कथा

कासव आणि माकड

Category:

 

(मॉरिशसची लोककथा)

खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. एक होते माकड आणि एक होते कासव. या कासवाला सात मुले होती. माकड मात्र आळसात वेळ घालवीत असे. कासव खूप कष्ट करीत असे. एकदा कष्टाचे काम केल्यावर त्याला त्याची मजुरी मिळाली, तर त्या मजूरीच्या पैशातून त्याने तांदुळाचे एक पोते खरेदी केले. ते पोते घेऊन कासव घरी येत असता वाटेतच मध्यावर थांबले. त्याने आपल्या पाठीवरचे पोते रस्त्यावर काढून ठेवले.

  October 22, 2025


कथा

हत्ती आणि पाऊस

Category:

 

एके काळी निसर्गात दोन बलवंत शक्ती होत्या. हत्ती आणि पावसाचा देव. अभिमानी आणि बढाईखोर हत्ती पावसाशी नेहमी वाद घालायचा. दोघात हत्ती मोठा आहे असं पावसानं मान्य करावं हा हत्तीचा हेतू असायचा. एकदा अशाच वादात आपल्या ओल्या आणि खळखळाट करणाऱ्या आवाजात पावसानं हत्तीला विचारलं ‘अहो गजराज, जिथं मी तुम्हाला चारा देतो तिथं माझ्यापेक्षा तुम्ही कसे मोठे असाल ?’ अभिमानी हत्ती हे कसे मान्य करणार ? काहीही विचार न करता तो म्हणाला, ‘तू नाही मला चारा देत. माझा मी शोधतो आणि खातो. स्वतःच्या हिंमतीवर मी जगतो.’

  October 22, 2025


कथा

कळीचा माकड

Category:

 

(इंडोनेशियन लोककथा)

इंडोनेशियन लोक म्हणतात की, फार वर्षांपूर्वी, आता जसे माणसांत व जनावरांत आपापसांत वैर आहे, तसे नव्हते. सगळेजण एकमेकांशी गुण्यागोविंदाने राहात. हे सगळे वैर एका कळीच्या नारदाने – ‘माकडाने निर्माण केले. ते कसे केले याबद्दल एक गंमतीदार गोष्ट सांगतात; ती अशी..

  October 22, 2025


कथा

हत्ती शिष्यचार शिकतो

Category:

 

एके दिवशी नदीकडे जाणाऱ्या वाटेवर हत्तीला खार आडवी आली. सम्राटासारख्या तोऱ्यात चालणाऱ्या मातब्बर हत्तीनं तिला सोंडेनं वाटेतून बाजूला सारून म्हटलं, “बाजूला हो ग भिक्कार. चिमुरडे.” खारीला हा मोठा अपमान वाटला. तीही कोणी होतीच की. ह्या हत्तीला नीट वागायचं शिकवायला पाहिजे असं तिला वाटलं.

  October 22, 2025


कथा

चतुर कोल्हा

Category:

 

एक जंगल होते. जंगलात अनेक प्राणी राहत होते. वाघ, कोल्हा, लांडगा, अस्वल अशा हिंस्त्र प्राण्यांचे वास्तव्य तिथे होते. एके दिवशी कोल्हा जंगलात फिरत असताना खूप जोरात पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुरू झाला. कोल्हा घाबरला. पळत सुटला.

  October 22, 2025


कथा

हत्ती आणि ससा

Category:

 

खूप खूप वर्षे झाली. एका रानात एक हत्ती रहात होता. त्याचा एक मित्र होता. तो होता ससा. एके दिवशी हत्ती सशाला म्हणाला,‘आपण एक जमिनीचा तुकडा विकत घेऊया आणि त्या जमिनीत आपण एक सुंदर बाग तयार करुया.’

  October 22, 2025


कथा

मेघ राजा

Category:

 

एक होता मेधी राजा. मोठा भरभक्कम ताजा तवाना. रंगानं काळा. पण मोठा ऐटबाज. मनात आलं की, आभाळात उंच उंच भरारी मारायचा. धावल्या ढगांना पकडायचा. त्यांची मानगूट धरायचा. धक्काबुक्की करायचा. त्यामुळं पाऊस अवचितच पडायचा. माणसं मग, आच्यारी का विच्यारी व्हायची. ते बघून हा असा हसायचा की, दोन पर्वतांची टक्करच जणू झालीय असा दणका उडायचा! त्याच्याजवळ एक छानदार लहान पिशवी असायची. देवानं ती त्याला दिलेली होती. म्हणून ती तो आपल्या केसात लपवून ठेवायचा. पण हा खुशीत आला की, ती एकदम चकाकायची.

  October 5, 2025


कथा

राजा आणि गरीब माणूस

Category:

 

एका गावात एक बुद्धिमान आणि अनुभवी वृद्ध रहात होता. त्याला एक मुलगा होता. एक दिवस त्याने आपल्या मुलास सांगितले, “बेटा, तीन महत्त्वाच्या गोष्टी लक्ष्यात ठेव. एक – कधीही अशा माणसास आपला मित्र करू नकोस. ज्यावर तुझा विश्वास नसेल. दोन – कधीही अशा माणसाकडून कर्ज घेवू नकोस. जो खानदानी श्रीमंत नसेल आणि तीन कधीही कोणतीही गुपित गोष्ट कोणालाही सांगू नकोस मग ती तुझी बायको का असेना.”

  October 5, 2025


कथा

दोन बेडूक मित्रांची गोष्ट

Category:

 

एक सुंदर बाग होती. बागेत एक तळे होते. तळ्याकाठी दोन बेडूक रहायचे. दोघे अगदी जिवाभावाचे मित्र. एकाचे नाव राम, दुसऱ्याचे श्याम. राम शूर, तर श्याम भित्रा. आजुबाजूला थोडा खुट्ट आवाज झाला तरी श्यामराव तळ्यातल्या पाण्यात लपून बसायचे. श्यामरावांच्या या भित्रेपणाला तळ्यातले मासे, कासव हसायचे. ‘भित्रे मंडुकराव’ म्हणून चिडवायचे. रामने श्यामला भिऊ नको म्हणून खूप वेळा सांगून पाहिले. पण त्याचा काही उपयोग होईना. तळ्यातले इतर जलचर राम बेडकाला म्हणायचे, ‘माणूस लोकात मुलांनी भिऊ नये म्हणून त्यांना हनुमान चाळीशी म्हणायला शिकवतात. तसा हा राम बेडूक श्यामला ‘मंडुकोपनिषद” शिकवतो.

  October 5, 2025


कथा

पारितोषिक

Category:

 

राजाच्या मंत्र्याचा मुलगा अजय पण मूर्त्या बनवित असे पण तो काही उत्कृष्ट मूर्तिकार नव्हता. परंतु त्याची इच्छा हीच असे की कसेही करून प्रथम पारितोषिक पटकावे. मंत्री पण चतुर होता. तो काही तरी युक्ती करून मुलाला कसे बक्षीस मिळेल याचा तो विचार करू लागला.

ठरलेल्या दिवशी सर्व मूर्तिकार मूर्त्या घेऊन आले. रामकिरण नावाच्या मूर्तिकारने राजाची अतिशय सुंदर मूर्ती तयार केली होती. ती पहाताच मंत्री समजून गेला की नक्कीच या मूर्तीला प्रथम पारितोषिक मिळेल. त्याने रामकिरणला एकीकडे नेऊन सांगितले, खरंच, तू सुंदर मूर्ती बनविली आहेस.

  October 5, 2025