सुवर्ण – झळाळी
Category:
वैचारिक लेखन शैक्षणिक सामान्यज्ञानमागील वर्ष- सहा महिन्यापासून सोने हे सर्वात जास्त चर्चेत आलेला विषय आहे. वर्तमानपत्र, मासिके व व्हाट्सअँप ग्रुप वर याची धमाल आहे. याचा दहा ग्राम (एक तोळा ) चा दर ७० हजार रुपये पासून २.५ लाख तोळ्यावर पोहचला होता. व आजकाल तो १.६० लाख रुपये तोळा पर्यंत खाली आलेला आढळतो. तुम्ही म्हणाल सोन्याला एवढी मागणी का निर्माण झाली? तर जगात कोठेही युद्ध सुरु झाले की लोकांची गुंतवणूक सोन्यात होते. कारण ही कधीही न बुडणारी गुंतवणूक आहे. सामान्य माणूसच काय पण प्रत्येक देश यात गुंतवणुकीला प्राधान्य देतो. हे आत्ताच घडते आहे असे नाही, पहिल्या व दुसऱ्या महायुद्धाच्या वेळीही हीच परिस्थिती होती.