Login Here Join Now

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • शाळेतला पावसाळा

    रैनाने पटापट आवरलं तरी आता तिला शाळेत जायला उशीर होतंच होता. सकाळी बरोब्बर आठ वाजून पाच मिनिटांनी तिची स्कूल बस येते. आठ वाजले तरी रैनाची आंघोळ व्हायची होती. त्यातच तुला “हे करायला नको, तुला ते करायला नको' अशी आईची आरती सुरू होतीच. आता ऊशीर झाल्याने शाळेत मार खावा लागेल त्यापेक्षा प्रेमळ भुताला बोलावलेलं बरं, असा रैनाने विचार केला.

    रैनाने डाव्या हाताची मूठ घट्ट बंद केली. उजव्या हाताच्या तळहातावर डाव्या हाताची मूठ ठेवली. उजव्या हाताच्या चार बोटांनी ही मूठ पकडली पण अंगठा मात्र सरळ ठेवला. मग डोळे बंद करुन मुठीमधे तीन वेळा फुंक मारत, दोन वेळा हळूच म्हणाली,“प्रेऽऽऽमळ भूऽऽत.. .. प्रेऽऽऽमळ भूऽऽत”
    त्याक्षणी रैनाच्या मानेवरुन एक बर्फाचा खडा घरंगळत गेला. आणि खिशिफिशी हसत प्रेमळ भूत म्हणालं, “बोल रैना काय मदत कर? तुझी शाळा नदीत नेऊन ठेवू? की तुझ्या शाळेत वाघ सिंह पाठवू?”
    “अरे तू पाहतो आहेस ना.. मला ऊशीर होतोय.. मला मदत कर.”

    “ओके..बोके..पक्के.. काम शंभर टक्के” प्रेमळ भूत खुसफूसलं.
    पाचच मिनीटात रैनाची स्कुल बस आली आणि तिथेच बंद पडली. ड्रायव्हरने खूप प्रयत्न केले पण गाडी सुरूच होईना.
    स्कुल बस पाहताच आई रैनाला ओरडू लागली,“चल आटप लवकर.”
    पण रैनाने अजिबात घाई गडबड केली नाही. तिने सावकाश आवरलं. आणि ती बस जवळ गेली. रैना बसमधे चढताच बस सुरू झाली. रैनाची सॅक आपोआप हवेत तरंगत वर गेली. रैनाला कळलं,सॅकमधे प्रेमळ भूत बसलं आहे.

    ती मनातल्या मनात भुताला म्हणालि,“तू शाळेत नको येऊस. तिथे वर्गातल्या सरांचं ऐकावं लागतं.”
    प्रेमळ भूत गयावया करत म्हणालं,“येतो ना गं प्लीज. मी सरांनी सांगितलेलं सगळं ऐकीन. आणि तुला मदत पण करीन.”
    बस बिघडली असल्याने शाळेत पोहोचायला ऊशीर होईल असं वाटलं होतं. पण बस अशा काही तुफान वेगाने गेली की ड्रायव्हर चक्कर येऊन पडला तरी बस वेळेवर पोहोचली. ज्या मुलांना भीती वाटली त्या मुलांना झोप आली व शाळा आल्यावर जाग आली.
    सगळे वर्गात गेले.
    शाळा सुरू झाली. जोशी सर वर्गात आले. सगळी मुले उठून उभी राहिली. पाठोपाठ रैनाची सॅकपण हवेत ऊंच गेली. सरांनी मानेनें खूण केली. सगळी मुले बसली पण सॅक मात्र हवेतच तरंगत राहिली.

    सरांनी काही प्रेमळ भुताला बसायला सांगितलं नाही म्हणून ते हवेतल्या हवेत उभंच होतं.
    हवेत तरंगणारी सॅक पाहून सर दचकले. पण पटकन रैनाने सॅक खालि ओढली.
    आज भूगोलाचा तास होता. हवामान व पाऊस असा विषय होता. इतक्यात मुलांनि काहीतरी गडबड करायला सुरुवात केली.
    सर वैतागून म्हणाले,“आधी मी सांगतो ते ऐका..”
    प्रेमळ भुताला वाटलं आता सर जे जे सांगतील ते ते ऐकलं पाहिजे.
    सर म्हणाले,“समुद्राच्या पाण्याची वाफ होते.”
    त्याक्षणी खिडकीतून गरमागरम वाफेचे लोटच्या लोट वर्गात येऊ लागले.
    मुले घाबरली. त्यांनि खिडक्या बंद करण्याचा प्रयत्न केला, पण छे!
    जरा घाबरुनच सर म्हणाले,“याच वाफेचे ढग बनतात.”
    आणि काय चमत्कार, वर्गात वाफेचे ढग तरंगू लागले. इकडे तिकडे फिरू लागले.मुले आरडा ओरडा करू लागलि. ढगांना हात लावू लागलि. बाकावर उभं राहून ढगात जाऊ लागली. हातांनी ढग इकडे तिकडे ढकलू लागली. वर्गात अंधारुन आलं.
    सरांना ही कळेना हा काय प्रकार सुरु आहे? त्यांनी घाबरत थरथरत विचारलं,“इथे काही भुताटकी तर नाही ना?”
    त्याक्षणी वर्गात ढगांचा गडगडाट होऊ लागला. एक ढग हसत-हसत गडगडला, “होऽऽऽ आहे भुताटकी.. पण प्रेमळ भुताटकी..”
    सरांचे पाय लटपटू लागले. त्यांच्य हाता-पायाला कंप सुटला. जीभ तोंडात लडबडू लागली.
    मुले म्हणाली,“सर शिकवा.. पुढे बोला..”
    सर कसंबसं म्हणाले,“या ढगांना गार हवा लागली की..”
    वर्गात गार हवा वाहू लागली. वाऱ्याचा वेग वाढला. गारवा अंगाला झोंबू लागला. ढग गरागरा फिरु लागले. मुले चेकाळली. धमाल आरडओरडा करू लागली.
    सरांना चक्कर येऊ लागली. असं कसं होतंय तेच त्यांना कळेना.
    मुले म्हणाली,“सर शिकवा.. पुढे बोला..”
    सर लडबडत म्हणाले,“ढगांना गार हवा लागली की मग पाऊस पडतो.. ..”
    वर्गात मुसळधार पाऊस पडू लागला.
    वर्गात मुलांच्या कंबरेपर्यंत पाणी तुंबलं. वर्गाचा दरवाजा उघडा असूनही पाणी काही बाहेर जाईना. मुले बाकावर उभं राहून पावसात नाचू लागली. पाण्यात डुंबू लागली. एकमेकांच्या अंगावर पाणी उडवू लागली. मुलांच्या वह्या, पुस्तकं आणि सॅक वर्गात तरंगू लागल्या.
    जोशी सरांना कापरं भरलं. त्यांची पँट भिजली. शर्ट भिजला. हातातले पुस्तक भिजले.
    पावसात भिजत आणि पाण्यावर तरंगत मुले म्हणाली,“सर शिकवा.. पुढे बोला..”

    वर्गातली टेबल खूर्चि आता पाण्यावर तरंगू लागली होती. मुलांची बाकं बाजूला तरंगत जाऊन मधल्या हौदात मुले धुमाकुळ घालत होती.
    सरांची भीतीने बोबडी वळली होती. तरी ते पुटपुटले,“पाऊस पडल्यावर गवत उगवतं..झाडं उगवतात..”
    त्याक्षणी वर्गात गवत उगवू लागलं. चिकूची, आंब्याची, सफरचंदाची, जांभळाची, डाळींबांची झाडं वर्गात उगवली.
    मुले आता झाडावर चढून पाण्यात उड्या मारू लागली.
    काही मुले छोटे चिकू, छोटे आंबे खाऊ लागले. एकमेकांना फळं फेकून मारू लागले.
    वर्गात धमाल कल्ला सुरु होता.
    इतक्यात लांबून मुख्याध्यापकांचा आवाज ऐकू आला, “काय दंगा चाललाय त्या वर्गात..?”
    जोशी सर भिजले होते तरी त्यांच्या तोंडचं पाणी पळालं!
    रैना भुताला म्हणाली,“अरे आम्हा मुलांना पहिल्यासारखं नीट कर. नाहीतर मुख्याध्यापक आमची धुलाई करतील.”
    “ओके..बोके..पक्के.. काम शंभर टक्के” प्रेमळ भूत खुसफूसलं.
    वर्गातली झाडं व गवत गायब झालं. पाणी उडून गेलं. टेबल, खुर्ची व बाकं जागेवर आली. मुले चक्कं कोरडी झाली. मुलांच्या वह्या, पुस्तकं व सॅक एकदम कोरड्या ठणठणीत.
    फक्त जोशी सर चिंब भिजलेले होते.
    इतक्यात रागीट मुख्याध्यापक वर्गात आले. त्यांनी पाहिलं तर, सगळी मुले शांत बसलेली पण सर मात्र भिजलेले.
    मुख्याध्यापक भडकले. रागाने लालेलाल झाले. ते सरांवर गुरकावत म्हणाले,“तुम्ही असे भिजलात कसे? वर्गात काय आंघोळ करता काय?”
    जोशी सर भीतभीत म्हणाले,“आधी वर्गात वाफ आली. मग त्या वाफेचे ढग झाले. त्या ढगांना गार हवा लागली. त्यातून पाउस पडला. त्याच पावसात मी भिजलो.”
    मुख्याध्यापक हळूच पुटपुटले,“मला काय मूर्ख समजता का?” मग ते सावकाश चालत जोशी सरांच्या जवळ गेले. त्यांच्या डोळ्यात काही वेडाची झांक दिसते का, ते पाहू लागले.
    त्यांच्या ओल्या पाठीवरुन हात फिरवत म्हणाले,“मग काय झालं पाऊस पडल्यावर..?”
    सर थरथरत म्हणाले,“वर्गात झाडं उगवली..”
    हे ऐकताच मुख्याध्यापक खो खो.. ठो ठो.. हसू लागले. मोठमोठ्याने हसू लागले.
    इतक्यात अचानक छतातून नळ सुटल्याप्रमाणे मुख्याध्यापकांच्याच अंगावर बदाबदा पाणी पडलं. तरिपण फक्त त्यांचि पँटच भिजली शर्ट मात्र सुका!!
    आणि कशी कुणास ठाऊक, पण शाळेची घंटा जोरजोरात वाजली.
    शाळा सुटली. मुले पळाली.
    घरी जाताना रैनाने भुताला विचारलं,“काय रे, तु आम्हा सर्वांना कोरडं केलंस, मग सरांन का नाही केलंस?”
    “अगं तू मला काय सांगितलं होतंस ते आठव ना..ठ प्रेमळ भुताने असं म्हणताच रैनाला आपली चूक कळली.
    “नंतर तू त्या मुख्याध्यापकांना का भिजवलंस रे?”
    खिशिफीशी हसत भूत म्हणालं,“अगं नाहितर आपल्या बिचाऱ्या जोशी सरांना.. .. ..”

