अवर्गिकृत

खच्चीकरणाची पंचवीस वर्ष

Category:

 

येणाऱ्या जानेवारीत मुंबईतील गिरणी कामगारांच्या ऐतिहासिक संपाला ३९ वर्ष पूर्ण होतील. या संपाला २५ वर्ष झाली (१८ जानेवारी २००७) तेव्हा संवेदनशील लेखक जयंत पवार यांनी महाराष्ट्र टाईम्समधे लिहिलेला लेख त्यांच्या परवानगीने खाली उद्धृत करत आहे.

  January 31, 2025


वॉटर हीटर (सोलर)
लेखसंग्रह

वॉटर हीटर (सोलर)

Category:

 

भारत हा उष्णकटिबंधातील देश असल्याने आपल्याकडे पावसाळ्याचे चार महिने सोडले तर बाकीचे दिवस सूर्यप्रकाश असतो. सहस्ररश्मी सूर्याची फुकट मिळणारी ऊर्जा वापरणे हा खरेतर इंधन टंचाईवरचा एक पर्याय आहे. पाणी तापवण्यासाठी आपण घरातील किमान २५ टक्के ऊर्जा खर्च करीत असतो ती वाचवता आली तर विजेचा किंवा गॅसचा वापर टाळल्याने प्रदूषण होणार नाही. सोलर वॉटर हीटर हा असाच एक पर्याय आहे. सोलर वॉटर हीटर तयार करताना जी कार्बनची निर्मिती झालेली असते ती या हीटरच्या वापराने ४-५ वर्षांत भरून निघते

  January 30, 2025


डीएनए कॉम्प्युटर
लेखसंग्रह

डीएनए कॉम्प्युटर

Category:

 

डीएनए आणि कॉम्प्युटर (संगणक) यांचा काय संबंध असे कुणालाही वाटेल यात शंका नाही पण सजीवांच्या शरीरात माहिती साठवणाऱ्या डीएनएचा वापर संगणकासारखा करता येतो हे आता संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. आपल्या नेहमीच्या संगणकात मायक्रोप्रोसेसर ही चिप असते, तर डीएनए कॉम्प्युटर या नॅनोकॉम्प्युटरमध्ये ही जागा डीएनए सांभाळत आहे.

  January 30, 2025


प्रदूषणमापक यंत्र
लेखसंग्रह

प्रदूषणमापक यंत्र

Category:

 

हवा प्रदूषण हे अनेक रोगांना कारण ठरणारे आहे. जागतिक ‘आरोग्य संघटनेच्या मते दरवर्षी २४ लाख लोक त्यामुळे मरतात. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात रसायने, सूक्ष्मकण, जैविक घटक हवेत मिसळतात. प्रदूषकांची हवेतील पातळी मोजून ती हवा श्वसनास योग्य की अयोग्य ते ठरवले जाते.

  January 30, 2025


कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

पारवा

Category:

 

पारवा म्हणजे कबूतर. घराच्या कौलारावर अथवा वळचणीला काहीही हालचाल न करता तासन्तास शांतपणे बसून राहिलेले कबूतर अनेकांनी पाहिले असेल. एखाद्या योग्याप्रमाणे जणू काही ध्यान लावल्यासारखे ते स्थितप्रज्ञ बसलेले असते. कबुतराचा आवाजदेखील घुमल्यासारखा धीरगंभीर असतो. अशा स्थितप्रज्ञ पारव्याचे चित्र बालकवी कसे रेखाटतात पहा

  January 30, 2025


कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

देवा, ह्याही देशात पाऊस पाड

Category:

 

‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.’ ही प्रतिज्ञा आपण मोठ्या अभिमानाने म्हणतो, परंतु आज या देशाचे खरेखुरे चित्र कसे आहे? वास्तवरूप कसे आहे, हे डोळसपणे पाहू लागलो तर आपल्याला वेगळेच दर्शन घडते. आपल्या देशात अनेकदा जातीय दंगली माजतात, एकमेकांच्या धर्माचा अपमान करून सामान्य जनतेला चिथावणी दिली जाते. अन्याय, अत्याचार, गुंडगिरी, भ्रष्टाचार अशा गोष्टींना उत्तेजन दिले जाते. पुढारी लोक खोटे मुखवटे धारण करून समाजसेवेचा आभास निर्माण करतात. प्रत्यक्षात मात्र स्वत:चे आणि नातेवाइकांचे हित करून घेतात. स्वतःच्या अधिकारपदाचा वापर करून घेऊन जवळच्या लोकांना मोठमोठी पदे, नोकऱ्या मिळवून देताना इतर बुद्धिमान, आणि वशिलेबाजीचा वापर न करणाऱ्या तरुण वर्गावर अन्याय करतात. अशा परिस्थितीमुळे देशाची विभागणी सरळसरळ दोन वर्गांत होते. एक अत्यंत धनिक वर्ग, जो गरिबांचे शोषण करून स्वतः श्रीमंत होत राहतो आणि दुसरा अत्यंत गरीब, अन्याय निमूटपणे सहन करणारा शोषित वर्ग. अशा प्रकारे शोषक आणि शोषित अशी विभागणी या देशात शतकानुशतके चालत आली आहे. एका बाजूला वैभव मिरवणाऱ्या उत्तुंग इमारती आणि दुसऱ्या बाजूला दारिद्र्याने खचलेली झोपडपट्टी असे दृश्य भारतातील प्रत्येक शहरात दिसते.

  January 28, 2025


कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

आई

Category:

 

आईची महती अनेक थोर कवींनी वर्णन केली आहे. ‘प्रेमस्वरूप आई वात्सल्य सिंधू आई’ – माधव जूलियन, ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ -यशवंत, ‘निजल्या तान्ह्यावरी माऊली दृष्टी सारखी धरी – भा. रा. तांबे किंवा ‘अंतरले पाय तुझे हाय हाय माते ।’ – केशवसुत. आई आपल्या मुलाची मायेने काळजी घेते. त्याला घास भरवते. लहानाचा मोठा करते. आजारपणात सेवा करते. आईमुळेच घराला घरपण येते. मुलाला घडवण्यात, त्याच्यावर चांगले संस्कार करण्यात आईचा वाटा फार मोठा असतो. चार-पाच दिवस जरी आई घरापासून दूर बाहेरगावी गेली तर घर सुने सुने होऊन जाते. आईच नसलेले घर तर अगदी पोरके होऊन जाते. इतके आईचे स्थान महत्त्वाचे आहे.

  January 26, 2025


अवर्गिकृत

कारण ते एकमेवाद्वितीय होते म्हणून

Category:

 

ज्याचे कुणी नसते त्याचा हिंदी सिनेमा असतो. स्वतःच्या घरापेक्षाही थिएटरच्या अंधाऱ्या घरात जास्त सहजतेने वावरणाऱ्या,तेथील मिट्ट काळोखात आपल्या मनातील काळोख बेमालूमपणे मिसळणाऱ्या आणि समोरच्या चौकोनी सेल्युलॉइडच्या तुकड्यावर जीव लावणाऱ्या कडव्या पण असंघटित फिल्लमबाजांचा शिरीष कणेकर हे बुलंद आवाज होते.
‘आम्ही शिर्डीला जाणाऱ्यांना हसत नाही.

  January 24, 2025