(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • त्या अफगाण परीचे नाव होते – मधुबाला

    कंदाहार हा दक्षिण अफगाणिस्तानातला पहाडी प्रांत. या प्रांतातले पुरुष लढवय्ये आहेत आणि स्त्रिया सौंदर्यसंपन्न. कंदाहारी ‘पाश्तुन’ जमातीच्या अलिकडे झालेल्या डी. एन. ए. चाचण्यांवरून ते आर्यांचे वंशज असल्याचे आढळले आहे. आर्यांनी सुमारे 2300 वर्षापूर्वी या प्रदेशावर आक्रमण केले होते. तिथल्या पठाण कुटुंबात जन्मलेली एक मुलगी दिसायला खूप सुंदर होती. अकरा भावंडात पाचव्या नंबरची.

      August 23, 2025


  • एकत्र सर्पालय व बेडूकालय !

    दक्षिण आफ्रिकेत एक प्राणी संग्रहालय बघण्यात आले. निरनिराळ्या प्राण्यांची वेगवेगळी दालने बघितली. एकप्रचंड असे सर्पाचे दालन होते. अति विशाल हौद, तळामध्ये दोन भाग केलेले. पाणी व जमिनिसाठ्यी. लहान मोठी झाडे, दगडाच्या शीला, काही ठिकाणी कृत्रिम वारुळे, आणि निरनिराळे खांब रोवले होते. अनेक जातीचे सर्प, पाणी व जमिनीवर मुक्त हालचाली करताना दिसत होते. अश्च्यर्याची गोष्ट म्हणजे

    त्या पाण्यात खूप मासे सोडलेले होते, तसेच बऱ्याच संखेने बेडूक देखील होते. दोन्हीही सापांचे खाद्य. परंतु त्यांचीही प्रजनन क्रिया देखील वाढत राहावी, ह्याचेपण वातावरण आयोजकांनी व प्रशासनांनी निर्माण केलेले होते. गंमत वाटलीकी साप व त्याचे खाद्य बेडूक व मासे एकाच वातावरणात जीवन कंठीत होते. ज्याप्रमाणे आम्ही जंगलात वाघ सिंह आणि त्याच वेळी हरीण झेब्रे ह्यांचेही कळप हे ही बघितले. जीवन मरणाचा आनंद व संघर्ष यांची कला निसर्ग शिकवतच असतो. वेटोळे घालून शांत पडलेले वा हालचाली करणारे अनेक सर्प, दिसत होते. आश्च्यर्याची गोष्ट म्हणजे कित्येक बेडूक हे तेथील सापावरही आरूढ होऊन बसलेले दिसले.आम्हाला मार्ग दर्शकांनी सांगितले कि सापाचे पोट रिकामे असेल, तो उपाशी असेल तरच स्वत:चे भक्ष्य म्हणून बेडकाला व माशाला खातो. एरवी कधी नाही. शिकाऱ्याच्या भूमिकेत साप वेगळाच व चपळ बनतो, त्याचा हालचाली वेधक बनतात. भक्ष्याना त्याची जाण येते. तेही आपला जीव वाचवण्यासाठी धावपळ करतात. इतर वेळी तेही बेफिकीर असतात. पोट भरलेला साप हा अनेक दिवस भक्षविना राहू शकतो. ही एक चांगली रचना. जेंव्हा भूक तेंव्हाच भक्ष्य व त्यावर लक्ष. हा प्राण्यामधला निसर्गाचा गुणधर्म असतो. मानव प्राणी हाच जेवण झाल्या बरोबर पुढच्या जेवणाची काळजी करतो, तश्या तरतुदी देखील करीत असतो. साठा करणे हा फक्त मानवाचाच गुणधर्म. ह्याचमुळे शिकारी प्राणी व त्याचे भक्ष्य प्राणी बराच काळ पर्यंत एकत्र राहतात. एकमेकांना हानी पोहचवत नसतात. हा निसर्गच गुणधर्म भक्ष्य होऊ घातलेल्या प्राण्यासाठी दिलासा देणारा निश्चितच असेल.

    शिकारी अथवा शिकार दोन्हीही भूमिका त्यांच्या जीवन चक्रात सतत होत राहतात. ह्यालाच म्हणतात

    जीवो - जीवनस्य – जीवनाम.

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    e-mail- bknagapurkar@gmail.com

      August 3, 2015


  • पिठापूर – कुरवपूर यात्रा – भाग २

    कुर्ला टर्मिनसला लिफ्टची कुठे सोय आहे का बघतच होतो की, आमच्यासमोर बॅटरी ऑपरेटेड ट्रॉली येऊन थांबली. आईला बघूनच तो आला असणार. आम्ही सामान आणि आईला घेऊन त्यात बसलो आणि त्यानेही इतके अलगद आम्हाला आमच्या दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या ट्रेनच्या डब्यापर्यंत आणून सोडले आणि सामानही आत चढवून सीट खाली लावून दिलं.

      April 24, 2022


  • एक परीस स्पर्श ( भाग – ३६ )

    विजयला आता त्याच्या आयुष्यात त्याच्या मर्जीने त्याच्या मर्जीचे असे काहीतरी करायचे होते कारण आता पर्यत विजय त्याच्या आयुष्यात जे काही करत आला ते इतरांसाठी. पण त्या इतरांनी त्याच्यासाठी कधीच काही केले नव्हते आणि भविष्यात करतील अशी त्याला आशाही नव्हती. विजयच्या मनात त्या मालकाविषयी काही राग वगैरे नव्हता कारण तो आयुष्यभर व्यवहारानेच वागत आला पण विजयला व्यवहार जमला नाही. ना त्याच्या कारखान्यात, ना कुटुंबात आणि ना त्याच्या आयुष्यात.

      July 30, 2022


  • असाही एक शिष्य…

    श्री कांतजींच्या निधनानंतर काही दिवस मी कार्यक्रम करणे थांबवले होते. आमच्या स्वर-मंच म्युझिक अॅकॅडमीत मात्र दिवसभर गाणे शिकवायचो. एक दिवस एक तरुण मुलगा गाणे शिकण्यासाठी आला. तो म्हणाला,

    “मला गाणे शिकायचे आहे सर, पण मला गायक बनायची इच्छा नाही." मला नवलच वाटले. मी विचारले,

    "मग तुला गाणे का शिकायचे आहे?”

    त्यावर तो म्हणाला, "मला संगीतकार बनायचे आहे. मी बांधलेल्या स्वररचना मला इतर गायकांकडून गाऊन घ्याव्या लागतील. ते योग्य गात आहेत की नाही ते पहावे लागेल. या दृष्टीकोनातून मला गाणे शिकवा सर!"

    मी चकितच झालो आणि मला त्या मुलाचे खूप कौतुक वाटले. कारण आपल्याला पुढे नक्की काय करायचे आहे ते त्याला ठाऊक होते. माझ्या दृष्टीनेही हे एक वेगळे आव्हान होते. मी हे आव्हान आनंदाने स्वीकारले. त्यानेही संगीतात अल्पकाळात मोठी प्रगती केली. हा मुलगा म्हणजे मला 'वेड लागले प्रेमाचे' ह्या लोकप्रिय गाण्याचा संगीतकार चिनार-महेश मधील चिनार खारकर. लवकरच हा माझा शिष्य माझा संगीतकार झाला. त्याच्या संगीत दिग्दर्शनाखाली '४०५ आनंदवन' आणि 'सासू पाहून लग्न करा' या व्यावसायिक नाटकांसाठी मी पार्श्वगायन केले. 'चुटकी' या मराठी चित्रपटासाठीदेखील मी एक गाणे गायले. चिनार-महेशसाठी रेकॉर्डिंग करणे हा आजदेखील एक आनंददायक अनुभव असतो.

    अजून एक नवीन संगीतकार हेमंत साने यांच्याबरोबर मी मराठी गझलचे एक प्रोजेक्ट केले. 'ऋतुरंग संगतीला' या मराठी गझलच्या सीडीसाठी मी तीन गझल गायल्या. माझ्याबरोबर स्वप्नील बांदोडकर आणि गौरी कवी हे कलाकारही होते. अच्युत गोडबोले यांच्या हस्ते या सीडीचे प्रकाशन झाले.

    - अनिरुद्ध जोशी

      July 31, 2022


  • आज सोचा तो…’ – वाताहतीचे अर्काइव्ह !

    “आत” मध्ये कोलाहल सतत सुरु असतात. दरवेळी नव्या सूर्याच्या स्वागताला बाहेरच्या अंगणात जाणं जमतंच असं नाही. तो सूर्यही तसा झाकोळलेलाच असतो. मागच्या परसदारातील किंचित काळोख्या तुळशीवृंदावनापाशी तिचा संयत सूर सापडतो. काल-परवा घडून गेलेल्या, पुसट न झालेल्या काळाच्या गोधड्या पुकारत असतात आणि त्यांच्या घट्ट उबेत बरंच काही पुनःपुन्हा साचत असतं, सापडतही असतं. “हसणाऱ्या जखमा” नामक काव्यात्म नांव घेऊन आलेला चित्रपट बघायलाच पाहिजे या श्रेणीतला त्या काळात वाटला नाही.

      January 1, 2021


  • आई

    शब्द अन् त्याचे अर्थ याविषयी खरं तर खूप काही बोलता, लिहिता येईल; पण त्याची ही जागा नव्हे आणि तसा हेतूही. तरीही संवादासाठी शब्दांचा आधार घ्यावाच लागतो. जेव्हा तुम्ही अशा देशात किंवा प्रदेशात जाता तेव्हा शब्दही मुके होऊन जातात. रशिया, जपान एवढंच काय दक्षिणेतल्या ग्रामीण भागात गेल्यावर शब्दांना अर्थ उरत नाही आणि मग अभिनयाचा कस लागतो. तरीही आपण बोलतो. म्हणजे शब्दाचा वापर करतो. काही वेळा वाटू लागतं शब्दांना अर्थ प्राप्त होण्यासाठी संस्कार व्हावे लागत असावेत. ज्यावेळी लहान मुलांना बोलताही येत नसतं त्यावेळी ते सभोवतालच्या संभाषणाचा, संवादाचा अन् शब्दांचा अन्वयार्थ लावत असावेत. `तू छान दिसतोस' आणि `घाण दिसतोस' यामध्ये केवळ एका शब्दाचा फरक आहे; पण तो एखाद्याचे भावविश्वच बदलून टाकू शकतो. भाषासंस्कारानुसार त्याचे परिणामही बदलतात. कोल्हापूर भागात `रांडच्या' हा शब्द प्रेमानं वापरला जातो. त्यातला जिव्हाळा सर्वत्र सारखाच असेल असं नव्हे. याचाच अर्थ या शब्दाबद्दलचे संस्कार सर्वत्र समान नसावेत. तुमच्या मनात सहजी आलं असेल, की शब्द, अर्थ आणि संस्कार अशी ही एवढी प्रस्तावना कशासाठी? पण त्याला कारणही तसंच आहे, संदर्भही शब्द, अर्थ अन् संस्काराचे आहेत. परवा `वसंत विशेष' या `लोकमत'च्या उन्हाळी विशेष पानासाठी मी काही लिहावं अशी सूचना माझ्या सहकाऱयानं केली. त्याला म्हटलं, ``तू सांग. काय हवं ते लिहून देतो.'' तो म्हणाला, ``आयुष्यात एखादी गोष्ट हरवून जाते अन् मग कधी तरी आठवते, त्या गोष्टीची रूखरूख वाटत राहते, असं काही तरी लिहा.'' मी ``हो'' म्हटलं; पण अशी एकही घटना, गोष्ट, प्रसंग किंवा इप्सित आठवेना, की जे हरवून गेलेलं असावं. एखादी गोष्ट हरवलीय म्हटलं, की ती आपली होती असं वाटू लागतं किंवा तो क्षण तरी पुन्हा जगावासा वाटतो; पण कसं शक्य आहे ते? ज्या क्षणाला ही अक्षरं उमटली तोच क्षण पुन्हा मिळत नाही म्हणून तर त्याला आयुष्य म्हणतात, जीवन म्हणतात. पाण्याच्या प्रवाहात पाय टाकून बसतो आपण आणि आपल्या पावलांना पाण्याचा स्पर्श सुखावून जातो. हाच आनंद अनेकवेळा घेता येतो माणसाला; पण पाण्याचे तेच बिंदू पुन्हा तेच असतील का? तसंच काहीसं क्षणांचं आहे. ते क्षणोक्षणी हरवतच असतात.

    मुळात ते आपले आहेत असं वाटतं आपल्याला; पण त्यांचं प्रवाहित होणं हेत त्यांचं उद्दिष्ट असतं. आपण मात्र भविष्यातल्या दुःखांना याक्षणी कवटाळू पाहातो किंवा भूतकाळातल्या आनंदाला वास्तवात आणू पाहतो. ते आहे तिथंच असतात. आपण मात्र आनंदी किंवा दुःखी होतो. हाती आलेला क्षण आपण उपभोगीतच नाही आणि मग ते मला मिळालं नाही म्हणून दुःख करीत बसतो. खूपच तात्त्विक किंवा आधात्मिक होतंय ना हे सारं; पण विषयच काही तरी हरवण्याचा होता. त्यात काय काय सापडतंय हे शोधण्याचा होता. तर सांगायचा मुद्दा असा, की माझं काय हरवलंय हे काही केल्या मला सापडत नव्हतं. आता हे लेखन करण्याच्या काही क्षण ते आठवलं आणि घेतलं लिहायला. माझं हरविलेलं कदाचित तुमचंही असेल किंवा कदाचित नसेलही; पण हे असं आठवणं महत्त्वाचं.

    मी माझ्या घरात थोरला. माझ्यापेक्षा मोठी बहीण. आमचं बालपण गेलं कोपरगाव-शिर्डी भागात. राहाता, दहिगाव ही आयुष्याच्या प्रारंभीची गावं पुसटशी आठवतात. त्यावेळी आमचं एकत्र कुटुंब होतं. वडील-आई आणि आमचे काका एकत्र असत. गावातल्या आया-बाया-बापे घरी यायचे, संवाद साधायचे. वडील सतत भ्रमंतीवर. स्वाभाविकपणे सर्वाधिक संवाद व्हायचा तो माझ्या आईशी. त्याकाळी वडिलांशी संवाद कमी आणि त्यांच्या अस्तित्वाचा धाकच अधिक असायचा. तर माझ्या आईला माझे काका वहिनी म्हणायचे. ते स्वाभाविकही होतं. आईचं वय त्यावेळी फार तर 24-26 असावं. ती गावातल्या सगळ्यांचीच वहिनी होती आणि वडील होते दादा. वडिलांचा उल्लेख आईकडून अहो किंवा ते नसताना दादा असाच व्हायचा. माझ्यापेक्षा मोठी बहीण-मंगल. तीही आईला वहिनी म्हणे. स्वाभाविकपणे आईची माझी जी ओळख झाली ती वहिनी म्हणनूच. ती माझी आई आहे ही माहीत होतं मला; पण ती माझ्यासाठी वहिनी होती. जसं जसं वय वाढत गेलं, `आई' या शब्दाविषयी ऐकत, वाचत गेलो तसं तसं या शब्दाचा अर्थ कळू लागला; पण `आई' या शब्दाचा जो संस्कार त्या वयात व्हायला हवा होता तो मला वाटतं राहूनच गेला. पायाला ठेच लागली तर `आई गं' असं व्हायचं; पण मनाच्या गाभाऱयात त्या आईचा चेहरा नसायचा. जेव्हा केव्हा मी मित्रांकडे, सहकाऱयांकडे जायचो त्यावेळी त्यांची हाक असायची आई, हे बघ कोण आलंय!' त्यांच्यासारखी, तशीच आई माझीही होती. तिनंही माझ्यासाठी सर्वकाही केलं होतं की जे आई करते; पण माझ्या ओठावर आई नव्हती. आज माझ्या वयाची पन्नाशी पार केल्यावरही जर काही हरविलेपण जाणवत असेल, तर ते `आई' या शब्दाचं.

    तुम्ही तुमच्या आईला आईच म्हणता ना? नसेल, तर आजच मोठ्यानं हाक मारा तिला आई! उद्या माझ्यासारखं हे असं हरविलेलं लिहिण्याची वेळ तुमच्यावर येऊ नये.

    -- किशोर कुलकर्णी

      April 16, 2006


  • पालखी आणू नका दारात माझ्या

    प्रदीप निफाडकरांची गझल

      April 16, 2010


  • हतबल – भाग तिन

    सरकारी हॉस्पिटलमधील ड्यूटी कॉन्स्टेबल पोलिस स्टेशन ला फोन करून कळवतो. “पोलिस ठाणे हद्दीतील या ठिकाणी राहणारी स्त्री नामे वय : चोवीस , आपल्या , नमूद पत्यावरील राहत्या घरी स्टोव्हवर अंगावरील कपडे पेटल्याने भाजली असून वॉर्ड क्र. xx मधे उपचारा करिता दाखल आहे “

      January 23, 2023


  • सनसेट अपियरन्स

    डॉक्टर जेनर जोसेफ हे प्रसिद्ध बालरोग तज्ञ व  शास्त्रज्ञ होते. निसर्ग प्रेमी होते. त्यांनी आपले घर समुद्र किनाऱ्यावर बांधले होते.  रोज सूर्यास्त समयी ग्यालरीत बसून समुद्राच्या पैलतीरी आकाशातून मावळनाऱ्या सूर्याला बघताना त्यांना खूप आनंद वाटत असे.

      December 3, 2020