    काऽऽय? प्रेमळ भुताचं हे वाक्यं तुम्ही पुरं करू शकाल? तसं भुताला कळवाल? त्याला इमेल कराल?
    आणि,
    तुम्हाला काय वाटतं, शाळेची घंटा कुणी वाजवली असेल?
    न भीता भुताला कळवा. त्याला इमेल करा. भूत तुम्हाला नक्की उत्तर पाठवेल.
    कारण,
    आपलं प्रेमळ भूत लहान मुलांना कधीच त्रास देत नाही. पण जी मोठी माणसं लहान मुलांना त्रास देतात त्यांना मात्र फटके देतं. किंवा आणखी काही गमती करतं.
    प्रेमळ भूत तुम्हा मुलांच्या पत्रांची किंवा इमेलची नेहमीच वाट पाहात असतं.

    - राजीव तांबे.

      July 23, 2015


  • कहो ना.. ‘आज भी’..प्यार है

    १४ जानेवारी, साल 2000  या दिवशी हिंदी सिनेमा जगताला, थोडक्यात बॉलीवूड ला ‘कहो ना प्यार है’ सिनेमामुळे एक ‘अजिंक्यतारा’ मिळाला…हृतिक राकेश रोशन नावाचा.. म्हणून हा 2000 सालचा जानेवरी महिना खास!

      January 15, 2022


  • संकल्प आणि कृती

    वर्षाचा शेवटचा महिना सुरु झाला की आपणा सर्वांना चाहूल लागत असते ती येणाऱ्या नवीन वर्षाची , आणि मग, या नव्या वर्षात काय काय करायचे ?
    काय काय करणार आहोत ? याची यादी अर्थात "संकल्प " Resoluations ",या बद्दल मित्रांन्शी शेअर करण्याची उत्सुकता असते.
    हे सर्व फेसबुक आणि इंटरनेट माध्यमावर वर मोठ्या आवडीने केली जाते . आपणही यात
    फारसे मागे नाहीत ", हे शेअर करण्याकरिता या संकल्प-उपक्रमात ", सहभागी होण्याचे ठरवणे ", यात काहीच वावगे नाहीत .
    " आपल्याला काही करावेसे वाटणे आणि तशी इच्छा होणे " ही भावनाच मुळी एक नवा उत्साह देणारी आहे , हे नव-चैतन्य आपल्या मनाला नक्कीच एक नवी उमेद देणारे असते.
    यासाठी नव-वर्षातच नव्हेतर आगामी दिवसात,आणि येत्या वर्षात "आपण काय काय करायचे , " ? हे जरूर ठरवावे , यातील जे सहजतेने आपण पूर्ण करू शकतो अशा सोप्या वाटणाऱ्या
    गोष्टी सर्वात आधी करून टाकल्या तर "संकल्प-पूर्तीचा आनंद " घेता येईल हे नक्की , यामुळे उत्साहात भर तर पडेलच पण "आपण काही करू शकतो ", हा विस्वास अधिक
    बळकट होतो हे जास्त महत्वाचे आहे.
    मित्रानो - गेल्या काही दिवसात माझ्या अनेक मित्रांनी त्यांचे "नियोजित संकल्प "जाहीर केले, या सर्वांचे मन: पूर्वक कौतुक आहेच ,
    आपण संकल्प करतो म्हणजे ,
    गोष्टींचा आपण सतत विचार करीत असतो ", हे तर तुम्ही पण मान्य कराल ,
    आणि ज्या गोष्टींचा विचार केला जातो त्या सर्व गोष्टी-या आपल्याशी नक्कीच संबंधित असतात ,
    त्या दृष्टीने आपण जे संकल्प करतो ते नक्कीच खूप महत्वाचे असतात, आपल्या दैनिक वेळापत्रकावर परिणाम करू शकणारे असतात . म्हणून संकल्प करीत असतांना आपण
    एक काळजी घ्यावी ती म्हणजे " आपल्याला जे करणे शक्य आहे, पूर्णत्वास नेऊ शकू अशा संकल्पास सिद्ध करावे.
    माझा एक अनुभव -जो तुमचा सुद्धा असेल - तो म्हणजे -
    आपणच आपल्या अनेक संकल्पांची .कल्पना ऐकून -लगेच चेष्टेचा सूर लावतो, टिंगल सुरु करतो ..अर्थातच यातील गांभीर्य मग निघून जाते . त्यात विशेष म्हणजे आपणच जर गंभीर
    नसुत तर हे संकल्प-चर्चा " निव्वळ हास्यापद उपक्रम " म्हणून चर्चिला जाऊन , यातून काहीच निष्पन्न होऊ शकत नाही. यासाठी -
    गाजावाजा न करता ..आपण आपल्या मनाशी नक्की काही एक जरूर ठरवावे .
    काय सुरु करायचे , काय बंद करायचे .?. मग विषय सोपा असो, कठीण असो , आपली परीक्षा पहाणारा असो ,
    प्रामाणिकपणे इच्छित संकल्प पूर्ण होण्यासाठी कृतीचा -आरंभ करावा ,
    आपल्या कृतीतूनच आपल्यात होऊ लागलेला बदल सर्वांना जाणवू लागतो , मग, त्यावर होणारी जाहीर वाच्यता किंवा हास्यापद चर्चा आपण टाळू शकतो ,
    म्हणून अगोदर कृतीतून संकल्प सिध्द करून दाखवणे ",हे केंव्हाही परिणाम करणारे असेल.
    संकल्प करणे , ते जाहीर करणे ,हा एक लोकप्रिय असा वार्षिक उपक्रम आहे , यात सहभागी होण्यास सर्वांना आवडते , या संकल्प मोहिमेत - वर्षानु वर्षे परिचित असलेले संकल्प-
    असतात जसे -
    सकाळी -फिरायला जाणे,व्यायाम करणे , योगा करणे , वजन नियंत्रणात आणणे ,साखर सोडणे , चहा कमी करणे , जेवणाच्या वेळा पाळणे ",इत्यादी इत्यादी ..
    वरील सर्व विषय अतिशय महत्वाचे आहेत , म्हणजेच ते थेट आपल्याशी - वैयक्तिक संबंधित आहेत ..याबद्दल तर आपण जागरूकपणाने -काळजी घेत वागायलाच पाहिजे
    ,आणि आपल्या डॉक्टरांनी आपणास
    वेळोवेळी केलेल्या सुचना आपण पाळल्या पाहिजे ..मग, या साठी "संकल्प -करून " बोलून दाखवण्याची गरजच नाही ,उलट न सांगता हे कृतीतून दिसले पाहिजे ,
    या साठी एक मोठा आणि महत्वाचा संकल्प नक्कीच करू या - तो म्हणजे - डॉक्टरांनी केलेल्या सुचानाची काटेकोर पणाने अमलबजावणी करायची ",
    या संक्ल्पनाने आपली स्वतःची काळजी तर नक्कीच कमी होईल ,त्याच बरोबर ..परिवारचे टेन्शन कमी होईल ", हे जास्त महत्वाचे आहे.
    संकल्प प्रत्येकाने जरूर करावे , यामुळे आपली निश्चयी -वृत्ती वाढेल , निर्णय -क्षमता वाढण्यास मदत होईल , आणि आवडीच्या विषयांचे संकल्प असतील तर संकल्प-पूर्ती साठी
    आपल्या कडून मनापासून प्रयत्न केले जातील .
    माझा संकल्प जरूर तुमच्याशी शेअर करीन -
    लेखनाच्या माध्यमातून "चांगले ते ते- प्रियजनाशी सांगेन " असा माझा लेखन प्रयत्न असेन यासाठी तुमच्या प्रतिसादाची , अभिप्रायाची सोबत असू द्यावी.
    शेष शुभ....
    नव-वर्षाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
    स्नेहांकित -
    अरुण वि.देशपांडे -पुणे.
    मो- 9850177342
    -------------------------------------------------------------------------------------------
    (पूर्व-प्रकाशित - दै.सत्य -सह्याद्री -सातारा .रविवार-साहित्य -पुरवणी .दि.३०-१२-२०१८ )
    लेख- संकल्प आणि कृती
    ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
    मो-9850177342

