नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
पाडगावकर/दाते/देव या त्रयीने एकेकाळी संधीकाळातील सुरावट रचली- त्या दूरच्या दिव्यांनाही स्वतःची कहाणी सांगण्यावर बंदी घातली. आता बोलायचे कोणाशी?
December 24, 2020
या पुरस्काराने कार्यक्रम करण्याची नवी उमेद दिली. कळवा स्कूलच्या मदतीसाठी आयोजित केलेल्या शंकर-जयकिशन नाईटमध्ये मी काही गाणी गायली. ओसवाल पार्क कलामंचच्या उद्घाटनाप्रित्यर्थ ‘फर्माईश' हा माझा गझलचा कार्यक्रम झाला. सौ. पारसनीस आणि श्री. पटवर्धन याचे आयोजक होते. यानंतर 'स्वर- गंध' या अंधांसाठी आयोजित केलेल्या सुगम संगीत गायन स्पर्धेचे मी परीक्षण केले. रोटरी क्लब ऑफ ठाणे हिल्स आणि नॅशनल फेडरेशन ऑफ ब्लाईंड यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. शास्त्रीय संगीतावर आधारित हिंदी चित्रपटगीतांचा कार्यक्रम 'मधुबन मे राधिका' आयोजक रमेश पाटील आणि नगरसेवक विलास सामंत यांनी घंटाळी मैदानावर आयोजित केला. या कार्यक्रमात मी अनेक गाणी सादर केली. या कार्यक्रमानंतर नगरसेवक विलास सामंत आणि स्थायी समितीचे सभापती नरेश म्हस्के यांनी 'ठाणे गौरव' पुरस्कारासाठी माझे नाव सुचवले. महापौर संजयजी मोरे यांनी या संदर्भात माझी भेट घेतली आणि काही दिवसातच ठाणे महानगरपालिकेतर्फे देण्यात येणारा 'ठाणे गौरव पुरस्कार' मला जाहीर झाला. याच काळात हिंदू जागृती गणेशोत्सव मंडळासाठी मी 'आरास ही
स्वरांची' हा मराठी व हिंदी गाण्यांचा कार्यक्रम केला. माझा विद्यार्थी मंदार जोशी, विद्यार्थिनी गीता पुरााणिक आणि सुप्रसिद्ध गायिका रंजना जोगळेकर या कार्यक्रमात माझ्याबरोबर गायल्या.
१ ऑक्टोबर २०१५ रोजी ठाणे गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. माजी महापौर मोहन गुप्ते, सतीश प्रधान आणि वसंतराव डावखरे यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथजी शिंदे आणि महापौर संजयजी मोरे यांच्या हस्ते मी 'ठाणे गौरव' पुरस्कार स्वीकारला. या एका वर्षात 'ठाणे नगररत्न' आणि 'ठाणे गौरव' असे दोन पुरस्कार मला मिळाले.
या पुरस्कारांपेक्षाही मोठा आनंद देणारी गोष्ट घडली होती. मी ९९७ जाहीर कार्यक्रम पूर्ण केले होते. आता श्रीगणरायांना पुन्हा वंदन करायचे होते. या माझ्या इच्छेप्रमाणे ९९८ वा कार्यक्रम जनप्रबोधिनी प्रतिष्ठानसाठी टिटवाळा येथे मी श्रीगजाननाच्या चरणी सादर केला आणि त्याचा आशीर्वाद घेतला. पुढील कार्यक्रम मी ठाणेकर रसिकांसाठी केला. ६ डिसेंबर २०१५ रोजी 'स्वर-मंच'तर्फे 'फर्माईश' या माझ्या हिंदी गझलच्या कार्यक्रमाचे मोफत आयोजन करण्यात आले. निवेदन मयुरेश साने याचे होते. रसिकांनी या कार्यक्रमाला मनापासून दाद दिली आणि दुसऱ्याच दिवशी मी गडकरी रंगायतनकडे तारखेसाठी धाव घेतली. माझ्या स्वप्नातल्या एक हजाराव्या कार्यक्रमासाठी तारीख मिळाली २० एप्रिल २०१६ !
