साहित्य - ललित

सफर सम्राट

Category:

 

दैनिक रोजची पहाट’चे प्रमुख वार्ताहर काका सरधोपट बरोबर दहा वाजता ‘सफर सम्राट’ म्हणजे ज्याला आपण प्रचलित मराठीत ‘किंग ऑफ सफारी म्हणतो, त्या राघोभरारींच्या सोनेरी सफरच्या कार्यालयात म्हणजे ज्याला प्रचलित मराठीत ‘ट्रॅव्हल एजन्सी’ म्हणतो तिथे पोचले. दैनिक ‘रोजची पहाट’च्या पर्यटन विशेषांकासाठी त्यांची मुलाखत घ्यायला. मुलाखतीची वेळ सकाळी सव्वादहाची होती आणि राघोभरारी हे वेळेच्या बाबतीत फार आग्रही असतात असं संपादकांनी काकांना बजावलं होतं. शिवाय सोनेरी सफरने दोन पानी ‘संपूर्ण पानभर’ म्हणजे प्रचलित मराठीत ज्याला आपण ‘फुल पेज’ म्हणतो तशी जाहिरात दिली होती याची जाण ठेवा असा सल्लाही दिला होता. तर काकांनी सोनेरी सफरच्या कार्यालयात बरोबर दहा वाजता येण्याचं प्रयोजन काय यासाठी एवढी प्रस्तावना पुरे आहे.

 

  July 31, 2022


अवर्गिकृत

भारतमातेच्या वीरांगना – ४० – अंजलाई अम्मल

Category:

 

१९२१ साली असहकार आंदोलना पासून त्यांचा स्वातंत्र्य संग्रामातील प्रवास सुरु झाला. दक्षिण भारतातल्या त्या पहिल्या महिला सेनानी ठरल्या. फक्त स्वतः भाग घेऊनच नव्हे तर आपली पारिवारिक भूमी, घर असं सगळं त्यांनी विकून टाकले आणि स्वातंत्र्य लढ्यासाठी मोठी राशी दिली. हे करतांना आपल्या भविष्याच काय? हा प्रश्न या माऊलीला पडला नाही. जे माझे ते देशासाठी अर्पण असाच त्याचा विचार होता. १९२७ साली नीलन ची मूर्ती हटविण्या विरुद्ध त्यांनी लढ्यात सहभाग घेतला, त्यासाठी त्यांना आणि त्यांच्या नऊ वर्षांची मुलगी अम्माकानु ला कारावास भोगावा लागला.

  July 31, 2022


कथा

एक परीस स्पर्श (भाग – ३७)

Category:

 

लग्न ही खरंच आपली गरज आहे का ? या प्रश्नाचे उत्तर त्याला अजूनही मिळाले नाही…आता पुढच्या आठवड्यात त्याच्या मामाच्या मुलाचं लग्न आहे …आता त्या लग्नात पुन्हा सगळे नातेवाईक कधी नव्हे ते जमा होतील आणि जमा झाले की विजयच्या लग्नाचा विषय पुन्हा ऐरणीवर येईल…काही नातेवाईक तो विषय खरंच विजयची काळजी म्हणून तर काही उपहास म्हणून चघळतील… पण कोणाचीही विजयला सरळ – सरळ विचारायची हिंमत होत नाही की तू लग्न का करत नाहीस ? कोणी जर हा प्रश्न विचारला तर विजय काय म्हणेल याचा नेम नव्हता , कदाचित तो असाही म्हणेल की मी लग्नाला एका पायावर तयार आहे माझ्यासाठी मुलगी तुम्ही शोधायची आणि लग्नाचा सर्व खर्चही तुम्हीच करायचा

  July 31, 2022


साहित्य - ललित

माझा लेखन प्रवास (आठवणींची मिसळ – भाग ६)

Category:

 

अंधेरी लोकल बोर्डाच्या चौथीच्या परीक्षेत मला “हिरवळ” हा अनंत काणेकरांचा ललितलेखांचा संग्रह बक्षिस मिळाला.तो वाचल्यानंतर मला लेखनातले वेगवेगळे प्रकार कळायला लागले.ते पुस्तक माझ्या पांचवीच्या वर्गशिक्षकांनी वाचायला मागून घेतले, ते मला परत मिळालेच नाही.कांही वर्षानी मी दुसरी प्रत विकत घेतली.त्याच वर्गशिक्षकांनी मला लिहिण्याचे उत्तेजन दिले.

  July 30, 2022


लेखसंग्रह

सौंदर्यदृष्टी आणि कलात्मकता

Category:

 

लेखिका ह्या काव्यलेखन व ललितलेखनाबरोबरच डिझायनिंगबाबत सल्लागार म्हणूनही कार्यरत असून त्यांचा इंटिरिअर डिझाईनिंगचा ‘वास्तुआर्ट’ नामक व्यवसाय आहे.

  July 30, 2022