जीवनातील वाटे वरती,
कडेकडेने उभे ठाकले,
परि वाटसरूंना सारे ते,
यशातील अडसर वाटले ।।१।।
वाट चालतां क्रमाक्रमानें,
बाधा आणून वेग रोकती,
ध्येयावरल्या उच्च स्थळीं,
पोहचण्या आडकाठी करीती ।।२।।
षडरिपूचे टप्पे असूनी,
भावनेवर आघांत होतो,
सरळ मार्गाच्या विचाराला,
आकर्षणाचा खेंच बसतो ।।३।।
पवित्र निर्मळ भावनेमध्ये,
रंगाच्या त्या छटा उमटती,
गढूळपणाच्या वातावरणीं,
सारे कांहीं गमवूनी बसती ।।४।।
थोडे राहता गाफील तुम्ही,
जाळ्यामध्ये अडकून जातां,
जीवनाचे जे साध्य असते,
स्वकर्माने गमवून बसतां.।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
December 28, 2015
April 16, 2012
शेतकरी राजा
आहे जगाचा आधार
भुकेचा भार
त्याच्यावरी ..... १
पुण्यवान राजा
खळगी भरवी पोटाची
सार्या जगताची
एकटाच ..... २
गाळूनी घाम
त्यानं फुलवलं रानं
पिकविलं सोनं
शेतामध्ये .... ३
शेताच्या बांधाला
खातो चटणी भाकर
लागते साखर
घामामध्ये ....४
धरणीचा लेक
करी काळ्याईची सेवा
पिकवितो मेवा
जगासाठी. .... ५
करी परोपकार
ह्या सार्या जगावरी
स्वर्ग भूवरी
उतरितो ..... ६
-- कवीराज - महेश पुंड
January 8, 2020
साऱ्या प्रश्नांची, उत्तरेच निःशब्दी
मौनात रुतलेल्या अव्यक्त भावनां
पावित्र्य! भावनांचे बंद पापण्यात
निर्माल्याचा गंध गंधाळतो स्मृतींना
शांत महासागर अथांग मनांतरीचा
प्रतिक्षेत दंग, व्याकुळ प्रीतभावनां
झांकोळलेले सावळबाधी नभांगण
अव्यक्त! अंतरिच्याच दग्ध वेदनां
आता स्पंदनांची, असह्य उलघाल
या सांध्यपर्वात तुलाच शोधिताना
सांग कसा उमजू अर्थ जीवनाचा
मी मग्न तुझ्यात तरी मला कळेना
-- वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. ९२.
२४ - ३ - २०२२.
April 4, 2022
वेध गुलाबी थंडीचे
पेटे शेकोटी रात्रीची
फड रंगती गप्पांचे
पार्टी असते हुर्ड्याची....१
पडे चांदणे रात्रीचे
चंद्र निरभ्र आकाशी
गुज सांगते मनीचे
सखी ही प्रियकराशी....२
उब वाढता तनाची
सय घालतो सखीसी
आस असे मिलनाची
आवतण रजईसी.......
३
निशा अंधाऱ्या रात्रीची
साथ मिळे गारव्याची
जादू रती-मदनाची
प्रित खुले युगलांची.......
४
दिस आले प्रणयाचे
रिते चषक मद्याचे
वेध गुलाबी थंडीचे
गौप्य हे आलिंगनाचे......
५
-- सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
November 27, 2019
तुज कितीही, विसरु म्हटले तरी
तूंच गे सदैव, लोचनातुनी तरळते
निक्षूनीया,कितीही ठरविले तरीही
आठवण अंतरी, तुझीच गहिवरते.
असे कसे, कां? घडते,उत्तर नाही
सत्य! हेच मनीचे हळुवार उमलते
विसरणे तुजला कदापि शक्य नाही
प्रीतदान! हे ईश्वरी, मला जगविते
मनहृदयी भावगंधली निष्पाप प्रीती
औक्षवंती! गीतातूनी मज भुलविते
जलावीना! मत्स्यगंधा कां जगते?
प्रीतीविना कां जगती जगणे असते
जरी दूरदूर तूं, सभोवारी भास तुझा
आत्मसुखदा! जीवनांती हीच असते
-- वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र.१६०.
२२ - १२ - २०२१.
December 27, 2021
आज लोपले शब्द ओठचे, भावनाच्या आकाशीं
प्रखर बनतां त्याच भावना, विचार जाती तळाशीं....१,
भावनेला व्यक्त करण्या, सांगड लागे शब्दांची
थोटके पडती शब्द सूर ते, गर्दी होता विचारांची...२,
भावनांचे झरे फुटूनी, विचार जलाशय झाले
विचारांचे बनूनी धबधबे, वाहू मग लागले.....३,
आकार देती शब्द भाषा, बांध घालूनी विचाराला
निश्चीत होतो वेग नी मार्ग, आकार देता भावनेला....४,
भाषेमधली शक्ती जावूनी, मूक बनविले तिने
उंचबळणाऱ्या विचार भावना, टिपल्या मात्र चेहऱ्याने....५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
October 3, 2020
बदलीत गेलो घरे मी माझी, आज पावतो कितीक तरी ।
पोटासाठीं नोकरी करतां, भटकत होतो आजवरी ।।
बालपण हे असेंच गेले, फिरता फिरता गावोगावी ।
वडिलांची नोकरी होती, धंदा करणे माहीत नाही ।।
पाऊलवाट तीच निवडली, मुलाने देखील जगण्यासाठी ।
तीन पिढ्या ह्या चालत राही, एका मागून एकापाठी ।।
गेले नाहीं आयुष्य सारे, स्थिर राहूनी एके जागी ।
देश वेळ आणि घरे निराळी, जगलो होतो विविध अंगी ।।
शरीर देखील असेच आहे, आत्म्याचे ते छोटे घरकुल ।
मिळवित असतां सत्व तेज ते, देह सोडूनी दूजात जाईल ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
February 3, 2020
खोड्या करणे, त्रास देणे,
हाच बनला स्वभाव त्याचा
वाटत होते बघून त्याला,
दूरोपयोग करि तो शक्तीचा...१
पाय ओढणे, खाली पाडणे,
कपड्यावरी तो चिखल फेकणे
मारपिट ती करूनी केंव्हां,
गुंडपणा तो करित राहणे...२,
बेफिकीर ती वृत्ती तयाची,
स्वार्थाने तो भरला पुरता
तुच्छ लेखी इतर जनाना,
स्व आनंद साधत असतां....३,
'आनंद' मिळवणे हेच ध्येय,
जीवनाचे तत्त्व खरे ते
विपरीत मार्ग अवलोकितां,
समाधान राही दूर तेथें...४
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
June 1, 2016
December 11, 2013
Copyright © 2025 | Marathisrushti