-अनिरुद्ध जोशी
August 21, 2022
…… माझ्या दृष्टीने ही विद्यापीठे आहेत. त्यांच्या शिष्यांनी आपलं आभाळ व्यापलंय, पण आभाळात अशा असंख्य आकाशगंगा असतात. या तीन आकाशगंगांच्या निर्मात्यांबद्दल आज एवढंच !
April 17, 2021
चंद्रलेखा हे खरे तर नाटककार वसंत कानेटकरांच्या मुलीचे नाव.त्यांनीच हे नाव वाघांना सुचवले आणि ही नाट्यसंस्था जन्माला आली. पुढच्याच महिन्यात ७ डिसेंबर १९६७ रोजी ‘गारंबीचा बापू’ ह्या नाटकाने ‘चंद्रलेखा’ची सुरुवात झाली.
November 23, 2021
कवितेचा कीड़ा डोक्यात शिरल्यावर काय होते ते – स्वत: चा अनुभव
March 4, 2011
व्यक्तिमत्व आणि व्यवसाय यांना पूरक अशी collar tune असलेले ( ” माणसाने माणसाशी माणसासम वागणे ” ) श्री अशोक देशमाने यांच्याशी आज एकदाची भेट झाली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या ७१ मुला -मुलींना आज त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने पंखाखाली घेऊन मायेची उब दिलेली आहे. नवनवे उपक्रम त्यांच्या मनात आहेत आणि बरंच काही त्यांना अपेक्षित आहे.
September 21, 2021
दोन मित्रांमधे भांडण झाले, खरेतर पहिल्यांदाच असे घडले पण त्या भांडणामुळे एका मित्राने आजवर घडलेल्या अनेक गोष्टींपैकी त्याला त्रास झालेल्या गोष्टी, राग आलेल्या गोष्टी, न पटलेल्या गोष्टी, घृणास्पद वाटलेल्या गोष्टी बोलून दाखवल्या.
December 24, 2021
साला वैताग आहे ! आज पुन्हा निर्मलेने कडकड केली ! आमच्या लग्नाला आता या चोवीस मेला पाच वर्ष होतील .अजून तिच्या स्वभावात काही फरक पडत नाही . तशी ती भांडकुदळ नाही , पण भडक माथ्याची मात्र आहे . कधी कधी फारच लावून धरते , लहान मुलांसारखं . हल्ली तिला भडकायला कसलंही कारण चालत , इतकंच काय ती विनाकारण पण भडकते !पण मला त्याचे खरे कारण माहित आहे ! माझी आई ! आई माझ्या सोबत रहाते , ते तिला नको आहे ! आता मला सांगा , या उतार वयात तिने कोठे जावे आणि का ? डोळे ,कान आदू झालेत , चकरा येतात , बी. पी. ,डायबिटीज सारखे जन्माचे सोबती आहेत ! येथे शहरात डॉक्टर दवाखाना हाकेच्या अंतरावर आहेत . मी निर्मलला परोपरीने सांगून पहिले . पण समजून घेत नाही .
March 23, 2018
माहिती म्हणून सांगतो, मालगाडीच्या गार्डची कॅबिन ही सुविधा शून्य कॅबिन असते. त्यात ना लाईट असतो, ना फॅन असतो, ना बर्थ असतं इतकंच काय त्या कॅबिन मध्ये वॉशरूम च्या नावाखाली फक्त भलं मोठं छिद्र असतं, रुळा कडे उघडणारं, पाणी सुद्धा नसतं हो त्या कॅबिन मधे…..
September 9, 2018
आमची भाषा टिकेल, हें ठीक. पण मग आतां स्वस्थ बसायचं कां? आपल्या जनजीवनात, व्यापार-व्यवहारात इंग्रजीच्या तुलनेने आपल्या मातृभाषेला दुय्यम स्थान मिळूं नये, असं आम्हाला जर वाटत असेल, तर आपण त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या भाषांना आधुनिक संदर्भात समृद्ध बनविण्यासाठी झटलं पाहिजे. त्यासाठी करायच्या काही गोष्टींकडे आपण एक नजर टाकू.
March 23, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti