(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • बाळक्रीडा अभंग क्र.१

    संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.

      August 12, 2018


  • असेन मी, नसेन मी !

    आज एके ठिकाणी भूपेंद्र आणि सुवर्णा माटेगांवकरांचे गीत दिसले म्हणून ऐकले- ” बिती ना बिताई रैना “. गुलज़ार /पंचम जोडी, जया /संजीव दुसरी जोडी आणि लता/भूपेंद्र ही तिसरी जोडी. यांपैकी नक्की कोणत्या जोडीने हे गीत अजरामर केलंय, मला १९७० पासून आजतागायत ठरविता आलं नाहीए. यापैकी एक जोडी पडद्यावर दिसली, एक कागदावर आणि वाद्यांमध्ये भेटली तथा तिसरी सरळ आतमध्ये घुसली.

      July 2, 2022


  • माझी मैना गावावर राहिली !

    महाराष्ट्र आणि म्हैसूर (म्हणजे आताचे कर्नाटक) यामधील न सुटलेला सीमाप्रश्न अजूनही कायम आहे. शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी याच मराठी माणसाच्या दुख-या शिरेवर बोट ठेवून ” माझी मैना गावावर राहिली हे अजरामर गीत लिहिले होते .जोपर्यंत बेळगाव कारवर निपाणी आणि उंबरगाव महाराष्ट्रात सामील होत नाही तो पर्यंत शाहिरांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही ..

      February 13, 2019


  • आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग तेरा

    परत परत त्याच शंका विचारल्या जात आहेत, याचा अर्थ मला नेमकेपणाने काय म्हणायचं आहे ते नीट समजले नसावे. एकतर मला नीट सांगता येत नसावे, किंवा वाचणाऱ्याने समजून घेण्याचा प्रयत्न केला नसावा. असो. पुनः एकदा सांगतो. कोणतेही, कोणाचेही गैरसमज नसावेत

      February 23, 2017


  • अजिंक्य रहाणे : क्रिकेटमधील सद्गृहस्थ

    अजिंक्य रहाणे : क्रिकेटमधील सद्गृहस्थ

    असा हा उत्कृष्ट क्रिकेटपटू अजिंक्य मनाला भावतो ते, एक व्यक्ती म्हणून त्याने वेळोवळी दाखवलेल्या सुजाणपणाने आणि परिपक्वतेमुळे. एवढे कर्तृत्व दाखवूनही त्याने कधी डोक्यात हवा जाऊ दिली नाही. साध्या, शांत स्वभावामुळे अजिंक्य आपल्या आसपासचा एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबातला एक गुणी, सुसंस्कृत मुलगाच वाटतो.

      April 20, 2024


  • पीसीओडी, स्त्रीत्व आणि भारतीयत्व

    स्त्रीत्व डोक्यावर घेतलेल्या पदरावर आणि हातभर बाह्या आणि कपाळभर कुंकवावर सुद्धा अवलंबून आहे. हेच स्त्रीत्व आहे, असं कुठं म्हटलंय ?

    स्त्रीचा पोशाखावरून ती सुसंस्कृत आहे की नाही कसं ओळखणार ? हे खूपच लांबच सांगितलय,
    बाह्य गोष्टीमधून लक्षात येणारं स्त्रीत्व हे लक्षात येईनासं झालंय. आणि हेच पीसीओडीचं कारण आहे, हे मला सुचवायचं होतं. कसं ते आता सविस्तर पाहू.

    भारतीय आचार विचार आणि पीसीओडी हा विषय आणि आयडीयल वूमनहूड हे दोन स्वतंत्र विषय आहेत.

    पाॅलीसिस्टीक ओव्हेरीयन डिसीज असं नाव धारण करणाऱ्या रोगाचे मूळ स्त्रीत्व नष्ट होत जाण्यामधे आहे. दरमहा जे डिंब तयार होऊन बाहेर पडते, ते बाहेर न पडता, बीजांडामधेच रहाते, म्हणजे पीसीओडी असं वरवर भासते. त्याचे मूळ कारण मात्र बदलत चाललेल्या जीवनशैलीमधे आहेत. त्याच्या काही कारणांचा अभ्यास केला तर, सुखाचा अतिरेक, कफ वाढविणारा आहार, बैठे काम, वाकण्याची सर्व कामे बंद होणे, जेवणाच्या अनियमित वेळा, आणि मुख्य म्हणजे आपण स्त्री आहोत हेच विसरून जाणे.अशी सर्वसाधारण कारणे लक्षात येतात.

    याची लक्षणे कोणती ?
    दरमहा मासिक पाळी न येणे, जाडी वाढणे, घाम खूप येणे, दाढी मिश्यांच्या ठिकाणी केस येणे, आवाज घोगरा होत जाणे, प्रवृत्ती पुरूषी होत जाणे, स्त्रीयांचे वैशिष्ट्य मानलेल्या, स्त्रीयांच्या मुलभुत गुणात असलेला नाजूकपणा कमी होत जाणे, बोलण्या चालण्यात, हावभावात पुरूषांप्रमाणे आक्रमकपणा येणे, ही सर्व पीसीओडीची लक्षणे आहेत.

    यावरून काय लक्षात येते ?
    स्त्रीत्व संपत जाणे, म्हणजेच पीसीओडी.

    रोग होण्याची तीन प्रमुख कारणे सांगितलेली आहेत. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक. हे आधी लक्षात ठेवले पाहिजे.

    दरमहा येणारी मासिक पाळी ही जिला कटकट वाटते, तिला पीसीओडी हा आजार लवकर होतो, भरीत भर म्हणून ती दरमहा येणाऱ्या रजःस्रावाला " प्राॅब्लेम " असे संबोधते. याचा अर्थ कटकट. दरमहा रजःप्रवृत्ती यायलाच हवी अशी भावना तयार झाल्याशिवाय मन, इंद्रिये, विषय, शरीर, अभिव्यक्ती ही साखळी पूर्ण होतच नाही. जर ती "कटकट" या अर्थी डोक्यात गेली असेल तर तिची अभिव्यक्ती कशी होणार ? आणि का व्हावी ?

    मुळात हा आजार भारतीय नाही, तर पाश्चात्य विचारसरणीची देणगी आहे, असे मी म्हटले तर माझे काय चुकले ?

    भारतीय असा शब्द वापरण्याचे कारण म्हणजे हा आजार भगिनींना केव्हापासून सुरू झाला तर जेव्हा नैसर्गिक मासिक चक्राचा विचार पाश्चात्य पद्धतीने होऊ लागला, तेव्हापासून ना !

    भारतीय विचारानुसार याला 'मासिक धर्म' असे संबोधले आहे. केवळ भारतीय धर्मशास्त्रातच नव्हे तर आयुर्वेदात देखील यावेळी शरीरातील टाकावू द्रव्ये बाहेर टाकली जातात. जो आर्तव गर्भधारणा न झाल्याने रज स्वरूप बनला आहे, त्याला शरीरातून बाहेर टाकणे ही अत्यंत नैसर्गिक प्रक्रिया आहे. केवळ गर्भाशयातूनच नव्हे तर घामातूनही ही शुद्धी होत असते. तिचा स्पर्श, घाम, श्वास इ. मधून मलाचे निष्क्रमण होत असते, म्हणून तिने अन्नपदार्थांना स्पर्शू नये असे सांगितले आहे. एवढेच नव्हे तर अशोकासारख्या औषधी झाडांना देखील तिने त्या चार दिवसात स्पर्शही करू नये. असे सांगितलेले आहे. हे काही स्त्रीला कमी लेखण्यासाठी नव्हे तर तिला सक्तीची विश्रांती देण्यासाठी होते, हे लक्षातच घेतले जात नाहीये.
    यावेळी तिची शारीरिक आणि मानसिक अवस्था अत्यंत कोमल असते. तिला विश्रांतीची अत्यंत गरज असते. म्हणून तिला "अस्पर्शा" (अस्पृश्य नाही.) सांगितले आहे. हा तिचा सन्मानच आहे. अन्य कोणत्याही देशात अशी विश्रांती स्त्रीला या चार दिवसात देण्यात येत नाही. हा आहे स्त्रीयांकडे आणि तीच्या दरमहा होणाऱ्या शुद्धीकडे पाहाण्याचा शुद्ध भारतीय दृष्टीकोन.
    यात काय विकृत मानसिकता दिसते कळतच नाही ?

    पाश्चात्य बुद्धीच्या विचारवंतांनी जेव्हा स्त्री पुरूष समानतेचे खुळ डोक्यात भरवले, तेव्हापासून मासिक पाळीकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलला आणि तिटकारा सुरू झाला.
    स्त्रीयांनी घराबाहेर पडूच नये, वगैरे वादात मी जातच नाहीये.
    स्त्री पुरूष कर्तृत्वाने समानच आहेत, यात कोणालाही शंका नाही.

    माझ्यावर स्त्रीत्व लादून, त्या पुरूष देवानेही अन्यायच केला आहे, ( इथे सोयीस्कररीत्या देव आठवतात. एरवी देव म्हणजे अंधश्रद्धा किंवा भोंदुगिरी वाटते, काहीजणांना.) असे म्हणून कसे चालेल ? स्त्रीला पुनर्निर्माण यंत्रणा म्हणजे अख्खं मातृत्व बहाल केलंय, सहनशक्ती दिलीय, हे मातृत्वच धोक्यात येतंय हे लक्षात आणून देण्याचा मी प्रयत्न करतोय. बाकी काही नाही.

    पाश्चात्य विचार हा भोगवादी आहे.
    पैसे मिळवण्यासाठी स्त्री शरीराचा वापर कोणी सुरू केला ? दाढीच्या जाहिराती मधेदेखील सुंदर ललना दिसू लागल्या. इथे त्यांना सोयीस्कररीत्या स्त्री पुरूष समानता हवी. फक्त नवऱ्याने मिळवलेल्या मिळकतीवर हौस मौज करता येणार नाही, त्यासाठी घरात येणारा पैसा वाढला पाहिजे. पैसे जास्ती मिळतील, तर आणखीन चार सुखाच्या गोष्टीची खरेदी करता येईल, म्हणून घरातील (लक्ष्मी स्वरूप मानलेल्या ) स्त्रीयांनी दुसऱ्यांच्या दारात जाऊन चाकरी करून मिंधेपणा स्विकारण्यात धन्यता मानली. ???
    ही काय भारतीय मानसिकता आहे ?

    त्याही पुढे जाऊन त्या विशिष्ट दिवसात, हव्या तश्या उड्या मारायच्या, हवे तसे डोंगर चढायचे, सायकली चालवायच्या, टेनिस, बॅडमिंटन, खेळायचे, अशा जाहिरातीतून दाखवली जाणारी स्त्री चालते ? आरोग्याचा विचार करून पहा, हा त्या दिवसात स्त्रीयांवर होत असलेला अत्याचार नाही का ?
    हा काय भारतीय विचार आहे ?

    स्त्रीत्वाचा पराकोटीचा तिटकारा जेव्हा मनात घर करतो, तेव्हा मनामधे दोष उत्पन्न होतो. वाताचा प्रकोप होतो आणि अवरोध निर्माण होतो.

    आयुर्वेदीय भाषेत पीसीओडीची संप्राप्ती वर्णन करायची झाल्यास, चुकीच्या जीवनशैलीमुळे तीनही दोष बिघडतात. कफ आणि वात वाढतो आणि पित्त कमी होते. विकृत कफ दोषामुळे, आम निर्माण आणि अग्निदुष्टी, पित्त क्षय, निरंतर हेतु सेवनाने अपान वायुची दुष्टी, आणि बदललेली मानसिकता यामुळे आणि व्याधी स्वभावामुळे दोष गर्भाशयात संचित होतात. बीजांडामध्ये स्थानसंश्रय करतात. अवरोध निर्माण होतो. अवरोधाने पुनः वातप्रकोप होतो.
    या अवरोधामुळे तयार बीज पुढे सरकतच नाही.

    एका बाजूने हेतु सेवन सुरू राहिले तर केलेल्या पंचकर्माचा आणि इतर शमन शोधनाचा तसा काहीही परिणाम होत नाही. आणि व्याधी दुष्चिकित्स्य बनतो. झाला तरी तात्पुरता होतो, पुनः ये रे माझ्या मागल्या !

    चिकित्सा करताना "हेतुसेवन बंद करणे" ही पहिली लाईन ऑफ ट्रीटमेंट रहाते. या व्याधीतील वर वर्णन केलेल्या अनेक हेतुंमधील एक हेतु, जो मला जास्ती महत्त्वाचा वाटतो तो आहे, विचार बदलवणे.!
    "मला दरमहा मासिक पाळी आलीच पाहिजे. त्याने माझी शरीर शुद्धी होत आहे. जे माझ्या स्त्रीत्वाचे वैशिष्ट्य आहे, ते स्त्रीत्व मी जागृत करीत आहे" असा सकारात्मक विचार अंतर्मनात पक्का झाल्याशिवाय, बाहेरून केवळ हार्मोन्स बदलवणारी औषधे घेत रहाणे, हा वरवरचा तात्पुरता उपाय आहे. त्यात मेटफाॅरमिन सारखी मधुमेहावरील औषधे कायम स्वरूपात घेणे, हे किती धोकादायक आहे ? आहे का मान्य हे ?
    रोगाच्या मुळापर्यंत जाऊन विचार केला तर कळेल, स्त्रीत्व जागृत करणं किती महत्त्वाचे आहे ते !
    स्त्रीत्व जागृत करण्यासाठीच, हातात काचेच्या बांगड्या घालणं, पायात वाजणारे पैंजण घालणे आणि डोक्याला ठसठशीत कुंकु लावणे असा उपाय मी चिकित्सा स्वरूप सुचवतो, यापेक्षा काही ( रूग्णाच्या भाषेत जालीम ) उपाय असल्यास जरूर सांगावा. नक्कीच उपयोगी होईल.

    कुंकु लावल्याने काय एनर्जी मिळते हे अनुभवल्याशिवाय कळणार नाही. हे फक्त स्त्रीयांनीच लावायचे असं नाही, स्त्री पुरूष दोघांनीही लावायचे आहे. आमचे विचारच पाश्चात्य होत असल्यामुळे आम्हाला त्याचे महत्त्वच कळेनासे झाले आहे.

    हातात काचेच्या बांगड्या घालण्यात कमीपणा कसला ? पण नाजुकपणा नक्कीच येईल. काम करताना, थोडं सांभाळून काम करावं लागेल, बांगडी फुटुन हाताला लागण्याचा धोका असल्यामुळे रागावर संयम येईल, मनावर संयम येईल. मग पुरूषांनी पण हातात बांगड्या का घालू नयेत असाही प्रश्न येईल. पण एक लक्षात ठेवूया. पुरूषी हात नाजुक कामासाठी नाहीतच. ते राकट आहेत.

    पायात वाजणारे पैंजण घातल्याने पण तेच होईल, पाय हलला तरी त्यात नाजुकपणा असेल, माझी चाल स्त्रीचीच असली पाहिजे अशी भावना सतत मनात जागृत रहायला हवी, हे महत्त्वाचे !
    पुनः एकदा सांगतो, इथे कुठेही स्त्रीला कमी लेखण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तिला तर माता, लक्ष्मी, शक्ती रूपात आपण पहातोय !

    पण आज आम्ही कशाही वागू, स्वच्छंद जगू, पुरूषी दास्य आम्ही मानत नाही, आम्ही कसेही कपडे घालू, पुरूषांनी आपली दृष्टी बदलणे गरजेचे आणि आवश्यक आहे, हा जो सूर स्त्री मुक्तीवाल्यांचा दिसतो, तो भारतीय नाही.

    मुळात स्त्रीला एका रथाची दोन चाके मानणारी आपली संस्कृती, रमन्ते तत्र देवता हे मानाचे सर्वोच्च पद बहाल करणारी आपली संस्कृती,
    कुमारी अवस्थेपासून, तारूण्य आणि वृद्धावस्थेपर्यंत पुरूषांनीच तिचे रक्षण केले पाहिजे असे ( खरंतर पुरूषांवर अधिक जबाबदारी ) सांगणारी आपली संस्कृती.
    तिचा अनादर होईल असा विचारही आपण कधी करत नाही. स्त्रीकडे वासनामय दृष्टीने पहावे, असं कोणत्या भारतीय धर्म ग्रंथात लिहिलंय सांगा बरं. अगदी मनुस्मृतीमधे देखील स्त्रीयांकडे बघण्याचा दृष्टीकोन अत्यंत पवित्र आहे. (जी मंडळी मनुस्मृतीवर टीका करतात, त्यांनी ती मुळातून वाचलेलीच नसते. कोणत्या तरी श्लोकांची तोडफोड करून आपल्याला हवे असतील तसे सोयीस्कर अर्थ काढून विकृतरीत्या सांगितले गेल्यामुळे आम्हाला आमच्याच ग्रंथाचे मूळ अर्थ समजलेले नाहीत.
    मनुस्मृतीचा पूर्वग्रहदूषित न ठेवता अभ्यास करायचा असेल तर स्वामी वरदानंद भारती, ( पूर्वाश्रमीचे वैद्य अनंत दामोदर आठवले ) यांनी मनुस्मृतीवर लिहिलेली टीका, जी राधादामोदर प्रतिष्ठानने प्रकाशित केलेली आहे, ती जरूर वाचावी.)

    कुंकु, बांगड्या, पैंजण हे सर्व केल्याने काय होईल ?
    आपण भारतीय पद्धतीने विचार करायला सुरवात करू.

    आरशात पाहिले तरी, हात हलला तरी, पाय हलवला तरी लगेच लक्षात येईल, की मी स्त्री आहे, मासिक पाळी नियमितपणे होण्यासाठी मला चिकित्सा म्हणून हा उपाय सांगितला आहे. ही मानसिकता जेव्हा लक्षात येईल तेव्हाच कायमस्वरूपी रोग जाईल. रोगाच्या या मानसिक हेतुकडे दुर्लक्ष करून कसे चालेल बरे ?

    भारतीयत्वापासून आपण लांब गेल्याने, असे गैरसमज वाढत चालले आहेत, या महिलादिनाच्या निमित्ताने ही माहिती आपल्यापर्यंत पोचवता आली.

    ज्यांना समजून घ्यायचं आहे, त्यांनी घ्यावं, सोडून द्यायचंय त्यांनी सोडून द्यावं.

    जय नारी शक्ती !
    जय भारतीय विचार !!
    जय आयुर्वेद !!!

    वैद्य सुविनय दामले, कुडाळ सिंधुदुर्ग.

      March 9, 2017


  • मुंबईतील तारापोरवाला मत्स्यालयाचा वर्धापन दिन

    २७ मे १९५१ रोजी मुंबईतील तारापोरवाला मत्स्यालयाचे राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते उदघाटन झाले होते. सर्व बाजूने सागराने वेढलेल्या मुंबईला सागरी मत्स्यसंशोधन केंद्र असावे अशी संकल्पना प्रथम १९२३ साली बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेचे कार्यवाहक श्री.मिलार्ड यांनी शासनापुढे मांडली. याचा अभ्यास करण्यासाठी शासनाने मत्स्यव्यवसाय संचालक यांच्या नेतृत्वाखाली १९२६ साली तज्ञसमिती नेमली. दुसऱ्या महायुध्दानंतर मत्स्यालय उभारणीला चालना मिळाली.

    मुंबईतलं अतिशय जुनं आणि प्रसिद्ध पर्यटनस्थळाचं अगदी सुरुवातीला म्हणजे २७ मे १९५१ रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या मत्सालयाच्या बांधकामासाठी डी. बी. तारापोरवाला या निसर्गप्रेमी दाम्पत्याने दोन लाख रुपये देणगी दिली होती. केवळ निसर्ग प्रेमी श्री. डी. बी. तारापोरवाला यांनी १९४५ साली दिलेले दोन लाखाच्या रुपयांच्या देणगीमुळे आणि शासनाने दिलेल्या समुद्र तटावरील मोठ्या भूखंडामुळे तारापोरवाला मत्स्यालय उभारणे शक्य झाले. त्यावेळी हे मत्सालय उभारायला ८,९०,९०४ रुपये इतका खर्च आला होता.

    तारापोरवाला मत्स्यालयाचे एकूण क्षेत्रफळ ४३६९ चौरस मीटर असून त्यापैकी १३६९ चौरस मीटरवर मत्स्यालयाची विद्यमान इमारत उभी आहे. काळाची गरज ओळखून सुमारे २१ कोटी रुपये खर्चून त्याचं नूतनीकरण करण्यात आलं आहे. सिंगापूमधील जॉर्जिया मत्स्यालयाप्रमाणे तारापोरवाला मत्स्यालयही अंडरग्राऊंड करण्याचा विचार पुढे आला होता. पण, मरीन ड्राईव्हचा उथळ समुद्र या प्रकारच्या मत्स्यालयासाठी योग्य नसल्याने हा प्रस्ताव बारगळला. मग, आहे त्याच जागेत आधुनिक पद्धतीने मत्स्यालयाची उभारणी करण्याचा निर्णय झाला. १८० अंशांमध्ये खाऱ्या पाण्यातील मासे ठेवण्यात आले आहेत. ही काच ॲ‍क्रेलिकची असून, अशा प्रकारे मत्सालय असलेलं हे भारतातलं एकमेव मत्सालय असल्याचं तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे मत्सालयाच्या प्रवेशद्वारापाशीच लोकांची उत्कंठा शिगेला पोहोचते.

    प्रवेशद्वारापाशीच आपल्याला भव्य भुयारी मत्सालय ठेवण्यात आलं आहे. प्रवेशद्वाराच्या समोरच पांढऱ्या रंगांतलं माशाच्या आकारातलं कारंज पाहायला मिळतं. त्या कारंज्याच्या बाजूने मुख्य प्रदर्शनी हॉलमध्ये जाता येतं. दर्शनी भागात प्रवेशद्वाराजवळ ओशनेरियम सदृश्य पाण्याचा टँक उभारण्यात आल्यानं आपल्याला समुद्रातून चालत जात असल्याचा नि भोवताली मासे असल्याचा सही फिल मिळतो. आतल्या भागात जुन्या साध्या काचांऐवजी पारदर्शक फ्लेक्सी काचा बसवण्यात आल्यानं टँकमधले मासे नि जलजीव अगदी जवळून पाहता येतात. या मत्सालयात विविध प्रकारच्या माशांच्या सुमारे ४०० जाती ठेवण्यात आल्या आहेत. या मुख्य हॉलमध्ये खाऱ्या पाण्यातील आणि गोडया पाण्यातील मासे असे दोन मुख्य गट तयार करण्यात आले आहेत. खाऱ्या पाण्यात आढळणाऱ्या माशांच्या २०० तर गोडय़ा पाण्यात आढळणाऱ्या २०० जाती ठेवण्यात आल्या आहेत. खाऱ्या आणि गोडया पाण्याचे सतरा ते अठरा टँक आहेत. पैकी गोडया पाण्याचा विभाग हा मध्यभागी करण्यात आला आहे. खाऱ्या पाण्याचा विभाग सागरी कासवाचा टँक सुरू होतो. आणि त्याच्या बाजूला डॅम्सेल, बटरफ्लाय, एंजल, ट्रिगर, कावळा मासा, किळीस, वाम, स्क्विरल, पोम्पॅनो, ग्रुपर, टँग, कोंबडा, व्हिम्पल, मुरीश, सी ॲ‍निमल आदी प्रकारचे आणि त्यांच्या प्रजातींचे शोभिवंत माशांचे टँक पाहायला मिळतात.

