घारीचे बाळ
Category:
कथा बाल-साहित्य साहित्य - ललितएक कुंभार होता. त्याला तीन मुली होत्या. मुलगा नव्हता. त्याला आता पुन्हा चौथी मुलगी नको होती. कुंभार बायकोला म्हणाला, “आता तुला पुन्हा मुलगी झाली तर मी तुला घरात घेणार नाही.” कुंभाराची बायको माहेरी गेली. दुर्दैवाने तिला चौथी मुलगीच झाली. तिच्या अंगाचा थरकाप झाला. आता नवऱ्याला कसे तोंड दाखवायचे याची तिला काळजी लागली. तो आपल्याला घरात घेणार नाही, याची तिला खात्री होती. तिच्या आईने पुढे काय होईल याचा अंदाज घेऊन त्या बाळाला कपड्यात गुंडाळले, टोपलीत घातले आणि टोपली नदीत सोडून दिली. तरंगत तरंगत टोपली पाण्याच्या प्रवाहाबरोबर वहात गेली.
October 5, 2025