अवर्गिकृत

एक्सपायरी डेट…. चलनी नोटांसाठीही हवी!

Category:

 

आज आपण कोणाला तरी चेक किंवा डिमांड ड्राफ्ट देतो. काय असते याची वटवायची मुदत? मग अशीच मुदत चलनी नांटांना असली तर काळ्या पैशाचे व्यवहार कमी होतील का?

  January 31, 2011


अवर्गिकृत

पीपल फॉर अँनिमल्स(मुंबई) संस्थेने सानपाडा येथून रेस्क्यू केला विषारी घोणस साप!!!

Category:

 

एका मुक्या जिवाचा जीव वाचला तसेच त्याच्या जहाल दंशामुळे उद्भवू शकणारा संभाव्य धोकादेखील टाळता आला !!!!

  January 31, 2011


लेखसंग्रह

अमृतवेल – नाबाद १५०!

Category:

 

मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून दर बुधवारी रात्री ८.३० वा. प्रसारित होणार्‍या ‘अमृतवेल’ या साहित्यविषयक कार्यक्रमात कथा-कविता विविध साहित्यिकांच्या मुलाखती आणि लेखनविश्वाच्या नव्या-जुन्या प्रवाहांचा वेध घेतला जातो. या या रसिकप्रिय कार्यक्रमाने १५० भागांचा टप्पा नुकताच पार केला. अमृतवेलच्या आगामी कार्यक्रमात ‘काव्यांजली’ हा कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या कवितांवर विशेष कार्यक्रम तीन भागांत लवकरच प्रसारित होणार आहे. २, ९ आणि १६ फेब्रुवारी रोजी या तीन भागांचं प्रसारण होणार आहे. यात ज्येष्ठ कवी शंकर वैद्य आणि डॉ. घनश्याम बोरकर हे सहभागी होणार आहेत.

  January 29, 2011


कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

गृह कर्ज आणि त्यासाठी लागणारे जुनी खरेदी खत

Category:

 

मग त्याचे काम नाही का जुने खरेदी खताची सत्यप्रत जमा करून घेण्याची. हि नसती उठाठेव मला का ?

  January 29, 2011


कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

मैं खयाल हूँ किसी और का

Category:

 

स्वतःची ओळख हा समस्त मानवजातीतील विद्वान आणि वैज्ञानिकांसमोरील एक कळीचा प्रश्न ठरला आहे. “माणूस कोण?” या प्रश्नाचे सर्वमान्य उत्तर आतापर्यंत कुणीही देऊ शकलेले नाही. गझलकारांनी मात्र आपापली हृदये लढवून आणि डोकी खाजवून अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. ती प्रत्येकाला रूचतील आणि समजतीलच असे मात्र नाही. सलीम कौसर नावाच्या शायराने स्वतःचा शोध घेण्याचा केलेला प्रयत्न या अतिसुंदर आणि काहीशा अवघड गझलेत व्यक्त झालेला आहे.

  January 29, 2011


लेखसंग्रह

शेतीचे दिवस पालटत आहेत….

Category:

 

ज्याकाळी या देशात सोन्याचा धूर निघत होता, त्या काळी उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी,हे सूत्र इथे मान्यताप्राप्त होते. शेतीला सर्वोच्च दर्जा दिल्यानेच या देशात सोन्याचा धूर निघण्याइतपत समृद्धी होती, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.नंतरच्या काळात मात्र सगळे गणितच उलटेपालटे झाले. समृद्ध शेती भिकेकंगाल झाली, शेतीचा मालक पै पैसाठी मोताद झाला, परिस्थिती इतकी विकोपाला गेली की शेवटी शेतकर्‍यांना आत्महत्या करण्याची वेळ आली.

  January 28, 2011


अवर्गिकृत

तेजोमय संगीतसूर्य

Category:

 

संगीतसाधनेचा अखंड ध्यास घेतलेले दिग्गज व्यक्तिमत्त्व म्हणून पंडित भीमसेन जोशी यांचा गौरवाने उल्लेख केला जातो. संगीत क्षेत्राची इमानइतबारे साधना करताना अनेक मानसन्मान प्राप्त होऊनही पंडितजींच्या स्वभावातील साधेपणा कायम राहिला. किराणा घराण्याला आणि संगीताला वाहिलेली निष्ठा हे त्यांच्या कारकिर्दीचे ठळक वैशिष्ट्य. रसिकांच्या हृदयसिहासनावर अधिराज्य गाजवणार्‍या या संगीतसूर्याला वाहिलेली श्रद्धांजली.

  January 28, 2011


लेखसंग्रह

तंत्रज्ञान बदलतेय वेगात

Category:

 

गेल्या दशकभरात तंत्रज्ञान झपाट्याने बदलत असून आज नवी वाटणारी गोष्ट उद्या लगेच जुनी होत आहे. यामुळे ग्राहकांसमोर एकाच वेळी अनेक पर्याय खुले होत असून योग्य पर्याय निवडताना ते गोंधळून जात आहेत. सध्या अॅण्ड्राईड या मोबाईल फोन्सच्या ऑपरेटिंग सिस्टिमबद्दल बरीच चर्चा होत असली तरी त्यापेक्षाही चांगली ऑपरेटिंग सिस्टिम कधीही बाजारात दाखल होऊ शकेल अशी परिस्थिती आहे.

  January 28, 2011


लेखसंग्रह

हे तर माफियांचे राज्य

Category:

 

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था माफियांच्या पायाखाली लोळण घेत असून गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. अतिरिक्त ल्हाधिकारी यशवंत सोनवणेंच्या हत्येची घटना अशीच निर्घृण आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. सत्ताधार्‍यांनी गुन्हेगारांना सल्याचा हा परिणाम आहे. राज्यकर्त्यांनी गुन्हेगारांना मोकाट सोडून भ्रष्टाचाराला चालना देणे न थांबवल्यास राज्यातील कायदेयंत्रणा सातळाला गेल्याशिवाय राहणार नाही.

  January 28, 2011