नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
सत्तरीच्या दशकात वयात आलेली तरुण मुलं आणि त्यांच्या जगण्याचं भान या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे. मात्र ते सत्तरीच्या दशकापुरते मर्यादित नाही. चक्रधर, या कादंबरीचा नायक, अशा पिढीचा प्रतिनिधी आहे. तो समूहात असूनही एकाकी आहे. चक्रधरचा आणि त्याच्या पिढीचा हा प्रवास अरविंद रे यांनी मोठ्या ताकदीने चित्रित केला आहे.
February 18, 2023
इन्स्पेक्टर शामराव साळुंकेनी वागळे इस्टेट पोलीस ठाणे, ठाणे याचा नुकताच चार्ज घेतला होता. पोलीस ठाण्याची, गुन्ह्यांची वगैरे जुजबी माहिती त्यांना मिळाली होतीच परंतु तेवढ्याने साळुकेचं समाधान झालं नव्हतं. सर्वसामान्यपणे ठोकपीट मेथडचा अवलंब करून गुन्ह्याची उकल करण्याकडे त्यांचा कल नव्हता. गुन्ह्याचे सूक्ष्म विश्लेषण करुन, बारीक सारीक धागे जुळवून बुध्दी कौशल्याने त्याची उकल करण्यात त्यांना रस होता. फारच क्वचित, ठोकपीट मेथड ते वापरीत. बहुधा नाहीच. आढावा घेता घेता ते दिनकर मोरेच्या केसकडे वळले. त्या दिनकरची बायको गायब झाली अशी त्याने आठवड्यापूर्वी तक्रार नोंदविली होती. पण आजपर्यंत तिचा शोध लागला नव्हता. त्यांनी त्यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव यांना लगेच बोलावून घेतले.
March 22, 2022
या दोन-तीन महिन्यानंतर मी गाण्याचे काम पुन्हा सुरू केले. विवेक देशपांडे यांच्या ‘निष्पाप’ या मराठी चित्रपटासाठी विश्वास पाटणकर यांच्या संगीत दिग्दर्शनामध्ये मृदुला दाढे-जोशी बरोबर एक द्वंद्वगीत मी रेकॉर्ड केले. याचवेळी विश्वास पाटणकर यांचा मुलगा मिथिलेश पाटणकर याने कवी ग्रेस यांच्या गाण्याला त्याने बांधलेली अतिशय सुंदर चाल ऐकवली. मिथिलेश त्यावेळी शाळेत होता. सातवी-आठवीत असेल. पण उत्तम संगीतकाराचे गुण वडिलांकडून जन्मजातच त्याने घेतले होते
July 15, 2022
माणसाचा जन्म मिळणे हे फार भाग्याचे आहे आणि तो आत्मा माणूस म्हणून जन्माला येतो तेव्हाच त्याच्यात काही गुण तसेच काही दोष हे उपजत आलेले असतात. श्री समर्थ रामदास स्वामींचे विचार सांगतात की थोर भाग्य मिळाला मनुष्य जन्म, ईश्वरी कार्यास अर्पण द्यावा, लोभ-द्वेष-ईर्षा लोटूनी द्यावे, धर्म-प्रेम-कारुण्य भरोनी घ्यावे!
December 14, 2021

अशी न लिहिली गेलेली आत्मचरित्रं , खूपच वेगळी असतात . अनवट वाटेनं जाणारी असतात . प्रचंड धक्कादायक असतात . खूप गुपितं लपवून ठेवणारी असतात . समाजात गदारोळ करणारी असतात . अनेकांचे बुरखे टराटरा फाडणारी असतात . नातेसंबंध ओरबाडून टाकणारी असतात . अशी आत्मचरित्रं सप्तरंगी नसतातच तर कृष्णधवल रंग त्यात मजबूत असतो . आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ,अशा आत्मचरित्रांचे नायक हे सर्वसामान्य असतात . त्यामुळे त्यांनी न लिहिलेल्या आत्मचरित्रातील त्यांचा आत्मा हा केव्हाच उडून गेलेला असतो . अशा न लिहिलेल्या आत्मचरित्रातील काही पाने माझ्या हाती लागली .
September 28, 2020
चाटू…. हे असते लाकडाचे म्हणून त्याची किंमत कमी होत नाही. मात्र त्याला रोज स्वयंपाक घरात येता येत नाही. एक दिवस त्याचाही येतो. त्यामुळे ते किती महत्वाचे आहे याची किंमत कळते. चिक. लापशी. वाळवणाचा कोणताही पदार्थ शिजवताना काही ही असो.
September 2, 2022
फ्रान्समधील पॅरिस आणि इटलीतील रोम ही दोन शहरे अप्रतिम अशी कलेचे माहेरघरं आहेत हे मात्र नाकारता येणार नाहीच.दोन्ही देशांना मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय इतिहासाची पार्श्वभूमी आहे.पॅरिस शहराला म्युझियम्सचे शहर म्हणतात असा मी पूर्वी उल्लेख केलेला आहेच. राजेशाही अस्तित्वात असणाऱ्या फ्रान्समधील, राजे मात्र कलेचे भोक्ते होते. त्यांना कलेची उत्तम जाण होती आणि ते कलेचा सन्मानही करत असत.
उत्कृष्ट कलादालनं बघण्याचा योग या टूरमध्ये आला.व्हर्साईल पॅलेस नि लहूरे म्युझियम.ही दोन्हीही प्रचंड मोठी तर आहेतच, पण अक्षरशः डोळे दिपवणारी कलाकृती मग ती पेंटिंग्जच्या, मोठ्या मोठ्या पुतळ्यांच्या किंवा शिल्पाच्या स्वरूपात असोत, ती अगदी उत्तम पध्दतीने जतन करून ठेवली आहेत. खरे तर ही दोन्हीही ठिकाणे चार एक दिवसांत अभ्यासून पूर्ण होणारी नाहीतच. पर्यटना साठी गेलेल्या आपल्यासारख्यांना वेळेचे बंधन असते. जास्त दिवस थांबणे केवळ अशक्य.पण धावती भेट घेऊनही आपण त्यांचे कलेच्या क्षेत्रातील योगदान डोळे विस्फारून बघू लागतो.एक कला या दृष्टिकोनातून बघितले तर भारावून जातो.
दोन्हीही कलादालनं बघताना गाईडचे मार्गदर्शन गरजेचे आहे. आम्हाला गाईड म्हणून लाभलेली एक वीस-बावीस वर्षांची षोडशा अत्यंत खेळकर पद्धतीने निवेदन करत माहिती पुरवत होती.
व्हर्साईल पॅलेस
फ्रान्सचा राजा पंधरावा लुईस हा अतिशय प्रबळ असा राजा होता. कलासक्त मनाच्या या राजाने कलात्मक पद्धतीने विशाल राजवाडा बांधून त्याला मोठे कलाकेंद्र बनवण्याचे स्वप्न त्यांने बघितले होते.तो आणि त्याच्याबरोबरच नंतरच्या उदयोन्मुख राजांनी पॅलेस निर्माण करण्यात मोठा सहभाग नोंदवला. लुईस ने योग्य ती जागा शोधण्याचे काम करत , राजवाड्याचे डिझाईन बनवून घेतले व कामाला सुरुवात केली होती.
व्हर्साईल पॅलेस म्हणजे आठराव्या शतकातील फ्रेंच आर्किटेक्चर आणि कला यांचा एक अति उत्तम नमुना म्हणता येईल.
या राजवाड्याच्या सभोवती सतराव्या शतकात भौमितिक पध्दतीने रचना करत तयार केलेली मोठी बाग आहे.250 एकर जमिनीवर अतिशय आकर्षक असे गार्डन आणि वेगवेगळे नयनरम्य फाउंटन्स,लॉन्स यांची केलेली रचना आपल्या मनाला आणि डोळ्यांना मोहवून टाकणारी आहे.
पाच छोटे छोटे चॅपल्स म्हणजे छोटे छोटे चर्च हे एक आकर्षणच म्हणता येईल.सुबक खांब आणि संगमरवरी फरशी यांच्या सहाय्याने बनवलेले राजवाड्यातील हे चर्च मन:शांती मिळवून देतात.
