नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
दुलीप सिंघ केवळ ९ वर्षाचे होते आणि राज्याला ब्रिटिशांना विरुद्ध पाहिले युद्ध लढावे लागले. राणी जिंद कौर ह्यांनी जबरदस्त मुकाबला केला, पण त्या असफल झाल्या आणि सत्तेवर इंग्रजी हुकुमातीचा हात आला. दुलीप सिंघ अजूनही राजेच होते, पण मुख्य कारभारात इंग्रजांनी त्यांच्या माणसांची नेमणूक केली. राणी जिंद कौर ह्यांच्या हातून सत्ता गेली. तरी त्या पुढचे जवळपास ५-६ वर्ष संघर्ष करत राहिल्या, इंग्रजांच्या नाकी नऊ आणणारी ही राणी त्यांच्यासाठी भीतीचे कारण बनली. इंग्रजांनी राणीची बदनामी सुरू केली, त्यांना ‘बगावती’ म्हणू लागले. आईबरोबर राहिला तर राजकुमार दुलीप सिंघ ब्रिटिश विरोधी होतील म्हणून त्यांनी ९ वर्षाच्या दुलीप सिंघ ह्यांना इंग्लंडला पाठविले आणि महाराणी जिंद कौर ह्यांना त्यांच्या केसांनी पकडून फरफटत कारावासात बंद केले. उत्तर प्रदेश च्या किल्ल्यातून त्या पळून गेल्या आणि नेपाळ ला वास्तव्य केले. आपल्या मुलापासून दूर. ११ वर्ष त्यांचे वास्तव्य नेपाळ मध्ये होते.तिथल्या महाराजांनी राणीला सुरक्षित ठेवले आणि त्याच्या मान मुरतब्यासह ठेवले.
August 11, 2022
युगानुयुगांपूर्वी (आता असंच म्हणायला हवं- १४ महिने चित्रपटगृहातील पडदा आणि नाटकाचा रंगमंच पाहिला नाही) पुण्याच्या बालगंधर्वला ” बाबला अँड हिज ऑर्केस्ट्रा “ला गेलो होतो दोन कारणांसाठी
May 23, 2021
भारतीय रेल्वे हे प्रवासाचे फार मोठे साधन आहे यामध्ये मालवाहतूक विशेष प्रमाणात केली जाते. भारतीय रेल्वे मध्ये अनेक लोकांना काम मिळाले आहे हे नाकारता येत नाही. रेल्वेतील लोकांचा प्रवास सुखमय होण्यासाठी रेल्वेने फार मोठे पाऊल उचलले आहे. रेल्वेने अनेक कामगारांचे संसार चालविली आहे त रेल्वे कर्मचाऱ्याला कमी भाड्यामध्ये खोली पाणी वर लाईट याची चांगली सुविद्या निर्माण करून दिलीआहे.
December 29, 2022
ना गपूरचे सुप्रसिद्ध गायक श्री. शरद मुठे माझ्या वडिलांचे मित्र होते. शरद मुठे हे उत्तम कवीदेखील होते आणि लहान मुलांची अनेक गाणी त्यांनी लिहिली होती. लहान मुलांची गाणी असलेले त्यांचे 'फुगेवाला' हे पुस्तक आणि इतर पुस्तकेही प्रसिद्ध झालेली होती. मुठेकाकांना लहान मुलांचे शिबिर घेऊन ठाण्यात गाणी शिकविण्याची इच्छा होती. डॉ. बेडेकर विद्यामंदिर या शाळेचे मुख्याध्यापक श्री. अशोक चिटणीस हे माझ्या वडिलांचे एक जवळचे मित्र. त्यांनी पुढाकार घेतला आणि मे महिन्याच्या सुट्टीत शाळेतच हे शिबिर आयोजित केले. या शिबिराच्या उद्घाटन समारंभासाठी मुठेकाकांनी एक अभिनव कल्पना मांडली. ते म्हणाले,