    याचं आणखी एक आकर्षण म्हणजे या ठिकाणी जेली फिश नावाची नवीन टाकी मध्यभागी ठेवण्यात आली आहे. अगदी जेलीसारखा दिसणारा हा मासा अतिशय दुर्मीळ आणि छोटा असून तो पाहण्यासाठी आणि त्याला कॅमेऱ्यात टिपण्यासाठी लोकांची झुंबड उडते. मधल्या गोडया पाण्याच्या विभागातही देश-विदेशातील मासे पाहायला मिळतात.यातील विशेष आकर्षण म्हणजे लक्षद्वीप बेटामधून आणलेले सात प्रकारचे प्रवाळ व मासे. तसेच ‘स्टिंग रे’, ‘शार्क’ किवा ‘काळा मासा’, ‘कासवे’ असे डिस्कव्हरीवर पाहायला मिळणारे समुद्री जीव समोर पाहताना मनाला फार आनंद मिळतो. खरं म्हणजे प्रत्येकालाच प्रत्येक माशांची माहिती असेलचं असं नाही. म्हणून या टाक्यांच्या वर त्या माशांचं नाव, त्यांच्या प्रजातीविषयीची माहिती सांगणारे एलईडी टीव्ही प्रत्येक टाकीवर लावण्यात आले आहेत. एलईडी असल्यामुळे स्पष्ट वाचता येतं. मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये ही माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे बाहेर पडताना तुमच्या ज्ञानात भरच पडेल यात काही शंका नाही. मुंबईतलं जुनं आणि पर्यटकांच्या नेहमीच आकर्षणाचा विषय असलेलं हे मत्सालय भारतातील महत्त्वाचं पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जातं.

    अशा या समुद्री सफर घडवणाऱ्या मत्स्याल्याला भेट देण्याकरिता तुम्ही वेस्टर्न रेल्वेच्या चर्नी रोड स्थानकावरून चालत किंवा टॅक्सीने जाऊ शकता.(सध्या करोना मुळे बंद आहे.)

    वेळ:- मंगळवार ते शनिवार- सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत

    रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी- सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत.

      May 27, 2022


  • मेक इन इंडिया, स्थलांतर आणि भारतातील सरकारी कंपन्या !!!!

    ऐअर इंडिया डब घाईला आलेली आहेच पण त्याच बरोबर भारतातील सर्वात मोठी कंपनी भेल सुद्धा गेली ५ वर्षे सातत्यानी कमी नफ्यात चालत आहे .२०१२ साली या कंपनीचा निव्वळ नफा ७०३९ कोटी रुपये होता .तो दरवर्षी घसरत मार्च २०१५ मध्ये १४१९ कोटी रुपये इतका घसरला.सरकारी कंपन्यांची हि अवस्था का होत आहे याचे उत्तर खरे तर नव्या सरकारनी शोधायलाच हवे.एकेकाळी या दोन्ही कंपन्या ''उत्तम'' या सदरात मोडत होत्या.पण या कंपन्यांचे नफ्याचे प्रमाण लक्षणीय घसरण्याचे कारण काय ? सरकारी अनास्था आणि खासगी कंपन्यांचे भले करण्याची मागील सरकारची परंपरा पुढे चालत राहणार असेल तर संपूर्ण देशाचेच खासगीकरण होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे असेच म्हणावे लागेल.एकेकाळी या देशात ऐअर इंडिया हि कंपनी अत्यंत अभिमानाची कंपनी होती.सरकारनी हि कंपनी चालवायला घेतली आणि या कंपनीचा पद्धतशीर ऱ्हास सुरु झाला.ऐअर इंडिया कधीही बंद पडेल अशी परिस्थिती कोणी आणली ? सरकारी कंपन्यां वर संचालकांची नेमणूक कशी होते हे नव्याने सांगायला नको.

    ग्लासनोस्त आणि पेरेस्त्रोईका आणलेल्या रशिया मध्ये याच openness आणि restructuring चा परिणाम चांगला झाला हे सर्वांना माहित आहेच पण कुठलीही गोष्ट देशात लागू करताना लोकांच्या फायद्या पेक्षा संधी साधू लोकांचा फायदा आधीक होतो यासाठी राजकीय आत्मबल फार महत्वाचे आहे.मोदी सरकारने हे आत्मबल जनतेला दाखवून देणे गरजेचे आहे.नाहीतर भा ज पा चे नुकसान होईलच पण देशात न भूतो न भविष्यति इतका गोंधळ उडेल.

    विरोधी पक्षांचा वकूब चांगला नसेल तर त्यांना चागल्या कामात खीळ घालायला आवडते पण चागले काम करून दाखवता येत नाही हे वारंवार सिद्ध झाले आहे.मेक इन इंडिया करताना ग्रामीण भागापासून सुरवात करावी हि मागणी लावून धरली पाहिजे.

    ग्रामीण रोजगार , शेती, ग्रामीण भागातील infrastructure हे कमालीचे मागासलेले असताना मेक इन इंडिया मध्ये ग्रामीण भागाकडे खूप मोठा निधी वळवला पाहिजे स्थलांतर थाबले तर प्रश्न कमी होतात हे जागतिक सत्य आहे.ग्रामीण भागातून स्थलांतर थाबले नाही तर उद्या आकाशात जरी शहरे बांधली तरी लोकांचे प्रश्न सुटणार नाहीत .

    मेक इन इंडिया आणि स्मार्ट सिटी ची सुरवात ग्रामीण विकासा पासून करा अख्खा देश "स्मार्ट" बनेल .

    -- चिंतामणी कारखानीस

      January 24, 2016


  • बचतीचे थोतांड!

    सरकारला बचत करायची असेल किंवा वायफळ खर्चाला आवर घालायचा असेल तर केवळ आपल्या मंत्र्यांचा ‘क्लास’ बदलून चालणार नाही. सरकारने आता एवढ्यावरच थांबू नये. सरकारी तिजोरीतून खर्च होणाऱ्या प्रत्येक पैशाचा नेमक्या कारणासाठी योग्य विनियोग होतो की नाही याची दक्षता घेतली जावी, प्रसंगी त्यासाठी
    कठोर पावले उचलावी लागली तरी हरकत नाही.

      September 20, 2009


  • कोकणातील ‘गावपळण’ ! भाग २

    कोकणातील अनेक गावांमध्‍ये शेकडो वर्षांपासून चालत आलेली ‘गावपळणा’ची किंवा ‘देवपळणा’ची परंपरा आजही श्रद्धेने व आनंदी वातावरणात पाळली जाते. त्यामागे गावाचे सौख्य टिकवणे आणि गावक-यांनी गुण्यागोविंदाने एकत्र राहावे हा हेतू असावा.

      September 21, 2017