मुळात राजवाडा याच हेतूने बांधलेला हा महाल अतिशय देखणा आहे.
या पॅलेस मध्ये एकूण सात मोठे मोठे दालनं आहेत.त्यापैकी सगळ्यात सुंदर आणि महत्वाचं आहे ते म्हणजे प्रचंड मोठा असणारा मिरर हॉल. एक अप्रतिम दालन. तब्बल ३५७ मिरर चा उपयोग करत तयार केलेले हे दालन विविध प्रकारचे आर्च (कमानी)आणि खिडक्या यांच्या साथीने अतिशय सुंदर अशी आकर्षक रचना करून बनवले आहे.आरसे आणि कमानी मोठ्या मोठ्या खिडक्या यांची योजना अशी आहे की, खिडकीबाहेर दिसणारे मोठे मोठे फाउंटन्स व लॉन्स त्यांची प्रतिमा मिररर्स वर पडते आणि त्यांचे परावर्तन संपूर्ण हॉल मध्ये. अतिशय विहंगम दृश्य दिसते दिवसाच्या वेळेला.स्त्री-पुरुष यांचे पुतळे आकर्षक पद्धतीने तयार केलेले आहेत.तसेच मानवी शरीराच्या काही अवयवांचे अप्रतीम शिल्पही आहेत यात.
२१४३ खिडक्या आणि ६७ जीने यांच्या साह्याने हा पॅलेस बनवलेला आहे.१७८९पर्यंत म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती पर्यंत हा पॅलेस सत्तेचे केंद्रस्थान होते. येथूनच राज्यकारभार चालवला जात असे.फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात व्हर्साईल राजवाड्यातील मधील अनेक कलाकृती संरक्षित करण्यासाठी लहूरे म्युझियम मध्ये हालवण्यात आली होती.
लहूरे म्यूझियम
हे सुद्धा अठराव्या शतकात उदयाला आलेले एक उत्कृष्ट कला दालन.फ्रान्स ला आपली खास ओळख निर्माण करुन देणारे असे आहे.जागतिक पातळीवरचे सर्वात मोठे असे हे कलादालन. यांमधील शिल्प चित्र किंवा पुतळे यांचा व्यवस्थित अभ्यास करावयाचा असेल तर किमान सलग दोन वर्ष द्यावे लागतील एवढे प्रचंड मोठे म्यूझियम आहे हे! ज्यात एकूण ३०,००० कलाकृती आहेत!इ.स. १२०० मध्ये हे बांधले गेले पण इ.स.१६५० मध्ये पुन्हा नव्याने बांधण्यात आले.सुरुवातीला याचा उपयोग राजाच्या वयक्तिक उपभोगासाठी बांधलेली वास्तू असा होता. पण नंतर लोकांना बघण्यासाठी खुली करण्यात आली.इ. स. १७९३ मध्ये पहिले कलादालन (म्युझियम) म्हणून लहूरे म्युझियम प्रचलित झाले.
या म्युझियम मधे प्रवेश घेतानाचे मोठे आकर्षण म्हणजे तेथे असणारे पिरॅमिड्स,ज्यातून आपण प्रवेश घेतो.
पहिला फ्रेंक्लिन आणि पंधरावा लुईस यांनी आणि राहिलेली नेपोलियन यांनी यातील जास्तीत जास्त पेंटिंग्ज खरेदी केलेले आहेत.नंतर ते मूळ मालकाला परतही केले. अतिशय भव्य आणि नितांत सुंदर असे पेंटिंग्ज बघून आपण थक्क होऊन जातो. परिणामकारक रंग संगती वैशिष्ट्य पूर्ण आहेच. वेगवेगळे राजकीय प्रसंग,बायबल मधील ही काही प्रसंग,तसेच मोठी मोठी अशी स्त्री व पुरुष सौंदर्याची रेखीव शिल्प ,पुतळे,प्राणीजन्य पुतळे वगैरे बाबींची खूप सुंदर मांडणी आहे.
जगातले सर्वात सुंदर हास्य असणारी स्त्री, मोनालिसा हिचे लिओनार्दो द व्हींची यांनी काढलेले जगप्रसिद्ध चित्र याच म्युझियम मध्ये आहे. शिवाय वेनस डी मिलो या स्त्री चे सुध्दा प्रसिध्द पेंटिंग येथे आहे.या कलादालनाचे सात उप कलादालनही आहेत.ज्यात प्राचीन इजिप्शियन संस्कृती मधील पुराणवस्तू केंद्र आहे. अती पुर्वेकडची संस्कृती दर्शवणारे दालन आहे. आणि रोमन संस्कृतिला वाहिलेलं दालन ही आहे.सर्व प्रकारच्या शिल्पकलेला वाहिलेलं दालन अप्रतिमच! मोठे मोठे शिल्प पुतळ्यांच्या स्वरूपातही आहेत. त्यातील काही डेकोरेटिव्ह आर्ट तर काही ग्राफिक आर्ट दर्शवणारी आहेत.बरीचशी शिल्प आणि पुतळे हे विवस्त्र अवस्थतील आहेत. यामागचे कारण विचारले असता नैसर्गिक सौंदर्य जसेच्या तसे दाखवण्यावर भर आहे कलाकारांचा तसेच सुयोग्य शारीरिक प्रमाणबद्ध शरीर रचना कशी असावी याचे विवेचन या शिल्पांमध्ये दाखवण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले गेले.
खरे म्हणजे आपल्याला चार्-चौघां बरोबर ही शिल्पे बघताना संकोच वाटावा इतपत नैसर्गिक अवस्थेत आहेत ती!
पण एकूणच सर्वच कलाकारांच्या कलेला सलाम करावा अशाच सर्व कलाकृती या म्युझियममध्ये आहेत.
सिलिंग पेंटिंग्ज तर खूपच हटके, अप्रतिम असे एकापेक्षा एक सुंदर!हे सुंदर आर्किटेक्चर बघितल्याने या पेक्षा सुंदर आणखी कुठेही काहीच असू शकत नाही यावर आपण ठाम राहतो. आधुनिक पद्धतीने आणि अतिशय काळजीने ह्या कलाकृति आजही जपून ठेवलेल्या आहेत याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे
नकळतपणे आपण या सर्व सिस्टीम ची तुलना आपल्याशी करतो आणि याबाबतीत आपण किती मागासलेले आहोत या जाणिवेने खट्टू होतो.
पॅरिसला फॅशनची उगमस्थान असेही म्हणतात! जगातली कोणतीही फॅशन पहिल्यांदा सुरू होते ती पॅरिस मधून अशी ख्याती आहे या शहराची.
आमचे पॅरिस मधील सर्वात शेवटचे डेस्टिनेशन म्हणजे मनोरंजनाचा शो. कृत्रिम लाईट्स ने सजवलेला झगमगाटी असा डोळे दिपवून टाकणारा ली लिडो शो हा होय. हा या ठिकाणी १९७७ पासून चालू झाला.शो बघण्यासाठी मात्र ठराविक ड्रेस कोड आहे.पुरुषांना कॅज्यूअल ड्रेस व स्त्रियांना अंगभरुन कपडे असा.
ली लिडो शो बघण्यासाठी आपण ज्या रस्त्यावरून जातो तोच पॅरिसमधला प्रसिध्द Champs elysees असा रस्ता आहे. या रस्त्याचे रात्रीचे सौंदर्य अवर्णनीयच. येथे आले की, शम्मी कपूर वर चित्रित झालेले'ऐसा मौका फिर कहॉं मिलेगा' हे गाणे ,अॅन इव्हिनिंग इन पॅरिस या सिनेमातले हमखास आठवतेच.
थेटरच्या प्रवेशालाच मोठमोठ्या चकाकणाऱ्या झुंबरांनी आपले स्वागत होते. प्रवेशद्वारा पासूनच चालू झालेला लखलखाट खेळ संपेपर्यंत कायमच असतो. भरपूर वाद्यांच्या संगतीने चालू असणाऱ्या ऑर्केस्ट्राच्या पार्श्वभूमीवर आपण जेवणाचा विविध ' पेयां 'सह आस्वाद घेत असतो.ऑर्केस्ट्रा चालू असताना प्रेक्षकां मधील हौशी जोड्या आपली नृत्याची हौस येथे पूर्ण करतअसतात.हा शो म्हणजे चक्क कॅब्रे डान्सच आहे बऱ्याच नृत्यप्रकारांतून नृत्याचे प्रदर्शन विविध कलाकारां मार्फत केलं जातं. सारेच नृत्यप्रकार खरोखर वाखाणण्यासारखेच आहेत. कलाकारांनी साकारलेलं प्रत्येक नृत्य हे "त्यांनी सादर केलेली एक सुंदर कला" या दृष्टिकोनातूनच आपण हा शो बघितला तर भरपूर आनंद घेऊ शकतो आपण. त्यांच्या कला सादर करण्याच्या या लकबींना अक्षरश: काही तोडच नाही!हे मान्यच करावे लागते पण आपल्याला सवय नसणारे अंगप्रदर्शन बघताना मात्र संकोचायला होते निश्चितच.फ्रेंच लोक त्यांचा एक सांस्कृतिक कार्यक्रम या दृष्टीने त्याकडे बघतात. पण आपल्याला न झेपणारी अशीच ही संस्कृती होय. अंगप्रदर्शन असले तरीही कुठेही कलाकारांच्या चेहऱ्यावर व्हल्गर भाव नसतात म्हणून ते बघण्याची हिम्मत आपण करू शकतो. अतिशय सुंदर पद्धतीने सजवलेले हे ऑडिटोरियम १२०० प्रेक्षक बसतील एवढे मोठे आहे.स्टेज,त्यावरील नेपथ्य, सरकते स्टेज वगैरे तांत्रिक बाबी क्लासच आहेत! दीड तासाचा हा शो बघून बाहेर जेंव्हा पडतो, तेंव्हा अगदी निश:ब्द व्हायला झालेले असते.एकूणच पॅरिस शहर कलाकारांच्या कोणत्याही कलेचा सन्मान करणारे शहर आहे यावर ठाम विश्वास बसतो.या साऱ्यांच कलांचा आपणही एक कलाकार म्हणून आनंद घेतल्यास नक्कीच मजा येते.
भाग ३ समाप्त.
क्रमश:
- नंदिनी म देशपांडे
October 25, 2018
कुख्यात चंदन तस्कर वीरप्पन कसा मारला गेला, बटला हाऊस एनकाउंटर का घडू शकले, उत्तर प्रदेशातील गुंड श्रीप्रकाश शुक्ला याला मारण्यात यश कसे मिळाले या तीनही प्रश्नांचे उत्तर एकच आहे ते म्हणजे फोन टॅपिंगमुळे हे शक्य झाले. दिल्लीत किमान सहा हजार लोकांचे फोन टॅप होतात, तर महानगरांमध्ये १० ते २० फोन गुप्तचरांच्या किंवा पोलिसांच्या नजरेखाली असतात असे आता स्पष्ट झाले आहे.
June 25, 2022
लाडू-करंज्या-शंकरपाळी-उटणं-मोती साबण आणि दिवाळी अंक एवढ्या भांडवलावर मराठी मध्यमवर्गीयांची दिवाळी हमखास आनंदातच जायची.दिवाळी अंक वाचणारे लोक ‘सांस्कृतिक’ समजले जायचे. बऱ्याच अंशी ते खरंही होतं. दिवाळी अंक काढणाऱ्यांना आणि वाचणाऱ्यांना किमान ‘समज होती. आता कुणीही उठून चार जाहिराती, हौशी बोरुबहाद्दरांचा मजकूर जमवतो आणि संपादक अमुक तमुक, असं बिरुद मिरवत दिवाळी अंक काढतो.
January 3, 2024
कौरवांनी पांडवांना कुंतीसह ठार मारण्याचा प्रयत्न केला. पण ते वाचले. पांडव ब्राह्मणाचा वेश धारण करून एकचक्रा नगरीत एका ब्राह्मणाच्या घरी येऊन राहिले. कुंती व भीम घरी रहात. बाकीचे चौघे पांडव भिक्षा मागून आणीत. ते ती भिक्षा कुंतीकडे देत.
December 25, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti