सकाळ झाली. गोगलबाई उठल्या. आपल्या पाठीवरच्या घरातून बाहेर अंगणात आल्या. सकाळचे कोवळे ऊन खात बसून राहिल्या. तेवढ्यात त्यांची एक मैत्रीण चिऊताई समोरून येताना दिसली. तिला पाहून गोगलबाईनी विचारले, “काय चिऊताई, आज सकाळीच कसे येणे केले?” चिऊताई म्हणाली, “मी आले आहे, बोलावणे करायला. उद्या किनई माझ्या बाळाचे बारसे आहे. मुद्दाम तुम्हांला सांगायला आले आहे. नक्की यायचे बरे का! आणि हे पहा, लवकरच निघा जरा. म्हणजे वेळेवर पोहचाल. बराय, येऊ मी, अच्छा!” असे म्हणून चिऊताई दुसरीकडे बोलावणे करायला लगेच भुर्रकन उडून गेल्या. दुसऱ्या दिवशी गोगलबाई अगदी लवकर उठल्या. घाईघाईने तयार झाल्या आणि लगबगीने निघाल्या. बारशाला वेळेवर जावे म्हणून त्यांनी आपला वेगही बराच वाढवण्याचा प्रयत्न केला. खूप खूप वेळ झाला. सगळी सकाळ गेली. दुपार झाली. दुपारही गेली. संध्याकाळ झाली. तरी चिऊताईचे घर काही येईना. लांबूनही ते दिसेना. पण घर येईतोवर चालायचे, बारसे चुकवायचे नाही, असे ठरवून त्या चालतच रहिल्या. शेवटी एकदाचे दूर अंतरावर गोगलबाईंना चिऊताईचे घरटे दिसू लागले. चिऊताईच्या घरट्याभोवती खूप गर्दी जमली होती. खूप गडबड चालली होती. गोगलबाईंना आनंद झाला. त्यांना वाटले- मंडळी दिसत आहेत, धावपळ चालू आहे. म्हणजे बारसे उरकले नव्हते खास! चिऊताईची अगदी धांदल उडून गेली होती. समारंभाला खूप मंडळी आलेली दिसत होती. मैनाराणी आपल्या गोड आवाजात पाहुण्यांचे स्वागत करत होत्या. पोपटदादा त्यांना प्रेमाने फांद्यांवर बसवत होता. साळुंकीमावशी गुलाबाच्या पाकळ्यांतून सगळ्यांना मध प्यायला देत होत्या. कावळेकाकू सारखी आपली मान इकडे तिकडे करून हवे-नको पाहत होत्या. फुलपाखरे मात्र रंगीबेरंगी सुंदर कपडे घालून इकडून तिकडे व तिकडून इकडे उगीचच मिरवत होती.
शेवटी एकदाच्या हाश्शहुश्श करत गोगलबाई घरट्यापाशी पोचल्या. धापा
टाकत म्हणाल्या. “पहा चिऊताई, आले की नाही बाई वेळेवर बारशाला?”
यावर जमलेली सर्व मंडळी खो खो हसू लागली. त्यांच्या या हसण्यामुळे
बिचाऱ्या गोगलबाई अगदी गोऱ्यामोऱ्या झाल्या. मग चिऊताईच त्यांना
म्हणाली, “अहो गोगलबाई, बारसे कुठले? ते तर मागेच झाले. आज माझ्या
बाळाचे लग्न आहे. बरे झाले, तुम्ही बारशाला निघलात, म्हणून लग्नाला तरी
वेळेवर पोचलात.!”
गोगलगाई बारशाला जातात
सकाळ झाली. गोगलबाई उठल्या. आपल्या पाठीवरच्या घरातून बाहेर अंगणात आल्या. सकाळचे कोवळे ऊन खात बसून राहिल्या. तेवढ्यात त्यांची एक मैत्रीण चिऊताई समोरून येताना दिसली. तिला पाहून गोगलबाईनी विचारले, “काय चिऊताई, आज सकाळीच कसे येणे केले?” चिऊताई म्हणाली, “मी आले आहे, बोलावणे करायला. उद्या किनई माझ्या बाळाचे बारसे आहे. मुद्दाम तुम्हांला सांगायला आले आहे.