(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • उलघाल स्पंदनांची

    साऱ्या प्रश्नांची, उत्तरेच निःशब्दी
    मौनात रुतलेल्या अव्यक्त भावनां

    पावित्र्य! भावनांचे बंद पापण्यात
    निर्माल्याचा गंध गंधाळतो स्मृतींना

    शांत महासागर अथांग मनांतरीचा
    प्रतिक्षेत दंग, व्याकुळ प्रीतभावनां

    झांकोळलेले सावळबाधी नभांगण
    अव्यक्त! अंतरिच्याच दग्ध वेदनां

    आता स्पंदनांची, असह्य उलघाल
    या सांध्यपर्वात तुलाच शोधिताना

    सांग कसा उमजू अर्थ जीवनाचा
    मी मग्न तुझ्यात तरी मला कळेना

    -- वि.ग.सातपुते. (भावकवी)

    9766544908

    रचना क्र. ९२.

    २४ - ३ - २०२२.

      April 4, 2022


  • सुखाचा छंद

    सुखाचा छंद,न लागो जीवाला
    आहे तो निवारा, अपुला बरा
    मोहविते कायम, सुखाची जरतार
    वेदनेचे ठिगळ, मिरवूया जरा
    सुखावते सारे,फुलणारे रंगपिसारे
    एकचि रंग सावळा, अपुला बरा
    दुखावते मन, यातना कठीण
    गोंजारु तयाला, लाडाने जरा
    सुख हे क्षणिक, मृगजळ जाण
    शोधावा निवारा, समाधानी खरा
    तुझे माझे काही, कमी नि अधिक
    आहे त्यात सुख, मानावे जरा!
    -- वर्षा कदम.

      November 12, 2021


  • तप- शक्ती

    तप आणि सत्याची,

    महान असे शक्ती,

    वाढवूनी बघा तुम्ही,

    प्रभूस ती खेचती ।।१।।

    तप वाढता तुमचे,

    झुकेल तो ईश्वर,

    हतबल होत असे,

    भक्त जणांसमोर ।।२।।

    विश्वाचा तो मालक,

    दिसत नाही कुणा,

    प्रयत्न होवूनी व्यर्थ,

    निराशा येई मना ।।३।।

    मिळविण्यास जा तुम्ही,

    मिळत नसे केव्हां

    तपशक्ती वाढविता,

    आपोआप येई तेव्हां ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      March 18, 2020


  • पुंडलिकाचे दैवत

    आईबापाच्या सेवेमध्यें, पुंडलीक रंगला

    उभा विठ्ठल दारावरती, हेच तो विसरला ।।धृ।।

    आईबाप हे दैवत ज्याचे

    रुप पाही त्यांच्यात प्रभूचे

    सेवा करीत आनंद लूटतां, तल्लीन जो जहला ।।१।।

    उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला

    निद्रेमध्यें असतां दोघे

    मांडी देऊनी आपण जागे

    कशी मोडू मी झोप तयांची, प्रश्न विचारी भगवंताला ।।२।।

    उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला

    विट देवूनी विठ्ठलासाठीं

    उभे केले त्या जगत्जेठी

    आपण गेला घेवून त्यांना, स्नानाकरिता चंद्रभागेला ।।३।।

    उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला

    आठ्ठाविस युगे गेली उलटूनी

    कटीवरती हात ठेवूनी

    पांडूरंग बघे वाट तयांची, भक्तितच जे विसरती जगाला ।।४।।

    उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    e-mail – bknagapurkar@gmail.com

    -- डॉ. भगवान केशवराव नागापूरकर

      October 30, 2013


  • जन्म स्वभाव

    गोड शब्द बोबडे, लकब मनास आवडे ।

    शब्दांची भासली जाण, नव्हते भाषेचे अजुनी ज्ञान ।। १

    भावनांचा उगम दिसला, मनी व्यक्त होई हालचालीतूनी ।

    रागलोभ अहंकारादी गुण, दिसून येती जन्मापासून ।। २

    देश-वेष वा जात कुठली, सर्व गुणांची बिजे दिसली ।

    हळूहळू बदले बाह्यांग जरी, उपजत गुण राही अंतरी ।। ३

    प्रसंग घडता अवचित , बाह्य जगाते विसरत ।

    उफाळून येती सुप्त भावना, मानवी त्या जन्मखुणा ।। ४

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      October 26, 2020


  • सासुरवाशिण

    सासुरवाशिण

      July 7, 2010


  • दान संचिती

    सुखावला हा जीव की मग जाणवते
    कधी तरी तुला, आठवण माझी येते

    असह्य विरहास मी नित्य सरावलेला
    तरीही आठवांचे आभाळ भरुनी येते

    अशक्य असते, सारे काही विसरणे
    हृद्य अंतरीचे रुतलेले, उचंबळूनी येते

    आज संवेदना जाहल्या साऱ्या मुक्या
    तरीही अव्यक्त सहज नेत्री दाटूनी येते

    कातरवेळा! ही सांजाळलेली भाबडी
    गतस्मृतींनाच, आसमंती उधळीत येते

    हाच खेळ, अनामिक अतर्क्य जीवनी
    ऋणानुबंध! दान संचिती कळुनी येते

    स्मरावे हृदयी, कनवाळू दयाघनाला
    जशी केशरी संध्या, नभी दाटूनी येते

    वि.ग.सातपुते.(भावकवी)

    9766544908

    रचना क्र. ७७

    १६ - ६ - २०२१

      June 25, 2021


  • जीवन मृत्यू खेळ

    सर्व दिशांनी घेरूनी येतो, मृत्यू तुमचे जवळीं

    सही सलामत निसटून जाणें, हीच कला आगळी....१,

    भक्ष्य त्याचे बनून जाणें, चुकत नाही कुणा,

    काळाची ती भूक असूनी, माहीत असते सर्वांना....२,

    अविरत चालू लपंडाव , जगण्या मरण्याचा

    शेवट हा जरी निश्चीत असला, हक्क तुम्हां खेळण्याचा....३,

    खेळती काही तन्मयतेने, रिझविती इतरजणां,

    खेळामधले नांव करूनी, आदर्श ठरती जीवनां....४

    -- डॉ. भगवान नागापूरकर

    9004079850

    bknagapurkar@gmail.com

      April 3, 2016


  • कां तुझे गं, मज वेड असे

    असे कसे गं असे कसे.
    कां तुझे गं मज वेड असे
    वेळी, अवेळी केव्हांही
    नेत्री सामोरी गं तूच असे।।

    नित्य प्रभाती त्या नभाळी
    तांबूसलेल्या सांजसकाळी
    आठविताच सहजी तुजला
    खुदकन मनी मीच कां हसे।।

    हिरव्या वेली, कोमल कळी
    अलवार, जणू तूंच उमलते
    पाकळी पाकळी अधर तुझे
    मकरंदा गंध तुझा कां असे।।

    निर्मल, शामल तुझी गं तनू
    माळूनी घेता श्वेत चंद्रचंद्रिका
    उजळुनी टाकिते नभांगणाला
    सर्वत्र स्पर्श तुझाच कां भासे।।

    -- वि.ग.सातपुते.(भावकवी)

    9766544908

    रचना क्र. ८.

    ८ - १ - २०२२.

      January 24, 2022


  • शब्दाची ठिणगी

    ठिणगी पडूनी पेटे ज्वाला, आकाशाला जावूनी भिडती

    नष्ट करूनी डोंगर जंगल, हा: हा: कार तो माजविती...१

    शब्दांची ही ठिणगी अशीच, क्रोधाचा तो वणवा पेटवी

    मर्मघाती तो शब्द पडतां, अहंकार तो जागृत होई...२,

    सूड वृत्तीचा जन्म होवूनी, वातावरण ते दुषीत होते

    संघर्षाचा अग्नी पेटूनी , जीवन सारे उजाड करिते...३,

    कारण जरी ते असे क्षुल्लक, विनाश व्याप्ती होई भयकंर

    केवळ तुमचे प्रेमळ शब्द, दुष्ट चक्र ते थांबवी सत्वर ….४

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      July 14, 2017