नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
आला आला पाऊस आला…मला भिजवून ओलेचिंब करून गेला…असे मनातल्या मनात गुणगुणत असेल ती उन्हाने लाही लाही झालेली आपली धरणी माता. जगभरातील शेतकरीच नव्हे तर प्रत्येक माणूस पावसाची, पावसाळा सुरू होण्याची चातकासारखी वाट पाहत असतो. त्याच्या आगमनाला जरा जरी उशीर झाला तरी शेतकर्यांसह सर्वांचाच जीव कासाविस होतो. पहिल्या पावसात सारेच भिजण्यासाठी आतूर असतात.
July 11, 2014
‘साहित्यिक’ ज्ञानेश्वर आणि वाङ्मयीन भाषा-वैविध्य व त्या अनुषंगानें एकाच रचनाकाराच्या भिन्नभिन्न भाषास्वरूपाची , (आणि अन्य क्षेत्रातील सृजनशील व्यक्तीँची) उदाहरणें यांची ओळख करुन देणारे सदर….
March 19, 2018
करा सर्वस्व ईश्वरासी अर्पण त्यांतच मिळेल समाधान,
जीवन अग्नी पेटत राही उर्जा निघे त्याचे ठायीं ।
उर्जेचे होते रुपांतर साधत असे कार्य त्यातून,
भावनेचा आविष्कार देई जीवना आकार ।
व्यक्त करण्या भावना उर्जा लागे त्यांना,
एकाग्र करा मना सोडूनी सारी भावना ।
एकाग्र चित्त हेच ध्यान प्रभू मिळण्याचे साधन,
सारी उर्जा ध्यानांत जाई तीच ईश्वरार्पण होई ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
August 4, 2015

तुझ्या सहस्रावधी रुपांच्या दर्शनाची आस आहे . तुझ्या अस्तित्वाचा ध्यास आहे. माऊली , तुझ्या प्रसन्न आशीर्वादाचा वरदहस्त नित्य लाभावा आणि मायेचा ओलावा आमच्या हृदयात पाझरत रहावा , यासाठी जगदंबे , दोन्ही कर जोडून ही विनवणी करतो आहे .
September 26, 2025
(जैन लोककथा)
एका कुटुंबात तीन भाऊ होते. त्यांच्या बायका आळीपाळीने स्वयंपाक करीत असत. एके दिवशी लहान सूनेला स्वयंपाक करावयाचा होता.
November 25, 2025

विजयला बुटाचे आकर्षण लहानपणापासून होते. विजय कमवायला लागल्यावर त्याने कधी स्लीपर फार घातली नाही.मग ती कितीही महागातली का असेना ? गोव्यावरून विजयने आणलेली स्लीपर त्याने कारखान्यात काम करताना वापरली.
March 11, 2022
आमची भाषा टिकेल, हें ठीक. पण मग आतां स्वस्थ बसायचं कां? आपल्या जनजीवनात, व्यापार-व्यवहारात इंग्रजीच्या तुलनेने आपल्या मातृभाषेला दुय्यम स्थान मिळूं नये, असं आम्हाला जर वाटत असेल, तर आपण त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या भाषांना आधुनिक संदर्भात समृद्ध बनविण्यासाठी झटलं पाहिजे. त्यासाठी करायच्या काही गोष्टींकडे आपण एक नजर टाकू.
March 23, 2019
लहानपणी कोजागरी पौर्णिमा आमच्या सोसायटीच्या गच्चीवर साजरी केली जायची. तिथल्या पाण्याच्या टाकीवर “कोजागरी पौर्णिमा” अस पांढरा, लाल, हिरव्या रंगीत खडूने छान अक्षरात लिहीलेले असायचे. बाजूला सुंदर नक्षी काढलेली असे.
October 11, 2019
दुपारची वेळ होती. सोसायटीत थोडी सामसूमच होती. सौभाग्यवती स्वयंपाकघरात कामात होती. अमित संगणकावर कांही काम करत होता. मीही पेपर वाचत होतो. माझ्या लाडक्या संपादकाचा अग्रलेख वाचण्यात मग्न होतो. त्यांनी धनदांडग्या उद्योगपतींवर चांगलं झणझणीत लिहिलं होतं.
January 4, 2024
त्यांनी पुण्याच्या केईएम रुग्णालयात कुटुंबनियोजनाचे पहिले केंद्र काढावयास भाग पाडले आणि दुसरी गोष्ट “ज्या देशातील लोक पंढरपूरच्या वारीला येतात, तो महाराष्ट्र“ अशी व्याख्या त्यांनी केली. पावसातील संगीत ऐकणारं कविमन, त्याच वेळी मानवाच्या हाडांचे सांगाडे तपासणारी एक शास्त्रज्ञ. दोन्ही गोष्टी त्यांच्या देहातच होत्या, त्या संपूर्ण आयुष्य कान आणि डोळे उघडे ठेवून जगल्या.
September 19, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti