वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

सहा कोटी वर्षांपूर्वीच्या काळातले पेंग्विन हे आजच्या पेंग्विनपेक्षा खूपच वेगळे दिसत होते. त्या काळाल्या पेंग्विनचे पाय आणि चोची आताच्या पेंग्विनच्या तुलनेत खूपच लांब होत्या. तसंच त्यांचे पंखही सर्वसाधारण पक्ष्याच्या पंखासारखेच दिसत होते. उत्क्रांतीदरम्यान पेंग्विनच्या पिसांचा रंग लाल झाला. त्यानंतरच्या काळात हे पेंग्विन दोन पायांवर उभे राहू लागले. या पेंग्विनची उंची आजच्या सर्वांत मोठ्या पेंग्विनपेक्षाही अधिक होती.
September 10, 2022
प्रेमकथेमुळे भारतीय चित्रपट सृष्टीला कधीच मरण नाही. पूर्वीच्या चित्रपटातील प्रेमकथेला दर्दभरा साज होता. असंख्यांना भुरळ घालणार्या प्रेमकथांनी सामाजिक जीवनावर अधिपत्य गाजवायला सुरुवात केली आहे. आजच्या चित्रपटातील प्रेमकथा पाहून खर्या जीवनात त्यांना प्रत्यक्षात आणणे, एवढेच सामान्य ध्येय उराशी बाळगून जगतायेत आजचे तरुण.
January 11, 2019
फणस हा सदाहरित वृक्ष असून मूलस्थान भारतीय द्वीपकल्प आहे असे समजले जाते. त्याचे शास्त्रीय नाव Artocarpus heterophyllus (Family Moraceae) आहे. यास इंग्लिश मध्ये जॅकफ्रुट म्हणतात
September 17, 2021
एका अभियांत्रिकी महाविद्यालयाची बातमी दिसली आणि एक फोटोही. तसे हे महाविद्यालय जुने, अर्थात फार बिनीचेही नाही पण वाचनात मात्र आहे. वेगवेगळ्या स्वयंघोषित सर्वेक्षणांमध्ये (ज्याच्या कुबड्या उच्च शिक्षणक्षेत्रातील महाविद्यालयांना आजकाल अपरिहार्य झाल्या आहेत) ते अधून-मधून झळकत असते आणि त्याच्या बातम्या समाजमाध्यमांवर अपूर्वाईने टाकल्या जातात.
January 13, 2023
शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यामुळे शाळा नावारूपाला येते. अशीच एक नावाजलेली शाळा, बीड येथील चंपावती विद्यालय व तिचे मुख्याध्यापक मुकुंद घनश्याम कुलकर्णी यांची ही यशोगाथा. पूर्वी चांगल्या शाळा चांगल्या संस्कारामुळे ओळखल्या जायच्या. तेथून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यावर शिक्षकाची व शाळेची छाप असे. आताही शाळा चांगल्या निकालावरून ओळखल्या जातातच.
June 8, 2026
राक्षसांच्या या सर्व वरदाना नंतरही त्यांची शक्ती भगवान गणेशां समोर चालत नाही. या कथा भागातून पुराणकार आपल्याला सांगत आहेत की मोरया पंचमहाभूतांच्या, त्रिगुणाच्या, मन-वाणीच्या अतीत आहेत. पर्यायाने या बाह्य सुखाच्या दुःखाच्या अतीत आहेत. ते शाश्वत आनंद स्वरुप आहेत.आपल्यालाही तो चिरंतन आनंद मिळवायचा असेल तर त्यांची उपासना हाच मार्ग आहे. त्यासाठीचा सर्वाधिक सुंदर मार्ग आहे मुद्गल पुराण.
September 7, 2019
आज ११ ऑगस्ट ! परदेशात हा दिवस ‘राष्ट्रीय मुलगा व मुलगी दिन’ (National Son and Daughter Day) म्हणून साजरा केला जातो. आपण पाश्चात्य संस्कृतीचं खूप अनुकरण करतो. आज हा दिवस उद्या तो दिवस मग कधीतरी आजचा दिवसपण चांगला साजरा करू. इतर दिवसांप्रमाणे हा दिवससुद्धा तितकाच प्रसिद्ध करू.
