(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • रेल्वे प्रवासाचं नियोजन – भाग १

    लांब पल्ल्याच्या प्रवासीगाड्यांचं नियोजन

    मेल, एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस, दुरांतो एक्सप्रेस, अशा बारा तासांपासून अगदी ऐंशी ते पंच्याऐंशी तासांचा प्रवास करणाऱ्या निरनिराळ्या गाड्या आहेत. या गाड्यांना लांब पल्ल्याच्या गाड्या म्हणतात. त्यांचं नियोजन विविध विभागांमार्फत होत असतं.

    इंजिनड्रायव्हर्स, गार्ड, हेल्पर, तिकीट तपासनीस, या सर्वांच्या एकत्रित काम करणाऱ्या गटाला 'क्रू' म्हणतात. या सर्वांची ड्यूटी साधारणतः आठ ते दहा तासांनंतर समाप्त होते. यासाठी रेल्वेमार्गावरील ज्या स्टेशनवर 'क्रू' बदलला जातो ते स्टेशन सर्व सोयींनी परिपूर्ण असावं लागतं. त्या कर्मचाऱ्यांसाठी विश्रांतीच्या जागा ठीकठाक असाव्या लागतात. महत्त्वाचं म्हणजे इंजिनाची तत्परतेनं करावी लागणारी तपासणी, प्रत्येक डब्याची तांत्रिक तपासणी, डब्यातील पाणीपुरवठा व स्वच्छता, खानपानाची सोय, ह्या सर्व गोष्टी दहा मिनिटांत पूर्ण कराव्या लागतात. पूर्वीच्या काळी अशा जंक्शनस्टेशनवर गाडी अर्धा तास थांबत असे, परंतु आजकाल गाडी लवकरात लवकर स्टेशनातून बाहेर काढावी लागते. या गाड्यांचे इंजिनड्रायव्हर्सही सहा ते आठ तासांनंतर बदलले जातात.

    प्रत्येक इंजिनमध्ये एक जड लाईन बॉक्स ठेवलेली असते, ज्यामध्ये संपूर्ण मार्गाचं तपशीलवार टाईम टेबल, ट्रॅकची सखोल माहिती, आवाज करू शकणारे व उजेड पाडणारे छोटे बॉम्बस्, सुटे दिवे व इतर छोटी-मोठी आयुधं असतात. ही पेटी जड असून, रेल्वेपोर्टर एका इंजिनामधून दुसऱ्या इंजिनात तिची ने-आण करतात.

    इंजिनड्रायव्हरना गाडी सुटण्याच्या वेळेआधी तासभर यार्डात जाऊन इंजिनाची तपासणी करून ते प्लॅटफॉर्ममधील उभ्या असलेल्या गाडीला लावावं लागतं. राजधानी एक्सप्रेससारख्या अति-महत्त्वाच्या गाडीचे ड्रायव्हर त्यांच्यावरील जोखमीचे काम करताना पूर्ण दक्षता घेतात. इंजिनड्रायव्हरजवळील वर्किंग टाईम टेबल हे सर्वांर्थानं परिपूर्ण असतं. त्यामध्ये सर्व लेव्हल क्रॉसिंग्ज, छोटी गेट्स, वळणं, पूल, नद्या, मार्गाची चढण, उतार, संपूर्ण मार्गावरील सिग्नल्सच्या जागा, तत्काळ वैद्यकीय केंद्रं, या सर्वांची पूर्ण माहिती दिलेली असते. काही ठिकाणी तांत्रिक थांबे असतात, जे प्रवासी टाईम टेबलमध्ये नसतात.

    प्रत्येक गाडीला Booked Maximum Speed, Commereial Speed आणि Maximum Permitted Speed यांचं कोष्टक आखून दिलेलं असतं. काही कारणाने गाडी उशिरा धावत असेल, तर अशा वेळी गाडी वरील कोष्टकाप्रमाणे वेगाने जाऊन वेळ भरून काढते. डबे ओढण्याची प्रत्येक इंजिनाची किती क्षमता आहे हे निश्चित केलेलं असतं. त्यानुसार अगदी जरूर पडल्यास पुढील बाजूस दोन इंजिनं जोडली जातात. २५०० कि.मी. प्रवास झाल्यानंतर प्रत्येक इंजिनाची कसून तपासणी होते. ३० ते ३५ दिवसांनी आयए, आयबी, आयसी अशा श्रेणीत तपासणी होत असते. प्रत्येक इंजिन कोणत्या शेडमध्ये तपासणीसाठी पाठवायचं हे ठरलेलं असतं. त्याप्रमाणेच ते गाडीला लावण्याचा क्रम आखला जातो.

    'ट्रेन सुपरिटेंडन्ट' हा एक महत्त्वाचा अधिकारी राजधानी एक्सप्रेस, दुरान्तो एक्सप्रेस, अशा काही खास गाड्यांसाठी नेमलेला असतो. गाडीतील संपूर्ण अंतर्गत व्यवस्थाप्रमुख म्हणून त्याचा हुद्दा असतो. सर्व प्रवाशांची झोपण्याची, जेवणाखाण्याची व्यवस्था, तसंच त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास तत्परतेनं त्यांना मदत करणं ही या अधिकाऱ्याची जबाबदारी असते. या विशेष गाड्या रेल्वेमंत्र्यांच्या आधिपत्याखाली असतात. अनेक परदेशी प्रवासी अशा गाड्यांनी प्रवास करतात. त्यामुळे गाडीतील व्यवस्थापनाचा दर्जा उत्तमच राहील याकडे अधिकाऱ्यांचा नेहमीच कटाक्ष असतो. गाडी संपूर्ण प्रवास बरोबर वेळेवर करत आहे किंवा नाही हे पाहण्याकरता मार्गावर १५० ते २०० कि.मी. अंतराचे 'कंट्रोल सेक्शन' असतात. ते सर्व एकमेकांशी टेलिफोननं जोडलेले असतात. या सर्व विभागांवर एक मुख्य नियंता असतो. गाडीच्या वेळापत्रकावर काटेकोरपणे लक्ष ठेवलं जातं. समजा, अपघात झाला, तर तत्काळ आपत्कालीन यंत्रणेचा उपयोग करण्याची जबाबदारी मुख्य नियंत्यावर असते.

    मुख्य व अतिमहत्त्वाच्या स्टेशनवरील कंट्रोल रूममध्ये भव्य कंट्रोल पॅनेल असतं, ज्यावर धावणारी प्रत्येक गाडी टिंबांच्या स्वरूपात दाखविली जाते. तांबडा ठिपका म्हणजे मेल व एक्सप्रेस गाड्या, निळा रंग पॅसेंजर गाडीचा, तर काळा रंग मालगाडी दर्शवितो. काही कारणाने गाडी मध्येच थांबून राहिली असेल तर ती ठळक जाड रेषेत दाखविली जाते.

    'केबिन कंट्रोल क्रू' हे सर्व रेल्वेमार्गावरील सांधे, सिग्नल व त्यांची इंटर-लॉकिंग अरेंजमेंट या सर्व गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष देतात, ज्यामुळे गाडी सुरक्षितपणे स्टेशनात शिरते व बाहेर पडते. गाडी कोणत्या प्लॅटफॉर्मवर घ्यायची हे मुख्य स्टेशनमास्तर ठरवितो. महत्त्वाच्या गाड्यांचे, जेथून गाडी सुरू होते व ज्या ठिकाणी शेवटचा थांबा असतो तेथील, प्लॅटफॉर्मस ठरलेले असतात. छोट्या स्टेशनात स्टेशनमास्तरना ही जबाबदारी एकट्याने सांभाळावी लागते.

    मालगाड्या एकदा मुख्य यार्डातून निघाल्या, की त्यांना मधल्या स्टेशनचे थांबे नसतात. त्यामुळे अशा पट्ट्यात त्या वेगाने जातात. जलद मालगाडी-सेवा (मुंबई ते दिल्ली) घेऊन जाणाऱ्या मालगाड्यांना प्रथम प्राधान्य दिलं जातं, परंतु इतर मालगाड्यांना मात्र पक्कं वेळापत्रक नसतं.

    एखाद्या वेळी तांत्रिक कारणामुळे डबे जोडण्यास विलंब होतो व त्यावेळी गाडी सुटण्यासच उशीर होतो. हे सर्व सांभाळणं म्हणजे एक कसरतच असते.

    -– डॉ. अविनाश वैद्य

      October 21, 2022


  • खानदानी ओल्ड ब्युटीज !!

    3-300

    5-300

    माझे पुणे स्थित ज्येष्ठ मित्र श्री.संजीव वेलणकर (आकाशी रंगाचा अर्ध्या बाह्यांचा शर्ट घातलेले) व त्यांचे बंधू श्री. दीपक वेलणकर (कलेक्शन खरं यांचं) ह्या बंधूद्वयांनी प्रेमाने जीवापाड जपलेल्या त्यांच्या 'खानदानी ओल्ड ब्युटीज..!!'

    सर्व 'महाराण्या'चालण्यात आजही तेवढ्याच डौलदार आहेत, जेवढ्या त्या त्यांच्या तारूण्यात होत्या..

    मरून आणि पिवळ्या रंगाच्या 'हर हायनेसां'चं वय ८० वर्षांच्या आसपासचं आहे..

    सोबत आमचे रसिक दोस्त..काळा टी-शर्ट व गॉगलधारी मधू साठे, काळसर निळ्या प्रिंटेड शर्टात संजय प्रभुघाटे व लाल रंगातल्या टी-शर्टातले मजबूत बांध्याचे मनोज सावंत..

    -- गणेश साळुंखे

      August 11, 2016


  • अविश्वसनीय….. बर्फावरची करामत…..

    अविश्वसनीय….. बर्फावरची करामत…..

    भारतीय संगीताच्या तालावर Perfection चा एक नमुना

      September 3, 2010


  • कल्याणवृष्टिस्तव – २

    एतावदेव जननि स्पृहणीयमास्तॆत्वद्वन्दनॆषु सलिलस्थगितॆ च नॆत्रॆ ।
    सान्निद्ध्यमुद्यदरुणायुतसॊदरस्य
    त्वद्विग्रहस्य परया सुधयाप्लुतस्य ॥ २ ॥

    अत्युत्तम साधकाची मानसिक अवस्था कशी असते? याचे नेमके वर्णन करताना आचार्यश्री या श्लोकात म्हणतात,

    एतावदेव जननि स्पृहणीयमास्तॆ- हे आई माझी एवढीच स्पृहा म्हणजे इच्छा आहे. कोणती ते सांगताना आचार्यश्री म्हणतात,

    त्वद्वन्दनॆषु - तुझ्या वंदन समयी, अर्थात नमस्कार करीत असताना, सलिलस्थगितॆ च नॆत्रॆ- डोळ्यात येणाऱ्या अश्रूंनी माझे नेत्र स्थगित होतील, अर्थात यामुळे मला दिसणे बंद होईल.
    ज्यावेळी असा साधक आईची चरण वंदना करण्यासाठी वाकेल त्यावेळी डोळ्यात आलेल्या आनंदाश्रूंनी त्याला ती चरणकमले देखील दिसणार नाहीत. त्यावेळी त्याची प्रार्थना आहे की,

    उद्यत् - उगवणाऱ्या

    अरुण- सूर्य सारथी, प्रभातीचा लालिमा.

    अयुत- कोट्यावधी

    सॊदरस्य- समान.
    अर्थात प्रभाती पसरलेल्या अरुणोदय कालीन लालिम्याच्या कोट्यावधी पट अधिक तेजस्वी असलेल्या,

    परया सुधयाप्लुतस्य- परम म्हणजे श्रेष्ठ सुधा म्हणजे अमृताने अर्थात आनंदाने प्लुत म्हणजे परिपूर्ण भरलेल्या.

    त्वद्विग्रहस्य सान्निध्यम् - तुझ्या विग्रह म्हणजे स्वरूपाचे, सान्निध्य म्हणजे जवळीक, मला प्राप्त होवो.

    अर्थात ज्या वेळी मी वंदन करेल आणि माझ्या डोळ्यातील अश्रूंनी तुझी चरणकमले मला दिसणार नाही, त्यावेळी हे आई जगदंबे ! मला दिसत नसले तरी, तुझ्या शिवाय मला कोणीही नाही हे, तुला दिसत असल्याने तू दूर जाऊ नकोस.

    -- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

      April 13, 2020


  • तेथे कर माझे जुळती…….

    वळवाचे पाऊस सुरू झाले,पहिल्या पेरण्या झाल्या की वारक-यांना वेध लागतात पंढरपूरच्या विठुरायाच्या भेटीचे. मनामनात गजर सुरू होतो “ विठ्ठल विठ्ठल , जय जय पांडुरंग हरी...” वेध लागतात पंढरपूरच्या वारीचे. मी अगदी लहानपणापासून ज्ञानोबांच्या पालखीचे दर्शन, वारीला जाण्याची गडबड बघत व अनुभवत आलेली आहे. पण ते सर्व पुण्यासारख्या शहरी वातावरणात आलेल्या वारीची. प्रत्यक्ष वारक-यांशी बोलणे किंवा त्यांची पंढरपूरपर्यंत चालत जाण्याचे श्रम करण्यामागची भावना जाणून घेणे कधी जमलेच नव्हते. गतवर्षी योगायोगाने तुकारामांची पालखी जेव्हां बारामतीत पोहोचते तेव्हां आम्ही तिथेच होतो. त्यामुळे आसपासच्या छोट्या गावातून येणारे वारकरी जवळून पहाण्याचा योग आला.

    सकाळपासूनच वेगवेगळ्या खेड्यापाड्यातून छोट्या मोठ्या दिंड्या यायला सुरूवात झाली होती. आम्ही जिथे उतरलो होतो तो रस्ता भर वस्तीतला, गजबजलेला होताच. पण या दिंडीतल्या वारक-यांच्यामुळे आज वेगळाच वाटत होता. उंच काठीवर डौलात फडकत असलेल्या भगव्या पताका एका खांद्यावर मिरवत, दुस-या खांद्याला अडकवलेली पिशवी सावरत, डोक्याला मुंडासे, लांब बाह्यांचा पांढरा सदरा,पांढरे धोतर व पायात चपला अश्या वेशातले वारकरी तोंडाने विठ्ठलाचा गजर करत रस्त्याने लगबग करत चालले होते. त्यांच्या मागोमाग गोल किंवा नऊवारी साडीतल्या नथी घातलेल्या बायका भराभर नामस्मरण करत चालल्या होत्या.काही बायकांच्या काखेत स्वच्छ चकचकीत पाण्याच्या तांब्यापितळेच्या कळशा तर काहींच्या डोक्यावर छान रंगवलेले तुळशी वृंदावन होते. त्यातली तुळस त्यांच्या चालण्याच्या ठेक्याबरोबर डुलत होती.बहुतेक जणांच्या गळ्यात लांबलचक दोरीला बांधलेले टाळ होते.कुणाकुणाच्या खांद्यावर वीणा तर कुणाच्या हाती चिपळ्याही होत्या.एका ठेक्यात येणारा टाळांचा आवाज आसमंत भरून टाकत होता.

    दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणांहून लोक येत होते, तुकारामांची पालखी ज्या भल्यामोठ्या मैदानात उतरते त्याच्या जास्तीत जास्त जवळ आपापली पडशी/पिशवी ठेऊन जागा मिळवून विसावत होते.संध्याकाळच्या सुमारास रस्ता परत एकदम गजबजला. विठ्ठलाचा गजर दुमदुमू लागला, त्याच्या जोडीला “ ज्ञानोबा माऊली तुकराम ” हाही गजर सुरू झाला.या सर्वांच्यावर आवाज काढत टाळ दुमदुमू लागले. रस्त्यात एकच लगबग सुरू झाली. प्रत्येक वारक-याची धावपळ पालखीला सामोरे जाण्यासाठी सुरू झाली. अशातच तुकाराम महाराजांची पालखी गावच्या वेशीवर पोहोचल्याची बातमी आली आणि वारक-यांची उत्सुकता व आनंद त्यांच्या चेह-यावर ओसंडून जायला लागला. हातातल्या टाळांचा आवाज वाढला, तोंडाने होणारा विठ्ठलाचा गजर गगनाला भिडला.वेशीवर योग्य आगत स्वागत होताच पालखी मंडपाच्या दिशेने येऊ लागली. तुतारीचा आवाज पालखी जवळ आल्याची कल्पना देत होता.भालदार चोपदार आपापल्या पारंपारिक वेशभूषेत पालखीवर चवरी ढाळत होते, उत्तम सजवलेला घोडा गर्दीच्या मधोमध शांतपणे पण डौलात चालला होता. ना त्याला माणसांच्या गर्दीची भीती वाटत होती,ना माणसांना तो उधळेल याची ! टाळांच्या, तुतारीच्या, कर्ण्यावरून होणा-या मोठ्या आवाजातल्या सूचनांचा कोणताही विपरित परिणाम त्याच्यावर होत नव्हता. एका ठेक्यात दुडक्या चालीतले, इकडेतिकडे पहात जसे काही तुकाराम महाराज त्याच्यावर स्वार आहेत, त्यांना सांभाळणे आपले कर्तव्य आहे अशा अविर्भावातले घोड्याचे चालणे लक्ष वेधून घेत होते. पालखीला लोटांगण घालणारे, पालखीतल्या पादुकांना हात लाऊन नमस्कार करणारे, पालखी ओढणा-या बैलांच्या पायावर पाणी घालणारे यांची एकच गर्दी झाली. जो तो भक्तीभावात मग्न होता. दोन तगड्या बैलांच्या गाडीवर तुकाराम महाराजांचा फोटो व पादुका असणारी पालखी विसावलेली होती. पालखी उत्तम रंगकाम केलेली फुलांनी सजवलेली होती. दुरूनही पादुकांचे दर्शन घेता येत होते. वारकरी आनंदाने नुसते नाचत होते. मुखाने अखंड विठ्ठलाचे नामस्मरण, तुकारामांचा जयजयकार चालू होता. स्त्रिया,पुरूष,गरीब,श्रीमंत,आबाल वृद्ध यांची सरमिसळ झाली होती. प्रत्येकजण भक्तिरसात मग्न होता.पालखी मंडपात मुक्कामाला पोहोचली आणि रस्त्यात थोडीफार शांतता पसरली.

    रात्री आम्ही मंडपात पादुकांचे दर्शन घेण्यासाठी गेलो,तर तिथले वातावरण वेगळेच होते.मंडपात कीर्तन चालू होते. तबलजी व हार्मोनियम वादक यांच्या मध्ये कपाळावर बुक्का,डोक्यावर पागोटे, पांढरा सदरा, पांढरे धोतर, कमरेला कसलेले लाल मोठ्या काठाचे उपरणे,हातात चिपळ्या, गळ्यात हार अशा पोशाखातले मध्यम वयाचे कीर्तनकार डोळे मिटून कीर्तनाला उभे होते. त्यांच्या मागे २०-२२ टाळकरी दिवसभराच्या चालण्याचे श्रम विसरून हातात टाळ घेऊन गोलाकार उभे होते.कीर्तनकारांनी “पांडुरंग हरी” चा जयजयकार करताच मंडपात एकच शांतता पसरली व कीर्तन रंगू लागले.रात्र चढायला लागली तसा उत्साह वाढायला लागला.कीर्तनकारांच्या इशा-यानुसार मागचा वारक-यांचा गोलाकार एका तालात डोलायला, नाचायला लागला.कीर्तन रंगू लागले,पादुकांच्या दर्शनासाठी म्हणून गेलेले आम्ही सुद्धा बघता बघता त्यात तल्लीन झालो.

