वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
ध्वनी प्रदूषण हा जागतिक पातळीवरचा प्रश्न असून तो गंभीर बनत चालला आहे. सर्वच प्रकारची गर्दी असणाऱ्या मोठ्या महानगरांमध्ये या प्रश्नाची तीव्रता अधिक जाणवते. सतत मोठा आवाज कानावर आदळत असेल तर माणसाला बहिरेपणा किंवा बधीरपणा येतो. ध्वनी प्रदूषणामुळे हृदयरोग, ब्लडप्रेशर, अल्सर, कोलेस्टेरॉल, श्वसन आणि पचनाचे विकारही जडतात.
August 6, 2014
दक्षिण भारतात शेवग्याची झाडे अधिक प्रमाणात पहायला मिळतात. साऊथ इंडियन "सांबार'मधे शेवग्याची शेंग हमखास घातलेली असते. नजीकच्या काळात आहारशास्त्रीय जगात शेवग्याला फार महत्त्व लाभले आहे. शेवग्याच्या शेंगेला "वंडर स्टीक' तर झाडाला "ट्री फॉर लाईफ' असे संबोधले जाते. कारण आहारतज्ज्ञांच्या मते शेवग्याच्या शेंगा व या झाडाची पाने हे पौष्टीकतेत अतिशय समृद्ध पातळीवर आहेत. काही तज्ज्ञांच्या मते शेवग्याच्या पाल्यामधे संत्र्याच्या सातपटीने अधिक "क' जीवनसत्त्व आहे, दुधाच्या चौपट कॅल्शियम आहे व केळ्याच्या तिप्पट पोटॅशियम आहे. दुधापेक्षा अधिक प्रथिने व गाजराहून कितीतरी पटीने अधिक बेटाकेरोटीन यात आहे. शेवग्यास "पॉवर हाउस ऑफ मिनरल्स' यासाठीच म्हटले जाते.
शेवग्याच्या शेंगेतही "क' जीवनसत्त्व, केरोटीन, कॅल्शियम व फॉस्फरस ही पोषणतत्त्वे आहेत. शेवग्याची शेंग ही गर्भवती व वाढीच्या मुलांसाठी उत्तम भाजी आहे. ती रक्त शुद्ध करणारी आहे तसेच ज्यांना कफाचा त्रास आहे (दमा, जुनाट खोकला) अशांनी शेवगा नियमित खावा. यकृत व प्लीहा ह्यांचे आजार असणाऱ्यांना शेवग्याचे सूप द्यावे. 100 ग्रॅम शेवग्याच्या शेंगेत निव्वळ 0.1% चरबी असून चोथ्याचे प्रमाण मात्र चांगले आहे. यामुळे अनेक लाईफस्टाईल डिसिजेस मधे (हृदयरोग, मधुमेह, उच्चरक्तदाब, गाऊट इ.) शेवगा पथ्यकारक ठरतो. 1 वाटी (50 ग्रॅम) शेवग्याच्या आमटीत 59 कॅलरीज, 0.8 ग्रॅम प्रोटिन्स व 2.2 ग्रॅम्स फॅट्स असतात. 1 वाटी सांबार मधे 87 कॅलरीज, 3.7 ग्रॅम प्रोटिन्स व 2.8 ग्रॅम फॅट्स असतात.
एकूणच भारतीय आहारात शेवग्याच्या शेंगेचं आपलं म्हणून एक स्थान आहे. शेवगा आहारात अगदी रोज वापरला तरी हरकत नाही, असं सांगितलं जातं. याचं मुख्य कारण आहे त्याचे औषधी गुणधर्म. शेवगा गरम, हलका, मधुर, तिखट, अग्निप्रदीपक, रुचकर, दाहकारक, वीर्यवर्धक, पित्त वरक्त प्रकोपक असून, शेवग्याची भाजी वातविकार दूर करणारी आहे. शेवग्याच्या मुळांचा रस काढून किंवा त्याच्या कढय़ात मध घालून घेतल्याने गळू बरे होतात.
शेवग्याच्या फुलात ‘प्टेरोगोस्परमीन, पाल्मिकएसिड, स्टेईक अॅसिड, बेटेनिक अॅसिड,ओलेईक अॅसिड हे घटक असतात. तसंच टेरिगोस्पर्मीन नावाचे प्रतिजैविक असतं. पानातील रसामध्ये जीवाणूनाशक तत्त्व असतं. खोडातून एक भु-या रंगाचा डिंक मिळतो. तसंच बियांमधून रंगरहिन तेल मिळतं. शेवग्यात मोठया प्रमाणात खनिजं आढळतात. शेवग्यापासून जीवनसत्व ‘अ’, ‘क’ आणि ‘ई’ तयार करतात. पाणी शुद्धीकरणात शेवग्याच्या बियांचा वापर होतो.
ही यादी खूप मोठी आहे. शेवग्याच्या पानांचा रस प्यायल्याने उचकी थांबते व धाप लागणं कमी होते. शेवग्याच्या पानांच्या रसात चमचाभर साखर घेऊन तो तीन दिवस प्यायल्याने वायूने आलेला गोळा नाहीसा होतो. शेवग्याच्या पानांच्या रसाने डोकं चोळलं असता डोक्यातील कोंडा निघून जातो. मस्तकशूळ झाला असल्यास शेवग्याच्या पानांच्या रसात मिरे वाटून त्याचा लेप लावावा. पोट फुगलं असल्यास शेवग्याच्या पानांच्या रसाचा काढा तयार करून त्यात हिंग व सुंठ घालून तो प्यावा.
शेवग्याच्या पानांच्या रसाचा काढा करून त्यात मिरे, संधव व पिंपळीचं चूर्ण घालून प्यायल्याने प्लिहोदर बरा होतो.
वायूचा प्रकोप होऊन शरीरात कुठंही दुखत असल्यास शेवग्याच्या काढय़ात सुंठ व हिंग घालून प्यायल्याने वेदना थांबते. शेवग्याच्या पानांच्या रसात मध घालून डोळ्यांत घातल्याने डोळे दुखणं थांबतं. मस्तकात वेदना होत असल्यास शेवग्याचा डिंक दुधात वाटावा आणि त्याचा लेप मस्तकावर लावावा. त्यामुळे वेदना कमी होतात. मिरपूड व शेवगा बारीक कुटून एकत्र करून हुंगल्यास शिंका येऊन डोकेदुखी दूर होते. गर्भवतीने आहारात शेवग्याच्या भाजीचा वापर केल्यास गर्भाची वाढ चांगली होते. शेवग्याच्या शेंगांची भाजी खाल्ल्याने भूक लागते, तोंडाला चव येते. शेवग्याच्या शेंगांचा जेवणात वापर होत असल्याने त्यांना बाजारात मोठय़ा प्रमाणात मागणी असते. शेवग्याने अनेक औषधी गुण पाहता त्यांना पौष्टिक कॅप्सुलच म्हणायला हवी.
आरोग्यम् धनसंपदा
April 6, 2017
मनाची सबलता म्हणजे आपल्या मनातल्या विचारांचा भक्कमपणा. आपल्या मनाचे निरोगी स्वास्थ्य….
June 28, 2020
ऋषीमुनी-संतांनी स्तोत्र तसंच मंत्रांची निर्मिती करून सर्वसामान्यांवर फार मोठे उपकार केले आहेत. कोणत्या अक्षरांची कशी मिळवणी केली म्हणजे कसे ध्वनीतरंग निर्माण होतील व त्याचा मानवाला शारिरीक आणि मानसिक लाभ व अंतःकरण शुद्धीसाठी कसा उपयोग होईल हे विज्ञान लक्षात घेऊनच विशिष्ट अक्षरांची मिळवणी करून ज्या विशिष्ट ध्वनीतरंगाची उन्नती केली ते म्हणजे मंत्र व स्तोत्र. स्तोत्रपठणाचं वैशिष्ट्य म्हणजे स्तोत्रातल्या वर्ण-अक्षरांच्या साहाय्याने माणसाच्या शरीरातली निरनिराळी चक्रं जागृत होतात. त्यामुळे शरीरातल्या सुप्त शक्ती जागृत होतात.
आपलं संस्कृत वाङ्मय अतिशय समृद्ध आहे. सर्व भाषांचा उगम संस्कृत भाषेतून झाला असा या भाषेचा लौकिकही आहे. या संस्कृत भाषेला 'गीर्वाणभाषा' म्हणजे देवांची भाषा असंही मानलं जातं. संस्कृत साहित्यात स्तोत्र वाङ्मयाचं एक विशेष स्थान आहे. या साऱ्या वाङ्मयात प्रामुख्याने देवदेवतांची स्तुती केलेली आढळते. उदा. 'रामरक्षा स्तोत्र', 'व्यंकटेश स्तोत्र', 'श्री गणपती अथर्वशीर्ष' आदी स्तोत्रांची नावं घेता येतील. आजही ही स्तोत्रं अनेकांच्या पठणत असलेली आपण पाहतो. केवळ काव्य म्हणून वाचणाऱ्या रसिक वाचकांना ती आनंद देतातच पण देवदेवतांवर श्रद्धा बाळगणाऱ्या श्रद्धावंतांनाही अशा स्तोत्रांचा लौकिक व पारमार्थिक अर्थाने लाभ होतो. त्याचबरोबर आपले उच्चारही सुस्पष्ट होतात.
पूर्वी सकाळ-संध्याकाळ घरोघरी स्तोत्रं म्हटली जात. आज तो काळ मागे पडला आहे. स्तोत्रपठणाचं महत्त्व कमी झालं असलं तरी या स्तोत्रांनी मानवी जीवनात एक अलौकिक स्थान मिळवलं आहे. स्तोत्रपठणाचा विशेष काही उपयोग होत नाही, असं म्हणणारे अनेकजण आहेत. परंतु स्तोत्रपठणाचा उद्देश व त्यामागच्या शास्त्रीय बैठकीचं महत्त्व कळल्यास मनामध्ये कोणताही प्रत्यवाय राहणार नाही.
कोणत्याही गोष्टीची अनुभूती ती गोष्ट प्रत्यक्ष कृतीत आणल्यानंतर येते असा नियमच आहे. लग्न, मुंज अशा काही प्रसंगी आता शांतीपाठ करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. सत्यनारायणासारख्या पूजाप्रसंगी मंत्रजागर करण्याचा प्रघात हळूहळू नामशेष होत चालला आहे. रूद्राची आर्वतनं करण्याची किंवा दक्षिणा देऊन ब्राह्मणांकडून 'लघुरूद्र' करण्याची रीत बंद पडत चालली आहे. हे शांतीपाठ किंवा मंत्र पठण हा केवळ भाबडेपणाचा भाग नसून याविषयी परदेशातून सूचित करणारे प्रयोग सिद्ध होत आहेत. त्या प्रयोगांवरून हे सर्व सांस्कृतिक आचार-विचार, व्रतवैकल्यांच्या मागे निश्चित वैज्ञानिक बैठक आहे, असं ध्यानी येईल.
डॉ. दोदो आर दो या एका फ्रेंच डॉक्टरने मानसिक शक्तीमापनाचं एक प्रभावी यंत्र शोधून काढलं. ज्याची मानसिक शक्ती मोजायची असेल त्याला दोन ते चार फूट अंतरावर उभं करून त्या यंत्राकडच्या काट्याकडे बघायला सांगण्यात येतं. त्याची दृष्टी स्थिर झाली की यंत्रावरचा काटा गोल फिरू लागतो आणि कोणत्याही डिग्रीवर स्थिर होतो. प्रत्येकाच्या डोळ्यातून विद्युतलहरी बाहेर पडत असतात आणि म्हणून तो काटा फिरतो असं त्यांचं संशोधन आहे. नेमक्या याच तत्वावर स्तोत्रपठणाचा परिणाम मानवी शरीरावर होत असतो.
ज्याप्रमाणे मनामध्ये विचार येतात त्याप्रमाणे विद्युतशक्ती निर्माण होऊन स्तोत्रांमधले शब्दसुद्धा विचाराने भारलेले असल्यामुळे स्तोत्र म्हणणाऱ्याच्या मनावर त्या शब्दसमूहांचा खूप चांगला परिणाम घडतो. स्तोत्राच्या आवर्तनातून आपल्याला अलौकिक, अद्भुत व गूढ अनुभूती येतात हेच स्तोत्रपठणाचं खरं रहस्य आहे. या विधानाच्या पुष्ट्यर्थ 'रामरक्षा' स्तोत्राचं उदाहरण देता येईल. मंत्रशास्त्राच्या दृष्टीने 'राम' या शब्दाला विशेष महत्त्व आहे. 'र'काराला मंत्रशास्त्रात 'अग्नीबीज' मानतात. 'र' काराच्या उच्चाराने आपल्या शरीरातल्या विद्युतशक्ती जास्त प्रमाणात सुरू होते व त्यामुळे आपल्या शरीरात विद्युतप्रवाह सुरू होतो. 'र'काराची शक्ती अतिशय वेगवान असते हा प्रयोग कोणीही करून पाहण्यासारखा आहे.
आपल्या पूर्वजांनी सांगितलं आहे की, सकाळी अंथरूणातून बाहेर यायच्या आधी कराग्रे वसते लक्ष्मी। करमध्ये सरस्वती। करमूले तू गोविंदम्। प्रभाते कर दर्शनम्। हा श्लोक म्हणून दोन्ही हात चेहऱ्यावरून फिरवून खाली बेंबीपर्यंत फिरवावेत. असं तीन वेळा करावं. चेहऱ्यावरून हात फिरवताना थोडासा दाब द्यावा. 'अॅक्युपंक्चर विदाऊट नीडल्स' या अमेरिकन पुस्तकातल्या 'अॅक्युप्रेशर ब्रेकफास्ट' या प्रकरणात चेहऱ्यावरचे २५ ते ३० पॉइण्टस दिले आहेत. हे पॉइण्टस लक्षात ठेवून दाबण्यापेक्षा चेहऱ्यावरून हात फिरवल्याने त्याचा फायदा होतो. डोळ्यावरची झापड लगेच जाते आणि आपण एकदम फ्रेश होतो. श्लोक म्हटल्याने सकाळी उठल्यावर देवाचं स्मरण होतं.
संत ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी'त म्हटलं आहे की बाराखडी म्हटली की त्यात सर्व मंत्र येऊन गेले. ऋषीमुनी-संतांनी स्तोत्र तसंच मंत्रांची निर्मिती करून सर्वसामान्यांवर फार मोठे उपकार केले आहेत. कोणत्या अक्षरांची कशी मिळवणी केली म्हणजे कसे ध्वनीतरंग निर्माण होतील व त्याचा मानवाला शारिरीक आणि मानसिक लाभ व अंतःकरण शुद्धीसाठी कसा उपयोग होईल हे विज्ञान लक्षात घेऊनच विशिष्ट अक्षरांची मिळवणी करून ज्या विशिष्ट ध्वनीतरंगाची उन्नती केली ते म्हणजे मंत्र व स्तोत्र. स्तोत्रपठणाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्तोत्रातल्या वर्ण-अक्षरांच्या साहाय्याने माणसाच्या शरीरातली निरनिराळी चक्रं जागृत होतात. त्यामुळे शरीरातल्या सुप्त शक्ती जागृत होतात. सामान्यतः माणूस त्याच्या एकूण शक्तीच्या १० टक्के शक्ती वापरत असतो. ९० टक्के शक्यतो सुप्तावस्थेच असते. ती शक्ती स्तोत्रपठणाने जागृत करता येते. पण त्यासाठी पद्मासनात बसून एकाच वेळी, एकाच ठिकाणी आणि योग्य उच्चारात स्तोत्रपठण केलं पाहिजे. स्तोत्रपठणाचा ज्यांना खरोखर अनुभव घ्यायचा आहे त्यांना ही सर्व पथ्यं काटेकोरपणाने पाळावीच लागतात. अन्यथा शास्त्रोक्त पद्धतीने स्तोत्रांचं पठण केलं नाही तर मग त्यांची प्रचिती कशी येणार?
आपल्या तोंडात, टाळूवर ८४ रेखावृत्तीचे बिंदू असतात. पूर्वी श्रेष्ठता प्राप्त झालेल्या काही व्यक्ती प्रदीर्घ तपस्येमध्ये मग्न झाल्या. त्या लोकांनी कालांतराने काही ध्वनी निर्माण करण्यास सुरुवात केली व असं करताना त्यांची जीभ टाळूवर असलेल्या रेखावृत्तांच्या बिंदूमधल्या विशिष्ट स्थानी टेकवली व त्यामधून विशिष्ट नादनिर्मिती झाली. आपण बोललेल्या प्रत्येक शब्दांच्या किंवा मंत्राच्या उच्चारामुळे मंत्रातल्या प्रत्येक शब्दाचा आघात शरीराच्या कोणत्याही भागावर होत असतो. योग्य प्रकारचे आघात झाले तर शरीरातले हायपोथॅलम्स, थॅलम्स अथवा पिच्युटरी ग्रंथीवर परिणाम होऊन अत्यानंदाच्या मनःस्थितीत आपण येतो.
ज्या वास्तूमध्ये नेहमी अभद्र बोलणं, वरच्या पट्टीत किंचाळून बोलणं, नकारात्मक बोलणं होत असेल अशा वास्तूमध्ये तुम्ही प्रवेश केल्यावर तिथलं वातावरण मनावर भार निर्माण करणारं व नैराश्यपूर्ण वाटेल. पण त्याऐवजी जिथे गाण्यांचे सूर, स्तोत्रपठण, वैचारिक पातळीची चांगली देवाणघेवाण, मंत्रोच्चार होत असतील, मनाला उल्हासित करणारं संभाषण चालू असतं त्या वास्तूत उत्साहपूर्ण, तणावरहित व मनमोकळे, प्रसन्न वाटेल.
तुम्हाला येणारा अनुभव निर्माण होणाऱ्या भावना यांचा नादशास्त्राशी खूप जवळचा संबंध आहे. आपल्या भावना उल्हासित होतील, नैराश्यातून आनंदाकडे नेतील असे शब्द निवडून प्रत्येक मंत्र, श्लोक, स्तोत्र रचले होते. आपण म्हटलं तर मेंदूच्या काही भागांना उत्तेजन मिळाल्याने मेंदूचं रासायनिक संतुलन बदलतं. ही बदललेली मेंदूची रासायनिक स्थिती आपल्या मनाला अधिक सुखावह, तणावमुक्त व उदार बनवते. मनाचा मोठेपणा वाढवून परिस्थितीबाबत अधिक उदार दृष्टिकोन निर्माण करते.
आज आपण कठीण काळातून जात आहोत. सर्व भौतिक सुखं हात जोडून आपल्यासमोर उभे आहेत. तरीही सध्याचं जीवन अनेक समस्यांनी ग्रासलेलं आहे. नित्यनवीन संकटं त्यात भर घालत आहेत आणि आपलं जीवन तणावपूर्वक बनलं आहे. विज्ञानामुळे मानवाची पावलं चंद्रावर पोहोचली असली तरी त्याच्या मनाला अजूनही शांती लाभलेली नाही.
शांती, समाधान, उत्कर्ष, उन्नतीसाठी कशाची गरज असते तर ती मानसिक समाधानाची. यासाठी रोज १५ ते २० मिनिटं एकाग्र चित्ताने स्तोत्रपठण केलं तर निश्चितच मानसिक समाधान मिळेल व चांगले आरोग्यही प्राप्त होईल।
-- `आरोग्यदूत' WhatsApp ग्रुपवरुन
May 16, 2017
…सरकारी कार्यालयाचे वाॅचमन, कार्यालयातील शिपाई, लिफ्टमन आदींचं समाधान दोन-पाचशे रुपयांच्या वर्गणीवर होतं. कारण त्यांची मजल तेवढीच असते. तेवढ्यावर मिळणारं एखादं गटार त्यांना पुरेसं असतं. खरी गटारी तर त्यांच्या पुढच्या डेसिग्नेशन्सवर असलेल्यांची आणि त्यांची तिथे नेमणूक करणार्या राजकारण्यांची असते. हे गटारी निमित्त वर्गणी वैगेरे काढत नाहात. ते एका दिवसाच्या गटारीवर समाधानीही नसतात. त्यांची गटारी वर्षभर सुरुच असते आणि लोळण्यासाठी गटारं असतात, ती ‘लाचे’ची, कॅश आॅर काईंड आॅर बोथ..! ही गटारं साधी, झोपडपट्टीतल्यासारखी गरजेपोटी निर्माण झालेली नसतात, तर मुद्दामहून तयार केलेले परंतू वरून गुळगुळीत गिलावा केलेले मोठे, गलित्छ नाले असतात…
July 26, 2017
शाळेच्या वयापासूनच आपण गणित आणि भूमिती हे विषय म्हटले की थोडा धसकाच घेतो, नाही का? काही जणांना गणिताची मुळात आवड असते पण काही मात्र त्याकडे रुक्ष विषय, आकडेमोड म्हणूनच पाहतात. पण भारतीय व्यवहारात आणि इतिहासात गणिताची सुरुवात आणि रुजवात कशी झाली हे समजून घेण मात्र तितकच रंजक आहे बर का! हा विषय तसा विस्ताराने मांडण्याचा आहे. पण वाचकांची उत्सुकता वाढवून त्यांना या विषयाची अधिक माहिती घेण्यासाठी प्रोत्साहन मिळावं आणि त्यासाठी किमान काही प्राथमिक माहिती हाती असावी इतकाच या लेखाचा मर्यादित उद्देश आहे.
September 30, 2020
मानव संसाधन विकासात मानव या शब्दाची व्याख्याच मुळी “क्षमतांचे गाठोडे” अशी केली आहे. काही क्षमता आपल्यात जन्मजात असतात – वंशपरंपरेने आलेल्या! काही आपण विकसित करीत असतो. पण प्रश्न असा आहे की, स्वतःच्या क्षमता आपणांस माहित असतात का? बऱ्याच जणांना माहित नसतात हे या प्रश्नाचे खरे आणि म्हणूनच कदाचित न आवडणारे उत्तर आहे.
July 11, 2021
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
August 14, 2018
पुरुषसूक्त हे ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील नव्वदावे सूक्त आहे. आपल्याला दिसणारे जग हे विराट परमेश्वराचा केवळ अंशभाग आहे हा या सूक्ताचा मुख्य विषय. विश्वपुरुष व त्याच्यापासून निर्माण झालेली सृष्टी यांचे वर्णन करणार्या या सूक्तात सोळा ऋचा असून रचयिता नारायण ऋषी व देवता पुरुष (परमेश्वर) आहे. मुख्यत्वे अनुष्टुप् छंदात रचलेल्या या सूक्ताची शेवटची ऋचा मात्र त्रिष्टुप् छंदात गुंफलेली आहे. पहिले पाच मंत्र त्या भव्य आदितत्त्वाचे (पुरुषाचे) वर्णन आहे. येथे पुरुष या शब्दाने अभिप्रेत आहे ते चराचराला व्यापणारे एक अमूर्त, अविनाशी, अनंत, अशरीरी तत्व. श्लोक ६ व ७ त्या विराट पुरुषाचाच यज्ञ करून यज्ञाचे हवन केल्याचे वर्णन येते. सर्वसाधारणतः यज्ञ एका विशिष्ट हेतूने किंवा देवतेच्या कृपाप्रसादासाठी केला जाई. परंतु येथे हा यज्ञ देवांनीच मांडला आहे. ८ ते १५ पर्यंतच्या ऋचांमध्ये त्या यज्ञातून काय निर्माण झाले याचा उहापोह आहे. या उत्पत्तीचा क्रमही लक्षणीय आहे. त्या काळी यज्ञात पशूंचा बळी देण्याची प्रथा होती आणि त्या प्राण्याचे वेगवेगळे भाग शिजवून त्या यज्ञातील वेगवेगळ्या ऋत्विजांना अधिकाराप्रमाणे आणि यजमानाला भक्षणार्थ दिले जात. या मानस यज्ञात तर प्रत्यक्ष त्या विराट पुरुषाचाच बळी दिला आहे. त्यामुळे त्यातून संपूर्ण विश्व आणि समाज निर्मिती झाल्याची कल्पना मांडली आहे.
काही अभ्यासकांच्या मते पुरुषसूक्तात प्रथमच चार वर्णांचा स्पष्ट उल्लेख येतो. परंतु अनेक अभ्यासकांच्या मते येथे चार लोकसमूहांचा निर्देश असला तरी त्यास ‘वर्ण’ असे म्हटलेले नाही. त्यामुळे चातुर्वर्ण व्यवस्था वैदिकोत्तर काळात रूढ झाली असावी. काही अभ्यासकांच्या मते ह्या दोन ऋचा (क्र ११ व १२) प्रक्षिप्त (मागाहून भर घातलेल्या) आहेत. ह्याच सूक्ताच्या आधारे (ऋचा क्र.१५) नरमेधाचा पुरावा दिला जातो. परंतु बहुतेक भाष्यकारांनी पशू या शब्दाचा अर्थ सर्वद्रष्टा परमेश्वर (पश्यति इति पशुः) असा लावला आहे. या सूक्तातील बहुतेक वर्णन मानसयज्ञाचे आहे. सृष्टीची उत्पत्ती होताना एखाद्या पुरुषाच्या अंगांपासून विश्वाचे वेगवेगळे भाग तयार झाले अशी कल्पना जगभरातील पुराकथांमध्ये आढळून येते.
ऋग्वेदाखेरीज इतर अनेक वैदिक साहित्यात हे सूक्त उद्धृत केलेले आहे. यजुर्वेदात त्यातील १५ वा मंत्र ७ वा करून त्यात अधिक सुसंबद्धता आणली आहे. पौराणिक काळापासून हे सूक्त नित्य पठणात असून षोडशोपचार पूजा करताना पुरुषसूक्तातील एकेक ऋचा म्हणून एकेक उपचार अर्पण करण्याची पद्धत रूढ आहे. याशिवाय हल्ली पूजा, आरत्यांनंतर म्हटल्या जाणार्या मंत्रपुष्पांजलीतही पुरुषसूक्तातील ‘यज्ञेन यज्ञमयजन्त देवाः’ या मंत्राचा विनियोग केला जातो.
सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात् ।
स भूमिं विश्वतो वृत्वात्यतिष्ठद्दशाङुलम् ॥१॥
मराठी- ज्याला हजार मस्तके, डोळे, पाय आहेत, असा पुरुष (परमात्मा) या धरतीला वेढून दहा बोटे अधिकच उरला आहे.
पुरुष एवेदं सर्वं यद्भूतं यच्च भव्यम् ।
उतामृतत्वस्येशानो यदन्नेनातिरोहति ॥२॥
मराठी- जे काल होते, आज आहे आणि उद्या असेल ते जग म्हणजे हा पुरुषच आहे. अमरत्वाचा अधिपती असलेला हा पुरुष अन्नरूपाने त्या सर्वापलिकडे जातो.
टीप- येथे काही अभ्यासकांनी दुसर्या चरणाचा अर्थ ‘प्राणिमात्रांच्या सुखदुःखाप्रीत्यर्थ परमेश्वर आपले मूळ स्वरूप सोडून जगामध्ये येतो. वस्तुतः ते त्याचे मूळ स्वरूप नव्हे’ असा केलेला आढळतो.
एतावानस्य महिमातो ज्यायाँश्च पूरुषः ।
पादोऽस्य विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतं दिवि ॥३॥
मराठी- ही अशी या पुरुषाची थोरवी त्यामुळे तो सर्वश्रेष्ठ आहे. त्याचा एक पाय या विश्वात आहे तर तीन पाय अंतरिक्षात आहेत. (हे जग म्हणजे त्याचा एक चतुर्थांश आहे तर उर्वरित तीन चतुर्थांश दिव्य लोकात आहे.)
त्रिपादूर्ध्व उदैत्पुरुषः पादोऽस्येहाभवत्पुनः ।
ततो विष्वङ् व्यक्रामत्साशनानशने अभि ॥४॥
मराठी- असा हा तीन अंश (विश्वाच्या पलिकडे) उंच अवकाशात असणारा पुरुष (सृष्टीची उत्पत्ती,स्थिती आणि लय स्वरूपात) पुनः पुनः अंशरूपात प्रकट झाला. त्यानंतर त्याने अन्न भक्षण करणार्या आणि न करणार्या अशा अनेक रूपांनी विश्व व्यापून टाकले.
टीप- काही अभ्यासकांनी ‘एक अंशभाग उत्पत्ती - लयाच्या चक्रामध्ये भ्रमण करीत राहतो’ असा अर्थ लावला आहे.
तस्माद्विराळजायत विराजो अधि पूरुषः ।
स जातो अत्यरिच्यत पश्चाद्भूमिमथो पुरः ॥५॥
मराठी- त्या (आदिपुरुषा) पासून भव्य (ब्रह्माण्डरूपी) पुरुष निर्माण झाला. पण त्याहीपेक्षा तेजस्वी परमात्म्याने त्याला व्यापून, त्यानंतर भूमी व शरीरधारी जीवांना उत्पन्न केले.
यत्पुरुषेण हविषा देवा यज्ञमतन्वत ।
वसन्तो अस्यासीदाज्यं ग्रीष्म इध्मः शरद्धविः ॥६॥
मराठी- जेव्हा देवांनी (या) पुरुषाला यज्ञीय अग्नी मानून होम सुरू केला, तेव्हा त्या (यज्ञा) साठी वसंत ऋतू साजूक तूप, ग्रीष्म ऋतू समिधा आणि शरद ऋतू (इतर) हविद्रव्ये झाले.
तं यज्ञं बर्हिषि प्रौक्षन्पुरुषं जातमग्रतः ।
तेन देवा अयजन्त साध्या ऋषयश्च ये ॥७॥
मराठी- जो सर्वांच्या अगोदर उत्पन्न झाला अशा त्या पुरुषाचे बर्ही (कुश गवत) गवताच्या आसनावर प्रोक्षण केले (जल शिंपडले) आणि त्याच्याच योगाने देव आणि साध्य प्रवर्गातील (दैवी) ऋषींनी हवन केले.
तस्माद्यज्ञात्सर्वहुतः सम्भृतं पृषदाज्यम् ।
पशून्ताँश्चक्रे वायव्यानारण्यान् ग्राम्याश्च ये ॥८॥
मराठी- संपूर्ण आहुती दिल्यानंतर त्या यज्ञापासून कणीदार रवाळ तूप तयार झाले. आणि त्यापासून हवेवर उपजीविका करणारे (पक्षी), तसेच जंगली आणि पाळीव पशू निर्माण झाले.
टीप- काही अभ्यासकांनी ‘पृषदाज्य’ चा अर्थ दहीमिश्रित तूपभात, तसेच दही युक्त तूप असा केलेला आढळतो.
तस्मात् यज्ञात् सर्वहुत ऋचः सामानि जज्ञिरे ।
छन्दांसि जज्ञिरे तस्माद्यजुस्तस्मादजायत ॥९॥
मराठी- त्या सर्व आहुती दिलेल्या यज्ञापासून ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद (हे तीन वेद) आणि (वैदिक गीतांचे गायत्री सारखे) छंद निर्माण झाले.
टीप- येथे अथर्ववेदाचा उल्लेख नाही हे लक्षणीय आहे.
तस्मादश्वा अजायन्त ये के चोभयादतः ।
गावोः ह जज्ञिरे तस्मात् तस्माज्जाता अजावयः ॥१०॥
मराठी- त्या यज्ञापासून घोडे,गाई,बोकड,एडके असे दोन्ही जबड्यात दात असणारे प्राणी उत्पन्न झाले.
यत्पुरुषं व्यदधुः कतिधा व्यकल्पयन् ।
मुखं किमस्य कौ बाहू का ऊरू पादा उच्येते ॥११॥
मराठी- या (विराट) पुरुषाला कोणकोणते अवयव होते? (देवांनी) त्याची कशीकशी कल्पना केली ? त्याचे तोंड काय होते; दोन हात, मांड्या आणि पाय यांच्यासाठी काय योग्य होते ?
ब्राह्मणोऽस्य मुखमासीद् बाहू राजन्यः कृतः ।
ऊरू तदस्य यद्वैश्यः पद्भ्यां शूद्रो अजायत ॥१२॥
मराठी- ब्रह्म जाणणारा त्याचे मुख, क्षत्रिय त्याचे हात, व्यापार उदीम करणारा त्याच्या मांड्या होते व पायांपासून शूद्र उत्पन्न झाला.
चन्द्रमा मनसो जातश्चक्षोः सूर्यो अजायत ।
मुखादिन्द्रश्चाग्निश्च प्राणाद्वायुरजायत ॥१३॥
मराठी- चंद्राची उत्पत्ती त्याच्या मनापासून, रवीची डोळ्यांपासून, इन्द्र आणि अग्नी मुखापासून आणि प्राणापासून वारा (हवा) उत्पन्न झाला.
नाभ्या आसीदन्तरिक्षं शीर्ष्णो द्यौः समवर्तत ।
पद्भ्यां भूमिर्दिशः श्रोत्रात्तथा लोकाँ अकल्पयन् ॥१४॥
मराठी- त्याच्या बेंबीपासून अंतराळ, शिरापासून स्वर्ग, दोन पावलांपासून धरती, कानांपासून सर्व दिशा आणि विचिध लोक निर्माण झाले अशी देवांनी कल्पना केली.
सप्तास्यासन् परिधयस्त्रिः सप्त समिधः कृताः ।
देवा यद्यज्ञं तन्वाना अबध्नन्पुरुषं पशुम् ॥१५॥
मराठी- या होमकुंडाभोवती सात कठडे होते, यज्ञासाठी एकवीस समिधा केल्या होत्या. देवांनी त्या विराट पुरुषाला बळी देण्याचा पशू म्हणून खांबापाशी (बलिस्तंभाशी) बांधले.
टीप- विविध अभ्यासकांनी ‘परिधी’ व ‘समिधा’ यांचा वेगवेगळा अर्थ घेतलेला दिसतो.
परिधी :- १. सप्तछंद (गायत्री, अनुष्टुप्, त्रिष्टुभ, जगती, उश्निह, बृहति, पङ्क्ती हे सात छंद वैदिक वाङ्मयात मुख्यत्त्वे वापरलेले आहेत.) २. सात समुद्र
समिधा :- १.एकवीस छंद २. बारा मास, पाच ऋतू, तीन लोक आणि आदित्य. ३. पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये, शरीरातील पंचनाड्या, मन, बुद्धी, जाणीव, अहंकार, धर्म आणि अधर्म.
यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् ।
ते ह नाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः ॥१६॥
मराठी- देवांनी यज्ञ करून यज्ञरुप विराट पुरुषाचे पूजन केले, जे यज्ञ आणि तत्सम धार्मिक उपासनेचे प्राथमिक स्वरूप (धर्मविधी) होते. पूर्वी ज्या स्वर्गात महान देवता आणि साध्य (ऋषी) निवास करीत ते स्थान (यज्ञ करून) त्यांनी निश्चितच प्राप्त केले.
हेच पुरुष सूक्त इतर ग्रंथातही (तैत्तिरीय आरण्यक) आढळून येते. तेथे त्यात अठरा मंत्र आहेत. अधिकचे दोन मंत्र असे :
वेदाहमेतं पुरुषं महान्तम् आदित्यवर्णं तमसस्तु पारे ।
सर्वाणि रूपाणि विचित्य धीरः नामानि कृत्वाऽभिवदन्यदास्ते ॥१७॥
मराठी- मी त्या महान बुद्धिमान पुरुषाला जाणतो, जो सूर्यासारखा तेजस्वी आहे, जो अंधकारा पलिकडे आहे, ज्याने सर्व आकृती आणि आकार निर्माण केले, सर्वांना नावे दिली आणि जो सर्व गुणविशेषांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि सर्व विश्व सांभाळतो.
धाता पुरस्ताद्यमुदाजहार शक्रः प्रविद्वान्प्रदिशश्चतस्त्रः।
तमेवं विद्वानमृत इह भवति नान्यः पन्था अयनाय विद्यते ॥ १८॥
मराठी- सर्वप्रथम ब्रह्मा प्रजापतीने या पुरुषाला ओळखले (जगासमोर आणले), त्यानंतर सर्व दिशांमध्ये पसरलेल्या या पुरुषाची इन्द्राला जाणीव झाली. हा पुरुष ज्याला समजला, त्याला या जन्मातच अमरत्व मिळते (मोक्ष मिळतो), त्यासाठी दुसरा कोणताच मार्ग आवश्यक नाही.
खालील मंत्र तैत्तिरीय आरण्यकाच्या प्रथम प्रपाठकातील प्रथम अनुवाकात आहे. तो पुरुषसूक्ताच्या सुरुवातीस म्हटला जातो.
मराठी- आम्ही आमच्या सध्याच्या आजारांच्या व भविष्यात होणार्या रोगांच्या निवारणाकरिता त्या (ओम् किंवा परमेश्वरा) ची विशेषत्त्वाने प्रार्थना करतो. (हा) यज्ञ (विघ्नरहित) गतिमान व्हावा (पार पडावा), तसेच त्याच्या यजमानाला चांगली गती मिळावी म्हणून विशेषत्त्वाने प्रार्थना करतो. आमचे स्वर्गीय कल्याण व्हावे. आमच्या मुला नातवंडांचे कल्याण होवो. आमच्या औषधी (वनस्पती) उंच वाढोत. आमच्या (नातलग, दासदासी इत्यादी) माणसांचे, तसेच (गाई, घोडे इ.) पशूंचे कल्याण होवो. सर्वत्र शांती नांदो.
खालील ऋचा तैत्तिरीय आरण्यकातील ३ र्या प्रपाठकातील १३ व्या अनुवाकात येतात.
अद्भ्यः संभूतः पृथिव्यै रसाच्च विश्वकर्मणः समवर्तताधि ।
तस्य त्वष्टा विदधद्रूपमेति तत्पुरुषस्य विश्वमाजानमग्रे ॥
मराठी- हा विराट आकाराचा नारायण नामक पुरुष सर्वत्र पसरलेल्या जलामध्ये (मण्डवत्- दुधातील लोण्याच्या गोळ्यासारखा) उत्पन्न झाला. केवळ जलच नव्हे तर पृथ्वीशी संबंधित जे जे रस होते त्यापासून तो उत्पन्न झाला. या विश्वाला उत्पन्न करणार्या परमेश्वरापासून श्रेष्ठ ब्रह्मा उत्पन्न झाला. या विश्वाच्या निर्मात्याने (ब्रह्म्याने) चौदा लोक उत्पन्न केले व तो त्या लोकात व्याप्त झाला.
टीप- त्वष्टा या शब्दाचे अनेक अर्थ - जसे एक आदित्य (सूर्य), विश्वाचा निर्माता, बांधकामाशी संलग्न कारागीर - आहेत. वेगवेगळ्या अभ्यासकांनी विभिन्न अर्थ घेऊन त्या दृष्टीने दुसर्या चरणाचा अर्थ लावलेला दिसतो. त्यात ‘ त्या रसाला धारण करून सूर्य रोज प्रकट होतो ’ असाही अर्थ दिसतो. सायणाचार्यांनी ‘ब्रह्म्याने चौदा लोक निर्माण केले’ असा अर्थ घेतला आहे.
वेदाहमेतं पुरुषं महान्तं आदित्यवर्णं तमसः परस्तात्
तमेवं विद्वानमृत इह भवति नान्यः पंथा विद्यतेऽयनाय ॥
मराठी- मी त्या महान बुद्धिमान पुरुषाला जाणतो, जो सूर्यासारखा तेजस्वी आहे, जो अंधकारा पलिकडे आहे. त्याला ओळखूनच मृत्यूला जिंकता येते. प्रगतीसाठी दुसरा मार्ग नाही.
प्रजापतिश्चरति गर्भे अन्तः अजायमानो बहुधा विजायते
तस्य धीराः परिजानन्ति योनिं मरीचीनां पदमिच्छन्ति वेधसः ॥
मराठी- ज्याला (लौकिक अर्थाने) जन्म (आणि मरणही) नाही असा ब्रह्मा (प्रजापती) या ब्रह्माण्डरूपी गर्भाच्या अंतर्भागी विहार करतो. योगाने आपल्या चित्तवृत्ती ज्यांनी संयत केल्या आहेत असे धैर्यशील जन त्या प्रजापतीचे जगत्कारणरूप जाणतात. ज्ञानी जन मरीची (सारख्या सप्तर्षीं) चे (अढळ) पद मिळावे अशी कामना करतात.
यो देवेभ्य आतपति यो देवानां पुरोहितः
पूर्वो यो देवेभ्यो जातः नमो रुचाय ब्राह्मये ॥
मराठी- जो देवांसाठी प्रकाशतो, जो देवांचा सल्लागार आहे, जो देवांच्या आधी अस्तित्त्वात आला, अशा तेजस्वी परब्रह्म स्वरूपाला मी नमस्कार करतो.
रुचं ब्राह्मं जनयन्तः देवा अग्रे तदबृवन् ।
यस्त्वैवं ब्राह्मणो विद्यात् तस्य देवा असन् वशे ॥
मराठी- अशा तर्हेने सृष्टि उत्पत्तीच्या अगोदरपासून अस्तित्वात असलेल्या चैतन्यमय परब्रह्मासंबंधी देव बोलले. जो हे जाणणारा ब्रह्मवेत्ता असेल, देव त्याचे अंकित होतात.
ह्रीश्च ते लक्ष्मीश्च पत्न्यौ अहोरात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपं ।
अश्विनौ व्यात्तम् इष्टं मनिषाण अमुं मनिषाण सर्वं मनिषाण ॥
मराठी- हे ब्रह्मन्, लज्जा आणि लक्ष्मी या तुझ्या दोन भार्या आहेत. दिवस आणि रात्र या तुझ्या दोन कडा आहेत. (आकाशात पसरलेले) चांदणे तुझे शरीर आहे. दोन अश्विनीकुमार तुझे विस्तृत मुख आहेत. तू आम्हाला इच्छिलेले (आत्मज्ञान) दे, जगात दृश्यमान गाई-घोडे इत्यादी दे, सर्व ऐहिक संपत्ती दे.
ॐ शांतिः ॐ शांतिः ॐ शांतिः ॥
******************
धनंजय बोरकर (९८३३०७७०९१)
November 5, 2021
आपली जन्मतारीख हे एक गुढ ( कोड लँग्वेज) आहे. आपण विशिष्ट तारखेलाच का जन्म घेतला यामागे काही संकेत आहेत. ही जन्मतारीख व त्यातील महिना व वर्षाचे आकडे आपल्या आयुष्याचा प्रवास कोणत्या दिशेने होणार आहे त्याचा अंदाज देतात..
January 10, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti