बालचरित्

श्रीमद्भागवत पुराण आणि इतर ग्रंथातील भगवान श्रीकृष्णांच्या बाललीलां वर आधारित असलेले महाकवी भास यांचे अत्यंत सुंदर नाटक म्हणजे बालचरित्या पाच अंकी नाटकात भगवान श्रीकृष्णांच्या जन्मापासून कंसवधा पर्यंतचा भाग रंगविण्यात आलेला आहे.



श्रीमद्भागवत पुराण आणि इतर ग्रंथातील भगवान श्रीकृष्णांच्या बाललीलां वर आधारित असलेले महाकवी भास यांचे अत्यंत सुंदर नाटक म्हणजे बालचरित्या पाच अंकी नाटकात भगवान श्रीकृष्णांच्या जन्मापासून कंसवधा पर्यंतचा भाग रंगविण्यात आलेला आहे.

पहिल्या अंकात श्रीकृष्णांचे अवतरण, त्यामुळे देवता आणि ऋषींना झालेला आनंद, कृष्णाला घेऊन वसुदेवांनी मथुरा सोडणे, यमुनेचा पूर, चमत्कारिकरीत्या यमुनेचे पाणी दोन भागात विभागून त्यांना वाट मिळणे हे कथाभाग आले आहेत.

भासांनी केलेले वेगळेपण म्हणजे एवढ्या रात्री नंदा कडे जाण्यापेक्षा सकाळी जाऊ असा विचार करत वसुदेव गावाबाहेर थांबणे. यशोदे ची मुलगी मृत जन्माला येणे, तिला यमुनेत सोडण्यासाठी नंद यमुनेकाठी आले असताना वसुदेवाने कृष्णाला त्यांच्याजवळ देणे हा कथाभाग पारंपारिक कथेपेक्षा वेगळा आहे.

ते मृत मुलीला घेऊन परत येत असताना तिच्यात चैतन्य संचारते. श्रीकृष्णाची विविध आयुधे आणि गरुड वाहन गोपाळांच्या वेशात प्रगट होतात असे सांगत पहिला अंक संपतो. दुसऱ्या अंकात कंसाला स्वप्नात वेगवेगळे दृष्टांत होतात. ज्योतिषी त्याचा अर्थ कोणत्यातरी दिव्य पुरुषाचा जन्म झाला असे सांगतात. तेवढ्याच सेवक घेऊन देवकीला मुलगी झाली हे सांगतो. कंस तिला आणायला सांगतो. तिला मारायला जमिनीवर आपटले तर ती सुटते आणि आकाशात कात्यायनी रूपात आपल्या सर्व गणांसह प्रगट होत, कंसाला तुझा मृत्यू जन्माला आला असे सांगते.

तिसऱ्या अंकात श्रीकृष्णाच्या गोकुळातील बाललीला वर्णन केल्या आहेत. पूतना, शकटासुर, धेनुकासूर इत्यादी राक्षसांचा वधांच्या कथा असून यमलार्जुन नावाचे वृक्ष पाडल्याचे कथानक देखील येते. अंकाच्या शेवटी श्रीकृष्ण कालिया मर्दनासाठी सज्ज होतात. चौथ्या अंकात कालिया मर्दन आणि श्रीकृष्ण धनुर्यागासाठी मथुरेला जातात हा कथाभाग आलेला आहे. पाचव्या आणि शेवटच्या अंकात कृष्णांच्याद्वारे कुवलयापीड हत्तीचा विनाश, कुब्जा दासीची दु:खमुक्ती, चाणूर वध या घटनांचा नंतर महालावर चढून कंसाला मारण्यासाठी श्रीकृष्णांची सज्जता हा भाग येतो. कंसाचे सैनिक कृष्णा वर आक्रमण करण्यासाठी तयार होतात पण त्याच वेळी वसुदेव येऊन श्रीकृष्ण म्हणजे सगळ्यांच्या उद्धारासाठी प्रगटलेला परमात्मा आहे अशी घोषणा करतात.

कंस वधानंतर उग्रसेनांना मुक्त करून वृष्णी राज्याची पुनर्स्थापना होते आणि नाटक परिपूर्ण होते.

परंपरागत रीतीने सर्व भारतीयांच्या मनावर राज्य करणाऱ्या श्री कृष्णाच्या बाललीलांना मूळ कथानकात फार बदल न करता महाकवी भासांनी या नाटकात रंगविले आहे.

कु.दिव्या दौलत मडावी
लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी
बी.ए. अंतिमवर्ष
दि. ०९.०३.२०२२

Author