वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं जीभ हे महत्वाचं इंद्रिय आहे. चुकून कधी आजारी पडलात आणि डॉक्टरकडे गेलात, तर डॉक्टर म्हणतो जीभ बघू अशी ह्या जीभेची महती आहे. त्या तुमच्या जीभेवर जास्त प्रमाणात पांढरट थर साचलाय का? असं असेल तर ती निश्चीतच चिंतेची बाब असू शकते.
दातांसाठी ब्रश करणं जितकं महत्वाचं आहे. तितकंच जीभेची स्वछता राखण पण गरजेचं आहे. तोंड धुताना जीभ टंग क्लिनरनं स्वच्छ करावी. टंग क्लिनरनं जीभ स्वच्छ करताना जीभेवर जास्त दबाव टाकू नये. दोन-तीन वेळा हलक्या हतांनी टंग क्लिनरचा उपयोग करावा. आपल्या तोंडामध्ये हानिकारक जीवाणूंना जराही थारा देवू नका.
गडद रंगाचे खाद्य पदार्थ खाल्यामुळं जीभेचा रंग बदलतो. परंतु ते एवढे हानीकारक नसते आणि ते टंग क्लिनरच्या साहाय्यानं स्वच्छ करता येवू शकतात. त्यासाठी प्लास्टिकचा किंवा धातुचा टंग क्लिनर वापरता येतो. काही कंपन्याच्या ब्रशच्या मागं जीभ स्वच्छ करण्यासाठीची सोय केलेली असते. ज्यामुळं आपण दातही घासू शकतो. आणि जीभही साफ करू शकतो.
जीभ स्वच्छ करण्याचा आणखी एक पर्याय म्हणजे माउथवॉशचा वापर करणे. अर्ध्या ग्लास पाण्यात अर्धा चमचा मीठ टाकून पाच-सहा वेळा गुळण्या करण्यानं सुध्दा जीभ स्वच्छ करता येते. जीभेवर घाण असल्यास ते डिहॉयड्रेशनचं कारण ठरु शकतं. त्यामुळं आपल्या जीभेची काळजी घ्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 18, 2017
साधारण तीन चार महिन्यांपूर्वी मी माझ्या इमारतीच्या शेजारी असलेल्या दोन झाडांबद्दल एक लेख whatsapp आणि facebookवर लिहिला होता. ३१ मे २०१६ या दिवशी पहाटेच्या वेळेस या दोन झाडांना कोणीतरी विषारी इंजेक्शन देऊन मारून टाकले होते. अगदी ६०-७० वर्ष वयाची ही पूर्ण वाढलेली हिरव्यागार पानांच्या भरगच्च पानांची ही दोन्ही झाडे विषारी इंजेक्शनमुळे अगदी एका आठवड्याच्या काळात काळीठिक्कर पडली होती.
September 27, 2016
संयुक्त राष्ट्र संघटनाने जागतिक आदिवासी समुदायाच्या अधिकाराच्या रक्षणार्थ १९९३ हे जागतिक आदिवासी वर्ष घोषित केले होते. तसेच, ९ ऑगस्ट हा ‘जागतिक आदिवासी दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. आदिवासी हेच पृथ्वीचे मूळनिवासी आहेत आणि ४६१ आदिवासी जमाती भारतात वास्तव्यास आहेत. आदिवासींच्या जातीत आज आणखी काही जाती समाविष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
संयुक्त राष्ट्रांच्या प्रेरणेने १९९४-२00५ हे ‘आदिवासी दशक’ म्हणून साजरा करण्यात आले. खरे तर १९७२ सालापासून युनोने आदिवासींच्या प्रश्नांना हात घालायला सुरुवात केली. आदिवासींच्या संदर्भात वाढत्या संघर्षामुळे १९७२ साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाकडे आदिवासींच्या समस्यांचा अभ्यास करण्याची जबाबदारी सोपवली आहे. पुढे १८ डिसेंबर १९९० च्या युनोच्या आमसभेत १९९३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय आदिवासी वर्ष म्हणून जाहीर केले आणि हे वर्ष १० डिसेंबर १९९२ च्या मानवाधिकार दिवसापासून सुरू झाले. या वर्षाच्या दरम्यान आदिवासींचे विविध प्रश्न जगासमोर मांडण्यात आले.
भारतामध्ये प्रामुख्याने चेंचू इरुला, कदार, कोटा या निग्रो, प्रोटो ऑस्ट्रॉलॉईड या वांशिक जमाती केरळ, तमिळनाडू, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात राहतात. मध्य भारतात बिहार, ओरिसा, मध्य प्रदेश, पं. बंगाल या राज्यामध्ये गोंड, संथाल, भूमजी, हो, ओरियन, मुंडा, कोरवा या प्रमुख जाती वास्तव्य करतात. राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, दमण-दीव, दादरा, नगर हवेली या राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशात भिल्ल या प्रमुख जमातीचे लोक राहतात. या व्यतिरिक्त कोळी, कोकणा-कोकणी, वारली, ठाकूर, कातकरी, आंध्र परधान, कोलाम, कोरकू, माडिया, गोंड, राज-गोंड या जमाती राहतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
August 9, 2021
महापालिकेच्या अखत्यारित असलेले केशवराव भोसले नाट्यगृह पूर्वी पॅलेस थिएटर म्हणून ओळखले जात होते. राज्यातील एक प्रसिद्ध नाट्यगृह म्हणून ओळख होती.
October 15, 2021
वेळ साधारण रात्री अकरा साडेअकराची असावी, मोबाईलची रिंग वाजली. एवढ्या रात्री कोणाचा फोन म्हणून माझ्या कपाळावर आठ्या, चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आणि मनात भीती अशा संमिश्र भावना एकाच वेळी निर्माण झाल्या. मात्र स्क्रीनवर जेडींचं नाव दिसलं आणि काही क्षणातच या सगळ्या भावना उडण छु झाल्या. जेडींचा आवाज कानावर पडला ….
झोपली होतीस का गं?
छे छे! देवासमोर बसून पहाटेची भक्तीगीतं गात होते.
हे काय उत्तर झालं?
मग हा काय प्रश्न झाला? जे डी रात्रीची वेळ ही नॉर्मल माणसांची झोपण्याची वेळ असते असं मला वाटतं.
हो का? मग झोपलेली ही नॉर्मल माणसं दुसऱ्या रिंगलाच फोन कसा काय उचलतात बुवा! हे काही कळलं नाही?
भावना पोहोचल्या, मुद्द्याचं बोला.
मुद्द्याचं हेच की, रात्रीचे साडे अकरा वाजलेत आणि तरी तू जागी कशी?
आज पिल्लुने हट्टच धरला, म्हणाला की गोष्ट ऐकल्याशिवाय झोपणार नाही. मग ऐकवली त्याला गोष्ट. आताच डोळा लागलाय त्याचा.
कोणती गोष्ट सांगितलीस?
कोणती सांगणार जे डी? मी काही तुमच्यासारखी हुशार नाही. खूप विचार केला, काहीच आठवेना. म्हणून मग शेवटी 'चिऊ ताई, चिऊ ताई दार उघड'… ती गोष्ट सांगितली.
अरे व्वा! छानच की. मग पुढे?
पुढे काय? निद्रादेवीची आराधना.
असं का, चल मग तुझी निद्रादेवी प्रसन्न होईपर्यंत मी तुला चिमणीची 'उरलेली पूर्ण गोष्ट' सांगतो.
जे. डी. बरे आहात ना? गोष्ट काय सांगताय? मी काय लहान आहे का?
गोष्ट लहान मुलांनीच ऐकायची असते हे तुला कोणी सांगितलं?
आणि माझी चिमणीची गोष्ट अर्धी आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं?
हे तुला तेव्हाच कळेल नं जेव्हा तू माझी गोष्ट पूर्ण ऐकशील?
आता ऐकण्याशिवाय दुसरा कुठला पर्यायच राहिला नाही मला.... सांगा... 'आलिया भोगाशी असावे सादर'… (मी जेडींना असं उपहासाने म्हंटल असलं तरी मला मात्र जाम उत्सुकता लागून राहिली होती … चिमणीच्या त्या अधुऱ्या गोष्टीबद्दल. मी कानात प्राण आणून ऐकायला लागले...)
जेडींचा धीर गंभीर आवाज आला... 'ऐक मग...."
चिमणीचे सगळे काम आटोपले, ती जरा निवांत झाली आणि तेव्हा तिच्या लक्षात आलं की अरेच्च्या! आपण अजून कावळ्यासाठी दारच उघडलेलं नाही. तिला विलक्षण अपराधी वाटलं. तिनं बंद दारामागचा कानोसा घेतला. दाराबाहेर शांतता होती. ती शांतता चिमणीला असह्य झाली. तिनं तत्परतेनं दार उघडलं. दाराबाहेर कावळा नव्हता. तिने आजू बाजूला फिरून पाहिलं, कावळा कुठेही नव्हता. 'गेला असेल कुठेतरी... येईल परत' …. तिने स्वत:च्या मनाची समजूत काढली. मात्र, रात्र मावळली... दिवस उगवला, संध्याकाळ झाली आणि परत रात्र आली तरी कावळ्याचा काही पत्ताच नव्हता. चिमणीचं मन आज कशातच रमेना … बाळाला न्हाऊ घालण्यातही नाही आणि बाळाला गंध-पावडर करण्यातही नाही … कारण एव्हाना तिला सवय झाली होती …. कावळ्याने बंद दारावर केलेल्या टकटकीची …… तो आवाज असा काही कानात साठला होता की दिवसातून अनेक वेळा तिने दारावर टकटक झालीय असं समजून दार उघडलं होतं आणि बाहेर कोणी नाही हे पाहून निराशेने बंद केलं होतं... अनेक दिवस उलटली.... चिमणीच्या मनातून काही कावळा जाईना. मग तिने कावळ्याचा शोध घ्यायचाच असं ठरवून घरट्याबाहेर पाऊल ठेवलं. मजल दरमजल करत फिरताना थकून एका झाडाच्या फांदीवर विश्रांती घेण्यासाठी ती थांबली. एवढ्यात त्याच झाडाच्या दुसऱ्या फांदीवरून चिरपरिचित आवाज तिच्या कानावर पडला... तो 'कावळ्याचा' आवाज होता. तो आवाज ऐकून चिमणीला कोण आनंद झाला. सारा थकवा, सारा शीण कुठल्या कुठे पळाला. तिने मोठ्या उत्साहाने त्या फांदीच्या दिशेने झेप घेतली. पहाते तर काय! कावळा आपल्या घरट्यात आपल्या पिल्लांसोबत आनंदाने मौज मस्ती करत होता. कावळ्याचं लक्ष चिमणीकडे गेलं. चिमणीला पाहून त्याला फार आनंद झाला. तो आनंदाने म्हणाला, 'या या चिमणाबाई. तुमचं स्वागत आहे आमच्या घरट्यात. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. बोला, काय करू तुमच्यासाठी?' कावळ्याचं ते अगत्य पाहून चिमणी खूप ओशाळली. म्हणाली,
'तुला राग नाही आला माझा?'
का यावा?
मी माझ्यात विश्वात गुंग होते म्हणून?
छे छे! प्रत्येकाचं आपलं असं स्वतंत्र विश्व असतं.. जसं तुझं होतं. तुला त्यात माझी गरज कधीच नव्हती रादर माझी ती गरज होती म्हणून मी तुझ्या दाराशी आलो. पण नंतर मला माझी चूक कळली. माझी गरज भागवण्यासाठी तू तुझ्या विश्वातून बाहेर येउन मला साथ देणं किंवा तुझ्या विश्वात मला प्रवेश देणं या दोनीही गोष्टी 'अतिक्रमणा सारख्याच' घडल्या असत्या नाही का? आणि कुणाच्याही वस्तूवर, अधिकारावर, भावविश्वावर 'अतिक्रमण' करण चूकच नाही का? म्हणून मग मी स्वत:च वजा व्हायचं ठरवलं आणि निघालो एकटाच …. तुझ्या विश्वापासून दूर.
मला एकट करून? अरे, मला सवय झालीय आता तुझी.
चिमणाबाई, या जगात एकट कोणीच नसतं. जेव्हा आपण एकट आहोत असं वाटतं ना तेव्हा तो एकांतच असतो आपला सोबती जो दाखवत असतो आपल्याला वाट आयुष्यातल्या पुढच्या प्रवासाची . मलाही दाखवली त्याने आणि बघ ……. आज मी किती आनंदी आहे … माझ्या 'घरट्यात'… माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या 'माझ्या माणसांमध्ये'
चिमणी नि:शब्द होऊन तिथून निघाली तेव्हा कावळा तिला एवढंच म्हणाला -
चिमणाबाई, माझ्या घरट्यात तू केव्हाही येऊ शकतेस हो. तुझी टकटक ऐकून मी लगेच दार उघडेल … क्षणाचाही विलंब न करता.
चिमणीचे डोळे पाणावले... भरल्या कंठाने निरोप घेऊन तिने परतीची झेप घेतली आपल्या घरट्याकडे... पण आज तिच्या पंखात पूर्वीइतक बळ राहिलं नव्हतं....
मी सुन्न ! इतक्यात जेडींचा आवाज आला ……
-बाईसाहेब गोष्ट संपली.
जे डी मला संदर्भ सांगा.
मला वाटलंच की तू आता संदर्भ विचारणार... ऐक …. आपल्या सगळ्यांचीच अवस्था ना थोड्याफार प्रमाणात त्या चिमणाबाई सारखी झालीय.
म्हणजे ?
म्हणजे कुणीतरी आपलं माणूस आर्तपणे आपल्याला साद घालतंय हे आपल्या गावीच नसतं अगं. ह्या आपल्या माणसांमध्ये भाऊ, बहिण, मित्र, आई, वडील बऱ्याचदा पोटची मुलंही असू शकतात... त्यांची आर्त साद आपल्याला ऐकूच येत नाही …. म्हणजे ते पोटतिडकीने साद घालतात आणि आपण म्हणतो …'थांब मला जर करिअर करुदे.... थांब जरा मला आता घर घ्यायचय... थांब जरा मला आता कार घ्यायचीय … थांब जरा मला आता ….' आणि मग ही जंत्री वाढतच जाते.
त्यांची सहन शक्ती संपते … ते त्यांचं वेगळं विश्व तयार करतात... त्या विश्वात आपल्याला स्थान नसतं... आपल्या ते गावीही नसतं आणि जेव्हा येतं तेव्हा …. आपण फार एकटे झालेले असतो.... !!
आणि असं होऊ नये असं वाटत असेल तर?
वेळीच 'टकटक ' ऐकायला शिका-
जे डी, यु आर रिअली ग्रेट यार-
जेडींचा फोन बंद झाला. घरातही सगळे झोपलेले होते. रात्रीच्या निरव शांततेत फक्त घड्याळाची 'टिकटिक' तेवढी ऐकू येत होती... ती 'टिकटिक' जनु जाणीव करून देत होती की कोणीतरी आहे 'आपलं' जे तिष्ठत उभं आहे दाराबाहेर …. दारावर 'टकटक' करत …. आपल्या एका सादेसाठी....!!
February 15, 2017
चिकुनगुनियाचा ताप हा डेंगीच्या तापाप्रमाणे असला तरीही त्याची मुदत मात्र काही महिन्यांची असते. दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात या तापाने अनेकांना जेरीस आणले. गर्भवती महिलांमध्येही या तापाची लागण होण्याची शक्यता असते. हा ताप बरा झाला तरी त्याचे दुष्परिणाम काही काळाने पुन्हा दिसू शकतात..
चिकुनगुनिया हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप (CHIKV) विषाणूंमुळे होतो. हा आजार जडला की दिवस आणि आठवडेच नव्हे तर काही महिन्यांपर्यंत तो रुग्णाची पाठ सोडत नाही. चिकनगुनियाची लक्षणे जरी डेंग्यूसारखी असली तरीही haemorragic fever ची अवस्था मात्र या रोगात जवळजवळ कधीच दिसत नाही.
