रम्य नील अंबरी लकाकतात तारका मंद्र सप्तकातुनी सतार चंद्र छेडतो
July 12, 2026
झुरते तुझ्या विना
ये काव्य सरिता पुन्हा
या सुंदर लेखणीविना
ना फुटणार पान्हा पुन्हा
झुरते तुझ्या विना
साहित्य दरबारी आले पुन्हा
सेवा घडणार नाही विद्येविना
लाभ घडो तुझा पुन्हा
झुरते तुझ्या विना
साहित्यिक प्रवासी होणार पुन्हा
निरंतर वाचना विना
साहित्यिक निर्मिती ना घडणार पुन्हा
घडणार पुन्हा
-- सौ. माणिक शुरजोशी
November 19, 2019
चिंगी
'पहाट झाली,
चिव चिवते चिमणी
उमज येईना,
उठविले तिजला कोणी.....१,
आई आहे कां ?
जी उठवी शाळेसाठी,
गुदगुदल्या करूनी
कुरवाळिते हळूंच पाठी....२,
घड्याळ उठवी
घण घण करूनी नाद
घरट्यामधुनी,
नाही ऐकला असा निनाद.'..३,
चिमणी –
' उषाराणी येते,
साऱ्यांची आई बनूनी
प्रेमानें मोडी झोंप,
नाजूक करकमलांनी.....४,
घड्याळ आमचे,
दवबिंदू पडतां पानावरूनी
चाळविती निद्रा,
टपटप आवाज करूनी' .....५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
March 7, 2021
ग्यानबाची मेख....!!!
कुणी खाकी आडं,कुणी वर्दिआडं,
कुणी पैशा आडं,तं कुणी सत्तेपुढं,
कपडे काढायची अन फाडायची जणु,
चषकी स्पर्धाचं लागली आहे.....!!!
शयनगृहातले खेळ सार्वजनिक होतायेत,
शिखंडी पत्रकारिते आडुनं सत्तेतला भिष्म,
कॅमेर्यातुन धर्मनितीचं शरसंधान करतोय,
हतबलं कृष्णमात्र सगळं विवशपणे पाहतोय...!!!
आधुनिक महाभारतात धर्म अधर्म मिळालेतं...
कोण कौरव कोण पांडवं गणीतच बिघडलय,
पांचालीच्या वस्त्रहरणात कृष्णाचा हात रूतलाय,
न्यायी धर्मराजा मात्र नर-कुंजरातच फसलाय !!
कलीचाच साया,अन कलीचाच खौफ,
चाणक्यांच्या हाती सत्तेचा गोफ,
़़अनितीघरी निती काम करतेय चोख.
हिच तर खरी, ग्यानबाची मेख!!
©गोडाती बबनराव काळे
9405807079
July 22, 2023
तो जेवण करत नाही,
तो आठवणी तयार करतो.
जिथे शब्द फिकट होतात,
तिथे चवीतून कथा बोलतात.
आचेवर ठेवलेलं भांडं
हळूहळू उकळत राहतं,
तसंच काहीतरी
त्याच्या आतही शिजत राहतं.
तो शब्द न वापरता सांगतो,
प्रेम आणि आठवणी हळू हळू गुंतत जातात.
चवीत मिसळलेले प्रेम,
शब्द न बोलता हसतं, रडतं, जिवंत राहतं.
लोक येतात, खातात,
“खूप छान आहे” म्हणतात,
पण कुणी विचारत नाही
तो इतका शांत का आहे?
तो न बोलता बरंच काही सांगतो,
ताटात मिसळलेल्या प्रेमाने,
जगण्यात गोडवा येतो,
आणि
शांततेच्या तृप्ततेची अनुभूती मिळते.
कारण त्याला समजलंय,
येथे भावना शब्द नसतात,
त्या चवीत मिसळून,
लोकांच्या हृदयात जिवंत राहतात..
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
June 2, 2026
लाजेची मशाल नयनी,
नाकात नाजूक नथनी,
लाल ओठ गुलाबी छान,
स्त्री तू सौंदर्यांची खाण...
झुपकेदार शेपूट कुंतलेचं,
मुक्त कमरेवरी रुळलेलं,
शान तूझ्या मोहक स्त्रित्वाची,
गुंफुनी गजऱ्यामध्ये माळलेलं...
उडे ऐटीत डौल पदराचा,
कुंपण घाली मंद वारा,
झाकाळलेल्या या रुपासमोरी,
फिक्या त्या लखलखणाऱ्या तारा...
कामिनी गं तु योवणाची,
वसुंधरेची अभिमानास्पद मान,
अंकुश घाली स्त्रिशक्तिवर,
हे शृंगारिक देह वरदान...
- श्वेता संकपाळ
September 9, 2018
समुद्राला अनुभवण्यासाठी
त्याच्या कुशीत शिरावे लागते
समुद्राची खोली मोजण्यासाठी
त्याच्या तळाशी जावे लागते
समुद्राची लांबी रुंदी कळण्यासाठी
जगाची सफर करावी लागते
समुद्रांचे रंग समजण्यासाठी
त्याच्या जुनियेत जगावे लागते
समुद्राची गोडी अनुभवण्यासाठी
त्यावर प्रेम करावे लागते
समुद्रांच्या लाटांवर स्वार होण्यासाठी
अभ्यास, अनुभव आणि धाडस असावे लागते
चक्रीवादळात अडकणार्यांना
समुद्र मंथनाचा अनुभवातून
अमृत विष आणि तत्नांची ओळख पटते
वसुंधरेचा सत्तर टक्के भाग
का पाण्याने व्यापला याचा
अर्थ समजण्यास पुरेसे आहे !
जगदीश पटवर्धन
October 31, 2017
नको राजसा अंत पाहू ,
डोळे वाटेकडे लागले,
किती रात्रंदिन साहू ,
विरहव्यथेने तळमळले,--!!!
अजून नाही आलास तू ,
संजीवनही आता संपले,
कोरडा होईल ना रे ऋतू ,
जरी हिरवेपण ते दाटले,--!!!
अंगप्रत्यंगी चिंब भिजू ,
स्वप्न डोळियांनी पाहिले,
तव स्पर्शाची जादू ,--
तनमन किती लालसावले,--!!!
मिलन आपुले किती योजू ,
दिन - रात कमी पडले,
अपार ते प्रेम लुटू,
काळजांचे धागे विणले,--!!!
प्रीत मुसमुसतांना तू ,
जवळ हवा, मज वाटले,
नवथर आपुली जोड
लाजरी कळी बघ उमले,--!!!
शहारते आज तनू ,
कल्पनेचे तिला हिंदोळे,
प्रियाला लागे कवटाळू ,
एकांताची वाट चाले,--!!!
सुगंध लागे दरवळू ,
प्रेमप्रीत कशी हाकारे ,
तू असा दूर की परंतू ,
जिवाला वेधही लागले,--!!!
© हिमगौरी कर्वे .
October 31, 2019
नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील हा घडलेला किस्सा. या निवडणुकीच्या वार्तसंकालानासाठी एका खेड्यात जाण्याचा प्रसंग आला होता. दुपारची वेळ होती. चहा घेण्यासाठी म्हणून गावाबाहेरील रोडवर असलेल्या हॉटेलात बसलो होतो. दिलेल्या ऑर्डरचा चहा येण्याची वाट पहात होतो,
December 13, 2010
मिळता मजला बाह्य एकांत, छळते गर्दी विचारांची
मन गुंतविण्या कुणी नसता, चलबिचल होते भावनांची...१,
शब्द वर्णांचा घेवून आधार, भावना काढी मार्ग आपला
आविष्कार घडविण्यासाठी, विचार करितो मदत तिला...२,
शब्दांना नटवी थटवी, ध्वनी लहरी नि सूर गेयता
अलंकार मिळता अंगी, रचली जाते एक कविता...३
डॉ. भगवान नागापूरकर
९००५०७९८५०
bknagapurkar@gmail.com
December 13, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti