लेखसंग्रह

रात्रीच्या जेवणातील ‘या’ चूकांमुळे वाढतो लठ्ठपणा

Category:

 

आपल्या प्रत्येक दिवसाची सुरूवात ही पोटभर नाश्ता करून झाली पाहिजे, संतुलित पोषण आहाराचा दुपारच्या जेवणामध्ये समावेश आणि रात्रीचे जेवण पचायला हलके व दिवसापेक्षा कमी प्रमाणात घेतले पाहिजे.

  March 31, 2019


लेखसंग्रह

अतिदक्षता विभागाचे जनक डॉ. जॉन कर्कलीन

Category:

 

अतिदक्षता विभागात संगणकीकृत निरीक्षणे ठेवणे व तेथील रुग्‍णांच्‍या अतिमहत्त्वाच्‍या चाचण्‍यांवर सतत लक्ष ठेवणे हे आज आपल्‍या ओळखीचे आहे. परंतु अशा प्रकारचा अतिदक्षता विभाग असावा अशी कल्पना मांडून , त्‍याचे प्रारूप कर्कलीन यांनी सुचविले व आज जगभरात ते अंमलात येते आहे. या प्रारूपाच्‍या वापरामुळे रुग्‍णांची काळजी घेणे सुलभ झाले आहे. त्‍याचप्रमाणे शस्‍त्रक्रियेनंतरची गुंतागुंत कमी झाली आहे व पर्यायाने कित्‍येकांना जीवदान मिळाले आहे.

  March 31, 2019


साहित्य - ललित

रुद्रा – कादंबरी – भाग १६

Category:

 

अनपेक्षितपणे तो बुटका टकलू ढाब्यातून वेगाने धावत हायवे कडे पळत होता, त्याच्या मागे राघव होता. क्षणात त्या बुटक्याला चिरडून तो राक्षसी ट्रक निघून गेला होता. रुद्राला हे नाट्य तो उभा होता तेथून दिसत होते. मेंदूने या सर्वांचा अर्थ लावेपर्यंत काहीवेळ तो एका जागी स्तब्ध उभा राहिला. या अपघातून तो बुटका वाचणे शक्यच नव्हते.

  March 31, 2019


लेखसंग्रह

एक रहस्यमय सिद्धान्त

Category:

 

सर्व forces जसे Electromagnetic , nuclear force आणि इतर काही हे सारे describe होऊ शकतात. म्हणजे microscopic level ला त्यांच्या particles मधले आदान-प्रदान दिसते  पण Gravitation एक मात्र असा force आहे की त्याबद्दल असे घडत नाही . म्हणून तो microscopic level ला describe होत नाही. त्यामुळे Quantum Gravity साठी अशी theory हवी जी सर्व forces describe करू शकेल व त्याचे स्वरूप हे massless हवे .आणि हे ‘string theory’ ने शक्य होते.

  March 30, 2019


व्यक्ती-परिचय

ऋषितुल्य भाई गायतोंडे

Category:

 

भाई गायतोंडे हे नाव संगीत क्षेत्रात संगीत ऋषी म्हणून जगप्रसिद्ध असलेलं. याच ऋषितुल्य भाईंची तुला त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या एका वाढदिवसानिमित्त केली होती. भाईंच्या वजनाचे तबले यावेळी भाईंना भेट म्हणून मिळाले होते. हे तबले भाईंच्या घरी एका काचेच्या कपाटात दिमाखात सजले होते. याच तबल्याच्या पार्श्वभूमीवर मी भाईंचा आणखी एक फोटो टिपला. भाईंची सांगीतिक श्रीमंती या फोटोकडे नजर टाकल्याच क्षणी दिसते. मी टिपलेला हा फोटो भाईंनादेखील खूप भावला आणि म्हणून माझ्यासाठी तो विशेष ठरला. पुढे हाच फोटो स्वरदायिनी ट्रस्टच्या दिनदर्शिकेसाठी वापरला गेला होता.

  March 30, 2019