(User Level: User is not logged in.)

नॉस्टॅल्जिया

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • नदीबाई माय माझी..

    परवा सहजच संध्याकाळच्या वेळी गावाहून येता येता गोदावरी काठी थोडा वेळ थांबलो.ताडकळस आणि पालम या दरम्यान धानोरा (काळे) या ठिकाणी गोदावरी नदीवर मोठा पूल बांधण्यात आला आहे. तिथे थोडा वेळ काम नसतांना ही रेंगाळलो पुलावरून खाली पाहिले असं काही मनोहर दृश्य दिसलं की मला पूर्वीच्या काळच्या दिपमाला ची आठवण झाली संध्याकाळ म्हणजे दिवे लागणीची वेळ, त्यातल्या त्यात त्यात दूरवरून झगमगणारे हे दिवे पाहिले जी माणसाला अधिकच आनंद होतो.

      June 6, 2022


  • ‘आपलं’ दुकान

    ‘आपलं’ दुकान

    आपण परदेशात गेल्यावर तिथं कोणी भारतातील, त्यातूनही महाराष्ट्रातील, नशीबाने पुण्यातील माणूस भेटला की, जो आनंद होतो.. त्याचं शब्दांत वर्णन करणंही अवघड आहे. कारण त्यात एकप्रकारचा आपलेपणा, आपुलकी असते.

      January 12, 2023


  • माझी M- 80

    माझी अत्यंत आवडती टू व्हिलर .पाच फुटापेक्षाही कमी उंची असलेल्यांसाठी एक वरदानच, दोन्ही पाय जमिनीला टेकवू देणारी गाडी.

      September 16, 2023


  • पानशेत धरण फुटीच्या आधीचे पुणे

    आज बारा जुलै : पानशेत धरण फुटीच्या आधीचे अर्थात बुधवार दिनांक बारा जुलै एकोणीसशे एकसष्ठ पूर्वीचे पुणे !

    पुणे येथील पानशेत धरण फुटलेल्या घटनेला आज पंचावन्न वर्षे पूर्ण झाली ! बुधवार दिनांक बारा जुलै एकोणीसशे एकसष्ठ, त्यादिवशी दिव्याची आवस होती ! एवढा काळ लोटला, तरीही माझ्यासारख्या जुन्या पुणेकरांच्या मनात पानशेत धरणफुटीच्या त्या भयानक आठवणी अजुनीही विस्मुतीमध्ये गेल्या नाहीत.

    मी तर तेव्हां डेक्कन जिमखान्यावरील डे जि भावेस्कूलमध्ये [आत्ताचे सौ विमलाबाई गरवारे प्रशाला] शिकत होतो. त्यावेळी पुण्याला शांत पुणे, पेन्शनरांचे पुणे, सायकलींचे पुणे, अश्या विविध चांगल्या विशेषणांनी संबोधले जायचे. पर्वती, पद्मावती, विठ्ठलवाडी, कोथरूड, ही ठिकाणे पुणे शहरापासून खूप दूर मानली जायची. सुट्टीच्या दिवशी, आलेल्या पाहुण्यांना पेशवे पार्क, तळ्यातला गणपती (आत्ताची सारसबाग) दाखवायला न्यायचे म्हणजे, आपण किती लांब आलो, असे वाटायचे. पौषाच्या महिन्यात पद्मावती येथे आवळीभोजनाला जायचो. कार्तिकी एकादशीला विठ्ठलवाडीला शाळेची सहल जायची. तेव्हा ह्या ठिकाणी बसची सोय नव्हती.

    आप्पा बळवंत चौक ते डेक्कन जिमखाना बसचं तिकीट फक्त पाच पैसे होतं, आम्हां शाळकरी मुलांचा महिन्याचा तेव्हां बस पास काढला जायचा फक्त दीड रुपयात ! पुण्यात एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये रिक्षा आली, तथापि रस्त्यावर मोठी वर्दळ होती ती सायकलींची, हं, प्रवाशांकरिता वाहन म्हणजे घोड्याचा टांगा ! शनिवार पेठेतून, शिवाजीनगर एसटी बस स्टँडला जाण्यासाठी टांगेवाल्याला फक्त चार-सहा आणे द्यावे लागायचे, अर्थात तेव्हां ते सुद्धा जास्त वाटायचे.

    संध्याकाळी शनिवारवाड्यापुढील पटांगणात नामवंतांची व्याख्याने ऐकायला मिळायची. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, ह्यांची ऐकलीली श्राव्य अशी व्याख्याने आजही आमच्या कानामनात घुमत आहेत. गणेशोस्तव साजरे व्हायचे, मेळे भरायचे, त्यामध्ये पं भीमसेनजी जोशी, गजाननराव वाटवे, ज्योत्स्ना भोळे, सरस्वती काळे, बी सायन्ना पार्टी, ह्यांच्या गाण्यांचे कार्यक्रम व्हायचे. गणपतीमध्ये मंडळांतर्फे रस्त्यावर चित्रपट पाहायला मिळायचे.

    उन्हाळ्यामध्ये कुठल्याही रसवंतीगृहात जा, पाच पैशात अर्धा ग्लास, तर दहा पैशात फुल ग्लास रस निवांतपणे पिउन आनद लुटत होतो. फक्त चार आण्यात म्हणजेच पंचवीस पैशात आईसप्रोट - कुल्फी मिळायची. शनिवारवाड्यावर चार आण्यात मस्त भेळ मिळायची !

    मंडई मध्ये गेल्यावर एक-दोन रुपये देऊन पाच-सहा पिशव्या भरून भाजी आणली जायची. गोडेतेलाचा भाव दहा आणे शेर झाला म्हणल कि, अरे बापरे, असे वाटायचं ! दिवाळीमध्ये फक्त दहा रुपयात, दहा पिशव्याभरुन फटाके आणले जायचे. घरातील सर्व भावंडांमध्ये ते वाटूनसुद्धा, थोडे बाजूला ठेवले जायचे, ते तुळशीच्या लग्नाला शिल्लक ठेवले जायचे.

    अगदी मनापासून, प्रांजळपणे सांगू कां ? तेव्हां आमच्या पिढीने अनुभवली ती मनाची श्रीमंती, आता दिसतीय ती पैशाची !

    -- उपेंद्र चिंचोरे

      July 12, 2016


  • छायाचित्रे – भूतकाळाची स्मारके !

    हातातून निसटणारे क्षण जिवाच्या आकांताने, किमान छायाचित्रांच्या मदतीने धरून ठेवणारे आपण सारेजण ! मग अशा “युनिक” स्मृती येणारच ना मनात !

      November 22, 2022


  • शंभर वर्षांपुर्वीचं गिरगाव

    मुंबईतलं गिरगाव म्हणजे समुद्राच्या विरूद्ध बाजूला चर्नीरोड रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतरचा परिसर. हा भाग तसा फोर्ट विभागापासून दूर म्हणजे अगदी सुरूवातीस पाहता इंग्रजांच्या दृष्टीने तसा गावाच्या बाहेरचा किंवा वेशीवरचा भाग. इथे इंग्रजांचं लक्ष दुरूनच असे. गिरगावचा परिसर हा वेगवेगळ्या वाड्यांनी बनलेला आहे. कांदेवाडी (खाडिलकर मार्ग), केळेवाडी (डॉ. भालेराव मार्ग), फणसवाडी, गायवाडी, खोताची वाडी, झावबाची वाडी वगैरे वाड्यांचा पुंजका मिळून गिरगाव बनलेलं आहे.

      April 4, 2017


  • तीन घटना

    जगात बर्‍याच घटना घडतात. परंतु स्थानिक घटना, चांगल्या किंवा वाईट, या दूरवर होणार्‍या घटनांपेक्षा आपल्यावर अधिक परिणाम करतात. बर्‍याच घटना अगदी कमी कालावधीसाठी आपल्या मनात राहतात, काही थोडा जास्त काळ. केवळ काही गोष्टी चिरस्मरणात राहतात.

      August 12, 2025


  • पावसाचे संदर्भ…

    रिमझिम पाऊस चालू असताना झाडांनी आपले कांद्याचे हात पसरून घ्यायला सुरुवात केलेली.. जिकडे तिकडे ओली ओली माती मधूनच वा-याची गार लहर.. अगदी अंगावर शहारे आणणारी… आसपासच्या नदी नाल्यात खळखळ सुरू झालेली.. भिजलेल्या पाखरांचे फांदी आड दडणे.. वाऱ्याच्या लहरीने झाडांचे शहारणे.. या गोष्टी जितक्या सूक्ष्म निरीक्षणातून येतात तितक्याच त्या सुंदर वाटतात..

      June 9, 2021


  • परिचय’ – नात्यांची नव्याने ओळख !

    एकाच छताखाली राहणारी ,रक्ताचे नाते असणारी मंडळी एकमेकांना “परिचित “असतीलच असे नाही. सध्याच्या काळात तर हे ठळकपणे अधोरेखित होतंय. एक नितांतसुंदर ,कॊटुंबिक ,अभिनयसंपन्न चित्रपट म्हणजे “परिचय ” ! यात रूढार्थाने प्रेमकहाणी नाही ,खलनायक नाही , रक्त वगैरे चुकूनही नाही (नाही म्हणायला आजारी संजीवकुमार खोकतो ,तेव्हा रक्ताचे डाग दिसतात.) अढी ,गैरसमज ,अहंकार यामुळे निरगाठी पडलेली नातेवाईक मंडळी येथे अपरिहार्यपणे (आणि सुरुवातीलातरी मनाविरुद्ध ) एकत्र राहात असतात. त्यांचाही नियतीमुळे नाईलाज झालेला असतो.

      November 13, 2021


  • मुंबईतली अस्तंगत झालेली ट्राम

    आज साठीच्या जवळपासच्या मुंबईकरांना ट्रामचा प्रवास नक्कीच आठवत असेल.

    मुंबईत घोड्यांची पहिली ट्राम ९ मे १८७४ रोजी आली. तीन आण्यात कुलाबा ते पायधुणी आणि अर्ध्या आण्यात पायधुणी ते बोरीबंदर असा प्रवास करता येत असे. १८९९ सालच्या प्रारंभी ट्रामने एका आण्यात मुंबईत कुठेही जाता येत असे. सहा ते ८ घोड्यांनी ओढली जाणारी ही ट्राम एका तासात सुमारे ५ मैल अंतर कापत असे.

    मुंबईतली ट्राम सुरुवातीला व्यापारी विभागांमध्ये सुरु केली गेली. कुलाबा - क्रॉफर्ड मार्केट - पायधुणी आणि बोरीबंदर - काळबादेवी - पायधुणी अशा २ मार्गांवरून ती सुरु झाली. यामध्ये ग्रॅंट रोड, पायधूनी, गिरगाव, भायखळा आणि ससून डॉक या भागांचा समावश होता.

    १९०७ मध्ये ट्रामचे विद्युतीकरण झाले आणि ती किंग्ज सर्कल पर्यंत धावू लागली. तोपर्यंत ट्रामचे शेवटचे स्थानक होते दादरचे खोदादाद सर्कल. शेवटच्या स्टेशनला टर्मिनस म्हणून संबोधतात. त्यामुळेच खोदादाद सर्कललाही दादर ट्राम टर्मिनस म्हणजेच दादर टीटी याच नावाने ओळखले जाऊ लागले. ट्रामची वाहतूक बंद झाल्यानंतर इतकी वर्षे लोटली तरी खोदादाद सर्कलचे दादर टी.टी. हे नावं आजही प्रचलित आहे. कधीतरी टॅक्सीवाल्याला सांगून बघा की खोदादाद सर्कलला जायचेय.. कदाचित त्याला कळणारही नाही.

    १९०७ मध्ये BEST ने ट्रामवाहतूक आपल्याकडे घेतली. ७ मे १९०७ रोजी विजेवर चालणारी ट्राम सुरु झाली आणि १९२० मध्ये डबल डेकर म्हणजेच दुमजली ट्राम सुरु झाली.

    ३१ मार्च १९६४ पासून मुंबईतली ट्राम कायमची बंद करण्यात आली त्यानंतर मुंबईत जलद वाहतुकीसाठी BEST च्या बसगाड्यांना सर्वत्र रस्ते मोकळे झाले.

    फेब्रुवारी २०१६ मध्ये दक्षिण मुंबईतल्या काही रस्त्यांचे दुरुस्तीकाम सुरु असताना अचानकपणे जुन्या काळातल्या ट्रामच्या रुळांचे अवशेष सापडले आणि मुंबईतली ट्राम पुन्हा एकदा चर्चेत आली होती.

    -- निनाद अरविंद प्रधान
    व्यवस्थापकीय संपादक, मराठीसृष्टी
    www.marathisrushti.com

    मुंबईच्या रंजक इतिहासातील टप्पे - भाग ३
    (क्रमश:)

      February 9, 2017