      January 1, 2019


  • घंटा (मी आणि ती कथा)

    ए बाई कुठे भटकतेस उन्हातून? तिने मागे पाहिले , आयला तू इथे काय करतोस, ह्या गावात . हे तर डोंबिवली गाव नाही पण शहरही नाही, ऍन्टी गोबल व्हिलेज म्हण

      July 9, 2021


  • सौंदरानंद

    महान संस्कृत महाकवी अश्वघोष यांनी लिहिलेले सौंदरानंद हे संस्कृत साहित्यातील एक श्रेष्ठ महाकाव्य आहे. भगवान गौतम बुद्ध यांचा सावत्र भाऊ नंद आणि त्याची स्वरुपसुंदर प्रिय पत्नी सुंदरी यांच्या प्रेमावर आणि राजा नंदाने बुद्धधर्माचा स्वीकार करणे या आधारभूत कल्पनेवर हे महाकाव्य रचलेले आहे.

      June 11, 2026


  • जालना शहराच्या रस्त्यावरील कलंदर कवी : शम्स जालनवी 

    जालना शहर पूर्वीपासून जसे व्यापारउदीम आणि उद्यमशीलतेसाठी प्रसिद्ध आहे तसे ते उर्दू कवी आणि मुशायऱ्यासाठीही परिचित आहे.

      August 24, 2024


  • मन नावाचे भूत.. (माझी लंडनवारी – 28)

    मला प्रिया अजिबात वरती जाऊन द्यायला तयार नाही. तिच्या डोक्यात काही तरी हॉन्टेड गोष्ट आहे तिथे, नाही तर आपण न उघडता ती खिडकी उघडली गेली कशी? आणि माझ्या डोक्यात चोर तर नाही वरती?

      January 30, 2022


  • होळी

    घड्याळात साडे आठ वाजलेले पाहून जयश्री ताईंनी दोन्ही मुलांना झोपेतून उठवायला सुरुवात केली ” मनिष…..अरे बाळा उठा आता, बघ जरा घड्याळात .. साडे आठ झाले …मृण्मयी ..चला उठा …आज होळी साठी जायचंय ना तुम्हाला तयारी करायला? चौकात सगळी मुलं आली बरं का ! ” शेवटच्या वाक्याची मात्रा मात्र लगेच लागू पडली आणि दोघं ही ताडकन उठून बसली …

      December 8, 2024


  • चाय’से पहेचान

    काहीजण माणसाच्या सहीवरुन, त्याचा स्वभाव ओळखतात तर काही जण चेहरा पाहून, स्वभाव ओळखतात.. आपण आता एकेकाच्या ‘चहा’वरुन स्वभाव ओळखायचा प्रयत्न करु.

      September 5, 2021


  • खासे सामोसे

    पाऊस पडून गेल्यावर काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा हमखास होतेच. अलीकडे कोणत्याही राजस्थानी स्वीट मार्टमध्ये गरमागरम सामोसे विक्रीला ठेवलेले असतातच. ज्याला ‘छोटीशी भूक’ आहे, तो सामोसा खायला, नक्कीच प्राधान्य देतो. दुकानदार तो गरम सामोसा पेपरप्लेटमध्ये घेऊन अंगठ्याने दाबून तो फोडतो, त्यात साॅस, ग्रीन चटणी घालून वरती बारीक शेव भुरभुरतो व सोबत एक तळलेली मिरची देतो.

      July 15, 2021