तोडफोड, दंगा-मस्ती) लोकांना असे भास होत असावे. असो.

    मोठे पतंगबाज शर्त(पण) लाऊनच पेच लढवितात. किमान ७०-८० गज पतंग उंच उडल्यावरच पेच लागत असे. अशी कटून आलेली पतंग लुटायला मिळाली कि किमान १०० गज मांजा मुफ्त मिळत असे. आमच्या सारख्यांच्या पूर्ण सीजन साठी पुरेसा असे. हा मांजा अत्यंत मजबूत हि असायचा. नेहमीच बोटे कापल्या जायची. तरीही त्या साठी दररोज संध्याकाळी आकाशात टक लाऊन पाहत असू, कुठे उंच आकाशात तरंगत जाणारी कटलेली पतंग दिसते आहे का?

    दिल्लीत पतंग उडविणे हि जिगरीचे काम. पतंग उडविण्यासाठी पहिले पतंगाचे कन्ने बांधावे लागतात. नंतर कन्न्याला मांजा बांधताना एक गाढ मारावी लागते. हीच ती कमजोर कडी. जवळ-जवळ घरे असल्यामुळे एकाच वेळी आकाश्यात भरपूर पतंगा उडताना दिसतात. पतंग उडविणार्या पतंगबाज्यांची नजर बाज पक्षी सारखीच असते. पतंगबाजांची आकाशात उडत असलेली पतंग, बाज पक्षी प्रमाणे खाली घेप घेणार आणि नुकत्याच आकाशात झेप घेण्याचा प्रयत्न करणार्या पतंगाचे कन्ने कापणार हे ठरलेलेच. अश्यावेळी संधी साधून, चौफेर पाहून, ५-१० सेकंदात पतंग आकाशात ४०-५० गज उंच उडवावी लागत असे. एकदा कि पतंग ५०-६० गज उंच उडाली कि मग चिंता नसे.

    मी पेच लढविण्याचा एकच नियम पाळीत असे. दुसर्याला पेच साठी लालच देणे. पण स्वत: त्याच्या जाळ्यात अडकायचे नाही. पेच लागताना ज्या दिशेला वारा वाहतो आहे, ठीक मध्य भागी पतंग ठेवायची, मग मांजा थोडा कमजोर असेल तरी हि ९०% दुसर्यांची पतंग कापण्यात यश मिळणारच. पेच लागताना जर पतंग वार्याच्या दिशेला नसेल तर ९०% टक्के पतंग कापल्या जाईलच. अर्थातच नेहमीच हे जमत असे नाही. शिवाय दुसर्याचा मांजा जास्त मजबूत आणि पतंग मोठी असेल तर त्याचा फायदा त्याला मिळणारच.

    दिल्लीचे पतंगबाज देशात मशहूर आहेतच. पण गुजरातचे पतंगबाज हि काही कमी नाही. दिल्लीकर पतंगबाज्यांशी टक्कर घेण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे. संक्रांतीच्या दिवशी तिथे हि दिल्ली सारखेच पेच लढविल्या जातात. पण आपले मुंबईकर मात्र पतंगबाजीत फिसड्डीच. गज्जू भाई सहज त्यांच्या पतंगा कापतात. एक नवखा पतंगबाज गुजराती उस्तादकडून पतंगबाजीचे धडे घेऊन मुंबईत आला आणि इथल्या भल्या-भल्या पतंगबाज्यांच्या पतंगा त्यांनी सहजच कापल्या. आता मुंबईच्या आकाशात त्याच्याच पतंगाचे एकछत्र राज्य आहे. असो.

    सर्व पतंगबाज्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा.

    -- विवेक पटाईत
    १४ जानेवारी २०१६

      January 14, 2016


  • लक्ष्मीपूजन

    अश्विन अमावस्येला प्रदोष काळी लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मीची पूजा करून प्रार्थना करतात. काही ठिकाणी वहीपूजन लक्ष्मीपूजनाचे दिवशी करण्याची प्रथा आहे.

      November 12, 2012


  • दुर्लक्षीत दिपस्तंभ : नार्वेकर सर

    नार्वेकर सर यांचं संपूर्ण नाव किशोर यशवंत नार्वेकर. २५ सप्टेंबर १९६० रोजी एका मध्यम वर्गीय कुटूंबात त्यांचा जन्म झाला. मध्यम बांधा, कृष्णवर्ण, टवटवीत डोळे आणि बुद्धिमत्तेचं प्रतिक असलेलं रुंद लांब कपाळ अशी त्यांची रेखीव आकृती. त्यांनी कॉलेजपासूनंच वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायला सुरुवात केली व पारितोषिकेही पटकवली. १९८१ पासून “प्रयोग मालाड” या नाट्यसंस्थेतून लहान सहान भुमिका करत व बॅकस्टेज सांभाळत त्यांनी नाट्यक्षेत्रात पदार्पण केले. प्रयोग मालाडच्या “गच्ची नाट्य उपक्रमात” सहभाग घेतला.

      September 18, 2013


  • नात यशस्वी होण्यासाठी

    स्वत:ला कामामध्ये, एखाद्या छंदामध्ये, मित्रांच्या घोळक्यात गुंतवून घेणे, किंवा बेसुमार टीव्ही पाहणं अथवा नशापाणी करणं. पण त्यांच्या समस्येचं उत्तर लग्न संबंधांच्या बाहेर उपलब्धं नसतंच. ते तर घरातच उपलब्ध असतं. तुम्ही दुस-या कुणाच्या प्रेमात पडूच शकत नाही असं मला म्हणायचं नाहिये. पडू शकता आणि त्यामुळे तुम्हाला काही काळाकरिता छान सुद्धा वाटू शकतं. पण काही वर्षानंतर तुम्ही, आज आहात त्याच परिस्थितीमध्ये असाल.

      July 9, 2011


  • विद्रोही कवी

    विद्रोही कवी

      July 18, 2010


  • भारतीय मूर्ख आहेत का?

    ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका….दोन तुल्यबळ संघ. पण त्यांच्या सामन्याला कोणीच प्रायोजक नाही? जाहिरातदार नाही? काय दिवस आलेत? आमच्याकडे अगदी कॅनडा किंवा बांगलादेश सारखा फडतुस संघ जरी खेळत असला तरी ओव्हरचा शेवटचा बॉल कधी एकदा पडतोय आणि जाहिरात सुरु होतेय असं चित्र असतं. बॉलर धावत जातानासुद्धा अर्धा स्क्रीन जाहिरातीनेच व्यापलेला असतो. एखादा खेळाडू आउट झाला की लागलीच जाहिरात.

      November 10, 2011


  • खरेच ऑस्मासीस ( Osmosis ) प्रणाली पर्याप्त उर्जेचे श्रोत्र बनेल ?………… नवीन शोध.

    ग्लोबल वार्मिंगच्या समस्ये मुळे आपले वातावरण संतुलित राखणे गरजेचे आहे. जगभरात उर्जा मिळविण्यासाठी लाकूड,कोळसा व नैसार्गिक वायु खर्ची घालत आहोत. त्यामुळे हवामानात बदल होत आहे व आपले स्वंरक्षक छत्र छेदु लागले ही एक गंभीर बाब आहे. ह्या समस्येच्या निवारणासाठी संपूर्ण जग सध्या झटत आहे.

      April 22, 2011


  • नागरिक पत्रकार – विश्वासार्हतेची एक नवी वाट

    न्यू मिडीया या एका महत्त्वाच्या संकेतस्थळावर ठळकपणे लिहिलेले हे वाक्य एका नव्या पत्रकारितेच्या आश्वासक प्रवासाची नांदीच स्पष्ट करत आहे. नागरिक पत्रकार म्हणजेच सिटीझन जर्नालिस्ट हा सध्याच्या संगणक आणि माहिती तंत्रज्ञान युगात एक अभिनव आणि बर्‍यापैकी विश्वासार्ह असा जनतेचा थेट सहभाग असणारा पैलू समोर येऊ लागला आहे.

      January 2, 2012


  • नवीन व्रत

    एक आटपाट नगर होतं. तिथे एक सुंदर स्त्री रहात होती. घरगुती कटकटींनी कंटाळलेली, मुला मुलींच्या शिक्षणासाठी झटत होती. परंतु धीटपणे कर्तव्याला सामोरी जात होती. जबाबदारीचे ओझे, एकटेपणाची जाणीव, या सगळ्यांनी ती ग्रासली आणि आजारपणाच्या गुंताड्यात फसली बी.पी., शुगर यांनी शरीरात मांडले ठाण आणि आनंद, खुशी, हसू यांची उडाली धूळधाण.

    तशातच एके दिवशी तिच्या लेकीनं दिला स्मार्टफोन भेट आणि what's app मुळे मित्र मैत्रिणींशी संवाद घडू लागला थेट काहि दिवसांतच रिपोर्ट येऊ लागले नॉर्मल. चिकटून बसलेले बी.पी. शुगर वागू लागले फॉर्मल.

    ती आनंदली,what's app व्रताची यशवार्ता आल्यागेल्याला सांगू लागली.

    तिची एक सखी निर्मळ मनाची ! ती म्हणाली, मला पण सांग ना ग, हे व्रत ! उतणार नाही, मातणार नाही घेतला वसा सोडणार नाही.

    स्त्री म्हणाली, बघ, रोज सकाळी उठताक्षणी ह्या देवाचे दर्शन करावे. GM, GNचा वेळोवेळी जप करावा.

    यथासमय देवाच्या देव्हार्‍यात डोकवावे, मन मोकळे करावे.

    एका ग्रुपने what's app ला वाहिलेले सर्व काही दुसऱ्या ग्रुपला यथाशक्ती मनोभावे अर्पण करावे.

    रुसू नये, रागवू नये, आपला ग्रुप सोडू नये. सखीने मनोभावे केले व्रत आणि आश्चर्य, चारच महिन्यात मिळाले फळ. शुगर कमी होऊन रडक्या मना येऊ लागले बळ.

    तुम्हीही व्रत हे धरावे,कामकाज काळवेळ सांभाळूनी त्रिकाळ what's app ला पुजावे.

    जसा हा देव त्या दोघी सखींना पावला, तसा तुम्हासही पावो. व्रत सर्व बंधुभगिनींनी करावे. साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण ....मन लाऊन वाचणाऱ्याला एक लाभ,फॉरवर्ड करणाऱ्याला अनेक लाभ.!!

      June 7, 2017


  • आरं आरं आबा !! काय झालं बाबा !!

    आरं आरं आबा …..!!! काय झालं बाबा …..!!! ही वात्रटिका नसून मयुर टिका आहे……!!! वास्तविका आहे……!!!

      August 22, 2012