August 11, 2020
गणपतीला कमळ प्रिय आहे म्हणून पूजेत कमळ वाहण्याची प्रथा आहे माझ्या अभ्यासात असे लक्षात आले की कमळ पित्तशामक व ह्रूद्य आहे म्हणजे हार्टला उपयोगी आहे. कमळामुळे क्षयातील ताप कमी होतो ,बायकांच्या रक्तप्रदरावर(जास्त दिवस ब्लिडींग होणे) कमळ उपयोगी आहे.हार्टवर कमळ जबरदस्त उपयोगी आहे.
१९८६सालची गोष्ट. श्री. चौबळ (वय७२)ह्मानी मला सांगितले की डॉक्टरानी सांगितले आहे की त्यांचे(चौबळाचे)हार्ट७५% काम करत नाही. फक्त२५%च काम करते आहे मी त्यांना जमेल तेव्हा ताजी कमळे खायला दिली. नंतर कमळे सुकवूनकेलेल्या गोळ्या दिल्या. चार महिन्यानी एक दिवस मला सकाळी९वाजता चौबळांचा फोन आला."ताप आल्यामुळे पूजा नर्सिंग होम मधे आहे. आज सकाळी पावणे आकरा वाजता येऊन भेटा.' मी म्हटले"अहो सकाळी१०-४५ला शक्य नाही , वाँटर प्रुफिंगसाठी माणसाना कामाला लावायला जायचे आहे. १२ वाजता येतो .'तेम्हणाले "नाही १०-४५लाच या. बाकी मला माहिती नाही 'आणि फोन ठेवून दिला. मी पावणे आकराला नाईलाने गेलो. चौबळानी मला बसयला सांगितले .व मी सांगे पर्यंत उठायचे नाही असे सांगितले.मी वैतागून बसून राहिलो कामे दिसत होती. पण इलाज नव्हता. तेव्हड्यात डॉ क्टर आले. त्यांनी चौबळाना तपासले. ठीक आहे म्हणून जाऊ लागले. चौबळानी डॉ ना विचारले हार्ट कसे आहे? त्यावर डॉ क्टर म्हणाले चौबळ तुमचे हार्ट१००%काम करते आहे. किती वेळा सांगू. का लिहून देऊ. आणि डॉ क्टर गेले. नंतर चौबळ मला म्हणाले माझे हार्ट१००% काम करत आहे हे मला तुम्हाला डॉ क्टरांच्या तोंडून ऐकायचे होते. म्हणून त्रास दिला. कारण हे तुमच्या कमळाच्या गोळ्यामुळे झाले. मी गेली दहा वर्षे डॉ च्या गोळ्या खाल्या पण फायदा नव्हता.
आपल्या पूर्वजानी गणपतीला कमळ आवडते सांगून सर्वसामान्याचे आरोग्य राखण्याचा प्रयत्न केला. देवाला जे प्रिय ते माणसाला उपयुक्त! त्यांनी धंदा केला नाही म्हणून ते अडाणी होते का?
मला वाटते दर वर्षी गणपतीला कमळ वाहून झाल्यावर दुसरे दिवशी ते कमळ पाण्यात २४तास भिजत ठेवावे .नंतर ते पाणी सर्वानी प्यावे. म्हणजे वर्ष भर हार्ट सेफ राहयाला मदत होईल. ज्यांना हार्टचा त्रास आहे त्यांनी रोज कमळाचे सरबत करून प्यावे फायदा होण्याची शक्यता आहे. किमान त्रास नक्की नाही.
-- अरविंद जोशी. B,Sc,
9421948894
हा मेसेज फाँर्वड करताना कोणताही बदल करु नये
May 16, 2017
पाण्याची प्रशंसता भाग तीन
जेणाच्या सुरवातीला पाणी पिऊ नये. कृशता येते.
जेवणानंतर लगेचच पिऊ नये. स्थूलत्व वाढते.
जेवताना पाणी पिणे हे सर्वथा योग्य आहे. त्याने प्रकृती साम्यावस्थेत राहाते. सातही धातुंचे पोषण उत्तम रितीने होते.
कसे ? आम्ही तर आजपर्यंत ऐकले आहे, जेवताना पाणी पिऊ नये, भूक मरते म्हणे. सगळंच चुकीचं चाललेलं आहे. पाश्चात्य संस्कृतीची झापडं लावल्यामुळे विचारांची किती भेसळ झाली आहे पाहा.
नारळ वाटण्यापूर्वी पाणी घातले तरी रस येत नाही. आणि नंतर पाणी घातले तरी रस नीट निघत नाही. नारळ वाटता वाटता जर त्यात पाणी घातले तरच रस चांगला निघतो ना ! हे वाटप पाट्या वरवंट्यावर असू देत किंवा मिक्सरमधे !
असेच व्यवहारात देखील दिसते.
जेवता जेवता अन्नामधे लाळ चांगली मिसळली तर पचनही चांगले होते. तोंडात लाळ नीट निर्माण होण्यासाठी घोटभर पाणी घोळवले की उत्तम काम होते.
पण नियम पाळायचे तर नीट ओळखून पाळावेत. जेवताना पाणी प्यायचे ते सुद्धा गरजेनुसार थोडे थोडे लागेल तसे प्यावे. उगाच नियम करून अमुकच लीटर पाणी हवे, असं अजिबात नको.
मग आमची जेवतानाची पाणी पिण्याची परंपरा मोडली कधी आणि कोणी कशी ?
हे शोधून काढणे जरा कठीण आहे. पण जे बदल झालेत, ते याच डोळ्यादेखत झालेत, हे नक्की आहे.
जेवताना पाणी पिण्याचा आणखी एक फायदा म्हणजे चवीचवीनं जेवता येतं. तिखट खाऊन झालं की नंतर गोड पदार्थ खायचा असेल तर दोन्ही चवींच्यामधे, चव नसलेलं पाणी घेतलं की दोन्ही चवीतला फरक नीट कळतो. नाहीतर प्रत्येक चव नीट कळत नाही. एक गोड पदार्थ खाल्ल्यानंतर लगेचच दुसरं गोड खाल्लं तर, दुसऱ्या गोड पदार्थाची चव कमी गोड लागते, हे पण व्यवहारात आपण बघतोच. मधे पाणी प्यायले तर नंतरच्या पदार्थाची चव आणि लज्जत आणखीनच वाढते.
जे काही पाणी प्यायचे आहे ते जेवतानाच प्यावे. पाणी पिताना सावकाश प्यावे. लाळ मिसळून प्यावे. तहान लागली तर जरूर प्यावे. पण मुद्दाम जेवणापूर्वी , जेवणानंतर लगेच पिणे, नियम करून पिणे चुक आहे, हे लक्षात ठेवावे.
पाणी पिण्याचा किंवा माझ्या उत्तम प्रकृतीसाठी कोणताही बदल मी आजपासून करेन, असा संकल्प केला तर तो उत्साह दोन तीन दिवस टिकतो, नंतर पहिला विरोध होतो, तो आपल्याच घरातून ! स्वयंपाकघरातून फक्त एक सूचना येते, आणि आपले प्रामाणिक संकल्प कुठल्याकुठे उडून जातात. बदल आपल्यात हवा असेल आपल्यालाच बदलायला हवे ना !
तीळगुळ घ्या आणि 'तुम्ही' गोडगोड बोला, असा उपदेश आज सगळेच करतील. जे बदलायचे ते तुम्ही. 'मी' बदलणार नाही, असंच ठरवून तीळगुळ दिला की नंतर आपण शब्दात अडकायला आणि दुसऱ्याने शब्दात पकडायला नको.
जर मनापासून बदलायचं असेल तर असं म्हणा,
"तीळगुळ घ्या, 'मी' गोड बोलेन." असं वचन देतोय मी ! कारण बदल मला माझ्यात करायला हवाय.
वैद्य सुविनय दामले,
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
14.01.2017
January 18, 2017
प्रकाशन दिनांक :- 04/04/2004
विज्ञान आणि शास्त्रज्ञांसाठी अद्यापही आव्हान असलेले अनेक भौगोलिक चमत्कार आजही अस्तित्वात आहेत. अटलांटिक महासागरातील बर्म्युडा ट्रँगल हे असेच एक रहस्य आहे. अटलांटिक महासागरात असलेल्या या त्रिकोणी प्रदेशात कोणतीही वस्तू गडप होते.
April 4, 2004
Copyright © 2025 | Marathisrushti