लेखसंग्रह

मराठीतील कोशवाङ्मय

Category:

 

मराठीमध्ये कोशवाङ्मयाची समृद्ध परंपरा आहे. मराठी भाषेत कोशरचना सुरू होऊन आता सुमारे १५० वर्षे लोटली आहेत. मराठीत १९व्या शतकात जी कोशरचना झाली ती सामान्यतः शब्दकोश-स्वरूपाची झाली. संस्कृतीच्या विकसनशील काळात आधी शब्दकोश निर्माण होतात; त्यानंतर ज्ञानकोशांची रचना होऊ लागते. अव्वल इंग्रजी काळात शब्दकोश रचनेमागच्या प्रमुख प्रेरणा इंग्रजी राज्यकर्त्यांची मराठी भाषा शिकण्याची गरज आणि ख्रिस्ती धर्मप्रचारकांची धर्मप्रसाराची गरज या होत्या.

  August 10, 2025


अवर्गिकृत

ड्रेसिंग टेबल

Category:

 

ड्रेसिंग टेबल तयार करण्याआधी आपल्या कोणत्या वस्तू तिथे ठेवायच्या आहेत त्याची नीट यादी करावी. आज पुरुष, लहान मुलेदेखील फॅशनच्या बाबतीत विशेष जागरूक असतात. त्यामुळे घरातील किती व्यक्तींचे कोणकोणते सामान तिथे ठेवायचे आहे हे सुरुवातीस ठरवून घ्यावे. त्यानुसार वेगळे कप्पे, ड्रॉवर्स करता येतात. त्यामुळे वस्तूंची सरमिसळ होत नाही. स्त्रियांचे सेमी प्रेशियस दागिने ठेवण्यासाठी इथे एखादा बंद ज्याला लॉक आहे असा ड्रॉवरही करता येतो.

  August 10, 2025


खाद्ययात्रा

अंड्याची मसालेदार भुर्जी

Category:

 

गणेशोत्सव-नवरात्रोत्सवातले कायकर्ते असोत, उशिरा कामावरून घरी निघालेले नोकरदार असोत किंवा जिवाची मुंबई करायला बाहेर पडलेले उत्साही तरुण असोत; कितीही रात्र झाली तरी आपली भूक भागवण्यासाठी अंडाभुर्जीची गाडी असणार याची त्यांना खात्री असायची. गरीब असो वा श्रीमंत, सारेच एकदिलाने अंडाभुर्जीच्या गाडीवर हक्काने ताव मारताना दिसायचे.

  August 8, 2025


लेखसंग्रह

श्री प्रभु श्रीराम मंदिर, रामटेक, नागपूर

Category:

 

प्रभु श्री राम वनवासात असताना या ठिकाणी काही काळ वास्तव्यास होते. त्यामुळे या ठिकाणाला रामटेक हे नाव ठेवले गेले. नागपूरपासून ५५ कि.मी. वर असलेले हे शहर अतिशय सुबक आहे. शहराच्या पूर्वेला एक उंच डोंगर आहे त्यावर प्रभू श्रीरामांचे सुमारे ६०० वर्षे जुने मंदिर आहे.

  July 13, 2025


साहित्य - ललित

पुस्तक प्रदर्शन : आनंद यात्रा

Category:

 

पुस्तक प्रदर्शनाच्या मॉलमधून फेरफटका मारताना नेमका हाच अनुभव मिळतो. याची जाण मॉलच्या प्रदर्शनीय खरेदीतून ग्राहकाला येऊ लागलेली आहे. त्यातूनच शहर, गांवागावांत, सभासंमेलनात होणाऱ्या कार्यक्रमातून वा अन्यत्र सातत्याने भरणाऱ्या पुस्तक प्रदर्शनातून पुस्तकांची विक्रमी विक्री उच्चांकाचे परीघ उंचावित अधिकाधिक उलाढाली करू लागली आहे.

  June 30, 2025


अवर्गिकृत

डॅडींच्या सहवासात

Category:

 

आणि मी नांदगावकरांच्याच घरात (खारला) १९८४ च्या मे महिन्यापासून त्यांची ‘मानसकन्या’ म्हणून राहू लागले. घरातील प्रत्येकजण तसंच त्यांना भेटायला येणारं प्रत्येकजण त्यांना ‘डॅडी’ या नावानं हाक मारत होता. मी तर एका छोट्याशा खेडेवजा गावातून अमळनेरातून आलेली मुलगी. वडिलांना ‘बाबा’ म्हणून हाक मारण्याची सवय, परंतु वडील हयात नसल्यानं तीही मोडलेली.

  June 27, 2025


लेखसंग्रह

अंबाजोगाईची योगेश्वरी

Category:

 

अंबाजोगाई बीड जिल्ह्यातील एका तालुक्याचे गाव म्हणजे भाविक भक्तांचे स्थान जगन्माता योगेश्वरी होय. देवीच्या स्थापनेचा कालावधी पुरातन असून याविषयी ऐतिहासिक उल्लेख प्राचीन शिलालेखात असलेल्या जोगाईचे माहेर या ठिकाणी आढळतो.

  June 13, 2025


लेखसंग्रह

कोल्हापूरची अंबाबाई

Category:

 

श्री महालक्ष्मी देवीच्या नित्य निवासाने पुनित झालेले महाराष्ट्रातील महाक्षेत्र करवीर वा कोल्हापूर या नावाने ओळखले जाते. हे क्षेत्र प्राचीन शक्तिपीठ असून पुराणमताप्रमाणे याला १०८ कल्पे झाली आहेत. अठरा पुराणांपैकी काशीखंड, पद्मपुराण, देवीभागवत, हरिवंशपुराण, स्कंदपुराण आणि मार्कंडेय पुराणात करवीर क्षेत्राचा उल्लेख सापडतो.

  June 10, 2025


लेखसंग्रह

माहूरची रेणुका

Category:

 

श्रीक्षेत्र माहूरगड नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात असून ते डोंगराळ भागात वसले आहे. समुद्रसपाटीपासून अडीच हजार फूट उंचीवर माहूरगड असून दक्षिणेस सह्याद्रीच्या रांगा पश्चिमेस सहस्त्र कुंड आणि उत्तर व वायव्य दिशेला पैनगंगा नदी सर्पाकृती वाहताना दिसते. या गडावर श्रीविष्णूंनी उन्मत्त राक्षस लवणासुराला मारल्यामुळे श्री ब्रह्मदेवाने आनंदाप्रीत्यर्थ आपल्या कमंडलूतून आणलेल्या पाण्याने श्रीविष्णूचे पाय धुतले तेव्हा त्यांचे चरणतीर्थ जे पृथ्वीवर वाहू लागले तीच पैनगंगा नदी आहे, अशी आख्यायिका सांगितली जाते.

  June 10, 2025


लेखसंग्रह

वणीची सप्तशृंगी

Category:

 

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात असलेल्या वणी गावानजीक सप्तशृंग गडावर सप्तशृंगी देवीचे निवासस्थान आहे. या गडाला म्हणजे डोंगराला सात शिखरे असल्यामुळे त्याला सप्तशृंग अथवा वणीचा डोंगर म्हणतात. राम-रावण युद्धात लक्ष्मण बेशुद्ध पडला होता, तेव्हा त्याला शुद्धीवर आणण्यासाठी हनुमान संजीवनी वृक्षाने बहरलेला द्रोणागिरी पर्वत उचलून आणीत असता त्यातला एक शिलाखंड जिथे पडला तोच हा सप्तशृंगीचा डोंगर आहे, अशी आख्यायिका सांगितली जाते.

  June 6, 2025