(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जुलमी राजाची किंमत

    तैमूरलंग हा इतिहासातील एकप्रसिद्ध सरदार. तो पराक्रमी होता परंतु तेवढाच अत्याचारी. हल्ले करून जिंकलेल्या प्रदेशातील लोकांवर तो अत्याचार करायला मागेपुढे पहायचा नाही. अशा लोकांना गुलाम करण्यासाठी तो जबरदस्ती करायचा. एकदा त्याने असेच खूप गुलाम पकडले. त्या गुलामांना विकण्यासाठी तो स्वतः सौदेबाजी करायचा व त्याने ठरविलेल्या भावात सौदा झाला की त्या गुलामांना विकायचा. एकदा त्याने पकडलेल्या गुलामामध्ये तुर्कस्तानामधील एक अध्यात्मिक संत अहमदी देखील होते. तैमूरलंगाला त्यांच्याबद्दल थोडीफार माहिती समजली होती. सर्व गुलामांना एकत्र केल्यानंतर तैमूरलंगाने त्यातील दोन गुलामांना बाहेर काढले व अहमदीजवळ येऊन तो त्यांना म्हणाला, सांगा या दोन गुलामांची किंमत किती असेल.

    अहमदीने त्या दोन गुलामांकडे निरखून पाहिले व ते म्हणाले, हे गुलाम समंजस वाटतात त्यामुळे त्यांची किंमत पाच हजार मोहराहून कमी असू शकत नाही. त्यांचे उत्तर ऐकून तैमूर लंगाला अहमदी यांची थट्टा करण्याची इच्छा झाली. तो त्यांना म्हणाला बरं, आता सांगा की, माझी किंमत किती असेल? त्यावर अहमदी चटकन म्हणाले, फक्त दोन मोहरा. त्याचे उत्तर ऐकून तेमूरलंग खूप संतापला. तो अहमदी यांच्या अंगावर धावून ओरडत म्हणाला, तू माझा अपमान करतोस? माझ्याजवळ असलेल्या दस्तीचीच (रुमाल) किंमत दोन मोहरा आहे. त्यावर अहमदी म्हणाले, मी त्या दस्तीचीच किंमत सांगितली. तुझ्यासारख्या अत्याचारी सरदाराची किंमत तर केवडीचीही नाही. त्यानंतर अहमदी यांनी तैमूरलंगाने केलेल्या अत्याचारांची सर्व गुलामांसमोर जंत्रीच सादर केली. सर्व गुलामांना वाटले आता अहमदी यांना तैमूरलंग ठार मारणार.

    मात्र अहमदी यांच्या सत्य वाणीने तेमूरलंगाची विवेकबुद्धी जागी झाली व त्याने अहमदी यांची गुलामगिरीच्या जोखडातून मुक्तता केली.

      January 1, 2018


  • आजी ग आजी!

    सर्वाना आपली आजी खुप आवडत असते. जेथे फक्त प्रेम व माया भरपूर प्रमाणात तुमच्यावर सतत बरसत असते. त्यात कोणताच राग नसतो. शिस्त लावण्याची गरज भासण्याची वृत्ती नसते. कोणताही लोभ व्यक्त झालेला दिसत नाही. फक्त निर्मळ प्रेम. वासना विकार रहीत. कदाचित हे वयाचे व परिस्थितीचे गुणधर्म असू शकतील. आजी म्हणून ती जी भूमिका करते, ती एकदम त्यात एकरूप होऊन गेल्या प्रमाणे भासते.

    लहान मुलगी कुमारिका विवाहित स्त्री माता, ह्या सर्व भूमिका, तिने जगाच्या व्यासपिठावर केलेल्या असतात. तिने जीवनाचा संसारिक अनुभव अनेक प्रसंगातून घेतलेला असतो. आजपर्यंत ती जीवनाची गाठोडी, केवळ जमा करण्यातच व्यस्त होती. आज्ञा ऐकणे पाळणे, वा करणे, ह्याच कार्यचक्रात ती गुंतलेली होती. आता ती परिपक्व भूमिकेत आलेली आहे. येथे जे जे आजपर्यंत जमा केलेले होते ते सारे वाटीत जाणे आता तिचे काम झाले आहे. निसर्ग चक्रानुसार घटनाची सतत पुनुरावृती होत असते. तशाच गोष्टी थोड्याश्या फरकाने होत असतात. ज्या इतरांना सर्वस्वी नवीन व वेगळ्या वाटणाऱ्या असतात, त्याचा आंतरिक गुंता आजीच्या अनुभव चौकटी मधलाच असतो. त्यामुळे त्याचा धागा तिच्या लक्षात येत असतो. अनुभवाच्या मार्ग दर्शनाचे पैलू येथेच मदत करतात.

    आज मला माझ्या बालपणीची आठवण झाली. मी त्यावेळी दहा वर्षाचा असेन. मला शिकवण्यासाठी एक शिक्षक ( त्यांना आम्ही गुरुजी म्हणत असू ) घरी येत होते. चांगले शिक्षक परंतु अतिशय शिस्तप्रिय व कडक अश्या स्वभावाचे होते. त्याकाळी मुलांना त्यांच्या चुकाबद्दल बेशिस्तपनाबद्दल सतत मार बसे. रागावले जायचे. कोणतीही गोष्ट मुलांना समजावून सांगणे, त्यांच्या भावना जाणणे, ह्याबाबतीत पालकांना, शिक्षकांना, आणि कोणत्याही वडील व्यक्तींना मुळीच आस्था नव्हती. हा केवळ वेळ व्याया घालविण्याचा मार्ग आहे ही त्यांची धारणा असे. ” छडी लागे छम छम, विद्या एयी घम घम.” ह्या पुर्वकालीन तत्वज्ञानात त्यांचा विश्वास होता. त्याच प्रसंगी योग्य वेळी योग्य शिक्षा ही धाक व शिस्त निर्माण करते ही त्यांची अनुभव संपन्न समजूत होते. ( आता काळ पूर्ण बदलला, शिक्षक बदलये, आणि विद्यार्थीही.).

    माझे शिक्षक अर्थात पूर्वकालीन होते. रोज रात्री सात वाजता ते एकतास शिकवीत असे. त्या वेळचे पाठ शिकवीत व गृहपाठ देत असे. बालवय व विद्यार्थी म्हणून अनेक चुका करीतच शिक्षणाचा मार्ग चालला होता. मात्र चुकले की ” गाढवा, मूर्ख ” असल्या शिव्या ते देत व अधून मधून पाठीत धपाटा ही लागावीत. मी निराश होत होतो. केव्ह्ना केव्ह्ना रडू येत होते. परंतु ” रडतोस काय असा ?” म्हणून त्यावरचा शांत करण्याचा उपाय म्हणून आणखी एखदा धपाटा पाठीत बसत असे. शिकणे तसे सारे दिव्यच होते. त्या वेळेला कळवळंल्याच्या आजही आठवणी येतात व हसू येते.

    माझी वेगळी खोली होती. खाली सतरंगी अंथरून आम्ही बसत असू. एक दिवस अचानक माझी आजी तेथे आली. तिच्याजवळ कापूस होता. ती वाती व फुलवाती करीत तेथेच बसली. नेहमीच्या सवयी प्रमाणे, माझे चुकतच “ गाढवा ही बेरीज अशी होती का?” म्हणत गुरुजींनी माझा कान पिळला व मला धपाटा लगावला. मी कळवळंलो. मला रडू आले. आजी जवळ होती. तिला वयाचा एक अलिखित अधिकार मिळालेला होता. ती उसळून गुरुजीना म्हणाली “ अहो एवढे काय मारता त्या लहान मुलाला. चुकला असेल तर समजावून सांगा.” गुरुजी एकदम सटपटले. त्यांनी उत्तर दिले नाही. मात्र त्यानंतर त्यांच्या वागण्यातला झालेला बदल जाणवला. आता आजीच्या केवळ तेथे अस्तित्वामुळे वातावरण बदलल्याचे माझ्या लक्षात येऊ लागले. शिक्षेऐवजी प्रेमळ शब्दात समजावणे हे होऊ लागले. दुसऱ्या दिवसा पासून सतरंजी टाकून ठेवणे, वह्या पुस्तक पेन्सिल घेणे, ह्याच बरोबर ताटात कापूस, वाटीत थोडीशी रांगोळी आणि खिडकीजवळ आजीसाठी पाट ठेवणे हे आठवणीने केले जायचे. कदाचित त्यासाठीच व अशाच प्रसंगांना आई बाबा पासून वेगळ्याच संरक्षणाची भिंत बनणारी आजी मला खूप आवडायची.

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      January 9, 2019


  • ८ वी ड – भाग ७ – कार्ट आणि मुलगा

    संघर्ष! कुणाला चुकला आहे मुंगी पासून माणसापर्यंत सर्वांना आहे. अगदी लहान शाळकरी मुलांना देखील करावा लागतो. याचा अंदाज शिक्षकांना, पालकांना खरोखर आहे का?

      April 12, 2021


  • पालखी आणू नका दारात माझ्या

    प्रदीप निफाडकरांची गझल

      April 16, 2010


  • होळी

    घड्याळात साडे आठ वाजलेले पाहून जयश्री ताईंनी दोन्ही मुलांना झोपेतून उठवायला सुरुवात केली ” मनिष…..अरे बाळा उठा आता, बघ जरा घड्याळात .. साडे आठ झाले …मृण्मयी ..चला उठा …आज होळी साठी जायचंय ना तुम्हाला तयारी करायला? चौकात सगळी मुलं आली बरं का ! ” शेवटच्या वाक्याची मात्रा मात्र लगेच लागू पडली आणि दोघं ही ताडकन उठून बसली …

      December 8, 2024


  • शिल्पा

    त्या दिवशी सकाळी - सकाळी कोणीतरी गेल्याची बातमी कानावर आली. ती कुजबुज ऐकण्यासाठी मी झोपेतच माझे कान टवकारले असता दोन दिवसापुर्वी शिल्पा गेल्याची बातमी कळ्ली. शिल्पा कोणी लहान मुलगी नव्ह्ती पंच्चविशीतील एक विवाहित स्त्री होती. आमच्या चाळीतील लहान- थोर सारेच तिला प्रेमाने शिल्पा या एकेरी नावानेच हाक मारत. मी व्यक्तीशः तिला फारसा ओळखतही नव्ह्तो कारण खासकरून अनोळ्खी व्यक्तीशी मी फारसा स्वतःहून ओळ्ख काढून संवाद साधन्याचा प्रयत्न करीत नाही. तिची आमची ओळख झाली कारण सध्या आंम्ही राहण्यासाठी या चाळीतील जे घर भाडयाने घेतले आहे. त्या घरात ती जवळ- जवळ चार वर्षे भाड्याने राहात होती. पण तिच्या घरमालकाने हे घर दुरूस्त करून जास्त भाड्याच्या आशीने आंम्हाला भाड्याने दिले होते. त्यामुळे तिला नाईलाजाने बाजुच्या चाळीत दुसरे घर भाड्याने घ्यावे लागले होते. तरी मला व्यक्तीशः तिच्या बोलण्यावरून तिचा आम्ही सध्या राहात असलेल्या घरात जीव गुंतला असल्याचे मला बर्यावचदा जाणवले होते. माझ्या दृष्टीने ती एक भोळ्सट स्त्री होती. का कोणास जाणे लोकांप्रती अती सहानुभूती, प्रेम दाखविणार्याय आणि स्वतःपेक्षा ही इतरांची काळजी अधिक वाहणार्याए स्त्रियां माझ्या डोक्यात जातात. तश्या दोन स्त्रिया आमच्याच घरात होत्या म्ह्णून असेल कदाचित एक आमची आई आणि दुसरी आमची लाडकी बहिण. त्याबाबतीत मी थोडा कोडगा आणि कोरडा होतो. माझ्या ठायी मुर्खपणाला अजिबात थारा नव्हता. आमच्या मालकीच्या घराच्या जागी इमारत होत असल्यामुळे आमच्यावर कधी नव्हे ती भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली होती. पुर्वी कधी ही भाड्याच्या घरात न राहिलेल्या मला व्यक्तीशः भड्याच्या घरात राहण ही एक प्रकारची शिक्षाच वाटत होती. आमचे जुने घर सोडतानाच मी मनाशी पक्क ठरवून टाकलं होतं दुसर्याा जागी राहायला गेल्यावर तेथे कोणत्याही प्रकारचे नवे बंध निर्माण करायचे नाहीत आणि मी ठरविल्याप्रमाणे ते केले ही ! म्ह्णूनच मी शिल्पाकडे तटस्थपणे पाहू शकलो, तिचं निरीक्षण करू शकलो. काही महिन्यापुर्वी मी जेंव्हा शिल्पाला पहिल्यांदा पाहिले तेंव्हा ती तिसर्यांलदा गरोदर होती. तिची दुसरी मुलगी जन्मा नंतर महिन्याभरातच वारली होती. शिल्पाच निरीक्षण करतेवेळी माझ्या एक गोष्ट लक्षात आली जगाच्या दृष्टीने ती भोळ्सट, स्वछंदी जीवन जगणारी एक अल्लड बाई असली तरी माझ्या दृष्टीने नाईलाजाने परिस्थितीपासून, समस्यांपासून पळणारी, जगण्यात फारसा रस नसलेली आणि स्वतःबाबत अत्यंत बेफीकीर झालली किंचित भोळसट झालेली स्त्री होती. जी जगाला आपण किती सुखी आहोत हे दाखविण्याचा जीवाच्या अकांताने प्रयत्न करू पाहत होती.

    शिल्पा गेल्याची बातमी झाली होती पण ही बातमी आमच्या चाळीपुरती मर्यादित होती. तिच्या जाण्याची दखल कोणी गंभीरपणे घेतल्याची शक्यता तशी कमीच होती कारण सर्वांना ती लक्षात होती कारण त्यांनी सांगितलेली कामे तिने जरा ही का ! कू ! न करता निमूटपणे केलेली होती म्ह्णून. शिल्पा सारख्या स्त्रिया आपल्या देशात रोज हजारोच्या संख्येने मरत असतात पण त्यांची दखल समाज कधीच घेत नसतो. शिल्पा अचानक कशी गेली ? काहींच्या मते तिच्या जाण्याला तिचा गाढवपणा आणि हेकेखोर स्वभाव कारणीभूत होता. काही दिवसापूर्वी तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. दवाखान्यातून घरी आल्या आल्या ती थंडीच्या दिवसात थंड पाण्यात बादलीभर कपडे घेऊन धुवायला बसली होती घरात सासू असतानाही. सासूचा तिच्यावर फार जीव नसावा आणि नवर्याथलाही तिची फिकर नसावी. त्यानंतर तिला ताप भरला तो वाढतच गेला. त्यानंतर तिला दवाखान्यात भरती करताच तासाभरात तिचा जीव गेला होता. तिच्या दुसर्यात मुलीला तिच्या निष्काळजीपणामुळे जीव गमवावा लागला होता कारण ती मुलगीला एकटीला घरात रडत सोडून बाहेर भटकायला जात असे. हे लोकांचे निरीक्षण पण वरवरचे माझा जितका अभ्यास आहे त्यानुसार ती त्या मुलीच्या दुधाची व स्वतःच्या लहान मुलाच्या आणि स्वतःच्या पोटाची खळगी भरण्याची व्यवस्था नसल्यामुळे ती करण्यासाठी भटकत असावी. तिचा नवरा कामाला होता पण त्याला वेळच्या वेळी पगार मिळत नव्हता. जेंव्हा मिळायचा तेंव्हा तो घरभाडे आणि उसणवारी देण्यातच खर्च व्हायचा त्यामुळे त्यांना एका मुलाचेच हट्ट पुरविणे शक्य नसताना तीच्यावर आणखी दोन बाळंतपणं लादण्यात आली होती कदाचित तिच्या मनाविरूध्द ! तिला सारचं कळत होत कारण ती बर्या पैकी शिकलेली होती पण परिस्थितीची गुलाम झाल्यामुळे आणि आपल्या हातात करण्यासारखे काहीच नसल्यामुळे परिस्थितासमोर तिने अक्षरशः गुडगे टेकले होते. त्यानंतर आपण कसे दिसतो, कसे वागतो, कसे राहतो आणि आपल्या मागे लोक आपल्या बद्दल काय चर्चा करतात या बाबत ती बेफीकीर झाली होती. अत्यंत हुशार असतानाही आपण भोळसट आहोत हे जगाला पटवून देण्यात ती यशस्वी झाली होती. दररोज लोकांशी खोट बोलण्याचा हातात दमडी नसताना लाखाच्या बडाया मारण्याचा आणि पोटात अन्नाचा कण ही नसताना ढेकर देण्याचा तिला कंटाळा आला होता. कदाचित तिला या सर्वांतून मुक्ती हवी होती पण नैसर्गिक...

    शिल्पा गेली नव्ह्ती तर आपल्या समाज व्यवस्थेने तिचा बळी घेतला होता. आपल्या चांगल्या शिकलेल्या मुलीचा तिच्या पालकांनी स्वतःच मुंबईला घरदार नसणार्या् अल्पशिक्षीत मुलाशी फक्त हुंडा दयायला नको म्ह्णून विवाह करून दिला होता, ज्याने स्वतःच्याच उदरनिर्वाहाचा प्रश्न असताना एका मुलाला जन्म देण्याचा गाढवपणा केला होता. त्यात भर म्ह्णून त्याने बायकोला नोकरी करण्याची परवानगी ही दिली नव्हती. शिल्पाने ही स्वतः स्वतःच जीवनमान सुधारण्यासाठी संघर्ष करण्याऐवजी स्वतःला परिस्थितीच्या स्वाधीन केल होत कारण तिला नवर्याशच्या विरोधात जायच नव्हतं. शिल्पाने आमच्या चाळीत आपल्या गोड स्वभावाने लोकांना त्यांच्या छोट्या – मोठ्या कामात मदत करून त्यांची मने जिंकली होती. त्यामुळे प्रसंगी पोठाची खळगी भरण्यासाठी ती त्यांच्याकडे हक्कने हात पसरू शकत होती. तिचे ते हात पसरणे मला तिच्यासोबतच्या पहिल्या भेटीतच खटकले होते. तिच्या नवर्या चे गावी मालकीचे घर होते त्यामुळे स्वतःसोबत तिची फरफट करण्याची त्याला काही गरजच नव्ह्ती. पण तो हे करीत होता कारण काय तर त्याला दोन वेळच गरम – गरम जेवन मिळावं म्हणून पण त्याची व्यवस्था ही प्रसंगी लोकांपुढे हात पसरून तिलाच करावी लागत होती. पण तरीही शिल्पा प्रचंड आशावादी होती त्याचे मला कौतुक वाटे कारण हा आशावाद तिच्यात तिच्या शिक्षणामुळे आला होता. पण तरी ही तिला जगण्यात फारसा रस राहिला नव्हता हे सत्य होत. तिच्या जाण्याला तो साधा ताप कारणीभूत नक्कीच नव्हता. ती गरोदर असताना तिच्या तब्बेतीकडे केले गेलेले प्रचंड दुर्लक्ष त्याला कारणीभूत होते. आजही आपल्या समाजात पुरूषांकडून स्त्रियांच्या तब्बेती बाबत दाखविला जाणारा निष्काळजीपणा ही शिल्पाच्याच नव्हे तर शिल्पासारख्या हजारो स्त्रियांच्या अकाली जाण्याला कारणीभूत असतो. शिल्पासारख्या स्त्रियांची होणारी कुचंबना समाजाला दिसत असते, ती दूर करण्यास समाज सक्षम ही असतो पण डोळ्यावर गेंडयाच्या चामडीचे झापडं घेतलेला समाज घोड्यासारखा समोरच पाहत राहतो. सतत चार वर्षे अगदी निमुठपणे समाजाच ओझ वाहणार्याच शिल्पाच्या जाण्याची समाजाने काय दखल घेतली तर एका चाळीतील दहा खोळ्यात तिच्या जाण्यावर दहा मिनिटे चर्चा झाली आणि त्यानंतर दहा - पंदरा दिवस निवांत गप्पा मारताना तिच्या जाण्याच्या कारणांवर पोकळ चर्चा झाल्या त्या चर्चा ही काळांतराने त्या चाळीतील हवेत विरगळून गेल्या, आता तर शिल्पाच्या आठवणीही त्या चाळीतील हवेत विरगळून नष्ट झालेल्या आहेत आणि अनेक शिल्पा जशा या पुर्वी समाज मनाच्या विस्मृतीत गेल्या होत्या तशी आणखी एक शिल्पा विस्मृतीत गेली....

    लेखक – निलेश बामणे.

      June 26, 2015


  • नारळांत पाणी

    देवाची करणी  , नारळांत पाणी
    आगळेंच असलें दुसरें पाहीलें फळ ना कोणी ।।

      August 5, 2017


  • कात्रीची करामत

    वामन भोसले यांनी उत्कृष्ट संकलन केलेल्या.. दो रास्ते, मेरा गाव मेरा देश, दोस्ताना, गुलाम, अग्निपथ, परिचय, आँधी, कर्ज, कालिचरण, साहेब, रामलखन, खलनायक, इत्यादी सुपरहिट चित्रपटांना चित्ररसिक कधीही विसरू शकणार नाहीत…

      June 1, 2022


  • परळ

    परळला वाडिया हॉस्पिटलच्या समोर एका चाळीत आम्ही राहात असू. वाडिया हॉस्पिटलहून थोडं पुढे गेलं की के.इ.एम. हॉस्पिटल येतं. सुप्रसिद्ध हाफकिन इन्स्टिटयूट के.इ.एम.च्या शेजारीच आहे. याशिवाय टाटा कॅन्सर आणि बच्चूभाई डोळ्यांचे हॉस्पिटल ही देखील जवळपासच आहेत. यात भर म्हणजे जनावरांचं बैलघोडा हॉस्पिटलही परळचंच. सर्व हॉस्पिटल जवळजवळ एकाच परिसरात येत असल्याने आमच्या घरासमोरचा रस्ता नेहमी गजबजलेला असे. पेशंटस, त्यांचे नातेवाईक, मेडिकलचे विद्यार्थी, नर्सेस या सर्वांचीच रस्त्यावर लगबग असे. धन्यासोबत बैलघोडा हॉस्पिटलकडे जाणारी जनावरेही अधूनमधून दिसत. सकाळी अगदी सातपासून चाळीपुढच्या फूटपाथवर रहदारी सुरु होई.

    समोरच्या वाडिया हॉस्पिटलचे मॅटरनिटी हॉस्पिटल आणि चिल्ड्रन हॉस्पिटल असे दोन विभाग होते. या हॉस्पिटलचे घुमट दूरवरुन नजरेत येत. हॉस्पिटलच्या मागल्या बाजूस नर्सेस क्वार्टर्स आणि नर्सेसच्या जेवणाखाण्यासाठी एक मेस होती. संपूर्ण परळमध्ये हा परिसर मात्र अगदी शांत भासे. शाळेत असताना आम्ही अनेकदा अभ्यासासाठी या मेसच्या आवारात जात असू. गंमत म्हणजे तिथे जाण्यास आम्हाला कधीच कोणी अटकाव केला नाही. उलट तिथल्या सिनिअर सिस्टर्स आम्हाला प्रेमाने चहापाणीही देत असत. शाळेचे दिवस आठवले की तो मेसचा परिसर आणि त्या प्रेमळ सिस्टर्स लगेचच आठवतात. परळच्या या हॉस्पिटल्समध्ये सुखसुविधांची वानवा असतानाही गोरगरीब रोग्यांना उत्कृष्ट दर्जाची वैद्यकीय सेवा उपलब्ध होत असे. साहजिकच या हॉस्पिटल्समध्ये केवळ मुंबईतीलच नव्हे तर बाहेरगावातील पेशंटसचीही रीघ लागलेली असे. शिवसेनेच्या स्थापनेनंतर वामनराव महाडिक, विजय पर्वतकर असे अनेक कार्यकर्ते रोग्यांची देखभाल करण्यासाठी या हॉस्पिटल्समध्ये आवर्जून फेरी मारत आणि त्यामुळेच त्यांच्याविषयी परळ लालबागमधील जनतेच्या मनात आपुलकीचं नातं जोडलं गेलं. शिवसेनाला परळ लालबागमध्ये जम बसविण्यात हा एक महत्त्वपूर्ण घटक ठरला हे इथे आवर्जून नमूद कारवंसं वाटतं.

    हॉस्पिटलप्रमाणे परळमध्ये देवळेही बरीच होती. आमच्या घराच्या थोडं पुढे दत्ताचं देऊळ होतं. याच देवळात मारुतीचंही छोटं देवस्थान होतं. शाळेत परीक्षांच्या दिवसात आमची या देवळातली फेरी ठरलेली. दत्ताच्या देवळाच्या थोडं पुढे जयकरांचं विठ्ठल मंदिर होतं. संपूर्ण परळभर हे मंदिर जयकरांचं देऊळ म्हणूनच ओळखलं जाई. मनवमीच्या दिवशी या देवळात मोठा उत्सव भरत असे. या उत्सवात रामासाठी पाळणाही सजवीत असत. सोहळा संपल्यानंतर सुंठवडयाचा प्रसाद हातावर पडे. त्या सुंठवडयाची चव अजूनही जीभेवर रेंगाळतेच आहे.

    परळमधील कामगार मैदान व नरे पार्क या दोन मैदानंचीही आपल्याला नोंद घ्यावीच लागेल. आर.एम. भट हायस्कूलसमोरील कामगार मैदान आणि शिरोडकर हायस्कूलच्या मागील बाजूस असलेलं नरे पार्क या मैदानांनी अनेक राजकीय उपथापालथी अनुभवल्या. परळ लालबागसारख्या कामगार वस्तीत कम्युनिस्ट पक्षाच्या अनेक महत्त्वपूर्ण सभा या मैदानांवरच गाजल्या. कॉम्रेड डांगे, कॉम्रेड देसाई अशा अनेक समाजवादी नेत्यांच्या घणाघाती भाषणांनी या मैदानांचं नाव सर्वतोमुखी झालं. मात्र पुढे याच मैदानात सभा घेऊन शिवसेनेने आपलं बस्तान बसविण्यास सुरुवात केली व प्रचलित सामाजिक परिस्थितीमुळे त्यात त्यांना यशही लाभलं. अर्थात या सभा संध्याकाळनंतर होत. दिवसभर मात्र या मैदानांवर मुलांचा धुडगूस चाले. कामगार मैदानात संध्याकाळी चार नंतर लाऊडस्पिकरवरुन गाणीही वाजविली जात. येऊ कशी कशी मी नांदायला, गेला हरी कुणा गावा, चल ग हरिणी तुरु तुरु अशी अनेक गाणी लोकप्रिय झाली ती या कामगार मैदानावरील जाहीर प्रसरणांमुळेच.

    परळच्या आठवणी सांगताना तिथल्या काही लोकप्रिय उपहारगृहांविषयी लिहिण्याचा मोह आवरत नाही. दूध आणि मिठाईचे पदार्थ यांसाठी परळच्या नाक्यावरील सांडू आणि धूपकरांची दुकानं सर्वमान्य ठरली होती. या दुकानांतील दुधी हलवा- आणि गुरुवारी घरच्या देवांसमोर दाखविण्यासाठी -पेढे- यांना मोठी मागणी लाभत असे. तेच भाग्य अर्थातच पियुषलाही लाभलं होतं. मुंबईत उडप्यांनी संसार उघडला तेव्हा वाडिया हॉस्पिटलसमोरील मिनाक्षी भुवन दाक्षिणात्य पदार्थांची फौज सर्वप्रथम परळमध्ये उतरवली. उपमा, इडली, मसाला डोसा या पदार्थांची ओळख मिनाक्षी भुवननेच प्रथम परळच्या मराठमोळ्या कामगारांना घडविली. परळच्या नाक्यावरलं फिरदोसी हे इराणी रेस्टॉरंट मुंबईच्या तमाम इराणी हॉटेल्सचं प्रतिनिधित्व परळमध्ये करी. ब्रून मस्का, बन मस्का, प्लमकेक, पुडिंग, ऑम्लेट या पदार्थांची रेलचेल असलेलं हे हॉटेल निरुद्योगींच्या गप्पटप्पांचं माहेरघर मानलं जाई. याशिवाय के.इ.एम. हॉस्पिटलच्या रस्त्यावर मेडिको डायनिंग या नावाची एक गुजराथी खानावळ होती. या खानावळीत गुजराथी थाळी अगदी माफक दरात मिळे. या थाळीतील गरमागरम पुलके आणि अप्रतिम चवीची डाळ यांनी अख्ख्या परळला वेड लावलं होतं. याशिवाय काही मोजक्या हॉटेल्समध्ये मालवणी मांसाहारी पदार्थांनी संबंधीतांशी जिव्हाळ्याचं नात जोडलं होतं. एकदोन मुलतानी हॉटेल्समधील खिमा, चिकन आणि नान परळच्या घराघरात पोहोचले. गौरीशंकर छितरमल मिठाई वाल्याकडील बंगाली मिठाई आणि काही दूधवाल्यांकडची जिलेबी यांनीही परळच्या रहिवाशांच्या घरात मानाचं पान पटकावलं होतं.

    परळचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे सर्व धर्माचे आणि प्रांतांचे लोक गुण्यागोविंदाने राहात. चित्रा सिनेमाच्या जवळ मुसलमानांची वस्ती होती, हिंदमाता सिनेमाजवळ ख्रिश्चन धर्मियांचं प्रशस्त चर्च होतं आणि त्यांची सोसायटीही होती. बच्चूभाई हॉस्पिटलजवळ अनेक चाळींमध्ये ज्यू बांधव राहात. गुजराथी मंडळी तर जवळजवळ प्रत्येक चाळीत स्थिरावली होती व त्यांची मुलं अस्खलीत मराठी बोलत. जवळजवळ प्रत्येक चाळीखाली एका मारवाडयाचं दुकान असे व दुकानातच आतल्या बाजूस संसारही थाटून राहात असे. शिरोडकर हायस्कूल शेजारीच ख्रिश्चन समाजातील एका विशिष्ट गटाचं प्रार्थना मंदिर होतं. या हॉलवरील 'ख्रिस्त सुसमयी पापी लोकांसाठी मरण पावला' ही पाटी परळमधील सर्व रहिवाश्यांना परिचित होती.

    सुमारे तीसएक वर्षांपूर्वी आम्ही परळ सोडलं आणि उपनगरात आलो. आता कधीतरी काही निमित्ताने परळला फेरी होते. या फेरीत परळचा चेहरामोहरा बदलत असल्याचं जाणवतं. सांडूंच्या उपहारगृहाजागी आता कपडयाचं दुकान आलं आहे. नाक्यवरला इराणी आता ग्रिटिंग कार्डस विकतो तर के.इ.एम. समोरच्या इराण्याने औषधांचं दुकान थाटलं आहे! सूर्या सिनेमाच्या जागी आता भव्य इमारत उभी राहिली आहे तर हिंदमाता सिनेमा शॉपिंग मॉल बनला आहे. परळच्या बाह्य रुपात अनेक बदल घडत आहेत. लालबागला आता चाळींच्या जागी गगनचुंबी इमारती येत आहेत. काही वर्षांत तोच प्रकार परळमध्ये सुरु होईल. आमचेही परळशी असलेले ऋणानुबंध आता तुटले आहेत. शिवसेनेच्या भाषेत सागायचं तर आम्ही परळमध्ये आता उपरे झालो आहोत. परंतु परळच्या रस्त्यांवरुन पुढे जाताना जुनं परळ डोळ्यांसमोर येतं. या आमच्या परळचा चेहरामोहरा तोच असतो. ओळखीचा. त्या परळच्या अंतरंगात कुठेतरी आमचाही चेहरा लपलेला असतो. आम्ही सर्वार्थाने परळमय होऊन गेलेलो असतो...
    कायमचेच!

    -सुनील रेगे

      June 28, 2022


  • मनस्वी शिक्षक

    न. प. शा. क्रमांक अकरा समतानगर उस्मानाबाद येथील शाळेत मी मुख्याध्यापिका म्हणून रुजु झाल्या पासून त्यांना अगदी जवळून पाहिले. नवीन शाळा सुरू करण्यात आली होती म्हणून मैदानात काही रोपे लावली होती आणि कुंभार सर शाळेत लवकर येऊन झाडांना पाणी घालणे. आळे करणे कामे करीत असत. अगदी याच अपेक्षेने मुलांना घडवत असत. गणित विषय शिकवण्यात त्यांचा हातखंडा होता. पण दुसरे कोणतेही विषय दिले तरी नाही म्हणणार नाहीत. तिथेही मुलांना कमी पडू दिले नाही. कधीही घरगुती कारण सांगून काम टाळले नाही. साधा राहणी आणि उच्च विचारसरणी.

      May 26, 2022