साहित्य - ललित

बालचरित्

Category:

 

श्रीमद्भागवत पुराण आणि इतर ग्रंथातील भगवान श्रीकृष्णांच्या बाललीलां वर आधारित असलेले महाकवी भास यांचे अत्यंत सुंदर नाटक म्हणजे बालचरित्या पाच अंकी नाटकात भगवान श्रीकृष्णांच्या जन्मापासून कंसवधा पर्यंतचा भाग रंगविण्यात आलेला आहे.

  July 1, 2026


युवा-विश्व

आनंदाची अनुभूती

Category:

 

सुखाची अनुभूती हीच आनंदाची अनुभूती असतें. अंतर बाह्य बदलल्या शिवाय सुख व आनंद मिळत नाही.अनेकांना सुख कळले पण वळले नाही. सुख म्हणजे नक्की काय असतं ?याचे उत्तर प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं. अनेकांना सुख कळले पण सुखाच्या पायवाटा नाही कळल्या. सुख मिळवण्याची प्रत्येकाची धडपड असते.

  July 1, 2026


युवा-विश्व

प्रेरणा देणारी पुस्तकांची पायवाट

Category:

 

शिक्षक व पुस्तके काय घडवू शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे भालचंद्र मुणगेकर यांचे असा मी घडलो हे आत्मचरित्र होय. अतिशय प्रांजळपणे टिपकागदा प्रमाणे सर्व घटना टिपणारे.हे पुस्तक केवळ भाषेचा डोलारा, उपमा, अलंकार याचा कृत्रिम स्प्रे नसून हा वास्तवाचा दस्तावेज आहे.यात मी नसून आम्ही,आमचं नसून आपलं याचं प्रतिबिंब दिसतं.

  June 30, 2026


मनोरंजन

वाऱ्यावरची वरात

Category:

 

मी नाटकाचे दौरे किंवा इतर काही कार्यक्रम नसले की, रोज अभिषेकी बुवांच्या घरी जात असे. ‘लाडकी लक्ष्मी’ नाटकाच्या गोव्याच्या दौऱ्यात एक दिवस सुट्टी होती. माघी पौर्णिमेचा दिवस. मंगेशीला मोठा उत्सव असतो. रात्रभर जागरण, पहाटे रथोत्सव. खूप उत्साही वातावरण असतं. आम्ही मंगेशीचे महाजन. आमचा मुक्काम मंगेशीहून जवळच्याच माशेल गावात होता. मी मंगेशीला पोहोचलो. म्हटलं, गोव्यात आहोत तर उत्सव पाहुया. बुवांच्या तिथल्या घरी गेलो. म्हटलं आई, भाऊला भेटावं. बघतो तर काय प्रत्यक्ष अभिषेकी बुवाच !

  June 30, 2026


युवा-विश्व

पर्याय डी. स्कूल

Category:

 

धायरी, पुणे येथील पर्याय डी. स्कूल एक वेगळा विचार घेऊन सुरू झालेली मुक्त शाळा आहे. इव्हान आलीच यांनी युरोपमध्ये डी-स्कुलिंग ही चळवळ सुरू केली होती. स्कूलमध्ये जे आपण कप्पे केलेत, विषयांचे असो, वर्गांचे असो, वयांचे असो, स्कूल ड्रेसचे असो, यांच्यापलीकडचं जे आहे ते सर्व डी.स्कुलिंग मध्ये येतं. स्कुलिंग पुसून त्याच्या पलीकडचं, जे जे आहे, पुस्तकांच्या पलीकडचं तसेच व्यवहारातलं जीवन जगण्यासाठी जे जे लागतं ते, थोडक्यात जीवनशिक्षणच.

२०११ पासून ही शाळा सुरू झाली. २०२३ मध्ये दहावीची पहिली बॅच या शाळेच्याबाहेर पडली. शाळेच्या पलीकडे मुलांना काय येतं व काय करायचंय, काय शिकायचंय हा या शाळेत देण्यात येणाऱ्या शिक्षणाचा गाभा आहे. वेगळ्या विचाराने प्रेरित झालेल्या अनेक शाळा आज आकाराला येत आहेत. पूर्वी खरोखर ज्यांना शिक्षणाच्या कार्यात व प्रसारात तळमळ होती त्यांनी समर्पित होऊन शैक्षणिक संस्था काढल्या ज्या पुढे नावाजल्या गेल्या.

  June 30, 2026


युवा-विश्व

संबोध

Category:

 

अनुभूतीशिवाय संबोध स्पष्टता नाही. संबोध स्पष्ट नसले की बोध होत नाही. अर्थ माहीत नसताना बऱ्याचशा वेळेला अनेक विद्यार्थी पाठांतर करतात. पाठांतर जर समजून केलं तर संबोध स्पष्ट व्हायला मदत होते. अनेक वेळा पाठांतर करून गुण मिळवण्याचा प्रयत्न केला जातो, विद्यार्थ्यांना अर्थ विचारला असता ते निरुत्तर होतात.

  June 30, 2026