वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
२६ जुलै २०१८ला कारगिल युद्धाला १९ वर्षे पूर्ण झाली. या युद्धानंतर सरकारने कारगिल रिव्ह्यू कमिटी स्थापन केली होती, या कमिटीला या युद्धाआधी झालेल्या चुका आणि त्यानंतर काय तयारी करायला पाहिजे याचे अवलोकन करण्याचे काम दिले होते. १९ वर्षानंतर या कमिटीने दिलेल्या मुद्द्यावर अंमलबजावणी झाली आहे की नाही हे बघणे जरुरी आहे.
July 26, 2018
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात शिंदे वासुली गावाजवळ उभ्या होत असलेल्या ‘डाऊ’ कंपनीच्या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी समस्त वारकरी रस्त्यावर उतरले आहेत. हा विरोध केल्याबद्दल वारकरी सेनेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी अटक केल्यामुळे संपूर्ण राज्यातील वातावरण तापले आहे. वारकरी संप्रदायाचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात अशी ज्येष्ठ कीर्तनकाराला अटक होत असेल तर बहुराष्ट्रीय कंपन्यांना संरक्षण देण्यासाठी सरकार कोणत्या थराला जाऊ शकते हेच त्यातून दिसून येते.
September 28, 2008
नवीन सरकार निवडून आले तरी ते काम 30 मे च्या आधी सुरुवात करण्याची शक्यता नाही. अश्या 80 दिवसा हून जास्त लांबलचक निवडणूक प्रक्रियेमुळे एक महत्त्वाचा निर्णय जो अडकुन राहिला आहे तेल आयातीचा. डोनाल्ड ट्रम्प यांनी १ मे पासुन इराणकडुन कोणीही तेल विकत घेउ नये असे निर्बंध लादले आहेत. इराणकडून कच्च्या तेलाची सर्वाधिक आयात चीन आणि भारत करतो. अमेरिकेच्या घोषणेनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव 74.38 डॉलर प्रतिबॅरल एवढे वधारले . नोव्हेंबरनंतरचा हा सर्वोच्च भाव आहे. ही दरवाढ 85 डॉलर प्रतिबॅरलपर्यंत पोहोचू शकते.
May 25, 2019
सौंदर्य कशात नाही, या भुतलावरील प्रत्येक व्यक्ती प्राणी, निसर्ग या प्रत्येक ठिकाणी सौंदर्य ओतप्रोत भरले आहे फक्त तुमच्याकडे ते सौंदर्य ओळखण्याची नजर असली पाहिजे. लहान बाळाच्या प्रत्येक हालचाली मधे सौंदर्य असते ते आपण सुध्दा अनुभवू शकतो फक्त त्या साठी आपल्याला त्याच्या आईची नजर असली पाहिजे. तिच्या नजरेतून जर आपण पाहिले तर आपल्याला त्या लहान बाळात सौंदर्य दिसून येईल.
September 17, 2018
मूल्ये नजरेला स्वच्छ करतात आणि एकाग्रता बहाल करतात. त्यामुळे पुढची वाट सुस्पष्ट दिसू लागते. स्व-जाणिवा जागृत झाल्या की आयुष्य अधिक खरं आणि कृतार्थ वाटायला लागतं. विकसित केलेली मूल्यव्यवस्था म्हणजे होकायंत्र! रस्ता हरपल्यावर आपल्याला दिशादर्शन करण्याचे आणि त्याद्वारे योग्य मार्गावर आणण्याचे कार्य आपली जीवनमूल्ये करीत असतात.
March 10, 2023
कवी नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ बी यांची इयत्ता सातवीच्या कुमारभारती पुस्तकात असलेल्या या कवितेचा आणि गाईंचा तसा काही संबंध नाही. आठ-नऊ वर्षांच्या आपल्या रूसलेल्या-रडवेल्या चिमुरडीची समजूत घालत असलेल्या बापाचे मनोगत कथन करणारी ही कविता…
December 12, 2017
स्क्वेअर-कट आणि खिलाडुवृत्तीसाठी विश्वविख्यात झालेला गुन्डप्पा विश्वनाथ
February 12, 2011
एका अभियांत्रिकी महाविद्यालयाची बातमी दिसली आणि एक फोटोही. तसे हे महाविद्यालय जुने, अर्थात फार बिनीचेही नाही पण वाचनात मात्र आहे. वेगवेगळ्या स्वयंघोषित सर्वेक्षणांमध्ये (ज्याच्या कुबड्या उच्च शिक्षणक्षेत्रातील महाविद्यालयांना आजकाल अपरिहार्य झाल्या आहेत) ते अधून-मधून झळकत असते आणि त्याच्या बातम्या समाजमाध्यमांवर अपूर्वाईने टाकल्या जातात.
January 13, 2023
मानवी मेंदूसारख्या गुंतागुंतीच्या किचकट अवयवाबद्दल आपणास खरंच कितपत माहिती आहे? उत्तर असं आहे – फारशी नाही. मेंदू या अवयवावर आजतागायत सर्वाधिक संशोधन झालेलं आहे आणि अजूनही सुरु आहे. मात्र हातात काही भरीव लागत नाही. शरीराचे अनभिषिक्त सत्ताकेंद्र मेंदू आहे. प्रसंग, परिस्थिती, घटना यांच्याबाबत अहोरात्र माहिती घेऊन त्यांवर तातडीने निर्णय घेणे हे मेंदूचे प्राथमिक कार्य असते. सर्व अवयवांमध्ये सुसूत्रता राखणे आणि शरीराचे कामकाज सुरळीत सुरु ठेवणे यामध्ये मेंदू गुंतलेला असतो.
July 4, 2021
माझा जायचा यायचा रस्ता पूर्व पश्चिम असा आहे. डोंगरातून जाणारा रस्ता असल्यामुळे, काही ठिकाणी रस्ता छोट्या छोट्या खिंडींमधून जातो. त्यामुळे खिंडीची एक भिंत उत्तराभिमुख असते तर दुसरी दक्षिणाभिमुख. हे ठिकाण बरेच उत्तरेला असल्यामुळे हिवाळ्यामधे सूर्य नेहमी दक्षिण दिशेलाच दिसत असतो. त्यामुळे बरेचदा सूर्यप्रकाश पडला, की दक्षिणाभिमुख भिंतीवरचे बर्फ वितळून जाते, तर उत्तराभिमुख भिंतीवर सूर्यकिरणे न पडल्यामुळे, तिथले बर्फ तसेच साचलेले रहाते. त्यामुळे रस्त्यावरून जाताना, खिंडीची एक बाजू बर्फाच्छादित तर दुसरी बाजू उन्हात झळकणार्या काळ्या कातळांची, असं मोठं मजेशीर दृश्य दिसतं.
बर्फाची रूपं देखील वेगवेगळी. सकाळच्या कोवळ्या उन्हात चमकणारं डोंगरमाथ्यावरचं सोनेरी बर्फ बघितलं, की अमेरिकेत असल्याचा विसर पडतो. हिमालयाशी तुलना करणाचा प्रश्नच नाही, पण कधी काळी भल्या पहाटे उठून बघितलेला हिमालयातला सूर्योदय आठवत रहातो. कैलास पर्वतावर खरोखरच शंकराचं जागृत स्थान असेल की नाही कोणास ठाऊक, पण सकाळच्या किरणांत चमकणारी बर्फाच्छादित शिखरं बघितली की, दैवी सौंदर्याचा साक्षात्कार मात्र होतो - मग ती हिमालयातील असोत की अमेरिकेतली! सकाळच्या कोवळ्या उन्हातली बर्फावरची नारिंगी छटा वेगळी आणि संध्याकाळच्या सरत्या उन्हातली बर्फावरची गुलाबी, किरमिजी छटा वेगळी! लख्ख उजेडातला, उन्हात चमकणारा आणि डोळे दिपवून टाकणारा दिवसाचा बर्फ वेगळा आणि रात्री, चंद्राच्या मंद प्रकाशात, रुपेरी वाळूच्या अथांग किनार्यावर उभं असल्याचा भास करणारा बर्फ निराळा !
हिवाळ्यात ओढे, डबकी, नद्यांची रूपं बदलतात. ओढ्या, नद्यांचं पाणी आपला खळाळता प्रवाह विसरून संथ वहायला लागतं. थंडीच्या वाढत्या कडाक्याबरोबर साचलेल्या तलावांत, रस्त्याकडेच्या डबक्यांतील पाणी थिजून जातं. वहात्या पाण्यात मधे मधे थिजलेल्या पाण्याची बेटं तयार व्हायला लागतात. सस्कुहाना नदीच्या पात्रातून छोटे छोटे हिमनग वहात जाताना दिसतात. तापमान फारच खाली गेलं की नद्या, ओढ्यांची पात्र पूर्णपणे बर्फाच्छादित होऊन जातात. पुढे मग जेंव्हा पाणी पुन्हा वहातं व्हायला लागतं, तेंव्हा पात्राच्या मधला पाण्याचा पट्टा प्रथम वहाता होतो. पाण्यावर साठलेलं बर्फ वहात्या पाण्याच्या प्रवाहामुळे, नदीच्या काठांकडे लोटलं जातं. नदीचं पात्र दोहोकडून अशा बर्फाच्या पांढर्या शुभ्र किनारीवाल्या साडी सारखं दिसायला लागतं.
माझ्या जायच्या यायच्या रस्त्यावर टेकड्यांच्या उतारावर आणि नदीच्या काठाकाठाने अस एक मोठं गॉल्फ कोर्स आहे. हिवाळ्यात ते पूर्णपणे बंद असतं. त्याच्या प्रशस्त उतारावर साचून राहिलेला शुभ्र बर्फ, महिनेन महिने तसाच पडून राहिलेला असतो. ना त्यावर कुणाच्या पाऊलखुणा उमटतात ना कुणी तो इतस्तत: सरकवायचा प्रयत्न करतं. त्या गॉल्फ कोर्सवर अधे मधे लावलेल्या सूचिपर्णी वृक्षांच्या लांबच लांब काळ्या सावल्या तेवढ्या त्या अनाघ्रात बर्फाला साथ देत उभ्या असतात.
रानावनाला पडलेला बर्फाचा वेढा ३-४ महिने तरी कायम असतो. झाडांच्या मोडून पडलेल्या फांद्या, सुकलेल्या काटक्या, वाळलेली पानं, पिवळं पडलेलं गवत, या सर्वांवर बर्फाने आपली रुपेरी मोहर बसवलेली असते. झाडांच्या फांद्यांवरचं बर्फ अर्धवट वितळून, फांद्यांचा वरचा भाग पांढरा तर खालचा भाग काळसर झालेला असतो. शेतांत, मळ्यांत, सुकलेल्या गवताची आणि मक्याच्या कापलेल्या खुंटांची टोकं बर्फाच्या आवरणाखालून डोकावत असतात. त्यात कधी कधी टर्कीचा थवा किडे वेचताना दिसतो.
मार्चच्या सुरवातीपासूनच येणार्या बदलाची चाहूल लागायला लागते. नद्या ओढ्यांचं पाणी पूर्ववत खळाळतं व्हायला लागतं. अचानक त्या पाण्यात बदकं अवतरतात. हिवाळ्यात कुठे दडून बसलेली असतात कुणास ठाऊक! पण रस्त्याकाठच्या ओढ्यांमधे बदकिणी आणि त्यांची पिल्लं, पाणी वहातं व्हायला लागल्याची जाणीव करून देतात.
असंच एखाद्या दिवशी आकाशातून दूरवरून ओळखीचा असा गीज (geese) चा आवाज येतो. वर बघावं तर खूप उंचावरून गीज चा थवा आपल्या ठरावीक इंग्रजी ‘V’ अक्षरासारख्या आकारात उडत असतो. स्थलांतर करून हे पक्षी आता आपल्या उत्तरेच्या प्रवासाला लागलेले असतात. पुढचा महिनाभर, दिवसा रात्री, आपल्या आवाजाने लक्ष वेधत आणि निसर्गाचा अचंबित करून टाकणारा एक चमत्कार दाखवत, हे पक्षी ऋतुचक्राचे एक आवर्तन पूर्ण करत असतात.
August 16, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti