अवर्गिकृत

वेळेचा अपव्यय

Category:

 

जनता केंद्रातील सरकारला उबगलेली आहे. अशा वेळी त्या लाटेवर स्वार होऊन दिल्ली काबीज करण्याची तयारी करण्याऐवजी पंतप्रधानांच्या राजीनाम्याचा विषय टोकापर्यंत ताणून धरणे हितकारक नाही.

  August 31, 2012


अवर्गिकृत

फुगा फुटायची वेळ

Category:

 

अरविंद केजरीवाल यांची स्थिती बैलाएवढा होण्यासाठी फुगणार्‍या बेडकाप्रमाणे झाली आहे. भ्रमाचा हा फुगा फुटण्याची वेळ आता आलेली आहे. भ्रष्टाचाराविरुद्धच्या आंदोलनातून अण्णा हजारे बाजूला झाले, तशी त्यांची जागा घेण्याचा प्रयत्न केजरीवाल यांनी चालवला असला तरी त्यांचे ते आंदोलन दिशाहीन भरकटताना दिसू लागले आहे.

श्री. परेश प्रभू
संपादक, नवप्रभा

  August 28, 2012


व्यक्ती-परिचय

डॉ. सत्यपाल सिंग

Category:

 

१९८० च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी असलेले डॉ. सिंग यांनी ठाणे, नाशिक, बुलढाणा, गडचिरोलीचे अधीक्षक, मुंबईत वांद्रे परिमंडळाचे उपायुक्त, ईशान्य मुंबईत अतिरिक्त आयुक्त, गुन्हे अन्वेषण विभागाचे सहआयुक्त, पुण्याचे आयुक्त आणि राज्याचे अतिरिक्त महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) अशा विविधांगी जबाबदारी पार पाडल्या आहेत. डॉ. सिंग हे काही काळ केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागातही होते. ऑगस्ट २०१२ मध्ये मुंबईच्या आयुक्तपदाची धुरा त्यांच्या खांद्यावर आली.

  August 27, 2012


लेखसंग्रह

सुट्ट्यांचा सुकाळ; देशाचं वाटोळं!

Category:

 

या देशातील सुट्ट्यांचा सुकाळ आणि कर्मचार्‍यांचा बेजबाबदारपणा लक्षात घेता असे काही कठोर निर्णय घेणे ही काळाची गरज आहे; परंतु ब्रिटिशांनी मस्तवाल करून ठेवलेल्या आणि ती मस्ती अजूनही कायम असलेल्या प्रशासकीय व्यवस्थेला शिस्त लावण्याची धमक सरकार दाखवू शकते का, हा खरा यक्षप्रश्न आहे.

  August 27, 2012


लेखसंग्रह

पुण्यातील सुप्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती

Category:

 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे पुण्यातील सुप्रसिध्द मिठाईचे व्यापारी होते. श्रीमंत व निगर्वी, सत्याचे पाईक असा त्यांचा स्वभाव होता.  पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर ही त्यांची रहावयाची इमारत होती.

  August 27, 2012


अवर्गिकृत

तरच कत्तलखाने बंद होतील !

Category:

 

यातून तुम्हाला एकवेळ पैसे मिळणार नाहीत. पण कशाशीच तुलना करता न येणारे अमाप असे पुण्य मात्र नक्की मिळेल.

  August 26, 2012


अवर्गिकृत

ट्विटर’ आणि सरकार

Category:

 

‘ट्विटर’ हे अमेरिकी संकेतस्थळ आहे आणि त्याचे भारतात कार्यालयही नाही. सरकारने बंदी घालायचे ठरवले तरी त्यांनी मनात आणले तर अनेक प्रकारे ही बंदी झुगारून ‘ट्विटर’ सुरू राहू शकते. जेथे ‘विकीलिक्स’ ला अमेरिका नमवू शकली नाही, तेथे भारताची काय पाड? त्यामुळे सरकारने उगाच स्वतःचे हसे करून घेऊ नये.

श्री. परेश प्रभू

संपादक, नवप्रभा

  August 25, 2012


अवर्गिकृत

राजकारणातील गुन्हेगारीची नाकाबंदी!

Category:

 

साम, दाम, दंड आणि भेद या आयुधांवर आधारित असलेलं राजकारण…गुन्हेगारी पार्श्वभूमीचा ठपका पुसण्यासाठी राजाश्रय हे एक पूरक आणि पोषक साधन…असुशिक्षित, असुशील व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले नेते, ज्यांना समाजसेवेची ओढ,आवड अथवा समाजाशी कसलीही बांधिलकी नाही,..जनतेच्या अडी-अडचणी, दैनंदिन समस्या, सामाजिक प्रश्नांची जाण व समज नसलेले नेते जनतेचे नेतृत्व करण्यास लायक असतील का?

  August 25, 2012