    सकाळी जाग आली ती रस्त्यावरच्या गडबडीने. छोटे टेंपो घेऊन माणसे आली होती त्या माणसांनी टेंपोतून येताना मोठमोठ्या पातेल्यातून पोहे, खिचडी, पराठे असे पदार्थ आणले होते. वारक-यांना बोलावून प्रत्येकाच्या हातात यातील काही ना काहीतरी दिले जात होते. पंढरीला जाणा-या सर्वांसाठी हे अन्नदान चालू होते. आपण जाऊ शकत नाही तर निदान जे जाताहेत त्यांच्या रूपाने विठ्ठलाला आपल्यातर्फे नैवेद्य पोहोचावा ही या मागची भावना ! वारकरी याचा आस्वाद घेऊन तृप्त होत होते. आता त्यांची पुढच्या प्रवासाला जाण्याची लगबग चालू झाली होती.पालखी तयार झाली होती. पालखीचा अश्व, भालदार चोपदार सज्ज होते. तुतारीचा इशारा होताच परत भजनाचा दमदार आवाज आसमंत भरून टाकू लागला, टाळ वाजू लागले, नगारे घुमू लागले. आम्हीही पालखीला निरोप देण्यासाठी रस्त्यावर उतरलो. हे सर्व जवळून बघता आले याची धन्यता वाटत होती.हळू हळू पालखी, तिच्या बरोबरचा लवाजमा पुढे पुढे सरकायला लागला. रस्त्यावरची गर्दी पांगू लागली.आता तुरळक तुरळक वारकरी मागे उरले. त्यातच एक म्हातारा वारकरी काठी टेकत टेकत हळू हळू चालत होता. त्याला तेवढ्या श्रमानेही तहान लागली असावी. त्याला पाणी देण्यासाठी मी त्याच्याजवळ गेले. अणि इतके दिवसात न मिळालेली एका सामान्य वारक-याशी बोलण्याची संधी मला मिळाली.

    “बाबा, तुम्ही कुठून आलात?”
    “माउली,आमचं गाव इथून धा मैल तरी दूर असलं!”बाबा घाम पुसत म्हणाले.
    “काल गावापासून चालतच आलात की काय?”
    “तर वो! फाटं फाटं निघालो. मला चालाया येळ लागतोय. म्हनूनशान समदी गाववाली निघायच्या आत म्या रस्ता धरला. काल पालखी अदुगर पोचलो.”
    “मग इथूनच परतणार काय? चालायला त्रास होतोय म्हणून विचारलं.”
    “त्यात काय, माऊली,पाय हाएत तर त्ये दुकणारच की वो ! असं त्याचं कवतूक करून चालतय व्हय! जास्त तरास वाटल तर कलाकभर बसायच आनी फुढ जायाचं!”
    “म्हणजे बाबा, पंढरी पर्यंत जाणार म्हणाकी तुम्ही !त्याच्या पुढं दर्शनासाठी भल्यामोठ्या रांगेत उभ रहायच,त्या गर्दीत दर्शन घ्यायच आणि परत फिरायच. एवढ सगळ झेपेल का तुम्हाला?”
    “इटुराया घेईल की काळजी माजी. म्या कशाला इचार करू? पंढरी पत्तुर जायाच ,कळसाला हात जोडायचे ,रातभर कीर्तन भजन ऎकायच आन परत माघारी फिरायच.दरसाल जातोय म्या. एकडाव बी चुकलो न्हाई.”
    “बाबा, इतक्या दूर जाता तर दर्शन तरी नीटपणे घेता येते का?”
    “माऊली, इटुरायाच्या द्येवळात मुंगीलाबी जागा नसतीया. तिथं कशाला जायाचं?”
    “म्हणजे दर्शन न घेताच तुम्ही परत फिरणार?”माझ्या पांढरपेशी मनाला इतक्या दिवसांची पायपीट ,श्रम करून देवदर्शन न घेताच परतण काही केल्या पटत नव्हत.

    म्हातारा मिशीतल्या मिशीत हसला. म्हणाला “माउली, तू बी एक माउली हायेस,तुजी लेकरं जवा गावावरून येतात तवा तू काय घरात बसून असतेस का? दारात येत न्हाईस? तसाच माजा इटोबापन.आमी त्येची लेकरं त्यो माउली. आमास्नी येताना बगून त्यो काय द्येवळात दडी मारून बसल व्हय? अग, आमी जवा वाखरीला ४ मैलावर येतो ना तवाच त्यो द्येवळाच्या कळसावर चढतो आन आमची वाट बघतो बघ. त्यो आमाला लांबूनच वळकतो. म्हनून्शान त्येला तिथूनच कळसावर बसलेला बगतो, हात जोडतो आनी परतीची वाट धरतॊ.”

    म्हाता-याचे बोलणे ऐकताना मी त्याच्या शब्दातील भक्तीभावाने इतकी भारवून गेले की त्याच्या पुढे मी नतमस्तक झाले. आपोआप माझे हात जुळले, डोळे पाण्याने डबडबले, त्याच्या सामान्य रूपात मला दिव्यत्वाची प्रचीती आली, त्याच्या रूपाने मला पांडुरंगच भेटल्याची जाणीव झाली व मनात शब्द उमटले “दिव्यत्वाची जेथ प्रचिती ,तेथे कर माझे जुळती.”

    “पांडुरंग हरी”.

    -- अनामिका बोरकर
    ए १८, वुडलॅंड्स, गांधी भवन मार्ग,
    कोथरुड, पुणे ४११ ०३८.

    ९८१९८ ६९०९०

      June 30, 2019


  • रताळी

    रताळे हे कंदमूळ आहे. रताळी हे एक उपवासाचे पदार्थ. तसेच रताळे हे प्रत्येक माणसाला आवडतेच. लहान मुलांना भूक लागली तर आई लागलीच दूध व साखर घालून मुलाला देतात. रताळे हे प्रत्येकासाठी अत्यंत पौष्टिक अन्न आहे. बटाट्याप्रमाणेच रतळ्याचेही उपयोग आहेत. भरपूर जीवनसत्त्वे त्याचप्रमाणे भरपूर खनिजे तसेच भरपूर प्रथिने यात आहेत. रताळ्याचा उगम कसा व कुठून झाला हे अज्ञात आहे. मात्र रताळ्यात अमेरिकेमध्ये तयार होते तसेच आफ्रिका व काही ठिकाणी दक्षिण आशियातही मिळते. मात्र फार पूर्वीपासून रताळा हे भारताला परिचित आहे. तसे बघितले तर फूड अँड अॅग्रीकल्चरल ऑर्गनायझेशन (एफ.ए.ओ.) यांनी सर्व जगात संवर्धन केल्याप्रमाणे संबंध जगात रताळ्याचे उत्पादन जास्त असते. चीनमध्ये जगात दुसऱ्या नंबरवर रताळ्याचे उत्पादन होते.. अगदी नवीन अमेरिकन शेतकरी डॉ. मॅथ्यू मॉरिसन याने रताळ्याचे अनेक पृथ्थकरण करून त्यातील उपयोगाकरिता पुढे आणली. रताळे ही कोणीही कुठून आणले तरी अत्यंत पौष्टीक असे जाहीर केले. याचे कारण म्हणजे रताळे कोठेही कोणत्याही हवामानात वापरता येते. आश्चर्य म्हणजे रताळी अनेक देशात निर्यातही करतात, हे विशेष.

    आता रताळी सर्वत्र उपलब्ध असल्याकारणाने रताळ्याचे अनेक प्रकार करण्यात येतात. अगदी बटाटे उकडून बटाट्याची भाजीदेखील उपवासाला चालते म्हणजे ते एक पूरक अन्न चालू शकते. रताळ्याची कापा बटाट्यासारखी तेलात अगर तुपात तळून चांगल्या लागतात. रताळे किसणीने किसून त्याची पॅटीस अथवा अनेक प्रकार उपयोग करता येतो. तसेच लहान मुलांचे अथवा ज्येष्ठ नागरिकांचे पाय दुखत असल्यास रताळ्याचा उपयोग अवश्य करता येतो. थोडक्यात रताळे हे एक चविष्ठ आणि निरनिराळ्यात प्रकारात केलेली अपूर्व देणगीच म्हणावे लागेल.

    रताळ्यात सगळे आढळते. त्यात जेजे आहे ते ते सर्वत्र मिळते.

    १०० ग्रॅम रताळ्याचा गुणधर्म खालीलप्रमाणे आहे.

    – मदन देशपांडे

      December 4, 2023


  • आजचा आरोग्य विचार – भाग पाच

    एक काळ असा होता, की पाश्चात्यांना पोट कसे भरावे याची चिंता होती. संस्कृती, संस्कार हे शब्द त्यांच्या खिजगणतीतही नव्हते. लज्जारक्षण कसे करावे, हे त्यांना माहित नव्हते. अर्थात अजून तरी कुठे कळले आहे म्हणा ! लज्जारक्षण करण्यासाठी चांगले कपडे घालायचे असतात, हा उद्देश नाहीच आहे. शरीर आणखी आकर्षक कसे दिसेल यासाठीच आज ते कपडे घालतात. त्यातूनच रॅम्पवाॅक कॅट वाॅक, फॅशनशो आणि स्त्री शरीराचा बाजार इ. प्रकार पुढे येत गेले.

      February 5, 2018


  • वॉरेन बफेट गुंतवणुकीचे महागुरू

    शेअर्स किंवा स्टॉक मार्केट गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येकानेच वॉरेन बफेट यांचं नाव ऐकलं असतं . आजच्या घडीला जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीत गणना होणाऱ्या वॉरेनना गुंतवणूक विश्वाने ‘ ओरॅकल ऑफ ओमाहा ‘ असं नामाभिधान प्रदान केलं आहे .

      November 1, 2022


  • यलोस्टोनची गुपितं

    अमेरिकेतल्या रॉकी माउंटन्स या डोंगराळ परिसरात यलोस्टोन राष्ट्रीय उद्यान वसलं आहे. नैसर्गिक वैविध्यानं नटलेल्या या राष्ट्रीय उद्यानाचा काही भाग, त्यातील गरम पाण्याचे कारंजे, झरे, तलाव, तसंच वाफेचे स्रोत यांसाठी जगप्रसिद्ध आहे. गरम पाण्याचे आणि वाफेचे सुमारे दहा हजार स्रोत इथे सापडले आहेत. यांतला दर तास-दोन तासांनी उसळणारा ‘ओल्ड फेथफूल’ हा गरम पाण्याचा कारंजा, तसंच ‘ग्रँड प्रिझ्मॅटिक स्प्रिंग’ हा गरम पाण्याच्या झऱ्यामुळे निर्माण झालेला रंगीबेरंगी तलाव, या जागा तर वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

      July 23, 2022


  • श्री गणेश भुजंगस्तोत्रम् – भाग ५

    भगवान श्रीगणेशांच्या निवास लोकांला ‘श्रीस्वानंदलोक’ असे म्हणतात. तेथे भगवान गणेश आपल्या सहस्रदल कमळावर विराजमान असतात. त्यांच्या सेवेसाठी अष्ट महानायिका सुसज्ज असतात.

      January 17, 2020