“या लहानग्यांच्या शिबिराच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणेही छोटी मुलेच असतील." झाले! या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका छापली गेली. या समारंभाचे अध्यक्ष होते अनिरुद्ध जोशी (वय वर्षे सात) आणि प्रमुख पाहुण्या होत्या मुग्धा चिटणीस (वय वर्षे पाच). मुग्धाने पुढे जाऊन कथाकथनकार आणि चित्रपट अभिनेत्री म्हणून खूप नाव मिळविले. बालगीते ही संख्येने फार कमी असतात. त्यामुळे नेहमी अनेक मुले तीच तीच गाणी म्हणताना आपण ऐकतो. मुठेकाकांनी या शिबिरात आम्हाला अनेक नवीन बालगीते शिकवली. ती लोकांसमोर सादर कशी करायची हे देखील शिकवले. अशा किती घटनांमधून आपण कसे घडत जातो, हे त्यावेळी आपल्याला कळत नाही, पण पुढील आयुष्यात त्याचा अगणित फायदा आपल्याला मिळत असतो. या शिबिरात साथीसाठी वाद्ये नव्हती. मुठेकाका एक लाकडी स्टूल समोर घेऊन ताल धरीत असत आणि आम्ही गात असू. कोणत्याही वाद्याच्या साथीशिवाय उत्तम गाणे सादर करता येऊ शकते, हे मुठेकाकांनी आम्हा लहान मुलांच्या मनावर कोरून टाकले. त्यामुळे पुढे कार्यक्रम सादर करताना असे अनेकदा घडते, की हवे असलेले वादक उपलब्ध नसतात. कधी कधी अनेक वाद्ये साथीला घेणे शक्य होत नाही आणि मग गायकावरील दडपण वाढते. मी मात्र अशा प्रसंगी कधीच डगमगत नाही. याचे सारे श्रेय मी मुठेकाकांच्या शिबिराला देतो.
- अनिरुद्ध जोशी
June 24, 2022
आज ऐन सनासुदीचं आभाळ आलं व्हतं, तळहाताच्या फाॅडावाणी जपलेलं आमच्या रानातलं ह्ये पिवळं सोनं उघड्यावरच व्हतं, आमच्या रानातला समदा कारभार हाकणारं आण्णा आन् दादा ह्येन्ला एकच चिंता पडली. आता सनासुदीमुळं लेबर मिळायचंबी आवघड झालतं मग काय तोंडातला घास पावसात भिजुनी म्हणुनशान घरातल्या समद्या पावण्या रावळ्यांसहीत मी आन माझं भाऊबंद निघालोकी रानात. आमचं दादा आन् आण्णा सकाळपसुनच रानात व्हतं, सोयाबिनिची रास लाल तळवटावर शिग लावुन बसली व्हती. सुतळी गोण्या, चार घमेली, रूपेश, सुजित, युवराज, स्वप्निल ही पोरं गवतावनी झटली आन् समदं सोयाबिन आवघ्या तासाभरात शिलपॅक करून टाकलं. ऊशिराची पेर आसल्यानं मधल्या पावसाच्या रपाट्यातुन आमचं सोयाबिन थोडक्यात वाचलं व्हतं. चार एकरात ईनबिन ईस किंटल सोयाबिन पदरात पडलंय, शेतकऱ्याचं ह्ये पिवळं सोनं बाजारात मातुर कवडीमोल किंमतीनं ईकलं जाणाराय ह्यजी खंत वाटतिया.
रानातलं ह्ये सोयाबिन ईकल्यावर ह्यज्यापसुन सोया दुध, सोया पनिर, सोया टिक्का, सोया चिल्ली, सोया ऑईल आसली डझनभर उत्पादनं तयार व्हत्याली पण ह्ये सोयाबिन मातीत पिरून त्याला कोरड्या आन् वल्या दुष्काळाच्या हाबाड्यातुन वाचवुन, घरातल्या समद्या माणसानी जे जिवाचं पाणी केलंय त्याचा दाम मातुर त्येन्ला मिळणार नाय ह्यजंच वाईट वाटतंय. माझ्या फिरस्तीमुळं मला शेताकडं जास्तीचं लक्ष देता येत नाय पण जितबी कुठं कोणत्याबी ईषयावर बोलायला जातो तवा शेतकऱ्याचं दुःख मांडल्याबिगीर माझं व्याख्यानच पुरं व्हत नाय. शिवटी समदं ईषय रानातल्या मातीत सुरू हुन मातीतच संपत्यात मग त्या मातीला माझ्या बोलण्यातुन आन् लिव्हण्यातुन जित्तं करणं ह्ये तर माझं कर्तव्यच हाय की.
ईस किंटल सोयाबिन पोत्यात भरणं म्हंजी माज्या सारख्या कधीतरी शेतात राबणाऱ्या माणसासाठी जरा ओव्हरलोडंच काम म्हणायचं. उद्या व्याख्यानाला उभा राहील्यावर आंगतला ह्यो दर्द शब्दांच्या रूपानं भाहीर पडलं हे नक्की. आज बऱ्याच दिसानं माझ्या आंगातुन कष्टाचा घाम आलता. गेल्या कित्येक दिसापासुन मोबाईल पेक्षा जास्त वजन कधी उचलण्यात आलं नाय पण आज साठ किलोच्या गोण्या दादांसोबत उचलताना माझ्यातला पैलवान जागा झालता. वडीलांच्या हातात हात दिऊन शेतात राबताना येगळाच आभिमान वाटत व्हता. खरं सांगतु आपल्या बापासोबत काम करण्यासारखा दुसरा आनंद नाय राव. दुपारपसुनचं ह्ये आमचं कष्टाचं काम सांच्याला समदी पुती शेडमदी टाकुनच संपलं. शेततळ्यावर हात पाय तोंड धुवुन आमच्या टॅक्टरवर बसुन ह्यो सगळा परसंग टाईपीत बसलोय. दिवस मावळलाय, रानातली पाखरं घराकडं निघाल्याती म्या बी फोर्डमधी बसलुय, पोटात मरणीची आग पडलीया; कधी एकदा आईच्या हातची चुलीवरची भाकरं म्हशीच्या घट्टबंड्या दुधात चुरून खातुय आसं झालंय.
लेखक : प्रा.विशाल गरड (पांगरीकर)
दिनांक : ३० ऑक्टोंबर २०१६
वेळ : सायंकाळी ५ ते ६:३० वाजता (रानात)
November 2, 2016
मी म्हणालो तुम्हा मुलींचे खूप लक्ष असते सगळ्यांकडे . तशी ती हसली म्हणाली , जसे तुम्हा पुरुषांचे मुलींकडे , स्त्रियांकडे असते तसे आमचेही. तिच्या माझ्यात जवळ जवळ २५ वर्षाचे अंतर. शेजारीच रहात होती. आम्ही चाळीत रहात असल्यामुळे थंडीत ऊन खायला सकाळी बाहेर असायचो कधी रविवारी तर कधी बँक हॉलीडेला.
June 26, 2021

चालणारा पोपट पहिल्यांदाच बघत होतो. त्यााला कधीच उडता येणार नव्हतं. कारण पंखांची टोकं कलात्मक पद्धतीनं कापून टाकलेली होती. उडणारे पोपट बघितले, पिंजऱ्यातले पोपट बघितले. पण चालणारा पोपट पहिल्यांदाच बघितला.
May 10, 2022
आम्ही चार मोठे, अधिक दोन लहान असे एकंदर सहा जण, एक रूम पुरणार नव्हती, दोन घेतल्यात का? उगाच डोक्यात किडा वळवळत होता. सामनासगट आम्ही जेव्हा आमच्या रूम मध्ये आलो त्यावेळेस मला दुसरा धक्का बसला. ती ‘रूम’ म्हणजे, टू बी.यच.के.चा वेल फ़र्निशश्ड फ्लॅट होता! हो किचन पण होत! गॅस, ओव्हन,फ्रीझ आणि भांड्या सगट! जेवण बाहेर करा किंवा घरात शिजवून खा!
आणि संध्याकाळी सातच्या सुमारास आम्ही ‘रिव्हर वॉक’ साठी बाहेर पडलो. डिसेम्बरचा महिना होता. भन्नाट लाईटिंगने गाव सजल होत. ख्रिसमस ओसंडून वहात होता. येथल्या लाईटिंगची एक गोष्ट मला खूप भावली, ती म्हणजे हि लाइटिंग झगझगाटाची नव्हती, नेत्रसुखद होती!
November 23, 2020
१९७८ साली दहावीची परीक्षा मी ८३.१४ टक्के मार्क मिळवून उत्तीर्ण झालो. त्यावेळी हे मार्क खूपच चांगले होते. कारण या मार्कांवर मला कोणत्याही उत्तम कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळू शकणार होती. आमच्याच शिक्षण संस्थेचे बी.एन. बांदोडकर कॉलेज ऑफ सायन्स या ठिकाणी मी अॅडमिशन घेतली. मला विज्ञानापेक्षा कला शाखेची जास्त आवड होती. पण कला आणि वाणिज्य शाखेपेक्षा विज्ञान शाखेत अॅडमिशन घेऊन मी पुढे इंजिनिअर व्हावे, असे घरच्या वडिलधाऱ्यांचे मत पडले आणि त्याप्रमाणेच वागायचे असा तेव्हा प्रघात होता. म्हणून मी विज्ञान शाखेत अॅडमिशन घेतली. त्याचबरोबर माझ्या गाण्याच्या शिक्षणाचा प्रवासही सुरू कसा राहील याबाबत मी प्रयत्नशील होतो. पद्धतशीरपणे गाणे शिकण्यासाठी कोणी तरी मला काळे सरांचे नाव सुचवले. माझा आवाजही आता पुरुषांच्या पट्टीत स्थिरावला होता. एके दिवशी माझा मित्र सुबोध दाबके याच्याबरोबर मी संगीततीर्थ पं. विनायकराव काळे यांच्या घरी गेलो. नारायण भुवन या त्यांच्या घरातच संगीताची जादू होती. एका बाजूला कपाटात अनेक सुरांचे तबले व्यवस्थित मांडून ठेवले होते. दुसऱ्या बाजूला अनेक सुरांचे तंबोरे होते. दोन हार्मोनियम होत्या. एक सुरपेटी होती आणि मध्यभागी सरांचे आसन होते. सर तक्क्याला टेकून बसले होते. आम्हा दोघांना सरांनी बसायला सांगितले. सुबोधला गाण्याची आवड खूप! पण तो काही गाणारा नाही. माझ्यावरचे दडपण वाढले. सरांनी हार्मोनियमवर काही सूर वाजवून मला ओळखायला सांगितले. गाण्याबद्दल इतरही काही माहिती विचारून माझी परीक्षा घेतली. हे काळे सर खूपच कडक आहेत, असे ऐकून मी थोडा घाबरलो होतो. पण आता मात्र त्यांच्याकडेच गाणे शिकायला मिळावे असे मला वाटायला लागले. काही गोष्टी घडायला फक्त प्रयत्न उपयोगी पडत नाहीत तर त्याला नशिबाची जोडच लागते. तो योगच यावा लागतो. ती एक घटना तुमच्या आयुष्याला काही वेगळे वळण देण्याइतकी समर्थ असते. मी मनोमन प्रार्थना करत होतो आणि काळेसरांनी मला गाणे शिकवण्यास होकार दिला. माझ्या संगीताच्या प्रवासाच्या वाटेवरला एक मोठा टप्पा मी आज गाठल्याचा आनंद मला झाला होता. त्या आनंदात मी सुबोधबरोबर बाहेर पडलो. “ते हार्मोनियमवर वाजवलेले वेगवेगळे सूर तू कसे ओळखलेस रे?” सुबोध मला विचारत होता. पण मी एव्हाना गाण्याच्या एका वेगळ्याच जगात पोहोचलो होतो. आम्ही दोघांनी तो आनंद भेळ खाऊन साजरा केला.
10 सप्टेंबर 1978, या दिवशी संध्याकाळी मी काळे सरांकडे गाणे शिकायला सुरुवात केली. हा पहिला दिवस माझ्या चांगलाच स्मरणात राहिला आहे. गुरूपूजन झाल्यावर सरांनी मला बर्फीचा तुकडा प्रसाद म्हणून दिला. इतरही अनेक विषयांवर माझ्याशी गप्पा मारल्या. पण गाणे काही शिकवले नाही. शेवटी मी त्याबद्दल विचारले. सर ठासून म्हणाले, अरे, किती हालतो आहेस तू? शांतपणे बसायला तर शिक. गाणे नंतर शिकू या. मी चांगलाच वरमलो. पण मला समजावत सर म्हणाले, "अरे, याला आसन स्थिर करणे असे म्हणतात. याला थोडा वेळ लागतो. काळजी करू नकोस."
गाणे शिकण्यापूर्वीच एक खूपच मोठी गोष्ट सरांनी मला शिकवली होती. खरंच आपण जोपर्यंत स्थिर बसू शकत नाही, तोपर्यंत काही शिकणे शक्य नाही. गाणे तर पुढे राहिले. लवकरच सरांकडे नियमितपणे गाणे शिकायला मी सुरवात केली. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या दुनियेत मी सरांबरोबर प्रवेश केला. मला सुगम संगीतात पार्श्वगायन आणि हिंदी गजल यात काम करण्याची इच्छा आहे असे मी सरांना गाणे शिकायला सुरुवात करण्यापूर्वीच सांगितले. काही जणांचे मत होते की, मी असे सांगितल्याने सर खूप रागावतील. पण तसे काहीच घडले नाही. माझा गाण्याबद्दलचा दृष्टीकोन मी सांगितल्याबद्दल आणि मला काय करायचे आहे याची स्पष्ट कल्पना मला असल्याबद्दल त्यांनी कौतुकच केले. त्यांचे सांगणे असे होते की संगीत कोणत्याही प्रकारचे असो, त्यात सूर आणि ताल यांचे महत्त्व अनन्यसाधारण असते. तेव्हा रागांच्या माध्यमातून सुरांचा आणि तालाचा रियाज करायला सरांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रारंभ केला. वेगवेगळ्या रागात रचलेल्या सरांच्या जवळजवळ साडेसहाशे स्वरचित बंदिशी आहेत. त्या शिकायला सुरुवात केली. रागदारी संगीत हे देखील सुगम संगीताइतकेच मनोरंजकरित्या सादर करता येते हे काळे सरांनी मला शिकविले. रागदारी संगीताबरोबरच सुगम संगीत ते ऐकत असत. इतकेच काय पण पाश्चात्त्य संगीताशी देखील त्यांचा चांगला परिचय होता. त्यांनी बांधलेल्या वेगवेगळ्या रागातील बंदिशी जर तालात अचूकपणे सादर केल्या तर एखाद्या गीतासारख्या त्या परिणाम साधू शकतात हे त्यांनी दाखवून दिले आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मला भावगीते, चित्रपटगीते आणि प्रामुख्याने गझल गायची असल्याने त्यांनी माझा आवाज या गायकीसाठी 'हलका' राहिल असाच रागदारी संगीताचा रियाज माझ्याकडून करून घेतला. माझ्या आवाजात 'फिरत' तर येईल, पण त्यामुळे माझा आवाज एकाच साच्यात फिरणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. गाण्याचा नियमित रियाज मी सुरू केला. काही महिन्यांतच त्या रियाजाचा चांगला परिणाम माझ्या आवाजात कळून येऊ लागला.
- अनिरुद्ध जोशी
June 28, 2022
१९६४ च्या “शगुन ” मधील खय्याम ने संगीतबद्ध केलेलं हे गीत त्याच्या पत्नीने (जगजीत कौर ने) गायलेलं ! गीतकार- हिंदीतला आजवरचा ऑल टाइम ग्रेट – साहीर ! (त्याच्या नंतर गुलज़ार , मग जावेद , मग निदा फाजलीं – ही माझी यादी )
May 9, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti