वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
जेम्स बाँड नायक असलेले आजवर २४ चित्रपट प्रदर्शित झाले असून सर्वात नवा चित्रपट २०१५ सालचा स्पेक्टर हा होय. हे चित्रपट अत्यंत यशस्वी ठरले असून ते जेम्स बाँडच्या पात्राची स्टाईल, रूबाब तसेच चित्रपटांमधील संगीतासाठी ओळखले जातात.
भारताची अव्वल बॅडमिटनपटू साईना नेहवाल हिने ‘हाँगकाँग सुपर सिरीज’ स्पर्धा जिंकून मोठा पराक्रम केला. चीनच्या खेळाडूंवर विजय मिळवणे अशक्य असल्याचा समज खोटा ठरवताना तिने चीनच्याच शिझियान वँग या खेळाडूवर मात केली. या विजयाद्वारे तिने चिनी खेळाडूंच्या योजना अचूक ओळखून त्यावर आपली बिनतोड योजना अंमलात आणली. या स्पर्धेत तिने चिनी खेळाडूंचा ‘कोड क्रॅक’ केल्याचे बोलले जाते.
प्लास्टिकच्या अमर्याद वापरामुळे झालेल्या प्रदूषणाने भारतातील तमाम जनता त्रस्त झाली असतांना, काही प्रमाणात दिलासा देण्यासाठी सरकारने प्लास्टिकच्या वापरासंबधी काही नियम घालून दिलेत. परंतु या नियमातील त्रुटींचा आधार घेऊन गुटखा निर्मिती कंपन्यांनी पर्यावरणालाच धोका निर्माण केला.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत लावणीला अढळ स्थान आहे. लावणी गाता येणार नाही, लावणी नाच करता येणार नाही पण लावणीच्या गाण्यावर लावण्यवती नाचतांना पाहतांना मात्र भान हरपते.
आपल्याकडे कुंकवाने दारावर, भिंतीवर लाल स्वस्तिक काढायची पद्धत आहे. मात्र स्वस्तिके वापरून आरोग्य सुधारता येते याबद्दल कोणतीही माहिती शास्त्रीय ग्रंथात उपलब्ध झाली नाही. मी एका लेखात वाचले की स्वस्तिकात खूप पॉवर असते. त्यावरून कल्पना सुचून मी इंद्रधनुष्याच्या सात रंगाची स्वस्तिके तयार केली. आणि असे लक्षात आले की, रंग किरण चिकित्सा आणि रंगीत स्वस्तिकाचे गुण साधारणतः सारखे आहेत.
ठराविक आकाराचे व रंगाचे स्वस्तिक शरीरावर योग्य ठिकाणी लावल्यास आरोग्य सुधारते असे अनुभव आले. लाल स्वस्तिक छातीवर ठेवले असता कफ कमी होतो. थंडीच्या दिवसांत लाल स्वस्तिकावर बसले असता थंडी कमी वाजते. पिवळे स्वस्तिक माकाहाडला लावले असता संडासला साफ होते आणि वात कमी होतो. फिक्यानिळ्या रंगाचे स्वस्तिक बेंबीवर लावले असता अॅसिडीटी, पित्ताचा त्रास कमी होतो. गर्द निळे स्वस्तिक बेंबीवर लावले असता पचन शक्ती वाढते. हिरवे स्वस्तिक उन्हाळ्यात टोपीमध्ये ठेवले असता उन्हाचा त्रास कमी होतो. अशा प्रकारे अभ्यास करवून घेऊन "आरोग्यदायी सप्तरंगी स्वस्तिके" असे पुस्तक २००७ साली परमेश्वराने माझ्याकडून लिहून घेतले. ते वाचून अनेकांनी स्वतः स्वस्तिके तयार करून वापरली तर अनेकांनी माझ्याकडून स्वस्तिकाचे सेट नेऊन ती स्वस्तिके वापरली आणि त्यांना फायदा झाला.
स्वस्तिके शरीरातील सात चक्रांना किंवा अवयवांना आजाराप्रमाणे किमान दोन तास ते दिवसभर लावावीत. स्वस्तिकाची रंगीत बाजू शरीराला लागली पाहिजे.
स्वस्तिकाला जे अधिकचे चिन्ह आहे. त्याची लांबी विषम संख्येत असावी. म्हणजे एक इंच, तीन इंच, सात इंच इ. स्वस्तिकांच्या भुजांची रुंदी लांबीच्या १० ते १२ टक्के असावी. स्वस्तिकाचे रंग इंद्रदानुष्याच्या रंगाशी मिळते हवेत. सध्या बाजारात उपलब्ध व्हायोलेट रंगात तांबडा रंग कमी आहे.तो जांभळा हवा. स्वस्तिक हे कागदावर (शक्यतो पांढरा), सफेद कापडावर, थार्मोकोलवर, पांढर्या प्लास्टिक शीटवर काढले तरी चालते. स्वस्तिक निट आखून घेऊन काढणे चांगले. यासाठी वाॅटर कलर, ऑईल पेंट, बाटिक पेंट, छपाई चे रंग व कोणत्याही प्रकारचे रंग चालतात. माझेकडे कार्ड पेपरवर छापून व लॅमिनेट करून घेतलेली स्वस्तिके तयार आहेत व ती चांगली उपयोगी पडत आहेत.
स्वस्तिक तयार करणे
स्वस्तिकाची लांबी व रुंदी पाच इंच पाहिजे. रेषांची जाडी अर्धा इंच. पांढरे कागदावर स्वस्तिक वाँटर कलरने काढून पुठ्याला चिकटवावे. नंतर प्लँस्टिकच्या पिशवी ठेवून वापरावे.लाल स्वस्तिक कुंकवात पाणी व थोडा डिंक किंवा फेवीकाँल घालून काढावे . तसेच पिवळे हळद वापरून काढावे.नंतर पुठ्यावर चिकटवून प्लँस्टिकच्या पिशवीत ठेवून वापरावे
अरविंद जोशी B.Sc.
९४२१९४८८९४
लग्न ही प्रत्येकाच्याच आयुष्यातील महत्त्वपूर्ण घटना असते. लग्न कशासाठी, याची समज येण्यासाठी आणि त्याचं अवलंबन करण्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता असते. विचारस्वातंत्र्य हवं आणि तरी विश्वास हवा. या दोन गोष्टींमधून प्रेम जन्म घेतं.
दर वर्षी फेब्रुवारी महिन्यातील दुसऱ्या रविवारी जागतिक लग्न दिवस साजरा केला जातो.
संकलन. संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करण्यासाठी जोरदार मोहिम न राबवल्यास अमेरिका आपले भूदल पाकिस्तानमध्ये आणेल हा अमेरिकेचा इशारा, काश्मिरमध्ये सार्वमत घेण्याची पाकिस्तानने युनोत केलेली मागणी आणि जनरल मुशर्रफ यांची नव्या पक्षाची घोषणा या घडामोडींमुळे पाकिस्तानमधील प्रश्नांचा गुंता सुटण्याऐवजी वाढण्याचीच चिन्हे आहेत. अशा स्थितीत भारताने आपल्या भूमिकेवर ठाम रहाणे अधिक महत्त्वाचे आहे.
रोजच्या जेवणात असलेल्या तिखट पदार्थात सर्वांना आवडणारा एक चटपटीत आंबट तिखट पदार्थ म्हणजे चटणी.
ही चटणी बहुगुणी औषध आहे. जिरे, मिरी, मिरची, हिंग, कढीपत्ता, चिंच, पुदीना, कोथींबीर या पैकी कोणत्या तरी पदार्थाने नटलेली सजलेली, रंगीबेरंगी चटणी रोजच्या जेवणात असावी. सुकी किंवा ओली कशीही असली तरी चविष्ट लागते. म्हणजे इष्ट चवीची !
डाव्या हाताला असणारी चटणी मधे मधे खाल्ली की उजव्या बाजूच्या इतर पदार्थांची रूची पण आपोआपच वाढत असते.
लसूण, शेंगदाणे, तीळ, नारळ, जवस, कारळे, कांदा यापैकी ( म्हणजे आठवड्यातून दरदिवशी एक कोणत्याही वेगळ्या प्रकारची चटणी केली तरी) त्यातील मुख्य पदार्थ हा एक प्रकारची तेलबी असते.
या बिया आणि इतर वेगवेगळे मसाले कुटले कि त्यातील तेल बाहेर येते. त्यात मीठ घालून ढवळले की, चटणी तयार. यात कुटण्याची पद्धत महत्वाची.
मिक्सरमधून बारीक वाटून होते, पण कुटण्याचा संस्कार होत नाही. संस्कार बदलला कि परिणाम बदलतात, चवही बदलते.
मिक्सर आणि पाटा वरवंटा वापरून केलेल्या चटणी किंवा वाटपामधे फरक पडतोच ना ! मिक्सरमध्ये ब्लेडच्या सहाय्याने बारीक बारीक तुकडे पाडणे आणि वरवंट्याचा घाव घालून पाट्यावर रगडणे या दोन्ही कृतीतून तेलबीयांमधले तेल बाहेर पडल्यामुळे चवीतही फरक पडतो. म्हणून संस्कार महत्वाचा !
चटणीला चव येण्यासाठी वापरला जाणारा मसाला कच्च्या स्वरूपातच वापरला जातो. हे उघड सत्य आहे.
हे फक्त लक्षात आणून देतो की, चटणीमधले तेल आणि मसाले कच्च्या स्वरूपात वापरले जातात, तर भाज्या या सुसंस्कारीत करून खाल्ल्या जातात. भाज्या कच्च्या नाहीत, मसाले भाजून नाहीत, तर ते जास्त औषधी.
मसाला टिकवण्यासाठी किंवा नीट कुटला जावा, यासाठी तो भाजला जातो. तो परत परत भाजला तर त्यातला दळ, वास, तेल, आणि औषध निघून जाते. पूड होण्यासाठी किंचित गरम करणे इथपर्यंत ठीक आहे, पण खमंग वास आणि परत तेल सुटेपर्यंत भाजणे, म्हणजे त्यातील अंगभूत औषध उडवून लावल्यासारखं आहे. हे निमंत्रित केलेल्या पाहुण्याला, घराच्या दारात आल्यावर, आम्ही आता शिनिमाला जातुय, *तू आता परत जा, असे सांगण्यासारखेच झाले.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
12.11.2016
अनाद्यंतमाद्यं परं तत्त्वमर्थं
चिदाकारमेकं तुरीयं त्वमेयम् |
हरिब्रह्ममृग्यं परब्रह्मरूपं
मनोवागतीतं महःशैवमीडे ‖ २ ‖
कैलासनाथ भगवान शंकरांच्या या नितांत रमणीय स्तोत्रात त्यांच्या दिव्य स्वरूपाचे वर्णन करताना भगवान शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
अनाद्यंतम्- जे अनादि तत्त्व आहे. जे अनंत आहे. अर्थात ना ज्यांना आदी आहे ना अंत आहे. जे आहेतच आहेत. परम सनातन शाश्वत आहेत.
आद्यं - जे अनंत कोटी ब्रह्मांडाचे प्रथम तत्व आहेत. आदि तत्व आहेत.
परं तत्त्वम् - जे सर्वश्रेष्ठ तत्त्व आहे. अंतिम सत्ता आहेत.
अर्थं- जे खऱ्या अर्थाने प्राप्त करावी अशा प्रकारचे तत्व आहे. मिळवण्याचे अंतिम स्थान आहे. जीवाने शरण जाण्याचे परमश्रेष्ठ स्थान आहेत.
चिदाकारम्- ज्यांचे स्वरूप म्हणजेच काही चैतन्याचे प्रगटीकरण आहे. निर्गुण निराकार चैतन्याचा सगुण साकार अविष्कार आहेत.
एकं - ज्यांच्या समान अन्य कोणीही नाही. एकमेवाद्वितीय. अतुलनीय.
तुरीयं - तीन गुणांच्या अतीत असणारी चौथी समाधी अवस्था असणारे. सदैव त्याच अवस्थेत स्थिर असणारे.
त्वमेयम् -मेय म्हणजे मोजमाप. अमेय म्हणजे याचे मोजमाप करताच येत नाही असे. अपरंपार. अमर्याद.
हरिब्रह्ममृग्यं- हरी म्हणजे भगवान विष्णू आणि ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेव यांच्याद्वारे मृग्य म्हणजे त्यांच्या स्वरूपाचा शोध घेतला जातो असे.
पुराणकथेनुसार ज्यावेळी भगवान शंकर ज्योतिर्लिंग स्वरूपात प्रगट होतात त्यावेळी भगवान विष्णू कासवरूपात खाली तर भगवान ब्रह्मदेव हंसरूपात वर त्यांचा शोध घेतात. पण त्या दोघांनाही यांच्या स्वरूपाचा अंतपार लागत नाही.
परब्रह्मरूपं- परब्रह्मस्वरूप असणारे.
मनोवागतीतं- मन आणि वाइनच्या आतीत असणाऱ्या, महःशैवमीडे - भगवान शंकराची मी स्तुती करतो.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
Copyright © 2025 | Marathisrushti