लक्षणे:
ताप येणे, तोंड, पाठ, पोट येथे पुरळ उठणे ही चिकुनगुनियाची लक्षणे आहेत. या रोगाचा संसर्ग झाल्यास सांधे प्रचंड दुखतात. त्यामुळे रुग्णांना हालचाल करताना त्रास होतो, सांध्यांना सूज येते. रोग बरा झाला, तरी ही लक्षणे कमी होण्यास काही आठवडे लागतात. काही रुग्णांमध्ये दीर्घ संधिवाताची लक्षणे दिसतात. स्नायू, कंबर, डोके दुखण्याची लक्षणेही आढळून येतात. चिकुनगुनियाचा डास चावला की सुमारे १२ दिवस त्याची सर्वसाधारण लक्षणे दिसत नाहीत. मात्र, अनेकदा सांधेदुखी जाणवते. याचबरोबर पहिल्या १२ दिवसांत डोळ्यात लाली आणि प्रखर उजेडाकडे बघण्यास त्रास जाणवू शकतो.
हात-पायांवर रॅशेस येतात. मात्र, चिकनगुनियाचे निदान करण्याचा खात्रीदायक मार्ग म्हणजे रक्ताच्या नमुन्याची चाचणी. सर्वसाधारण तीव्र ताप आणि सांधेदुखी एकत्र आली की तात्काळ ही चाचणी करून घेण्यास सांगितली जाते. आरटी-पीसीआर नेस्टेड प्राईम ही रक्तचाचणी यासाठी घेतली जाते. यामध्ये या विषाणूमुळे रक्तातील काही घटकांचे विघटन होऊन त्याच्या गुठळ्या बनल्याचे आढळतात आणि चिकुनगुनियाचे निदान होते.
आजाराचे परिणाम
तरुण रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती अधिक असल्याने ५ ते ८ दिवसात हा आजार बरा होतो मध्यमवयीन रुग्णांमध्ये २-३ महिने या आजाराचा त्रास होऊ शकतो तर वृद्धत्वाकडे झुकलेल्यांना वर्षभर या आजाराच्या दुष्परिणामांना तोंड द्यावे लागते.
तातडीने रक्तनिदान करुन घेणे.
डॅाक्टरांनी दिलेल्या औषधांचा कोर्स पथ्यांसह पूर्ण करणे
आजाराची लागण पुन्हा होऊ नये म्हणून पहिली दोन वर्षे दर सहा महिन्यांनी रक्ततपासणी करणे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 6, 2017
मित्रांनो सध्या तापाची साथ जोरात सुरु आहे.
लहान बाळापासून वयस्कर माणसांपर्यंत सर्व जण तापाने आजारी आहेत व दवाखान्याच्या खेपा घालत आहेत.
दोन तीन दिवस औषध,injection, saline लावून देखील ताप कमी जास्त होत राहतो.मग तुमचा डॉक्टर रक्त तपासायला सांगतो,ज्यात प्लेटलेट कमी झाल्याचे समजते किंवा डेंगू ची टेस्ट positive येते.
ह्यावर हॉस्पिटल मध्ये ऍडमिट व्हायचा सल्ला मिळतो.
घाबरलेला पेशन्ट आणि धास्तावलेले कुटुंबीय त्याला ऍडमिट करतात. ट्रीटमेंट सुरु होते,सलाईन चा ,injections चा मारा सुरु होतो,रोज रोज रक्त तपासणी केली जाते .
पण दुर्दैवाने काहींच्या प्लेटलेट्स वाढण्याच्या ऐवजी उलट कमीच होताना दिसतात.
अश्या वेळी कोणीतरी सांगितलेले किंवा वाचलेले उपचार म्हणजे पपईच्या पानांचा रस,ड्रॅगन फ्रुट,किवी इत्यादी पेशन्टला देण्यात येतात मात्र विशेष फायदा होताना दिसत नाही.
सुदैवाने अश्या डेंगू तापासाठी किंवा कोणत्याही viral तापासाठी (म्हणजे चिकूनगुण्या,फ्लू इत्यादी) अगदी रामबाण औषध आहे
Eupatorium 200 (यूपाटोरीयम 200)
पेशन्टला डेंगू झाला असेल, ताप उतरत नसेल,प्लेटलेट खूप कमी झाले असतील,अंगदुखी फार असेल,डोके खूप दुखत असेल
तर अधिक वेळ न दवडता वरील औषध liquid मध्ये मागवा.
अर्धा लिटर पाणी चांगले उकळून घ्यावे मग थंड झाल्यावर एका प्लास्टिक च्या बाटलीत भरून घ्यावे
ह्या बाटलीत वरील औषधाचे फक्त 3 थेंब टाकावे आणि बाटली झाकण लावून जोरजोरात हलवावी आणि
2 - 2 झाकण औषध दिवसातून दर 3- 3 तासाने देत रहावे.
पेशन्टला 24 तासात फरक जाणवेल,आराम होईल आणि 48 तासात तो जवळजवळ बराच होईल.
तर तुमचा कोणी नातेवाईक आजारी असेल तर Eupatorium 200 हे औषध होमिओपथी च्या दुकानातून लगेच मागवा आणि सांगितल्याप्रमाणे सुरु करा.
डॉ प्रसाद हजारे,भिवंडी ठाणे
व्हाट्स अप 9881374994
October 24, 2016
मलेरिया हा प्लासमोडियम प्रजातीच्या परजीवीमुळे होणारा एक संसर्गजन्य आजार आहे. मलेरियाचा उल्लेख इजिप्तच्या फॉरोंमध्ये व चरक संहितेतही सापडतो. आधुनिक युगात सर रोनॉड रॉस या ब्रिटिश भारतीय सेनेच्या डॉक्टांनी मलेरिया डासांद्वारे पसरतो हे सिद्ध केले. व्हायव्याक्स, फॉलसिपॉरम, ओव्हेल व मलेरिए हे प्लासमोडियम प्रजातीचे चार मुख्य प्रकार आहेत. भारतात व्हायव्याक्स व फॉलसिपॉरम सर्वात अधिक प्रमाणात आढळून येतात.
April 24, 2023
ब्रह्मा-विष्णू-महेशाच्या या मूर्ती सुबक असून त्या एकाच कलाकाराने कोरलेल्या दिसून येतात.
June 30, 2025
१. ज्याचा डिपी स्थिर त्याचा स्वभाव शांत असतो.
२. वारंवार डीपी बदलणारे चंचल स्वभावाचे असतात.
३. छोटे स्टेटस ठेवणारे समाधानी वृत्तीचे असतात.
४. नेहमी स्टेटस बदलणारे हौशी असतात.
५. सतत काही न काही शेअर करणारे दिलदार मनाचे असतात.
६. कधीच कुणाला लाईक न करणारे गर्विष्ठ असतात.
७. प्रत्येक पोस्ट ला आवर्जून प्रतिक्रिया देणारे रसिक आणि दुसऱ्यांच्या विचारांचा आदर करणारे असतात.
८. इकडचे मेसेज तिकडे फिरवणारे राजकारणी असतात.
९. फोटो किंवा पोस्ट दिसताच ओपन करणारे अधीर स्वभावाचे असतात.
१०. जुन्याच पोस्ट परत परत टाकणारे धांदरट असतात.
११. दुसऱ्याच्या पोस्टकडे दुर्लक्ष करून स्वतःच्याच पोस्ट पुढे ढकलण्यात पटाईत असणाऱ्या व्यक्ती वर्चस्व गाजवणाऱ्या असतात.
१२. मेसेज वाचून प्रतिक्रिया न देणारे संकुचित वृत्तीचे असतात.
१३. कधीच काहीच शेअर न करणारे कंजूष असतात.
१४. मोठे मेसेज न वाचणारे आळशी असतात.
१५. वेगवेगळे वॉट्स अप ग्रुप बनवणारे महत्वाकांक्षी असतात.
१६. कामापुरते वॉट्सअप चालू ठेवणारे जीवनात यशस्वी होतात.
June 7, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti