आरोग्य

आजचा आरोग्य विचार – भाग चौतीस

Category:

 

आहारामधे फळांचा वापर करावा. आहारानंतर फळ नको किंवा आहाराऐवजी फलाहार करावा. आज जेवणानंतर फळे खायची प्रथा पडली आहे. फळे पचायला जड असतात. जे पदार्थ पचायला जड ते अग्नि प्रखर असतानाच म्हणजे भूक कमी होण्याअगोदरच संपवावे.

  March 6, 2018


आरोग्य

आजचा आरोग्य विचार – भाग तेहेतीस

Category:

 

६६ भारतीय आहारामधे सहा चवी हव्यात. पण आज मधुमेह झाला म्हणून गोड बंद, पित्त वाढते म्हणून तिखट आंबट बंद, रक्तदाब वाढतो म्हणून खारट बंद, आवडत नाही म्हणून कडू बंद, राहिली एक तुरट चव. पाश्चिमात्य आहाराविषयी न बोललेलंच बरं.

  March 5, 2018


आरोग्य

आजचा आरोग्य विचार-भाग एकतीस

Category:

 

तुळशीला प्रदक्षिणा घालून तीर्थ म्हणून तुळशीचे पान घातलेले पळीभर पाणी पिणे ही आणखी एक लुप्त होत चाललेली भारतीय परंपरा आहे. आमच्या पिढीने निदान तुळशी वृंदावन तरी पाहिले आहे. नातवाची तिसरी पिढी ते पाहील की नाही याचीच शंका आहे. अर्थात ग्रामीण भारतात अजूनही अंगणात तुळशी वृंदावने आहेत.

  March 3, 2018


आरोग्य

आजचा आरोग्य विचार – भाग एकतीस

Category:

 

मी पाश्चात्य संस्कृतीच्या एवढा विरोधात का, असा प्रश्न माझ्या काही मित्रांना, नातेवाईकांना पडला आहे. हा बदल राजीवभाईनी दिलेल्या दृष्टीकोनाचा आहे. प्रत्येक गोष्ट शिकायची असेल तर ती भारतीयत्वाच्या दृष्टीने अभ्यासायची सवय त्यांनीच लावली. आयुर्वेद देखील अशाच पद्धतीने शिकलो. नाहीतर आज आयुर्वेद देखील पाश्चात्य बुद्धीने शिकवला जातोय, त्याचा मी पण एक भाग झालो असतो.

  March 3, 2018


आरोग्य

आजचा आरोग्य विचार-भाग तीस

Category:

 

भक्तीमार्गातून मानवता, कर्म मार्गाने कृतज्ञता आणि संस्कृती संवर्धन किंवा ज्ञानमार्गाने जाऊन जीवनाचे इप्सित साध्य करण्यासाठी साधना आणि सत् चित आनंद प्राप्ती, हे तीन्ही मार्ग जगाला सर्वप्रथम आमच्याच स्वामी विवेकानंदांनी सांगितले होते.
हा इतिहास आम्ही विसरत चाललो आहोत

  March 2, 2018


आरोग्य

आजचा आरोग्य विचार – भाग तीस

Category:

 

देवदर्शनासाठी जायची सुद्धा लाज वाटू लागली. विज्ञान म्हणे देवाला मानत नाही. आपण देवाला मानले तर उगीचच आपणाला आर्थोडाॅक्स म्हटले जाईल, कदाचित याची लाजही वाटू लागली.

  March 2, 2018


आरोग्य

आजचा आरोग्य विचार – भाग एकोणतीस

Category:

 

डोक्याचं लालभडक कुंकु गेलं पण तोच लालभडकपणा डोक्यावरून उतरून ओठावर येऊन चिकटला. लिपस्टीक लावण्याने ओठ अधिक आकर्षक दिसतात. आपण सुंदर दिसावं. पण आपल्याकडे कुणी वाईट वासनामय नजरेनं बघू नये, शृंगार एवढा सोज्वळ असावा. हा झाला भारतीय दृष्टीकोन.

  March 1, 2018


आरोग्य

आजचा आरोग्य विचार – भाग अठ्ठावीस

Category:

 

जेवताना जेवणात केस सापडणे म्हणजे जेवणाऱ्या व्यक्तीचा अपमान समजला जाई. एवढे निशिद्ध समजले गेलेले केस सौंदर्य स्पर्धांमुळे जरा जोरातच फडफडायला लागले. केस जेवणात पडू नये म्हणून डोक्यावर टोपी घातलेली दाखवली की झाले. केस बांधून, छान वेणी घालून पोरगी आली म्हणजे ती बावळट झाली. असा गैरसमज कधी झाला आम्हाला कळलेच नाही.

  February 28, 2018


आरोग्य

आजचा आरोग्य विचार – भाग सत्तावीस

Category:

 

तेल गेलं तूपही गेलं, हाती धुपाटणं आलं. अशी एक म्हण आपल्याकडे होती. केसांना तेल लावायचं नाही, अंगाला अभ्यंग करायचं नाही, डोळ्यात काजळ घालायचे नाही, नाकात तेल सोडायचे नाही, कानात तेल ओतायचे नाही, आणि पोटासाठी तेल प्यायचे नाही. नाक, कान, डोळा, त्वचा, जीभ या ज्ञानेंद्रियांचे संरक्षण करणारी मुख्य भारतीय यंत्रणा ताब्यात घेऊन, आरोग्यामधे घुसखोरी सुरू झाली.

  February 27, 2018


आरोग्य

आजचा आरोग्य विचार – भाग सव्वीस

Category:

 

सुगंधी उटणे लावून केलेली आंघोळ साबण लावून केलेल्या आंघोळीपेक्षा कितीतरी पटीने आरोग्यदायी आहे. तरीसुद्धा आपण वैचारिक गुलामीमुळे स्वतंत्र विचार करू न शकल्याने साबणाच्या फेसातून बाहेर पडण्याची मानसिकताच नाहीये.

  February 26, 2018